:: आदेश नि.क्र.01 वर ::
(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन. कांबळे, मा.अध्यक्ष.)
(पारीत दिनांक :07 एप्रिल, 2012)
1. अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. तक्रार प्राथमिक सुनावणी करीता दिनांक 03.04.2012 रोजी न्यायमंचा समक्ष ठेवण्यात आली. प्राथमिक सुनावणीचे वेळी न्यायमंचाद्वारे तक्रारीचे अवलोकन केले. प्रस्तुत तक्रार न्यायमंचाचे कार्यक्षेत्रात मोडते काय ? याचा खुलासा अर्जदाराने करावा, असा आदेश निशाणी क्रमांक 1 वर पारीत करण्यांत आला. सदर तक्रार आज रोजी प्राथमिक सुनावणी करीता ठेवण्यांत आली.
ग्राहक तक्रार क्रमांक-38/2012
2. अर्जदारा तर्फे वकील यांची प्राथमिक सुनावणी ऐकण्यांत आली. गैरअर्जदार हा मंचाचे कार्यक्षेत्रातील राहणारा किंवा व्यवसाय करणारा नाही, ही बाब स्पष्ट होते आणि त्यामुळे सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 (2) अंतर्गत स्विकारण्यास पात्र नाही, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत आहे. अर्जदाराचे वकील यांनी प्राथमिक सुनावणीचे वेळी, तक्रारीतील काही मजकूरात बदल करावयाचा असल्यामुळे सदर तक्रार परत घेवून पुन्हा नविन तक्रार दाखल करण्याची परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज नि.क्र.5 वर दाखल केला.
3. सबब अर्जदाराने तक्रार अर्ज परत घेण्याचा अर्ज नि.क्र.5 वर दाखल केला असल्यामुळे तसेच तक्रार प्राथमिक दृष्टीने उपलब्ध रेकॉर्ड वरुन स्विकारण्यास योग्य नाही, असे न्यायमंचाचे स्पष्ट मत असल्यामुळे, तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
::आदेश::
1) अर्जदाराची तक्रार खारीज.
2) अर्जदाराला नविन तक्रार दाखल करण्याची मुभा देण्यात येते.
3) प्रबंधक, जिल्हा मंच यांना आदेशीत करण्यांत येते की, त्यांनी सदर प्रकरणात
अर्जदाराने मूळ कागदपत्रे दाखल केली असल्यास, त्याच्या झेरॉक्स प्रती रेकॉर्डवर
घेऊन मूळ कागदपत्र अर्जदारास परत करण्यात यावे. तसेच सदस्य संच परत
करण्यात यावे.
वर्धा
दि.-07/04/2012