(पारित दिनांक-06 डिसेंबर, 2021)
(व्दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्य)
01. सदर पुर्नविचार अर्जाचे प्रकरणात अर्जदार (मूळ विरुध्दपक्ष) डॉ. योगेश जिभकाटे यांनी असे नमुद केले की, जिल्हा ग्राहक आयोग, भंडारा यांनी मूळ ग्राहक तक्रार क्रं-CC/17/79 मध्ये दिनांक-15.02.2021 रोजी जे निकालपत्र पारीत केलेले आहे, त्या निकालपत्रातील अंतिम आदेशा बाबत पुर्नविचार करण्यात यावा अशी विनंती केली. अर्जदार डॉ.योगेश जिभकाटे यांनी त्यांचे पुर्नविचार अर्जाचे प्रकरणात क्रं 1 ते 10 मुद्दे मांडलेले आहेत. सदरचे अर्जावर गैरअर्जदार श्री अरुण वाघमारे (मूळ तक्रारकर्ता) यांनी दिनांक-22.01.2021 रोजी आपले लेखी उत्तर सादर करुन अर्जदार डॉ.जिभकाटे यांनी उपस्थित केलेले क्रं 1 ते 10 मुद्दे खोडून काढलेले आहेत.
02. अर्जदार डॉ.योगेश जिभकाटे यांचे पुर्नविचार अर्जावर उभय पक्षांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. सदरचे अर्जावर जिल्हा ग्राहक आयोगा तर्फे नविन ग्राहक संरक्षण कायदा-2019 च्या कलम-40 चा विचार करण्यात येते, त्यामध्ये खालील प्रमाणे तरतुद नमूद आहे-
40. Review by District Commission in certain cases.-
The District Commission shall have the power to review any of the order passed by it if there is an error apparent on the face of the record, either of its own motion or on an application made by any of the parties within thirty days of such order.
This clause provides that a District Commission shall have the power to review its orders if there is any error apparent on the face of record. (Notes on Clauses).
वरील तरतुद लक्षात घेऊन जिल्हा ग्राहक आयेागाने अर्जदार डॉ. योगेश जिभकाटे यांचा पुर्नविचार अर्ज तसेच मूळ तक्रारीतील निकालपत्र आणि मूळ तक्रारीतील संपूर्ण अभिलेखाचे अवलोकन केले, त्यावरुन मूळ तक्रारीतील निकालपत्रा मध्ये मुख्य मुद्दे विचार करण्यास सुटलेले आहेत असे दिसून येत नाही, त्याच बरोबर ग्राहक सरंक्षण कायदयातील तरतुदींचे हनन झाल्याची बाब सुध्दा दिसून येत नाही. पुर्नविचार अर्जा मधील अर्जदार डॉ.योगेश जिभकाटे यांनी उपस्थित केलेले अ.क्रं 1 ते 10 मुद्दे हे आधारहिन असल्याचे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे, करीता पुर्नविचार अर्जाचे प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
-आदेश-
- अर्जदार (मूळ विरुध्दपक्ष) डॉ.योगेश जिभकाटे यांचा पुर्नविचार अर्ज RA/21/1 खारीज करण्यात येतो.
- सदर आदेशाची नोंद उभय पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांनी घ्यावी.
- जिल्हा ग्राहक आयोग, भंडारा यांनी मूळ ग्राहक तक्रार क्रं-CC/17/79 मध्ये दिनांक-15.02.2021 रोजी पारीत केलेले निकालपत्र कायम ठेवण्यात येते.