(पारीत व्दारा श्रीमती वृषाली जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक–27 ऑक्टोंबर, 2021)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 खाली विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) अनुक्रमे जे.एस.व्ही.डेव्हलपमेंट इंडीया लिमिटेड, भोपाळ या कंपनीचा स्थानिक एजंट आणि जे.एस.व्ही.डेव्हलपमेंट इंडीया लिमिटेड, भोपाळ या वित्तीय कंपनी विरुध्द विरुध्दपक्ष वित्तीय कंपनीचे योजने प्रमाणे तिने गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह परत मिळण्यासाठी आणि ईतर अनुषंगीक मागण्यां साठी जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
यातील विरुध्दपक्ष क्रं-1) व क्रं-2) अनुक्रमे जे.एस.व्ही.डेव्हलपमेंट इंडीया लिमिटेड, भोपाळ या वित्तीय कंपनीचा स्थानिक एजंट आहे तर जे.एस.व्ही.डेव्हलपमेंट इंडीया लिमिटेड, भोपाळ ही एक वित्तीय कंपनी आहे. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 1) स्थानिक एजंट याचे माध्यमातून विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनी मध्ये योजने नुसार प्रतीमाह प्रमाणे रकमा गुंतवणूक केल्यात. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे शेडयुलची प्रत दाखल केली, त्या मध्ये खालील प्रमाणे नमुद आहे.
JSV DEVELOPER INDIA LIMITED CERTIFICATE |
Application cum Agreement registered for the Developed/Agriculture based land unit(s) booked as per detail furnished hereunder the terms and conditions printed overleaf. |
Date & Time | 014366 Date-19-01-2011 |
Registration No. & Date of Commencement | 0111050010796 Date-19-01-2011 |
Plan No. & Term | Plan-105 SY-OM |
Consideration Value | Unit-600/ Rupees-60,000/- |
Mode of payment | Monthly |
Number of Installments | 60 |
Installment of Amount | Rs.-1000/- |
Installment due date | On or Before 19th of every month |
Expected Value of Units on expiry of agreement | Rs.-85,000/- (In words Eighty Five Thousand only) |
Date of Last Payment | 19-12-2015 |
Expiry date of Agreement | 19-01-2016 |
Executive Code | 0110001048 |
Name and Address-SMT. HEMLATA H. KAPGATE, R/O PAUNI, DISTT. BHANDARA |
We look forward for your renewed patronage. 10% will be paid extra as bonus at the end term if the Registration Certificate is not lapsed. |
उपरोक्त विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे शेडयुल वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 2 कंपनीचे लॅन्ड युनिट मध्ये प्रत्येक महिन्याचे 19 तारखे पर्यंत प्रतीमाह रुपये-1000/- हप्ता या प्रमाणे एकूण पाच वर्षा करीता म्हणजे 60 महिन्या करीता एकूण रुपये-60,000/-एवढी रक्कम गुंतवणूक करण्यासाठी नोंद दिनांक-19.01.2011 रोजी केली आणि दिनांक- 19.12.2015 रोजी शेवटच्या हप्त्याची रक्कम भरावयाची होती आणि त्यानंतर दिनांक-19.01.2016 रोजी मुदत संपणार होती. विरुध्दपक्षाचे शेडयुल अनुसार मुदत संपण्याचे दिनांकास म्हणजे दिनांक-19.01.2016 रोजी तक्रारकर्तीला रुपये-85,000/- एवढी रक्कम मिळणार होती अशा बाबी विरुदपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे शेडयुल मध्ये नमुद आहे.
तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं 1 यांनी मुदत संपल्या नंतर म्हणजे दिनांक-19.01.2016 रोजी विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनी ही तिने गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह परत करेल असे तिला सांगितले होते आणि वि.प.क्रं 2 वित्तीय कंपनीने रक्कम न दिल्यास विरुध्दपक्ष क्रं 1 हे स्वतः संपूर्ण रक्कम देतील असे सांगितले होते आणि त्या बाबत त्यांनी तहसिलदार, पवनी, जिल्हा भंडारा यांचे समक्ष दिनांक-03.09.2012 रोजी प्रतिज्ञापत्राव्दारे हमीपत्र लिहून दिले होते. त्यामुळे तक्रारकर्ती ही नियमित पणे मासिक हप्त्यांची रक्कम विरुध्दपक्ष क्रं 1 एजंट यांचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनी कडे भरणा करीत होती. अशाप्रकारे तक्रारकर्तीने शेवटचा हप्ता दिनांक-19.12.2015 रोजी भरला आणि विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे शेडयुल प्रमाणे संपूर्ण रकमेचा भरणा केला. विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे शेडयुल प्रमाणे दिनांक-19.01.2016 रोजी मुदत संपल्या नंतर आणि तिने प्रत्येक महिन्या प्रमाणे संपूर्ण रक्कम भरलेली असल्याने वि.प.क्रं 2 वित्तीय कंपनीचे शेडयुल प्रमाणे व्याजासह येणारी रक्कम रुपये-85,000/- देण्याची मागणी विरुध्दपक्ष क्रं 1 प्रतिनिधी आणि विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीकडे केली. परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 प्रतिनिधीने रक्कम देण्या बाबत लिखित स्वरुपात सुचना मिळेल असे सांगितले. परंतु त्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनी कडून कोणतीही लिखीत सुचना तिला न आल्यामुळे तिने विरुध्दपक्ष क्रं 1 प्रतिनिधी कडे विचारणा केली असता त्यांनी वि.प.क्रं 2 चे कार्यालया बाबत त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे उत्तर देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केली. तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनी कडे दिनांक-11.06.2018 रोजी वकीलांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवून विरुध्दपक्ष् क्रं 2 वित्तीय कंपनीचे शेडयूल प्रमाणे रक्कम व्याजासह परत मिळण्याची मागणी केली परंतु सदरची नोटीस वि.प.क्रं 2 वित्तीय कंपनीवर तामील न होता परत आली. त्यानंतर तक्रारकर्तीने विरुध्दपक्ष क्रं 1 एजंट यांना दिनांक-11.10.018 रोजी वकीलांचे मार्फतीने शेडयुल प्रमाणपत्रा प्रमाणे व्याजासह रक्कम देण्याची मागणी केली. सदर नोटीस विरुध्दपक्ष क्रं 1 यांना तामील होऊन सुध्दा विरुध्दपक्षानीं तक्रारकर्तीस शेडयुल नुसार रक्कम परत केली नाही म्हणून शेवटी तिने प्रस्तुत ग्राहक तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्तीची तक्रार मंजूर करुन विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्तीस पॉलिसीची रक्कम रुपये-85,000/’ व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षांना आदेशित व्हावे.
- तक्रारकर्तीला झालेल्या आर्थिक, मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाईची रक्कम विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे.
- सदर तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. जिल्हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने या मधील विरुध्दपक्ष क्रं 1 श्री अरविंद शालीकराम शेन्डे, जे.एस.व्ही.डेव्लपमेंट इंडीया लिमिटेड या कंपनीचा एजंट यास रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविली असता ती स्विकारण्यास नकार या पोस्टाचे शे-यासह परत आल्याने विरुध्दपक्ष क्रं 1 याचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने प्रकरणात दिनांक-14.11.2019 रोजी पारीत केला.
04. जिल्हा ग्राहक आयोगाचे मार्फतीने या मधील विरुध्दपक्ष क्रं 2 चेअरमन, जे.एस.व्ही.डेव्लपमेंट इंडीया लिमिटेड भोपाल यांचे नावे दिनांक-15.12.2019 रोजीचे दैनिक भास्कर या वृत्तपत्रातून जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात आली होती परंतु अशी नोटीस प्रसिध्द होऊनही विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनी तर्फे कोणीही जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाही म्हणून विरुध्दपक्ष क्रं 2 चेअरमन, जे.एस.व्ही.डेव्हलपमेंट इंडीया लिमिटेड, भोपाळ यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने प्रकरणात दिनांक-23.01.2020 रोजी पारीत केला.
05. तक्रारकर्तीची तक्रार, तिने दाखल केलेले दस्तऐवज, शपथे वरील पुरावा आणि तिचे वकील श्री तुळसकर यांचा मौखीक युक्तीवाद यावरुन जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष न्यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्रं 1 एजंट आणि विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीची ग्राहक असल्याची बाब सिध्द होते काय? | होय |
02 | योजनेची मुदत संपल्या नंतरही विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनी आणि वि.प.क्रं 1 तिचा एजंट यांनी तक्रारकर्तीची जमा असलेली रक्कम व्याजासह परत न करुन दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची सिध्द होते काय? | होय |
03 | काय आदेश? | अंतीम आदेशा नुसार |
::कारणे व मिमांसा::
मुद्दा क्रं 1 ते 3
06 तक्रारकर्तीने पुराव्या दाखल विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे शेडयुल आणि विरुध्दपक्ष क्रं 1 एजंट मार्फत मासिक हप्त्यांच्या रकमा भरल्या बाबत पावत्यांच्या प्रती पुराव्यार्थ दाखल केलेल्या आहेत. विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनी असून विरुध्दपक्ष क्रं 1 हे त्या कंपनीचे अधिकृत एजंट आहेत, विरुध्दपक्ष क्रं 1 एजंटने केलेल्या कृत्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीची जबाबदारी (Vicarious liability) येते आणि त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्दपक्ष क्रं 1 एजंट आणि वि.प.क्रं 2 वित्तीय कंपनीची ग्राहक होते आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
07. वर नमुद केल्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 एजंट याने जिल्हा ग्राहक आयोगाची नोटीस स्विकारली नाही तर विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे नावे वृत्तपत्रातून नोटीस प्रसिध्द होऊनही ते जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष उपस्थित झाले नाहीत वा त्यांनी आपले लेखी निवेदन दाखल केलेले नाही. या उलट तक्रारकर्तीची तक्रार सत्यापनावर असून तिने आपला शपथे वरील पुरावा सुध्दा जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेला आहे. तसेच पुराव्या दाखल तिने विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे शेडयुल प्रमाणे योजनेची मुदत संपण्या पर्यंत वेळोवेळी मासिक हप्त्यांच्या रकमा भरल्या बाबत पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत तयावरुन ही बाब सिध्द होते की, तिने विरुध्दपक्ष वित्तीय कंपनीचे योजने प्रमाणे मासिक हप्त्यांच्या रकमा वेळोवेळी भरलेल्या आहेत. मुदत संपल्या नंतरही पैसे न मिळाल्यामुळे आणि विरुध्दपक्ष क्रं 1 एजंट याने कोणतेही लक्ष न दिल्यामुळे तिने विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे नाव आणि पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने कायदेशीर नोटीस पाठविली परंतु ती नोटीस तशीच परत आली. त्यामुळे तिने विरुध्दपक्ष क्रं 1 एजंटला कायदेशीर नोटीस पाठवून रकमेची मागणी केली परंतु नोटीस तामील होऊनही विरुध्दपक्ष क्रं 1 एंजटने कोणताही प्रतिसाद दिला नाही. या सर्व प्रकारामुळे तिला निश्चीतच शारीरीक व मानसिक व आर्थिक त्रास झालेला आहे.
08. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे यामधील विरुध्दपक्ष क्रं 1 हा विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचा अधिकृत एजंट आहे व विरुध्दपक्ष क्रं 1 याने विरुध्दपक्ष क्रं 2 कंपनीने रक्कम न दिल्यास वार्षिक-18 टक्के दराने व्याजासह रक्कम परत करण्याचे लेखी हमीपत्र दिले होते. या संदर्भात तिने विरुध्दपक्ष क्रं 1 श्री अरविंद शालकराम शेन्डे याने तहसिल कार्यालय पवनी येथील सेतू केंद्रात तक्रारकर्तीचे नावे स्टॅम्प पेपरवर जे लेखी हमीपत्र दिनांक-03.09.2012 रोजी नोंदवून दिले त्याची प्रत पुराव्या दाखल अभिलेखावर दाखल केलेली आहे, त्या हमीपत्रा नुसार विरुध्दपक्ष क्रं 1 श्री अरविंद शालीकराम शेन्डे हा विरुध्दपक्ष क्रं 2 जे.एस.व्ही. डेव्हलपर इंडीया लिमिटेडचा एंजट असून त्याचा एंजट क्रं-011-1048 असा आहे. सदर विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनी डबघाईस गेल्यास तो सौ.हेमलता एच. कापगते रजिस्ट्रेशन क्रं-0111050010796 यांना हमीपत्र लिहून देत आहे की, सौ.हेमलता कापगते (तक्रारकर्ती) यांचे कडून दिनांक-19.01.2011 रोजी पासून प्रतीमाह रुपये-1000/- प्रमाणे पाच वर्षा करीता एकूण रुपये-60,000/- जे.एस.डेव्हलपर इंडीया लिमिटेड भोपाल करीता रक्कम स्विकारण्यात येणार आहे. उल्लेखित जे.एस.व्ही. डेव्हलपर इंडीया लिमिटेड डबघाईस, नुकसानीत किंवा बंद पडल्यास हमीपत्र लिहून देणार हे हमीपत्र लिहून घेणार यांचे कडून स्विकारलेली रक्कम 18 टक्के व्याज दराने तत्क्षणीच परत करण्याची हमी देत आहेत.
09. विरुध्दपक्ष क्रं 1 ने उपरोक्त नमुद केल्या प्रमाणे लिहून दिलेल्या हमीपत्रा वरुन ही बाब सिध्द होते की, तो विरुध्दपक्ष क्रं 2 जे.एस.व्ही. डेव्हलपर इंडीया लिमिटेड भोपाळ या कंपनीचा अधिकृत एंजट आहे कारण त्याने त्याचा एजंट क्रमांक सुध्दा हमीपत्रा मध्ये नमुद केलेला आहे. तसेच तक्रारकर्तीने तिचे वकीलांचे मार्फतीने रजि. पोस्टाने जी नोटीस विरुध्दपक्ष क्रं 2 चे भोपाळ येथील पत्त्यावर पाठविली ती नोटीस सदर पत्त्यावर विरुध्दपक्ष क्रं 2 चे कार्यालय नाही या पोस्टाचे शे-यासह परत आल्या बाबत तिने पुराव्या दाखल परत आलेल्या रजिस्टर पोस्टाव्दारे पाठविलेल्या पॉकीटची पोस्टाचे शे-यासह प्रत दाखल केलेली आहे.
10. तक्रारकर्तीने जो आपला शपथे वरील पुरावा जिल्हा ग्राहक आयोगा समोर दाखल केलेला आहे, त्यामध्ये तिने असे नमुद केले आहे की, विरुध्दपक्ष क्रं 1 हा विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचा एजंट असून त्याचा एजंट क्रं-0111048 असा आहे आणि विरुध्दपक्ष क्रं 1 हा माझ्या कडून नियमित मासिक किस्तीची रक्कम वसुल करीत होता. विरुध्दपक्ष क्रं 1 याने दिनांक-03.09.2012 रोजी रक्कम व्याजासह परत करण्याचे लेखी हमीपत्र लिहून दिले असल्याने तिने मासिक हप्त्याच्या रकमा भरल्यात आणि दिनांक-19.01.2016 ला मुदत संपल्या नंतर पॉलिसीची रक्कम रुपये-85,000/- परत करण्याची विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे कडे मागणी केली. तसेच वि.प.क्रं 2 वित्तीय कंपनीला रजि. पोस्टाने पाठविलेली नोटीस परत आली. त्यानंतर वि.प.क्रं 1 ला रजि.पोस्टाची नोटीस तामील झाल्या बाबत पोच प्राप्त झाली परंतु त्याने सुध्दा रक्कम परत केली नाही.
11. तक्रारकर्तीचे तक्रारी प्रमाणे तिने विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे योजने प्रमाणे दिनांक-19.01.2011 पासून ते शेवटचा हप्ता दिनांक-19.12.2015 पर्यंत प्रतीमाह रुपये-1000/- प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 एजंटचे मार्फतीने पूर्ण रकमेचा भरणा केलेला आहे परंतु तिने अभिलेखावर जे.एस.व्ही.डेव्लपर इंडीया लिमिटेडच्या दिनांक-19 जानेवारी, 2011 पासून ते डिसेंबर-2015 या कालावधी पर्यंतच्या रक्कम भरल्याच्या ज्या पावत्याच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. त्यावरुन असे दिसून येते की, तिने सन-2011 मध्ये नियमित रकमा भरलेल्या आहेत. सन-2012 मध्ये माहे फरवरी-12 व सप्टेंबर-12 च्या पावत्या वगळता अन्य महिन्यांच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. सन-2013 मध्ये माहे जुलै-13, सप्टेंबर-13, ऑक्टोंबर-13, नोव्हेंबर -13 आणि डिसेंबर-13 च्या पावत्यांच्या प्रती दाखल आहेत. सन-2014 मध्ये जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर-2014 अशा हप्त्यांच्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. तर सन-2015 मध्ये मार्च, एप्रिल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर-2015 च्या पावत्या दाखल केलेल्या आहेत. या मध्ये तिने काही महिन्यांच्या पावत्या जोडलेल्या नाहीत. परंतु तिने आपले शपथे वरील पुराव्यात असे नमुद केलेले आहे की, तिने दिनांक-19.01.2011 पासून ते योजनेची मुदत संपल्याचा दिनांक-19.12.2015 पर्यंत संपूर्ण मासिक हप्त्यांच्या रकमा जमा केलेल्या आहेत, ज्या अर्थी तिने वर नमुद केल्या प्रमाणे पावत्यांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत आणि शेवटच्या मासिक किस्तीची रक्कम भरल्या बाबतची पावती अभिलेखावर दाखल केलेली आहे आणि आपल्या शपथे वरील पुराव्यात योजने प्रमाणे संपूर्ण रक्कम भरल्याचे नमुद केलेले आहे, त्याअर्थी तिने योजनेच्या सुरुवाती पासून ते शेवटच्या कालावधी पर्यंत मासिक हप्त्याच्या रकमा भरल्याची बाब सिध्द होते. तिने विरुध्दपक्षां विरुध्द केलेले आरोप विरुध्दपक्षांना संधी देऊनही त्यांनी खोडून काढलेली नाही. असे दिसून येते की, विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे शेडयुल प्रमाणे प्रती महिना रुपये-1000/- प्रमाणे एका वर्षा करीता रुपये-12000/- भरल्यास व्याजासह वर्षाला रुपये-17,000/- मिळणार होते आणि प्रती महिन्या प्रमाणे पाच वर्षा करीता रुपये-60,000/- भरल्यास व्याजासह रुपये-85,000/- मिळणार होते. परंतु वर नमुद केल्या प्रमाणे आज पर्यंत तिने भरलेली रक्कम व्याजासह तिला परत मिळालेली नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 एजंट आणि विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीने तिला घसघशीत जास्त दराने व्याज देण्याचे प्रलोभन दाखवून तिचे कडून रकमेची वसुली केली परंतु योजनेची मुदत संपल्या नंतरही आज पर्यंत व्याजासह कोणतीही रक्कम तिला परत केलेली नाही आणि विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी तिला दिलेली दोषपूर्ण सेवा असून अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही मुद्दा क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
12 मुद्दा क्रं 1 व क्रं 2 चे उत्तर होकारार्थी नोंदविल्या मुळे मुद्दा क्रं 3 अनुसार तक्रारकर्तीची तक्रार विरुध्दपक्षां विरुध्द अंशतः मंजूर होण्यास पात्र आहे. तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनीचे योजने प्रमाणे दिनांक-19.01.2016 रोजी देय असलेली व्याजासह रक्कम रुपये-85,000/- परत करण्या बाबत विरुध्दपक्षांना आदेशित करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे. या शिवाय तिला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च रुपये-5000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
13. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन जिल्हा ग्राहक आयोग प्रस्तुत तक्रारीमध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
:: अंतिम आदेश ::
- तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्दपक्ष क्रं 1 श्री अरविंद शालीकराम शेन्डे, एजंट-जे.एस.व्ही. डेव्हपमेंट इंडीया लिमिटेड, भोपाळ (एजंट क्रमांक-0110001048) आणि विरुध्दपक्ष क्रं-2 जे.एस.व्ही. डेव्हलपमेंट इंडीया लिमिटेड भोपाळ ही वित्तीय कंपनी आणि तिचे तर्फे तिचे चेअरमन यांचे विरुध्द खालील प्रमाणे वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष 1 एजंट आणि विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनी आणि तिचे तर्फे चेअरमन यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिने विरुध्दपक्ष क्रं 1 एजंटचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 2 वित्तीय कंपनी मध्ये योजने प्रमाणे संपूर्ण रक्कम भरलेली असल्याने दिनांक-19.01.2016 रोजी व्याजासह देय असलेली रक्कम रुपये-85,000/- (अक्षरी रुपये पंच्च्याऐंशी हजार फक्त) परत करावी आणि सदर रकमेवर दिनांक-20.01.2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18 टक्के दराने व्याज विरुध्दपक्ष क्रं 1 व 2 यांनी तक्रारकर्तीला दयावे.
- विरुध्दपक्ष क्रं.-1 व क्रं 2 यांचे दोषपूर्ण सेवेमुळे आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्यामुळे तक्रारकर्तीला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं-1 व क्रं-2 यांनी तक्रारकर्तीला द्यावेत.
- सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 श्री अरविंद शालीकराम शेन्डे, राहणार-पवनी, एजंट- जे.एस.व्ही. डेव्हपमेंट इंडीया लिमिटेड, भोपाळ (एजंट क्रमांक-0111048) आणि विरुध्दपक्ष क्रं-2 जे.एस.व्ही. डेव्हलपमेंट इंडीया लिमिटेड भोपाळ ही वित्तीय कंपनी आणि तिचे तर्फे तिचे चेअरमन यांनी प्रस्तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- उभय पक्षांनी दाखल केलेल्या अतिरिक्त फाईल्स जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्यात.