नि.17 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 52/2011 नोंदणी तारीख – 16/03/2011 निकाल तारीख – 14/07/2011 निकाल कालावधी – 120 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) -------------------------------------------------------------------------------- सौ. सीमा अधिक कदम लग्नानंतरचे नांव लग्नापूर्वीचे नांव सिमा बबन पवार रा. 452, करंजे तर्फे सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री.प्रमोद बाबर ) विरुध्द 1. आपुलकी को-ऑप. क्रे. सोसायटी लि., मुंबई शाखा सातारा चे समन्स मा. चेअरमन, हरिश्चंद्र मनोहर गोळे, यांचेवर बजवावे रा.मु.पो.अरबवाडी, ता. कोरेगांव, जि. सातारा 2. मा. सेक्रेटरी, श्री. पोपट मानसिंग मांढरे, आपुलकी को-ऑप. क्रे. सोसायटी लि., मुंबई रा. प्रेमसंबंध म्हात्रे चाळ, साईनाथ नगर, भांडुप पुर्व मुंबई. 3. मा. खजिनदार 3.आपुलकी को-ऑप. क्रे. सोसायटी लि., मुंबई श्री. अंकुश शंकरराव नावडकर रा. औधुंबर को-ऑप. क्रे. सोसायटी, शिवसागार अपार्टमेंट, बी, बिंग, 1 ला माळा, टिळकनगर, चेंबुर, मुंबई 4. मा. व्यवस्थापक, सौ. सविता संदीप वाघ रा. आपुलकी को-ऑप. क्रे. सोसायटी लि., मुंबई 178 ब, महसुल भवन गाळा नं. 63, रविवार पेठ, सातारा. ----- जाबदार क्र. 1 ते 4 (अभियोक्ता श्री.पी.एम.कांबळे ) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा आपुलकी स्नेह विकास पत्र योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. सदरच्या ठेवींची मुदत संपलेली नाही. अर्जदार यांना आपल्या आर्थिक गरजा पुर्ण करण्यासाठी रकमेची आवश्यकता असल्याने मुदत ठेव पावतीची देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्याजसहित देय झालेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी एकूण रक्कम रु.33,000/- तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत प्रकरणात जाबदार क्र. 1 ते 4 हे या प्रकरणात हजर झालेले आहेत व त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि.13 व शपथपत्र नि. 14 कडे दाखल केलेले आहे. 3. अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 5 सोबत 5/1 ते 5/17 ला दाखल केलेल्या एकूण 33 मूळ ठेवपावत्या पाहिल्या. 4. जाबदार क्र. 1 ते 4 यांनी त्यांचे म्हणणे/ कैफियत व अॅफिडेव्हट नि. 13 कडे दाखल केले आहे. त्यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे. तक्रारदार यांनी जाबदारांकडे त्यांच्या ठेवीची रक्कम मागणीसाठी कधीही त्यांचेकडे आलेले नाहीत. जाबदार संस्थेचे मुख्य ऑफीस हे मुंबई येथे असलेने या कार्यक्षेत्रात येत नाही. जाबदार संस्थेतर्फे दिलेल्या कर्जाची वसुली प्रयत्न करुनही वेळच्यावेळी झालेली नाही. सहकारी कायदा कलम 88 प्रमाणे संस्थेची चौकशी सुरु असल्याने रक्कम देणेचा विषय त्यांचे अखत्यारीत येत नसून रक्कम द्यावयाची झालेस सहकारी निबंधक यांचे आदेशाप्रमाणे करणेत येईल. सबब अर्जदार यांचा तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी आपले कथनात म्हटले आहे. 5. अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्पष्ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेमध्ये आपुलकी स्नेह विकास पत्र योजनेअंतर्गत वेगवेगळया रकमा ठेव म्हणून ठेवलेल्या होत्या व आहेत. सदरच्या ठेवींची रक्कम अर्जदार यांनी मुदतपूर्व जाबदार यांचेकडे मागणी केली असता जाबदार यांनी सदरची रक्कम देणे नाकारले. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली मुदतपूर्व रक्कम देण्यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्पष्ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्हणजे ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर संस्थेच्या मुदतपूर्व देय असलेल्या नियमानुसार व्याजासहित देय झालेली रक्कम दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे. 6 या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 4 यांनी अर्जदार यांना वैयक्तिकरित्या आणि संयुक्तिकरित्या खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. 1. ठेवपावती क्र.6990, 6991, 6992, 8251, 8252, 8253, 8254, 8255, 8256, 8257, 8258, 8259, 8260, 8261, 8262, 8263, 8264, 8265, 8266, 8267, 8268, 8269, 8270, 8271, 8272, 8273, 8274, 8275, 7001, 7002, 7003, 7004, व 7005 वरील मूळ रक्कम ठेवपावतीमध्ये नमूद केल्याप्रमाणे देय होणा-या व्याजासह रक्कम द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. 2. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. 3. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 4. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 14/07/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |