Maharashtra

Kolhapur

CC/18/322

Shubhangi Hanmant Noukudkar - Complainant(s)

Versus

Apple India Pvt. Ltd. - Opp.Party(s)

A.S.Desai

24 Jan 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/18/322
( Date of Filing : 29 Sep 2018 )
 
1. Shubhangi Hanmant Noukudkar
Plot No.12,Kanerkar Nagar,Fulewadi Ring Road,Kolhapur
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Apple India Pvt. Ltd.
24th,19th Floar,Conkord Tower C,U.B.City,Vitthal Malya Road,Banglore-560001
2. PAYTM
S.No.53,Dhanshri,58,1st Lane,Sai Nagar,Vadgaon Sheri,Pune-411014
3. Saluja Oversiz Pvt.Ltd.
K.H.No.27/9,Internal Road,Kapsedha,New Delhi,Delhi-110037
4. B2X Service Solutions India Pvt.Ltd.
Anant Towers,Shop No.13 & 14,1st Floar,Saix Extention,Kolhapur 416008
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 24 Jan 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार हे रेनूट्रॉन पॉवर सोल्‍युशन्‍स इंडिया प्रा.लि. या कंपनीचे कर्मचारी आहेत.  तक्रारदार यांच्‍या उत्‍कृष्‍ट कामगिरीमुळे त्‍यांच्‍या कंपनीचे मालक श्री राजेश पिरळकर यांनी तक्रारदार यांना अॅपल आयफोन 6 हा मोबाईल त्‍यांच्‍या वैयक्तिक वापरासाठी भेट दिला.  सदर फोनचे तक्रारदार हे एकमेव उपभोक्‍ता आहेत. वि.प. क्र.1 हे अॅपलचे उत्‍पादक आहेत.  सदर मोबाईलची किंमत रु. 29,180/- वि.प.क्र.2 च्‍या माध्‍यमातून अदा करण्‍यात आलेली आहे.  तक्रारदार काम करीत असलेल्‍या कंपनीचे मालकाचा पुतण्‍या श्री अनिकेत नितीन पिरळकर यांनी त्‍यांच्‍या वि.प.क्र.2 कडे असलेल्‍या पेटीएम अकाऊंटवरुन ता. 16/10/2017 रोजी कोल्‍हापूर येथूनच सदर फोनची ऑर्डर दिली.  सदर फोनची किंमत श्री राजेश पिरळकर यांचे क्रेडीट कार्डवरुन अदा करण्‍यात आली.  सदर मोबाईलचा वॉरंटी कालावधी हा एक वर्षाचा म्‍हणजेच दि. 24/10/17 ते 23/10/18 पर्यंत आहे.  सदर मोबाईलमध्‍ये सुरुवातीच्‍या काही कालावधीनंतर तक्रारदारांना काही दोष आढळून आले.  ते दोष म्‍हणजे डिस्‍प्‍लेवर लाईन्‍स येणे, चित्र अस्‍पष्‍ट दिसणे इ. प्रकारचे दोष आढळून आले.  म्‍हणून तक्रारदारांनी त्‍यांचे मालकांचे सूचनेवरुन वि.प.क्र.1 यांचे अधिकृत सर्व्हिस सेंटर वि.प.क्र.4 यांचेकडे दि. 07/06/2018 रोजी मोबाईल दुरुस्‍तीसाठी सुपूर्त केला.  तदनंतर दि. 11/6/18 रोजी वि.प.क्र.4 यांनी सदर अॅपल आयफोन 6 चा डिस्‍प्‍ले डयुप्‍लीकेट असून तो ओरिजिनल नाही असे सांगून मोबाईलबाबत योग्‍य ती सर्व्हिस देणेस असमर्थतता दर्शविली.  अशा प्रकारे वि.प.क्र.1 यांनी तक्रारदारांना ओरिजनल मोबाईल न पुरवता सदोष मोबाईल देवून तक्रारदारांची फसवणूक केली आहे.  म्‍हणून तक्रारदारांनी दि. 9/7/2018 रोजी वि.प.क्र.1 ते 4 यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु नोटीस लागू होवूनही तक्रारदाराचे तक्रारीचे ठोस निराकरण वि.प. यांनी केलेले नाही. दि. 13/7/2018 रोजी वि.प.क्र.4 चे कर्मचारी तक्रारदार काम करीत असलेल्‍या कंपनीमध्‍ये येवून सदर मोबाईलचे फोटो काढून घेवून गेले. तदनंतर दि. 16/7/18 रोजी त्‍यांनी तक्रारदार यांचे ऑफिसमध्‍ये येवून फोन खोलून त्‍यांच्‍या डिस्‍प्‍ले व इंटरनल पार्टचे फोटो घेवून गेले.  अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदारांना सदोष मोबाईल देवून सेवेत त्रुटी केल्‍याने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, तक्रारदारास मोबाईलची किंमत रक्‍कम रु.29,180/-, सदर रकमेवर होणारे व्‍याज रु. 4,800/-,  मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत मोबाईल खरेदीचे बिल, श्री राजेश पिरळकर यांचे क्रेडीट कार्ड स्‍टेटमेंट, मोबाईल डिलीव्‍हरीचा रिपोर्ट, तक्रारदारांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, सदर नोटीसची पावती व पोहोचपावती, वि.प.क्र.2 यांनी नोटीस न स्‍वीकारलेने परत आलेली नोटीस, पोस्‍ट ऑफिस, कोल्‍हापूर यांचे पत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प.क्र.1 ते 3 हे नोटीस लागूनही याकामी हजर न झालेने त्‍यांचेविरुध्‍द एक‍तर्फा आदेश करण्‍यात आला.  वि.प.क्र.4 हे याकामी हजर झाले परंतु त्‍यांनी विहीत मुदतीत म्‍हणणे दाखल न केलेने त्‍यांचेविरुध्‍द दि. 26/11/18 रोजी नो से आदेश करण्‍यात आला.  तथापि वि.प.क्र.1 व 2 यांनी मा. राज्‍य आयोग यांचेकडे सदरचे एकतर्फा आदेशाविरुध्‍द रिव्‍हीजन अर्जदाखल करुन प्रस्‍तुत‍कामी म्‍हणणे व पुरावा शपथपत्र दाखल केले.

 

4.    वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारली आहे.  ग्राहकाने चुकीचे पध्‍दतीने तसेच निष्‍काळजीपणे वस्‍तूचा वापर केला असलेस सदर कायद्याने ग्राहकास कोणतीही दाद मागता येणार नाही.  ग्राहकाने वस्‍तूचे नुकसान केलेले असलेने व सदरचे नुकसान उत्‍पादित बाबीशी निगडीत नसेल तर सदरचा क्‍लेम वॉरंटीचे पॉलिसीमध्‍ये येत नसून सदर ग्राहकांस ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कोणतीही दाद मागता येणार नाही.  सबब, आयफोनला कोणतेही नुकसान हे ग्राहकाचे चुकीचे पध्‍दतीने वापरामुळे अथवा निष्‍काळजीपणामुळे झालेस त्‍याची तक्रार वॉरंटीचे कालावधीत येत नसलेमुळे सदरचे नुकसानीस वि.प. हे जबाबदार नाहीत.  तक्रारदार यांनी सदरचा आयफोन 6, 32 जीबी IMEI No. 359220078749372 हा ऑनलाईन वि.प.क्र.3 यांचेकडून खरेदी केला.  ते वि.प.क्र.1 या कंपनीचे अधिकृत डिलर/Reseller नाहीत.  तसेच तक्रारदार यांनी सदरचे मोबाईलचे खरेदीची रक्‍कम रु. 29,180/- वि.प.क्र.2 यांचेमार्फत दि. 24/10/2017 ऑनलाईन अदा केलेली आहे.  तक्रारदार यांनी वि.प.क्र.4 हे वि.प.क्र.1 यांचे अधिकृत सर्व्हिस देणारे आहेत. त्‍यांचेकडे सदर मोबाईलमध्‍ये डिस्‍प्‍लेवर लाईन व अस्‍पष्‍ट चित्र दिसणे या कारणास्‍तव ता. 7/6/2018 रोजी सदर मोबाईल दाखवला वि.प.क्र.4 यांनी सदरचे मोबाईलचे निरिक्षण करता सदरचे मोबाईलचा डिस्‍प्‍ले हा डयूप्‍लीकेट असून ओरिजिनल  नाही, त्‍यामुळे सदरचे मोबाईलचे अनाधिकृत मॉडिफिकेशन असलेचे सांगितले.  सदरचे मोबाईलचे VMI (Visual Mechanical Inspection) ची चाचणी करता, सदरचे चाचणीमध्‍ये सदरचा मोबाईल फेल झालेला असून थर्ड पार्टी यांनी डिस्‍प्‍ले assembly केलेला असलेने तक्रारदार यांनी सदरचा मोबाईल थर्ड पार्टी यांचेकडून तपासून घेतला पाहिजे.  थर्ड पार्टी हे वि.प.क्र.1 यांचे अधिकृत सर्व्हिस प्रोव्‍हायडर नाहीत.  सबब, सदरचा मोबाईल हा टॅम्‍पर केलेला असलेने सदरचा मोबाईल हा वॉरंटीचे कालावधीमध्‍ये येत नाही.  वि.प.क्र.4 यांनी मोबाईलला वॉरंटी नसलेने तक्रारदार यांनी रक्‍कम भरुन सदरची सेवा घेणेस सांगितले असता सदरची सेवा तक्रारदार यांनी नाकारलेली आहे.  सदरचे मोबाईलचे नुकसान हे वि.प.क्र.1 यांचे अधिकृत सेवा देणार वि.प.क्र.3 यांनी केलेले असलेने सदरचे मोबाईलचे वॉरंटीतील अटी व शर्तींचा भंग झालेला आहे.  Unauthorised modification वॉरंटीमध्‍ये समाविष्‍ट नसलेने वि.प.क्र.1 यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही.  सदरचा मोबाईल हा दोषयुक्‍त असलेचे अनुषंगाने तक्रारदार यांनी कोणताही तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही.  सबब, वि.प. यांनी कोणतीही सेवात्रुटी न दिल्‍याने तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

 

5.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प. यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ.क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

5

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

6.    तक्रारदार यांचे कंपनीतील उत्‍कृष्‍ट कामगिरीमुळे कंपनीचे मालक राजेश पिरळकर यांनी तक्रारदार यांना अॅपल आयफोन 6 हा मोबाईल भेट दिला.  सदरचे मोबाईलची किंमत रक्‍कम रु. 29,180/- असून ता. 24/10/2017 रोजी सदरचा मोबाईल वि.प.क्र.3 यांनी तक्रारदार यांना दिला आहे.  वि.प.क्र.4 हे वि.प.क्र.1 यांचे सर्व्हिस सेंटर असून सदरचे ग्राहकांना विक्रीपश्‍चात सेवा देणेचे काम करते.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी तक्रारीसोबत दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता अ.क्र.1 ला ता. 16/10/2017 रोजी सदरचे मोबाईलचे टॅक्‍स इनव्‍हॉईस दाखल केलेले आहे.  अ.क्र.2 ला राजेश पिरळकर यांचे क्रेडीट कार्डचे स्‍टेटमेंट दाखल केले आहे.  प्रस्‍तुतकामी अनिकेत पिरळकर यांनी वि.प.क्र.2 कडे असलेल्‍या पेटीएम अकाऊंटरवरुन ता. 16/10/2017 रोजी सदरचे आयफोन 6 ची ऑर्डर दिलेली असून त्‍यांचा ऑर्डर ID No. 3980449032 आहे.  सदरचे एचडीएफसी बँकेचे क्रेडीट कार्ड नं. 5523650100197812 वरुन रक्‍कम रु.29,180/- रक्‍कम पेमेंट केलेचे दिसून येते.  तक्रारदार यांनी त्‍यांचे पुराव्‍याचे शपथपत्रामध्‍ये वि.प.क्र.3 यांनी सदरचे मोबाईलची डिलीव्‍हरी ता. 24/10/2017 रोजी देतेवेळी टॅक्‍स इनव्‍हॉईस तक्रारदार यांना दिलेले आहे.  सदरचे टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस वि.प. यांनी  नाकारलेले नाही.  सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.

 

मुद्दा क्र.2

 

7.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  तक्रारदार यांना सदरचे मोबाईलमध्‍ये सुरुवातीचे काही कालावधीनंतर डिस्‍प्‍लेवर लाईन येणे, चित्र अस्‍पष्‍ट दिसणे इ. दोष आढळून आले.  सदरचा मोबाईल वि.प. नं. 4 यांचेकडे ता. 07/06/2018 रोजी निर्मूलनासाठी सुपूर्त केला असता सदर अॅपल आयफोन 6 चा डिस्‍प्‍ले डयुप्‍लीकेट असून तो ओरिजिनल नाही या कारणास्‍तवर सदरचे मोबाईलबाबत सर्व्हिस देणेस असमर्थतता दर्शविली व तक्रारदारांचा मोबाईल परत केला.  सबब, वि.प. यांनी तक्रारदार यांचेकडून सदरचे मोबाईलची रक्‍कम स्‍वीकारुन ओरिजनल मोबाईल न पुरवता सदोष मोबाईल देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता अ.क्र.1 ला सदर मोबाईलचे टॅक्‍स इन्‍व्‍हॉईस/बिल ऑफ सप्‍लाय/कॅश मेमो दाखल आहे.  सदरचे कॅश मेमो नं. 07A0009883020865 असा असून अॅपल आयफोन 6, 32 जीबी Space arey असे नमूद असून सदर मोबाईलचा IMEI No. 359220078749372 आहे.  मोबाईलची वॉरंटी कालावधी 24/10/2017 ते 23/10/2018 पर्यंत आहे.  सदरचे मोबाईलचा IMEI No. 359220078749372 आहे. प्रस्‍तुतकामी वि.प.क्र.1 यांनी दाखल केलेले म्‍हणणेचे अवलोकन करता तक्रारदार यांनी सदरचा मोबाईल वि.प.क्र.3 यांचेकडून खरेदी केलेला आहे.  वि.प.क्र.3 हे वि.प.क्र.1 या कंपनीचे अधिकृत डिलर/Reseller नाहीत.  वि.प.क्र.4 हे वि.प.क्र.1 यांचे अधिकृत डिलर आहेत.  सदरचे मोबाईलचे डिस्‍प्‍लेवर लाईन येणे, चित्र अस्‍पष्‍ट दिसणे इ. दोष आढळून आले.... वॉरंटी कालावधीता नाही.  Unauthorised modification वॉरंटीमध्‍ये समाविष्‍ट होत नसलेने तसेच सदरचा मोबाईल दोषयुक्‍त असलेचे अनुषंगाने तक्रारदारांनी कोणताही तज्ञाचा पुरावा दाखल न केलेने तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी असे वि.प.क्र.1 यांनी कथन केलेले आहे.

 

8.    प्रस्‍तुतकामी तक्रारदार व वि.प. यांनी दाखल केलेल्‍या वि.प.क्र.4 B2X यांचे डिलीव्‍हरी रिपोर्टचे अवलोकन करता

            Product Detail –

            Product – Iphone 6

            IMEI No. 359220078749372

            Service type – Apple Limited Warranty

 

            Other problems

            Problem Description – Verticle lines on the display. Display Bicker, Brightness

            Issue

            Problem Found – Problem confirmed

Action taken – Due to TPP (Third party part) display assembly request customer paid service which is not approved by customer so unit return without repair.

 

      सदरचे कागदपत्रांवरुन तक्रारदाराचे सदरचे मोबाईलचा IMEI No. 359220078749372 वि.प. यांनी नाकारलेला नाही.  तथापि सदरचे मोबाईलमध्‍ये डिस्‍प्‍लेवर उभ्‍या रेघा तसेच अस्‍पष्‍ट चित्र दिसत असलेचे दिसून येते.  तथापि सदरचा मोबाईल सदर सर्व्हिस सेंटरने तक्रारदार यांना Third Party Part display assembly या कारणास्‍तव दुरुस्‍त न करता परत दिलेला आहे.  प्रस्‍तुतकामी तक्रारदारांनी तक्रारदारतर्फे साक्षीदार अनिकेत पिरळकर व राजेश पिरळकर यांची पुराव्‍याची शपथपत्रे दाखल केलेली आहेत.  सदरची पुराव्‍याची शपथपत्रे वि.प. यांनी नाकारलेली नाहीत.  वि.प. यांनी त्‍यांचे म्‍हणणेमध्‍ये सदर कामी तक्रारदार यांनी दोषयुक्‍त मोबाईलचे अनुषंगाने कोणताही तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही असे कथन केले आहे.  तथापि वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.4 B2X यांचे डिलीव्‍हरी रिपोर्ट दाखल केलेला असून सदरचे रिपोर्टमध्‍ये सदरचा मोबाईलचे डिस्‍प्‍लेमध्‍ये दोष असलेचे मान्‍य केले आहे.  सबब, दाखल कागदपत्रांवरुन सदरचे मोबाईलमध्‍ये दोष होता हे सिध्‍द होते.  तक्रारदाराचे पुराव्‍याचे शपथपत्राचे अवलोकन करता वि.प.क्र.4 चे कर्मचा-यांनी ता. 13/7/18 रोजी सदरचे मोबाईलचे फोटोग्राफ्स काढून घेतले तसेच सदरचा मोबाईल खोलून त्‍याचे डिस्‍प्‍लेचे व इंटरनल पार्ट्सचे फोटो देखील काढले व तक्रारदारांचा सदर अॅपल 6 चा डिस्‍प्‍ले डयूप्‍लीकेट आहे असे सांगितले.  सबब, दाखल कागदपत्रांवरुन तक्रारदारांचा मोबाईल सदोष होता ही बाब सिध्‍द होते.  वि.प.क्र.1 यांनी वि.प.क्र.3 हे सदर कंपनीचे अधिकृत डीलर/Reseller नसलेचे कथन केले आहे.  तथापि दाखल कागदपत्रांवरुन वि.प.क्र.1 यांचे अधिकृत सर्व्हिस सेंटर वि.प.क्र.4 यांनी सदरचे मोबाईलचा IMEI No. नाकारलेला नाही.  त्‍या कारणाने सदरचा मोबाईल हा Valid Device असलेची बाब वि.प.क्र 1 ते 4 नाकारु शकत नाहीत.  वि.प.क्र.4 यांना आयोगाने संधी देवून देखील तक्रारदारांची कथने पुराव्‍यानि शी नाकारलेली नाहीत.  वि.प.क्र.4 यांचेविरुध्‍द म्‍हणणे नाही (No Say) चा आदेश पारीत झालेला आहे.  सबब, वरील सर्व कागदपत्रांचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3      

 

9.    उपरोक्‍त मुद्दा क्र.2 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  सबब, तक्रारदार हे वि.प. यांचेकडून सदर मोबाईलची खरेदीची रक्‍कम रु.29,180/- मिळणेस पात्र आहेत.  तसेच सदर  रकमेवर तक्रार दाखल ता. 1/10/2018 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यांना मिळेपावेतो द.सा.द.शे. 9 टक्‍के प्रमाणे व्‍याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

 

 

 

 

मुद्दा क्र.4

 

10.   वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र.4 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.5  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -

 

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प.क्र.1 ते 4 यांनी तक्रारदार यांना मोबाईलचे खरेदीची रक्‍कम रु.29,180/- अदा करावी.  तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख 01/10/18 पासून सदरची संपूर्ण रक्‍कम तक्रारदार यास मिळेपावेतो द.सा.द.शे.9 टक्‍के प्रमाणे व्‍याज अदा करावे.

 

  1. वि.प.क्र.1 ते 4 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- अदा करावी. 

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयामधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 

 
 

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.