Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. सुभाष रा. आजने यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केली असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्ष 1 हा Apple iPhone चा निर्माता असून ते भारतातील अधिकृत रजिस्टर्ड कार्यालय आहे. विरुध्द पक्ष 2 हा Apple iPhone चा अधिकृत विक्रेता आहे व विरुध्द पक्ष 3 ही Apple iPhone चे सर्विस सेंटर आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 यांनी निर्मित केलेला 1 Apple iPhone , Colour – Silver, 16 GB, IMEI No. 355899066514510 विरुध्द पक्ष 2 रिलायन्स रिटेल लि. एम्प्रेस मॉल नागपूर यांच्याकडून रुपये 56,582/- इतक्या रक्कमेत बिल क्रं. ..............,अन्वये दि. 25.11.2014 रोजी खरेदी केला होता. सदर मोबाईल मध्ये Earpod काम करीत नसल्यामुळे विरुध्द पक्ष 3 यांनी दि. 05.12.2014 रोजी Earpod तक्रारकर्त्याला बदलवून दिले. त्यानंतर दि. 14.12.2014 ला तक्रारकर्त्याचा मोबाईल automatically bent झाला, त्यामुळे Apple iPhone चे outer Cover सुध्दा सैल झाले. सदरची बाब दि. 13.10.2015 ला तक्रारकर्त्याच्या निदर्शनास आले व याबाबत विरुध्द पक्ष 3 ला कळविण्यात आले, परंतु विरुध्द पक्ष 3 यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही. विरुध्द पक्ष 3 यांच्या म्हणण्यानुसार सदर iPhone हा डॅमेज झालेला आहे. iPhone हा वॉरन्टी कालावधीत असल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 3 यांना तक्रारकर्त्याच्या तक्रारीची दखल घेण्याबाबत सांगितले. विरुध्द पक्ष 3 यांनी सदरच्या मोबाईलचे छायाचित्र काढले आणि तक्रारकर्त्याला काही दिवस विरुध्द पक्ष 1 यांच्या उत्तराची वाट पाहण्यास सांगितले.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, त्याने विरुध्द पक्ष 3 च्या सर्विस सेंटरला दि. 22-23.10.2015 ला भेट दिली. विरुध्द पक्ष 3 यांनी तक्रारकर्त्याला अद्याप निर्मात्याकडून उत्तर न आल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 3 यांच्या सर्विस सेंटरला दि. 26.10.2015 ला भेट दिली. त्यावेळी विरुध्द पक्ष 3 यांनी iPhone हा वॉरन्टी मध्ये येत नसल्याचे तक्रारकर्त्याला सांगितले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 3 च्या सर्विस सेंटरला दि. 27.10.2015 ला भेट दिली, त्यावेळी त्याला रुपये 23,100/- देऊन iPhone बदलवून देण्यात येईल असे तक्रारकर्त्याला सांगण्यात आले.
- तक्रारकर्त्याने दि. 28.10.2015 ला अॅपलचे ऑनलाईन कॉल सेंटरवर संपर्क साधला, तसेच त्यांना ई-मेल द्वारे कळविण्यात आले होते. परंतु विरुध्द पक्ष 1 यांच्याकडून तक्रारकर्त्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. तक्रारकर्त्याने शेवटी दि. 02.11.2015, 03.11.2015 ला विरुध्द पक्ष 1 ला ई-मेल केला त्यावर विरुध्द पक्ष 1 यांनी दि. 04.11.2015 च्या पत्रान्वये तक्रारकर्त्याचा मोबाईल हॅन्डसेट वॉरन्टी कालावधीत बदलवून देण्यास मनाई केल्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करून मागणी केली की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे घोषित करावे. तसेच विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी तक्रारकत्यार्चा मोबाईल हॅन्डसेट बदलून देण्याचा आदेश द्यावा किंवा Apple iPhone 6 ची किंमत रुपये 56,582/- 24 टक्के व्याज दराने iPhone विकत घेतल्याच्या तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत व्याजसह देण्याचा आदेश द्यावा. त्याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्याचा आदेश द्यावा.
- विरुध्द पक्ष 1 ने आपल्या लेखी जबाब दाखल केला असून त्यात नमूद केले की, तक्रारकर्त्याने मंचाला गुमराह करण्याकरिता प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. जो ग्राहक स्वतःहून मोबाईलला डॅमेज करतो किंवा निष्काळजीपणाने हाताळतो तो ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत कोणतीही मागणी करु शकत नाही. जेव्हा ग्राहक कोणत्याही वस्तुला बाहेरुन डॅमेज करतो त्या वस्तुचा निर्मिती दोषाबाबत संबंध नसतो. अॅपल वॉरन्टी मधील शर्ती व अटी मध्ये अनधिकृत वस्तुला झालेल्या डॅमेज exclude करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात विरुध्द पक्षाने दिलेल्या सर्विस रिपोर्ट मध्ये नमूद केलेले आहे की, सदर iPhone मध्ये डॅमेज आहे व तो तक्रारकर्त्याच्या स्वतःच्या चुकिमुळे झालेला आहे. विरुध्द पक्ष 3 यांनी प्रयत्न करुन तक्रारकर्त्याचा iPhone 6, 16 GB, IMEI No. 355899066514510 तपासून त्यामधील प्रोब्लमचे निदान केले. तक्रारकर्त्याने जेव्हा सदरचा iPhone दि.27.10.2015 ला विरुध्द पक्ष 3 यांच्याकडे आणला तेव्हा विरुध्द पक्ष 3 च्या मॅकनिकने तक्रारकर्त्याच्या iPhone ची प्रत्यक्ष तपासणी केली, त्यावेळी लक्षात आले की, तक्रारकर्त्याचा फोन bent होता. Visual Mechanical Inspection (व्हिज्युअल यांत्रिक तपासणी) नंतर विरुध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याला सांगितले की, तक्रारकर्त्याचा iPhone डॅमेज झाल्यामुळे तो दुरुस्त होऊ शकत नाही आणि तो वॉरन्टी बाहेर आहे. अॅपलच्या वॉरन्टी मध्ये येत नाही आणि वॉरन्टीमधील शर्ती व अटी सदर प्रकरणी लागू होऊ शकत नाही. विरुध्द पक्ष 3 यांनी मोबाईलचे (diagnosis) डायग्नोसीस करतांना iPhone चे छायाचित्र आणि सर्विस रिर्पोट सादर केला होता, त्यामुळे विरुध्द पक्ष 3 ने दिलेल्या सर्विस रिपोर्टप्रमाणे तक्रारकर्त्याचा फोन हा bent आहे आणि तो वॉरन्टीच्या शर्ती व अटीमध्ये येत नाही.
- जर iPhone मध्ये inherent defect असले तर अशा प्रसंगी निर्मात्याची जबाबदारी असते. तज्ञ पुराव्या द्वारे सिध्द केल्यावर iPhone निर्मात्याला जबाबदार धरल्या जाऊ शकते. सदरचे प्रकरण निर्मिती दोषावर नाही म्हणून प्रस्तुत प्रकरण खारीज करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
- विरुध्द पक्ष 2 यांनी आपल्या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्त्याने त्याच्याकडून iPhone विकत घेतला होता, परंतु विरुध्द पक्ष 2 यांच्या विरुध्द कोणतेही आरोप नाही. विरुध्द पक्ष 2 ला मंचाच्या कार्यक्षेत्राकरिता प्रतिवादी बनविण्यात आलेले आहे.
- विरुध्द पक्ष 2 यांनी दि. 25.11.2014 ला तक्रारकर्त्याला iPhone खरेदी करते वेळी मोबाईल हॅन्डसेटचे संपूर्ण डेमोस्ट्रेशन दिल्यानंतर व तक्रारकर्त्याच्या संपूर्ण समाधानानंतर तक्रारकर्त्याने वि.प.2 कडून iPhone IMEI No. 355899066514510 विकत घेतला होता. वि.प. 2 हे Apple iPhone समवेत इतर इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा विक्रेता आहे. वि.प. 2 हे अॅपलचे निर्माता नाही आणि वि.प. 2 वस्तुच्या निर्मात्याचे सर्विस सेंटरला जाण्याबाबत मार्गदर्शन करतात. तक्रारकर्त्याची वि.प. 2 यांच्या विरुध्द कुठलीही तक्रार नाही, त्यामुळे तक्रारकर्ता वि.प. 2 यांच्या विरुध्द कोणतीही (रिलीफ) फायदा मिळण्यास पात्र नाही. वि.प. 1 व 3 यांच्या विरुध्द सदर तक्रारीमध्ये आरोप करण्यात आलेले आहे आणि वि.प. 2 यांना त्रास देण्याच्या उद्देशाने सदर प्रकरणात त्याला प्रतिवादी बनविण्यात आले आहे. तसेच विरुध्द पक्ष 2 यांच्या विरुध्द तक्रार दाखल करण्याचे कोणतेही कारण घडलेले नाही, म्हणून विरुध्द पक्ष 2 यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- विरुध्द पक्ष 3 यांनी आपल्या लेखी जबाबात नमूद केले की, वि.प. 3 हे वि.प. 1 चे अधिकृत सर्विस सेंटर आहे. वि.प. 1 ने घेतलेले सर्व निर्णय वि.प. 3 ला बांधील आहेत आणि वि.प. 3 ला स्वतंत्रपणे निणर्य घेण्याचा अधिकार नाही. तक्रारी मधील परिच्छेद क्रं. 6 मध्ये तक्रारकर्त्याचे iPhone bent होण्याबाबतच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबाबतचे केलेले आरोप हे सर्वस्व चुकिचे आहे. तक्रारकर्त्याने iPhone मध्ये निर्मिती दोष असल्याबाबतची केलेली तक्रार ही संपूर्णपणे चुकिची आहे. तक्रारकर्त्याचा iPhone तपासणी करता आला त्यावेळी त्याचे छायाचित्र काढण्यात आले व इतर इलेक्ट्रॉनिक मटेरियल आणि प्रक्रियेद्वारे तपासणी करण्यात आली होती. तेव्हा सदर iPhone निष्काळजीपणे हाताळण्यामुळे डॅमेज झाल्याचे निदर्शनास आले आणि सदरची बाब अॅग्रीमेन्ट ऑफ गॅरन्टी मध्ये येत नाही. विरुध्द पक्ष 1 यांनी विरुध्द पक्ष 3 ला मान्यता दिल्याप्रमाणे सेवा देण्यास तयार आहेत. विरुध्द पक्ष 3 हे तक्रारकर्त्याला (Appropriate) योग्य किंमतीमध्ये iPhone बदलवून देण्यास तयार आहे. मेसर्स अॅपल इंडिया प्रा.लि. च्या मार्गदर्शक तत्वानुसार विरुध्द पक्ष क्रं. 3 सदर iPhone ला सर्विस देऊ शकत नाही. विरुध्द पक्ष्ा 3 ही विरुध्द पक्ष 1 ची अधिकृत सेवा पुरविणारे सर्विस सेंटर आहे व त्यांना विरुध्द पक्ष 1 ने घेतलेले निर्णय बंधनकारक आहे, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 3 विरुध्द दाखल केलेली तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- उभय पक्षाने दाखल केलेले दस्तऐवज, लेखी युक्तिवाद व त्यांचा तोंडी युक्तिवाद ऐकल्यावर निकाला करिता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
1 तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय 2 विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय? नाही 3 विरुध्द पक्षाने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय? नाही 4 आदेश ? अंतिम आदेशानुसार कारणमीमांसा - मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत – तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 1 ने निर्मित केलेला Apple iPhone 6, Colour – Silver, 16 GB रुपये 56,582/- मध्ये विरुध्द पक्ष 2 कडून दि. 25.11.2014 रोजी खरेदी केला होता व विरुध्द पक्ष 3 हे विरुध्द पक्ष 1 चे अधिकृत सर्विस सेंटर आहे आणि तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष 3 ची सेवा घेतली होती हे नि.क्रं. 2 (1, 3) वर दाखल दस्तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द होते.
- तक्रारकर्त्याने दि. 14.10.2015 ला त्याच्या वापरात असलेला Apple iPhone विरुध्द पक्ष 3 कडे iPhone bent झाल्याच्या कारणाने बदलवून देण्याकरिता सादर केला होता. विरुध्द पक्ष 3 यांनी नि.क्रं. 2(3) वर दाखल केलेल्या सर्विस रिपोर्टनुसार An iPhone is bent from the top left corner near volume keys, image has been capture escalation and update the customer after IOS updating iPhone is freezing random errors while using app असे नमूद आहे.
तक्रारकर्त्याच्या मागणीनुसार iPhone हा वॉरन्टीच्या शर्ती व अटीनुसार वॉरन्टी बाहेर असल्यामुळे तक्रारकर्त्याचा मोबाईल बदलवून देता येत नाही, म्हणून तक्रारकर्त्याचा मोबाईल त्याला परत करण्यात आला होता. तक्रारकर्त्याच्या वापरात असलेला मोबाईल हा फिजीकल डॅमेजमुळे bent झालेला आहे असे विरुध्द पक्षाने जबाबात नमूद केले आहे. तक्रारकर्त्याच्या वापरात असलेला मोबाईलमध्ये निर्मिती दोष असल्यामुळे तक्रारकर्त्याचा iPhone bent झाला ही बाब सिध्द करण्याकरिता तक्रारकर्त्याने कुठलाही तज्ञ अहवाल दाखल केलेला नाही व सदरचे कथन सिध्द करण्यास अपयशी झाला असल्याचे दिसून येते असे आयोगाचे स्पष्ट मत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार खारीज.
- उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
| |