जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे
तक्रार क्र.210/10 रजि.तारीखः-09/07/10
निकाल तारीखः-26/09/2012
श्री.रोशनसिंग लक्ष्मणसिंग पवार,
रा.पंजाबी कॉलनी, मोहाडी उपनगर, धुळे. .......तक्रारदार
विरुध्द
1. श्री.अरिहंत नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे,
रा.अरिहंत अपार्टमेंट, महाविर सोसायटी जवळ,
मोहाडी रोड, धुळे.
(नोटीसीची बजावणी जनरल मॅनेजर यांचेवर करावी.)
2. श्री.राजेंद्र पन्नालाल संघवी, चेअरमन.
3. श्री.श्रीकांत ब्रिजलाल अग्रवाल, संचालक.
4. श्री.दिलीप दत्तात्रय महाले, संचालक,
नं.2 ते 4 रा.व्दारा श्री.अरिहंत नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे,
रा.अरिहंत अपार्टमेंट, महाविर सोसायटी जवळ,
मोहाडी रोड, धुळे.
5. श्री.रमाकांत वसंतलाल अग्रवाल, संचालक,
रा.आग्रा रोड, डी.कॉर शोरुमच्या वरती,
पोलिस चौकीजवळ, आग्रारोड, धुळे.
6. श्री.महेश मदनलाल बागरेचा, संचालक,
रा.32, महावीर सोसायटी, मालेगांव रोड, धुळे.
7. श्री.पंकज कांतीलाल शाह, संचालक,
रा.अग्रवाल नगर, भतवाल हॉस्पीटल जवळ, धुळे.
8. श्री.प्रफुल्ल शांतीलाल लोढा, संचालक,
रा.महावीर सोसायटी, बालाजी सहनिवास समोर,
मालेगांव रोड, सोसायटी पेट्रोल पंपामागे, धुळे.
9. श्री.सुरेश चंदुलाला खंडेलवाल, संचालक,
रा.स्नेह नगर, किशोर आप्पा यांचे घराजवळ,
मालेगांव रोड, धुळे.
10. श्री.किशोर रामा केदार, संचालक,
रा.26/15, महाविर सोसायटी, मालेगांव रोड, धुळे.
तक्रार क्र.210/10
11. श्री.पुरुषोत्तम रघुनाथ चौधरी, संचालक,
रा.जयेश ऑटो पाटर्स, हायवे-मोहाडी चौफुली,
बॉम्बे आग्रा रोड, धुळे. .......विरुध्द पक्ष
कोरम - श्री.डी.डी.मडके, अध्यक्ष
सौ.एस.एस.जैन, सदस्य
तक्रारदार तर्फेः-अॅड.एम.बी.पवार
विरुध्द पक्ष – एकतर्फा
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम व बचत खात्यात जमा असलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष श्री.अरिहंत नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत गुंतविलेल्या रकमेचा व बचत खात्यात जमा असलेल्या रकमेचा तपशील खालील प्रमाणे.
मुदत ठेव पावती क्रमांक |
ठेव रक्कम |
ठेव दिनांक |
देय रक्कम |
देय दिनांक |
003376 |
20,000/- |
04/07/05 |
40,000/- |
13/08/09 |
003377 |
20,000/- |
04/07/05 |
40,000/- |
13/08/09 |
003378 |
20,000/- |
04/07/05 |
40,000/- |
13/08/09 |
बचत खाते क्रमांक |
जमा रक्कम |
जमा दिनांक |
1005 |
03/03/09 |
1,40,047/- |
3. तक्रारदार यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष
तक्रार क्र.210/10
यांचेकडून मुदत ठेव पावती व बचत खातयाततील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
4. विरुध्द पक्ष यांना प्रथम पोस्टाने व नंतर जाहिर प्रगटन देवून नोटीस देण्यात आली. परंतू कोणीही हजर झाले नाही त्यामुळे प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदार यांची तक्रार यांचा विचार होता तक्रारीच्या न्यायनर्णियासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय? होय.
2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
3. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
4. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
6. मुद्दा क्र.1- तक्रारदार यांनी नि.5/1 ते 5/3 वर मुदत ठेव पावतींच्या झेरॉक्स प्रती व नि.5/4 वर बचत खात्याची झोरॉक्स प्रत सादर केलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावती व बचत खात्याची रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावती, बचत खाते तसेच त्यातील रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्दा क्र.2- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत व बचत खात्यात रकमा गुंतवल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावतीत गुंतवलेली रक्कम व बचत खात्यात जमा असलेली रक्कम परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
8. मुद्दा क्र.3- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावती व बचत खात्यातील व्याजासह होणारी रक्कम श्री.अरिहंत नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे व विरुध्द पक्ष क्र.2 ते
तक्रार क्र.210/10
11 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has beenrecorded above, I am of the view that asociety registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision ofConsumer Protection Act is entertain able against the society, the Directors ormembers of the managing committee cannot be held responsible in view of thescheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members ofthe managing committee of the societies responsible, without observing theprocedure proscribed under the Act, would also be against the principles ofco-operation,which is the very foundation of establishment of the co-operativesocieties.
9. वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तीकरित्या रक्कम देण्यास जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे विरुध्द पक्ष क्र.1 श्री.अरिहंत नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे यांचेकडून मुदत ठेव पावती व बचत खात्यामधील व्याजासह होणारी रक्कम मिळण्यास पात्र आहेत. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना श्री.अरिहंत नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे श्री.अरिहंत नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे यांच्या कडून अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.1000/- व मानसिक त्रासापोटी रु.500/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
10. मुद्दा क्र.4 - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. श्री.अरिहंत नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे यांनी तक्रारदर यांना मुदत ठेव पावतीमधील मुदत अंती देय रक्कम व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज व बचत खात्यातमधील जमा रक्कम व त्यावर जमा तारेखपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसाचे आत अदा करावेत.
तक्रार क्र.210/10
3. श्री.अरिहंत नागरी सह.पतसंस्था मर्या., धुळे यांनी तक्रारदर यांना मानसिक त्रासापोटी रु.1000/- तसेच अर्जाचा खर्च रू.500/- या आदेशाच्या प्राप्तीपासून 30 दिवसाचे आत अदा करावेत.
4. वर नमुद आदेश क्र.2 मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सौ.एस.एस.जैन) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे.