::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 16/12/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदार क्रं. 2 ही अर्जदार क्रं. 1 ची आई आहे. अर्जदार क्रं. 1 तर्फे अर्जदार क्रं. 2 यांनी गैरअर्जदाराशी कराराप्रमाणे संपूर्ण आर्थिक व्यवहार केलेला आहे. अर्जदाराने गैरअर्जदारापासून दि. 16/08/10 ला जमीन खरेदी करण्याचा करारनामा केला. त्या करारनाम्याच्या अनुषंगाने गैरअर्जदाराला प्लॉटची पूर्ण रक्कम मिळाल्यानंतर सदर प्लॉटचे विक्रीपञ दि. 15/08/11 ला करण्याचे ठरविले होते. अर्जदाराने गैरअर्जदाराला सदर प्लॉट करीता एकूण रक्कम 75,000/- दिली होती. करारानुसार गैरअर्जदाराने सदर प्लॉटचे ले-आऊट करुन अर्जदाराला विक्रीपञ करुन दयायचे होते परंतु गैरअर्जदाराने ले-आऊट न केल्यामुळे व अर्जदाराला सदर प्लॉटचे विक्री पञ करुन न दिल्यामुळे सबब अर्जदाराने गैरअर्जदाराला दि. 25/03/14 ला वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठवून सदर भुखंडाची विक्री करुन देण्याची विनंती केली. सदर नोटीस प्राप्त होवून सुध्दा गैरअर्जदाराने त्यावर दखल न घेतल्यामुळे अर्जदाराप्रति सेवेत ञुटी दिली असल्याने अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली केली आहे.
2. अर्जदाराची तक्रार दाखल होवून अर्जदाराच्या वकीलातर्फे प्राथमिक युक्तीवाद ऐकण्यात आला. अर्जदाराच्या प्राथमिक युक्तीवादात व तक्रार व दस्ताऐवजाची पडताळणी करुन सदर मंच खालील असलेले कारणे व निष्कर्षानुसार खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
कारणे व निष्कर्ष
3. अर्जदार क्रं. 1 ने अर्जदार क्रं. 2 ला सदर तक्रार दाखल करण्याचे कोणतेही अधिकार पञ किंवा आम मुख्त्यार पञ दिले आहे यासंदर्भात कोणतेही दस्ताऐवज दाखल केले नाही. अर्जदाराने नि. क्रं. 5 वर दस्त क्रं. 1 ईसारपञ ची पडताळणी करतांना असे दिसते कि, गैरअर्जदारानें अर्जदाराला सदर प्लॉटची विक्रीपञ दि. 15/8/11 ला करुन देण्याचे ठरले होते. अर्जदाराचा तक्रारीनुसार गैरअर्जदाराने ठरलेल्या दिवशी अर्जदाराला विक्रीपञ करुन दिले नाही सबब मंचाच्या मताप्रमाणे सदर तक्रार दाखल करण्याचे कारण 16/08/11 ला घडले. ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 24 (अ) (1) प्रमाणे सदर तक्रार कारण घडल्याचे मुदतीच्या आत दाखलकरण्यात आली नसल्याने खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
//अंतीम आदेश//
(1) अर्जदाराची तक्रार अस्विकृत करण्यात येत आहे.
(2) अर्जदाराला तक्रारीतील मूळ प्रत सोडून उर्वरित प्रति परत देण्यात याव्या.
(3) अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 16/12/2014