Maharashtra

Additional DCF, Thane

CC/19/191

MR. ASHISH SRIVASTAVA - Complainant(s)

Versus

APPLE INDIA PVT. LTD. THROUGH ITS DIRECTORS GAURAV DUGGAL - Opp.Party(s)

IN PERSON

06 Sep 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Complaint Case No. CC/19/191
( Date of Filing : 28 Aug 2019 )
 
1. MR. ASHISH SRIVASTAVA
S/O SHRI HRIDAI GOPAL VERMA, HAVING ADDRESS AT- A-205, VALENCIA, PLOT NO. 9, SECTOR 16E, ROADPALI, KALAMBOLI, NAVI MUMBAI MAHARASHTRA 410218
...........Complainant(s)
Versus
1. APPLE INDIA PVT. LTD. THROUGH ITS DIRECTORS GAURAV DUGGAL
HAVING ADDRESS AT-19TH FLOOR, CONCORDE TOWER C, UB CITY, NO.24, VITTAL MALLYA ROAD, BANGALORE, INDIA 560001
2. APPLE PTY LIMITED THORUGH ITS LEGAL MANAGER,
HAVING ADDRESS AT- P O BOX A2629, SYDNEY SOUTH, NSW, 1235 AUSTRALIA 133511
3. APPLE DISTRIBUTION INTERNATIONAL, THROUGH ITS AUTHORISED REPRESENTATIVE MR. KASHIF JAMEEL
HAVING ADDRESS AT- HOLLYHILL INDUSTRIAL ESTATE, HOLLYHILL, CORK, REPUBLIC OF IRELAND
4. MAPLE DIGITAL TECHNOLOGY INTERNATIONAL PVT LTD. THROUGH ITS DIRECTORS, MANIL BHASKAR SHETTY
HAVING ADDRESS AT- G-50, GROUND FLOOR, INORBIT MALL, SECTOR-30A, VASHI, NAVI MUMBAI, MAHARASHTRA 400705
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 06 Sep 2019
Final Order / Judgement

तक्रारदार स्‍वतः हजर.        

तक्रारदाराचा तक्रार स्विकृतीपूर्व युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. त्‍यांनी कथन केले प्रमाणे वादातीत लॅपटॉप जो सामनेवाले क्रमांक 1 ने उत्‍पादीत केला आहे, तसेच सामनेवाले क्रमांक 2 हे त्‍याचे विधि व्‍यवस्थापक आहेत व सामनेवाले क्रमांक 4 ने ते विकले आहे. सामनेवाले क्रमांक 3 ने वरील बाबतीत काय काम केले याबाबतीत तक्रारीत कथन नाही, म्‍हणून तक्रारदाराने वादातीत लॅपटॉपमध्‍ये उत्‍पादकीय दोष असल्‍याने त्‍याची किंमत परत मिळणेकामी, तसेच झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळणेकामी सदरची तक्रार तारीख 28/08/2019 रोजी दाखल केली. त्‍यांनी तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन वादातीत लॅपटॉपचा हमी कालावधी तारीख 05/11/2018 रोजी संपुष्‍टात आलेला आहे. त्‍यापूर्वी हमी कालावधीत त्‍यांनी वादातीत लॅपटॉप वेळोवेळी दुरुस्‍त करुन घेतलेला आहे. सबब सामनेवाले क्रमांक 1, 2 व 4 यांना त्‍यांनी वेळोवेळी ईमेल व नोटीस पाठविली, त्‍याला उत्तर म्‍हणून त्‍यांनी हमी कालावधीनंतर वादातीत लॅपटॉपमध्‍ये काही दोष निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी लॅपटॉपच्‍या उत्‍पादकावर व सेवा देणा-यावर नसल्‍याची बाब तक्रारदाराच्‍या निदर्शनास आणून दिली. त्‍यानंतरही तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदाराचे असे म्‍हणणे आहे की, वादातीत लॅपटॉपच्या हमी कालावधीमध्‍ये तो नादुरुस्‍त झाला म्‍हणून त्‍याची वेळावेळी सामनेवाले क्र. 4 कडून दुरुस्‍ती करुन घेतली. हमी कालावधीत दुरुस्‍ती करुन घेतली तरीही लॅपटॉप सुस्थितीत चालू नाही. सबब वादातीत लॅपटॉपमध्‍ये दोष हमी कालावधीतच निर्माण झाले होते, याबाबतीत कुठलाही विशेष तज्ञांचा अहवाल नाही किंवा पुरावा नाही. सबब मा. राज्‍य आयोगापासून ते सर्वोच्‍च न्‍यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निवाडयांप्रमाणे जेव्‍हा एखाद्या वस्‍तूमध्‍ये उत्पादकीय दोष असतात, त्‍याबाबतीत तज्ञांचा अहवाल दाखल करणे आवश्‍यक असते. सदरच्‍या तक्रारीमध्‍ये तक्रारीची दखल घेणेकामी प्रथमदर्शनी पुरावा म्‍हणून वरीलप्रमाणे तज्ञांचा अहवाल नाही. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे वरील बाबतीत ते तज्ञ नाहीत. सबब सर्व पुराव्‍याचा साकल्‍याने विचार केल्‍यानंतर  तक्रारीतील वादाची दखल घेण्‍यासारखी परिस्थिती वर नमूद केलेल्‍या कारणास्‍तव नाही. सबब तक्रार स्विकृतीपूर्वी रद्द करण्‍यात आली. तक्रारीचे कागदपत्र अभिलेख कक्षात पाठविण्‍यात यावेत.           

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.