(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 23/09/2010) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 02.01.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने गृह निर्माण करण्या करीता घेण्याचे उद्देशाने गैरअर्जदारांकडे अर्ज केला व रु.80,000/- कर्ज खाते क्रमांक 0000001091 अन्वये दि.20.03.1992 ला घेतले होते. सदर कर्ज घेत असतांना तक्रारकर्ता क्र.1 यांनी गैरअर्जदारांकडे भुखंडांचे दस्तावेज व जीवन विमा पॉलिसी जमा केली. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांना रु.80,000/- कर्जाची संपूर्ण रक्कम व्याजासह फेब्रुवारी-2009 पर्यंत न चुकता जमा केली असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. कर्जाची संपूर्ण रक्कम दिल्यामुळे तक्रारकर्ता क्र.1 यांनी गैरअर्जदारांकडे दस्तावेजांची मागणी केली. परंतु गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास वारंवार वेगवेगळी कारणे देऊन परत पाठविले, त्यामुळे तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे. 3. प्रस्तुत तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत अली असता त्यांनी आपले उत्तर दाखल केलेले असुन ते खालिल प्रमाणे आहे... 4. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्यांनी कर्ज घेतेवेळी 1) वाटणी यादीची कार्बन कॉपीवर नामदेव कायरकर व कल्पना कायरकर यांनी सही करुन दिली होती. 2) वारसान प्रमाणपत्र तहसिलदार, ब्रम्हपूरी यांनी खटू हनूजी कायरकरचा मृत्यू झाल्यावर नामदेव कायरकरच्या नावाने दिले आहे. 3) नामदेव कायरकर यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र 4) खटू हनूजी कायरकर यांचे मृत्यूचा दाखला. 5) 7/12 चा उतारा, 6) कराची पावती, 7) बांधकामाचे प्लान, 8) लिगल एडव्हायसर रिपोर्ट, 9) ग्राम पंचायतचे प्रमाणपत्र व 10) बांधकामाची परवानगी अशी बांधकामाचे कागदपत्रांच्या फोटो कॉपी दिल्या होत्या. 5. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या परिच्छेद निहाय उत्तरात तारण म्हणून भुखंडांच्या दस्तावेजांच्या कार्बन कॉपी जमा केल्या होत्या व जीवन विमा पॉलिसीचे दस्तावेजे तक्रारकर्त्याने जमा केले होते. तसेच तक्रारकर्त्यांचे इतर सर्व म्हणणू त्यांनी नाकारलेले असुन सदर तक्रार खारिज करण्यांची विनंती केलेली आहे. 6. प्रस्तुत तक्रार मंचासमक्ष दि.13.09.2010 रोजी युक्तिवादाकरीता आली असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. तक्रारकर्ता क्र.1 ने गैरअर्जदार क्र.1 संस्थेकडून गृह निर्माण करण्या करता रु.80,000/- कर्ज घेतले होते व सदर कर्ज गैरअर्जदारांनी दि.20.03.1992 ला मंजूर केले असुन ही बाब उभय पक्षांच्या कथनावरुन स्पष्ट होते, त्यामुळे तक्रारकर्ते हे गैरअर्जदारांचे ‘ग्राहक’ ठरतात. 8. तक्रारकर्त्यांनी गृह कर्ज घेत असतांना गैरअर्जदारांकडे भुखंडांचे दस्तावेज व जीवन विमा पॉलिसी जमा केली होती असे तक्रारीत नमुद केले आहे. गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्यांनी त्यांचेकडे वाटणीचे दस्तावेजांची कार्बन कॉपी, वारसान प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, मृत्यूचा दाखला, 7/12 चा उतारा, कराची पावती, बांधकामाचा प्लॉन, लीगल एडव्हायझर रिपोर्ट, ग्राम पंचायतचे प्रमाणपत्र व बांधकामाची परवानगी असे दस्तावेज होते, ही बाब मान्य केलेली आहे. 9. गैरअर्जदारांनी वाटणी प्रमाणपत्राची कार्बन कॉपी होती व इतर दस्तावेजांवर फोटो कॉपी असे नमुद केलेले आहे. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांकडे सर्व दस्तावेज मुळ स्वरुपात जमा केले होते असे दर्शविणारा कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही. 10. मंचाच्या मते तक्रारकर्त्यांनी कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यानंतर गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांस पत्र पाठवुन कर्जाची संपूर्ण परतफेड झाल्याचे प्रमाणपत्र द्यावयास पाहीजे होते. तसेच तक्रारकर्त्याने जे दस्तावेज दाखल केलेले होते ते संपूर्ण दस्तावेज परत करावयास पाहिजे होते, तसे त्यांनी केलेले नाही किंवा दस्तावेज परत करण्याची कोणतीही तसदी घेतल्याचे कोणत्यांही दस्तावेजांवरुन स्पष्ट होत नाही, ही गैरअर्जदारांचे सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे मत आहे. 11. गैरअर्जदारांनी दि.13.09.2010 रोजी युक्तिवादाचे वेळी निशाणी क्र.20 वर पुरसिस दाखल करुन तक्रारकर्त्यांचे त्यांचेकडे जमा केलेल्या वाटणीच्या यादीची कार्बन कॉपी दाखल केलेली आहे. यावरुन हे स्पष्ट होते की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना त्यांचेकडे दस्तावेज असुन सुध्दा परत केले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यास वारंवार गैरअर्जदारांचे कार्यालयात जावे लागल्यामुळे साहजिकच मानसिक व शारीरिक त्रास झालेला आहे. 12. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांस दस्तावेज न दिल्यामुळे त्याला सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करावी लागली व त्यामुळे तक्रारकर्त्यास तक्रारीचा देखिल खर्च आलेला आहे. 13. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांस कर्जाची संपूर्ण रकमेची परतफेड झाल्याचे प्रमाणपत्र द्यावे तसेच तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांने सदर तक्रारीत दाखल केलेली वाटणीची यादी स्विकारावी असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदारांनी वाटणीच्या व्यतिरिक्त इतर सर्व दस्तावेज कर्ज घेते वेळी जे जमा केले ते ज्या स्वरुपात होते ते सर्व परत करावे. 14. तक्रारकर्त्यांनी तक्रारीमध्ये नुकसान भरपाई बद्दल रु.4,75,000/- ची मागणी केलेली आहे. सदर मागणी न्याय संगत असल्यासंबंधी कोणताही योग्य खुलासा अथवा पुरावा तक्रारकर्त्यांनी दिला नाही. तसेच तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांकडे कर्ज घेण्याकरीता दिलेले दस्तावेज हे फोटो कॉपी होते, त्यामुळे मूळ दस्तावेजांमुळे कोणतेही कार्य तक्रारकर्ते करु शकले नाही किंवा तक्रारकर्त्यांना अडचण निर्माण झाली असे काही स्पष्ट होत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी केलेली नुकसान भरपाईची मागणी अवास्तव असुन नैसर्गीक न्याय दृष्टया तो रु.1,000/- मिळण्यांस पात्र ठरतो. तसेच तक्रारीचा खर्च रु.1,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करण्यांत येते. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांनी दाखल केलेली वाटणीच्या यादीची कार्बन कॉपी घेऊन जावी. तसेच गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांला वाटणीच्या यादी व्यतिरिक्त इतर सर्व दस्तावेज तक्रारकर्त्यांस परत करावी व तक्रारकर्त्यांस कर्जाची परतफेड पूर्ण झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र द्यावे. 4. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यांना मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रु.1,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- अदा करावे. 5. गैरअर्जदारांनी वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. 6. तक्रारकर्त्याने मा. सदस्यांकरीता दाखल केलेल्या (ब,क) प्रति 1 महिन्याच्या आंत घेऊन जाव्यात. अन्यथा 20(5) Consumer Protection Regulation 2005 अन्वये नष्ट करण्यांत येईल. (मिलींद केदार) (विजयसिंग राणे) सदस्य अध्यक्ष
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |