Maharashtra

Kolhapur

CC/16/105

Pravin Ramchandra Parit - Complainant(s)

Versus

Apple Hospital & Research Institute Pvt.Ltd.Through Sanchalak - Opp.Party(s)

Sandip Jadhav

27 Apr 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/16/105
 
1. Pravin Ramchandra Parit
Padal,Tal.Panhala,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Apple Hospital & Research Institute Pvt.Ltd.Through Sanchalak
525,E Vyapari Peth,Shahupuri,
Kolhapur
2. F.S.Paranjpe Apple Hospital & Research Institute Pvt.Ltd.
As Above
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
For the Complainant:Sandip Jadhav , Advocate
For the Opp. Party:
Adv.B.D.Torase
 
Dated : 27 Apr 2017
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य :  (व्‍दाराः- मा. सौ. मनिषा कुलकर्णी, सदस्‍या) 

1)    प्रस्‍तुतची तक्रार,  तकारदाराने  ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 11 व 12 अन्‍वये दाखल केलेली आहे. तक्रारदारास असहय पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्‍यामुळे डॉ. अमर वर्पे यांनी तक्रारदार यांना त्‍यांचे पोटदुखीचे व ग्रंथीचे निदान होणेकरिता यातील जाबदार यांचेकडे पाठविले. जाबदार यांनी अल्‍ट्रासाऊंड पध्‍दतीने तपासणी केली असता No Significant  Abnormality is Detected   असा अहवाल प्राप्‍त झालेने कोणतेही तकारदारास औषधोपचार केले गेले नाहीत. मात्र तदनंतर दुसरेच दिवशी “दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर” येथे अल्‍ट्रासाऊंड पध्‍दतीने तपासणी केली असता सदरचे अहवालाचे Recent Appendicular Perforation With  Peritonitis  असे निरिक्षण नोंदविले गेलेने तक्रारदारास ताडतीने शस्‍त्रक्रिया करणे भाग पडले.  सबब सदर जाबदार व दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर यांचेतील अहवालामध्‍ये कमालीचा विरोधाभास असलेने व जाबदार यांनी तक्रारदार यांनी तक्रारदार यांची पोटाची व ग्रंथींची अल्‍ट्रासाऊंड तपासणी योग्‍य पध्‍दतीने केलेली नसलेमुळे व चुकीचा अहवाल देवून व चुकीचा सल्‍ला दिलेने त्‍यांचे जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्‍य करुन वैद्यकीय सेवेत अक्षम्‍य कसूर केलेला असलेने सदरचा अर्ज दाखल केला आहे.                          

 

2)   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की,

    तक्रारदार यांना दि. 20-01-2016 रोजी असहय पोट दुखीचा त्रास जाणवू लागल्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रथमत:  डॉ. अमर वर्पे यांना दाखवलेनंतर त्‍यांनी तक्रारदाराचे पोट दुखी व ग्रंथीचे निदान होणेकरिता जाबदार यांचेकडे पाठविले.  जाबदार यांनी तक्रारदाराकडून तपासणी फी रु. 700/- घेऊन जाबदार नं. 2 यांनी  तक्रारदार यांचे पोट विकाराची व ग्रंथीची अल्‍ट्रासाऊंड पध्‍दतीने दि. 20-01-2016 रोजी दुपारी 1.30 चे दरम्‍यान तपासणी केली.  जाबदार नं. 2 यांनी तपासणीअंती तक्रारदाराचे पोट विकाराच्‍या व ग्रंथीच्‍या तपासणीचा अहवाल दिला असून त्‍यामध्‍ये “No Significant  Abnormality is Detected”  असे स्‍पष्‍टपणे नमूद केलेले आहे.   जाबदार यांनी दि. 20-01-2016 रोजीचा अहवाल हा तक्रारदारांची सामान्‍य स्थिती दर्शविणारा असलेने तक्रारदार यांचे डॉक्‍टरांनी सदरचे अहवालावर विसंबून राहून तक्रारदार यांना औषधोपचाराची गरज नाही असे अनुमान काढून औषधोपचार केले नाहीत.   तथापि तक्रारदार यांना पोट दुखीमुळे असहय  वेदना होत होत्‍या म्‍हणून तक्रारदार यांचे वडिलानी डॉ. ए.सी. दिवाण यांना तक्रारदारांची तब्‍येत दाखविली. डॉ. ए. सी. दिवाण यांनी तक्रारदार यांचे पोटातील आंतडयाची व ग्रंथीची अल्‍ट्रासाऊंडने तपासणी करिता दि. 21-01-2016 रोजी” दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर, कोल्‍हापूर” यांचेकडे पाठविले होते. दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर यांनी तक्रारदाराचे पोट विकाराची अल्‍ट्रासाऊंड पध्‍दतीने तपासणी करुन  दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर करिता डॉ. सचिन पाटील यांनी आपला अहवाल दिला सदर अहवालामध्‍ये Recent Appendicular Perforation With  Peritonitis  असे मत नोंदविले आहे.    सदर  दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर यांचे अहवालानुसार तक्रारदार यांचे पोटामधील अपेडिंक्‍स फुटून व त्‍यापासून संसर्ग होवून त्‍याचेमुळे तक्रारदार यांना पोटदुखीच्‍या असहय दाह/वेदना होत आहेत या निष्‍कर्षाप्रत डॉ. ए.सी. दिवाण आलेने त्‍यांनी तातडीने तक्रारदार यांची पोटातील आंतडयाची विना विलंब शस्‍त्रक्रिया करणेचा सल्‍ला देवून त्‍यानुसार श्री साई नर्सिंग होम, कोल्‍हापूर यांचेकडे शस्‍त्रक्रिया करुन तक्रारदारांवर आलेले संकट दुर केले.

 

      तक्रारदार त्‍यांचे तक्रारीत पुढे नमूद करतात की, वास्‍तविक जाबदार व दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर यांचेतील अहवालाचे अनुमान पाहता दोन्‍ही अहवालामध्‍ये कमालीचा विरोधाभास आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचे पोटाची व ग्रंथीची अल्‍ट्रासाऊंडने तपासणी योग्‍य पध्‍दतीने केलेली नसलेमुळे  व चुकीचा अहवाल देऊन चुकीचा सल्‍ला दिला त्‍यामुळे तक्रारदार यांच्‍या जिवितास धोका  निर्माण होईल असे कृत करुन तक्रारदारांना द्यावयाचे वैद्यकीय सेवेत अक्षम्‍य कसुर/त्रुटी केलेली असून व्‍यापारी अनिष्‍ठ प्रथेचा अवेलंब करुन तक्रारदारांना मानसिक व आर्थिक खर्चात पाडले आहे.  जाबदार यांनी तक्रारदार यांचे बाबीतीत वैद्यकीय सेवेतील निष्‍काळजीपणा दाखविला आहे.  जाबदार यांचे निष्‍काळजीपणामुळे तक्रारदार यांना लहान वयातच जिवितास धोका निर्माण झालेला होता. त्‍यामुळे तक्रारदाराचे आई वडिलांना प्रचंड मानसिक धक्‍का बसलेला आहे.  त्‍यामुळे तक्रारदार यांनी जाबदार कडून रक्‍कम रु. 700/- अल्‍ट्रासाऊंड करिता आकारलेली रक्‍कम,  तक्रारदार यांचे जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्‍य केलेने त्‍याची भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.2,00,000/- व जाबदार यांचे चुकीचे अहवालामुळे मानसिक त्रासाची रक्‍कम रु. 1,00,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु. 10,000/- अशी एकूण रक्‍कम रु. 3,10,700/-  12 टक्‍के व्‍याजासह जाबदार कडून मिळावी अशी तक्रारदारांनी तक्रार अर्जात विनंती केलेली आहे.                                                

    

3)   तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत एकूण सहा (6) कागदपत्रे दाखल केली आहेत. जाबदार यांचेकडील अल्‍ट्रासाऊंडचा अहवाल, दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटरकडील अहवाल, दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर कडील बिल, दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर कडील भुलीची फी, साई नर्सिंग होम कडील बिल, साई नर्सिंग होम कडील डिसचार्ज कार्ड इत्‍यादी कागदपत्रे दाखल केलेले आहेत.  तक्रारदाराने शपथपत्र, व  दि. 20-08-2016 रोजी पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केलेले आहे.   तक्रारदारांनी लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे.     

 

4)   जाबदार नं. 1 व 2 यांना नोटीस आदेश होवून ते या मंचासमोर हजर होवून त्‍यांनी आपले म्‍हणणे दाखल केले. जाबदार क्र. 1 व 2 यांचे कथनानुसार तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा, चुकीचा असून मान्‍य व कबूल नाही.  तक्रार अर्ज कलम 1 मधील मजकूर बरोबर आहे.  परंतु तक्रारदार कोणत्‍याही पत्राआधारे अगर डॉ. अमर वर्पे यांचेमार्फत जाबदार यांचेकडे तपासणीस आलेला नव्‍हता. तक्रारदार जाबदाराकडे स्‍वत: हून आला होता. जाबदार नं. 1 हे गेल्‍या 25 वर्षापासून कोल्‍हापूर येथे सोनोग्राफी व तत्‍सम सेवा देत आहेत. तसेच संस्‍थेमार्फत 25 वर्षे रोग निदान करीत होते. व जाबदार नं. 1 चे नाव त्‍या क्षेत्रात उत्‍तम नाव व प्रसिध्‍दी आहे. जाबदारांनी तक्रारदार कडून रु.700/- तपासणी फी घेतली ती चुकीचे आहे.  जाबदार यांनी जो अहवाल  दि. 20-01-2016 रोजी त्‍यांना अल्‍ट्रासाऊंडच्‍या वेळी तक्रारदार यांचे पोटाची जी परिस्थिती होती त्‍याप्रमाणे तंतोतंत खरा व बरोबर आहे. फिल्‍ममध्‍ये तक्रारदारचे अल्‍ट्रासाऊंडच्‍या चित्रफितीत जाबदार नं. 1 यांना ती परिस्थिती दिसली त्‍यास अनुसरुन अहवाल दिलेला आहे. जाबदार नं. 2 यांनी जाबदार नं. 1 यांचेकडे 15 वर्षे काम केलेले आहे.   जाबदार नं. 1 यांना सोनोग्राफीवरुन निदान करणेचा खूप मोठा अनुभव आहे.  जाबदार नं. 2 यांनी तक्रारदारांना तपासून त्‍यांचेशी संभाषण करुन त्‍यांना पोटात कुठे दुखते? कधीपासून दुखते? हे विचारुन संपूर्ण पोट तपासून पाहिले त्‍यावेळी तक्रारदारांनी “सगळया पोटात दुखते, व ती पोटदुखी अंपेडीक्‍स ज्‍या ठिकाणी आहे त्‍या ठिकाणी दुखते असे जाबदार नं. 2 यांना मुळीच सांगितलेले नाही”. तरी सुध्‍दा जाबदार नं.  2 यांनी अल्‍ट्रासाऊंड सोनोग्राफीने सर्व पोट तपासून ”  No Significant  Abnormality is Detected “  असा अहवाल दिला आहे. सदरच्‍या निदानामुळे पेशंट पुर्णपणे नॉर्मल आहे असे निदान होत नाही. वि.प. यांनी तक्रारदार यांना औषधाची गरज नाही असेही निदान होत नाही. तक्रारदार यांच्‍या मुळ डॉक्‍टरांनी तक्रारदार यांना औषधोपचार करणे गरजेचे होते. जर पोटात दुखले तर सोनोग्राफी करायला हवी. फेरतपासणी करुन घेणे जरुरीची असते. फेरतपासणीसाठी आलेल्‍या पेशंटची तपासणी विनामुल्‍य केली जाते. तक्रारदार दि. 21-01-2016 रोजी “दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर” मध्‍ये जे निदान झाले तेच निदान जाबदार कडे झाले असते.  दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर यांनी दिलेल्‍या अहवालात Recent Appendicular Perforation With  Peritonitis  रिसेंट शब्‍द अतिशय महत्‍वाचा आहे कारण अपेंडिक्‍सला फार सुज येवून ते नुकतेच किंवा आत्‍ताच फुटले आहे असे निदान होते.  अल्‍ट्रासाऊंड सोनोग्राफीमध्‍ये प्रथमदर्शनी अपेंडिक्‍स दिसत नाही कारण ज्‍यावेळी पोटाची सोनोग्राफी केली जाते त्‍यावेळी पोटात गॅस असतो व गॅसमुळे सोनोग्राफीचे किरण (Rays)  आतमध्‍ये न जाता परावृत्‍त(Reflect) होतात व गॅसच्‍या खालील पोटाचा भाग दिसत नाही.  असे कांही लिटरेचरमध्‍ये (Litarature) नमूद आहे.  तसेच इंग्‍लीश जर्नलमध्‍ये अपेंडिक्‍स दिसणेचे अनुमान किंवा प्रमाण 71% ते 97%  आहे याबाबत जाबदार यांचे मत ठाम आहे. जाबदार यांनी वैद्यकीय सेवेत कोणतीही कसूर केलेली नाही किंवा व्‍यापारी अनिष्‍ठ प्रथेचा अवलंब केलेला नाही. अगर तक्रारदारांना मानसिक त्रास  दिलेला नाही अगर आर्थिक खर्चात टाकलेले नाही.  जाबदार यांनी दि. 20-01-2016 रोजी जो अहवाल दिला आहे तो त्‍यावेळच्‍या प्राप्‍त परिस्थितीनुसार योग्‍य बरोबर व तंतोतंत होता.  तक्रारदारामुळे वि.प. यांनी व्‍यवसायात व समाजात बदनामी झाली आहे. तक्रारदाराकडून जाबदार यांना रक्‍कम रु. 10,00,000/- नुकसानभरपाई मिळावी.  जाबदार यांनी कोणताही निष्‍काळजीपणा अथवा तक्रारदाराचे जिवितास धोका निर्माण होईल असे निदान अगर निष्‍काळजीपणा केलेला नाही अगर तक्रारदार यांचेबाबत वैद्यकीय सेवेत कसूर अगर त्रुटी केलेली नाही.  तक्रारदाराची तक्रार अर्जातील सर्व विधाने खोटी असून मान्‍य नाहीत.  तक्रारदारांनी जी नुकसान भरपाईची रक्‍कम मागणी केली आहे ती रक्‍कम मागणेचा तक्रारदार यांना अधिकार नाही. तक्रार अर्जास कोणतेही कारण घडलेले नाही. सबब, तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर व्‍हावा असे म्‍हणणे दिले आहे.                                                                               

         

5)    जाबदार नं. 1 व 2 यांनी लेखी युक्‍तीवाद व पुराव्‍याचे शपथपत्र, व पुरावा संपलेची पुरसीस दाखल केलेली आहे. मेडीकल लिटरेचर व मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेले आहेत.        

  

6)  तक्रारदारांची तक्रार, दाखल पुरावे, व युक्‍तीवाद तसेच जाबदार  यांचे म्‍हणणे,  पुरावे  व युक्‍तीवाद यावरुन मंचासमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.

                    

­अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1.   

तक्रारदार जाबदार यांचे ग्राहक होतो काय ?   

होय

2.  

जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्‍ये त्रुटी केली आहे काय ?      

 

नाही. 

3.

अंतिम आदेश काय ?

खालील नमूद आदेशाप्रमाणे

वि व र ण -

7) मुद्दा क्र. 1 - 

 

     तक्रारदार यांना दि. 20-01-2016 रोजी असहय पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्‍यामुळे प्रथमत: डॉ. अमर वर्पे यांना आपली तब्‍येत दाखविली होती.  डॉ. अमर वर्पे यांनी तक्रारदार यांच्‍या पोटदुखीचे तसेच ग्रंथीचे निदान होणेकरिता यातील जाबदार यांचेकडे पाठविले व सदर जाबदार नं. 1 यांनी तक्रारदार यांचेकडून तपासणीची फी म्‍हणून रक्‍कम रु. 700/- जमा करुन घेवून जाबदार नं. 1 यांचे वतीने जाबदार नं. 2 यांनी तक्रारदार यांच्‍या पोट विकाराची व ग्रंथीची अल्‍ट्रासाऊंड पध्‍दतीने तपासणी केली व पोटविकाराचा व ग्रंथीचा तपासणीचा अहवाल दिला यामध्‍ये उभय पक्षांमध्‍ये यामध्‍ये वादाचा मुद्दाही उपस्थित नाही.  सबब, सदरचा तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये सेवा देणार व सेवा घेणार हे नाते निर्माण झालेले आहे.  सबब तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 2 (1) डी खाली “ग्राहक” होतो. सबब, मुद्दा क्र. 1 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.             

        

8)   मुद्दा क्र. 2 - 

 

     तक्रारदार यांना हे दि. 20-01-2016 रोजी पोटदुखीचा असहय त्रास जाणवू लागलेमुळे प्रथमत: डॉ. अमर वर्पे यांना आपली तब्‍येत दाखविली.  डॉ. अमर वर्पे यांनी तक्रारदार यांच्‍या पोटदुखी व ग्रंथीचे निदान होणेकरिता यातील जाबदार यांचेकडे पाठविले.  सदर जाबदार नं. 1 यांनी तक्रारदार यांचे कडून तपासणीची फी म्‍हणून रक्‍कम रु. 700/- जमा करुन घेतले व जाबदार नं. 1 यांचे वतीने जाबदार नं. 2 यांनी तक्रारदारयांच्‍या पोट विकाराची व ग्रंथीची  अल्‍ट्रासाऊंड पध्‍दतीने दि. 20-02-2016 रोजी दुपारी 1.30 चे दरम्‍यान तपासणी केली.   सदर तपासणी अंती यातील जाबदार नं. 2 यांनी तक्रारदार यांच्‍या पोटविकाराच्‍या व ग्रंथीच्‍या तपासणीचा अहवाल दिला व सदर जाबदार नं. 2 यांनी अहवालामध्‍ये No significant Abnormality is detetced असे स्‍पष्‍टपणे नमूद केलेले आहे. व सदर अहवालावर विसंबून राहून तक्रारदारास औषधोपचाराची गरज नसलेचे अनुमान काढले गेले.  

 

9)  मात्र तक्रारदारास सदर पोटदुखीच्‍या वेदना असहय होत असलेने तक्रारदार यांचे वडिलांनी डॉ. ए.सी. दिवाण यांचेकडे गेले असता त्‍यांनी अल्‍ट्रासाऊंडने तपासणीकरिता दि. 21-01-2016 रोजी “दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटरकडे” पाठवले. डॉ. सचिन पाटील यांनी या अल्‍ट्रासाऊंडचा अहवाल दिला असता सदर अहवालामध्‍ये  Recent Appendicular Perforation With  Peritonitis असे मत नोंदविले व तक्रारदार यांचे पोटातील Appendix फुटून त्‍यापासून संसर्ग होवून त्‍याचेतून तक्रारदार यांना पोटदुखीचा असहय वेदना झाल्‍या असे डॉ. ए.सी. दिवाण यांनी आपले मत नोंदविले. व पोटातील आतडयांची विनाविलंब शस्‍त्रक्रिया करणेचा सल्‍ला दिला व साई नर्सिंग होम कडे शस्‍त्रक्रिया करणेत आली असे तक्रारदार यांचे कथन आहे.                       

10)   तथापि जाबदार यांचे कथनानुसार, तकारदार हा पत्राआधारे अगर डॉ. अमर वर्पे यांचेमार्फत जाबदार यांचेकडे आलेला नव्‍हता तो स्‍वत:हून जाबदार यांचेकडे आलेला होता. जाबदार नं. 1 ही गेले 25 वर्षापासून कोल्‍हापूर येथे सोनोग्राफीची सेवा पेशंटना देत आहेत.  तक्रारदार यांचेकडून रक्‍कम रु.700/- घेतले हे म्‍हणणे चुकीचे आहे.  जाबदार यांनी अल्‍ट्रासाऊंडचा दि. 20-01-2016 रोजीचा जो अहवाल दिला आहे तो पोटाची जी परिस्थिती होती त्‍याप्रमाणे खरा व बरेाबर आहे. व अल्‍ट्रासाऊंडचे चित्रफितीही जी परिस्थिती दिसली त्‍यास अनुसरुन तक्रारदार यांना अहवाल दिलेला आहे. जाबदार नं. 2 हे जाबदार नं. 1 चे सोनोग्राफी डिपार्टमेंटमध्‍ये कार्यरत असलेने त्‍यांना त्‍याचा खुप मोठा अनुभव आहे.  तक्रारदार यांनी पोटात कुठे दुखते असे विचारल्‍यानंतर पोटात सर्वच ठिकाणी दुखते असे सांगितले नाही तरीसुध्‍दा जाबदार नं. 2 यांनी अल्‍ट्रासाऊंड सोनोग्राफ्रीने सर्व पोट तपासुन No significant abnormality is detected  असा त्‍यावेळचे परिस्थितीनुसार अहवाल दिला या निदानामुळे पेशंट पुर्णपणे नॉर्मल आहे असे निदान होत नाही.  व तक्रारदार यांना औषधाची गरज नाही असेही निदान होत होत नाही.  तसेच  तक्रारदार यांना औषध देऊनही जर पोट दुखले तर मुळ डॉक्‍टरांनी जाबदार क्र. 2 यांचेकडे   पुन्‍हा सोनोग्राफी करुन घेणेसाठी सांगणे जरुरीचे होते व अशा वेळी फेरतपासणीसाठी जे पेशंट येतात त्‍यांची फेरतपासणी ही विनामुल्‍य केली जाते.  जर परत तक्रारदार  जाबदार यांचेकडे आले असते तर “दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर”मध्‍ये  दि. 21-01-2016 रोजी जे निदान झाले असते तेच निदान जाबदार यांचेकडे  झाले असते.  दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटरचा जो अहवाल आहे त्‍यामध्‍ये “Recent Appendicular Perforation With  Peritonitis “  या Recent हा  शब्‍द अतिशय महत्‍वाचा  आहे. “कारण Appendix ला सुज येवून ते आत्‍ताच फुटले आहे”   असे निदान होते.  तसे त्‍यासंबंधी  literature  आहे  त्‍यात असे नमूद आहे की, “अल्‍ट्रासाऊंड सोनोग्राफी ” मध्‍ये प्रथमदर्शनी अपेंडिक्‍स दिसत नाही कारण ज्‍यावेळी पोटाची सोनोग्राफ्री केली जाते त्‍यावेळी पोटात गॅस असतो व त्‍यामुळे सोनाग्राफीचे Rays आतमध्‍ये न जाता Reflect  होतात व गॅस खालील पोटाचा भाग दिसत नाही व इंग्लिश जर्नलमध्‍ये  नमूद आहे की, अपेडिंक्‍स  दिसणेचे अनुमान किंवा प्रमाण 71% ते 97%  इतके आहे.  सबब,जाबदार यांनी केलेले निदान हे पुर्णपणे चुकीचे असून त्‍यामुळे तक्रारदार यांचे जिवास धोका निर्माण झाला हे म्‍हणणे चुकीचे आहे. सबब, वैद्यकीय सेवेत कुठेही कसूर केलेली नाही.  तक्रारदार यांचेमुळे, जाबदार यांची वैद्यकीय व्‍यवसायात बदानामी झालेली आहे.  सबब, तक्रारदार यांचेकडून जाबदार यांना रक्‍कम रु. 10,00,000/- नुकसानभरपाई मिळावी अशी जाबदार यांचीच तक्रार आहे.                                                         

 

11)   वर नमूद तक्रारदार व जाबदार यांचे कथनांचा विचार करता दि. 20-01-2016 व दि.21-01-2016 असे अनुक्रमे अॅपल सरस्‍वती हॉस्‍पीटलची तसेच दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर यांचे अल्‍ट्रासाऊंड सोनोग्राफी सेंटर यांचे अल्‍ट्रासाऊंडचे दोन अहवाल आहेत.   दि. 20-01-2016 चे अहवालानुसार “No significant abnormality is detected”  असे निरिक्षण नोंदवले गेले आहे व दिनांक 21-01-2016 रोजीचे अहवालानुसार “Recent Appendicular Perforation With  Peritonitis “  असे निरिक्षण नोंदवलेले आहे.   वादाचा मुद्दा इतकाच की, जाबदार व दिशा डायग्‍नोस्‍टीक सेंटर  यांचेतील अहवालामध्‍ये कमालीचा विरोधाभास आहे व जाबदार यांनी तक्रारदार यांचे पोटाची व ग्रंथींची अल्‍ट्रासाऊंडने तपासणी योग्‍य पध्‍दतीने केली नसलेने व चुकीचा अहवाल देवून चुकीचा सल्‍ला दिल्‍यामुळे तक्रारदार यांचे जिवितास धोका निर्माण होईल असे कृत्‍य  करुन वैद्यकीय सेवेत अक्षम्‍य कसूर केलेली आहे तथापि जाबदार यांनी त्‍यांचे अल्‍ट्रासाऊंड अहवालाचे रिपोर्ट व चित्रफिती तसेच वैद्यकीय साहित्‍य (Medical Literature) दाखल केलेले आहे त्‍यामध्‍ये,

(1) Diagnostic accurancy of ultrasonography in acute appendicitis.

 

Result :- Out of 60 patients whose USG of right lower quadrant was performed, 30 patients were correctly diagnosed as having acute appendicitis on USG out of 34 finally diagnosed cases based on histopathology. Similarly we picked 12 normal appendices out of 26 non-appendicitis patients.  The showed that US scan has sensitivity of 88%, specificity of 92 %, positive predictive value of 94%, negative predictive value of 86%, and overall accuracy of 90%.  The most accurate appendiceal finding for appendicitis was a diameter of 7 mm or larger followed by non-compressibility of inflamed appendix.  

 

Conclusion:-   Ultrasonography has high accuracy  in diagnosing acute appendicitis and reduces negative appendectomies.  Greater that 6-mm diameter of the appendix under compression is the most accurate USG finding with high positive predictive value for the diagnosis of acute appendicitis.  

 

 

Accuracy of ultrasonography in the diagnosis of acute appendicitis in adult patients: review of the literature.

 

Results: The gold standard for the diagnosis of appendicitis still remains pathologic confirmation after  appendectomy.  In the published literature, graded-compression. Ultrasound has shown an extremely valuable diagnostic accuracy in the diagnosis of acute appendicitis (sensitivity range from 44% to 100%; specificity range from 47% to 99%). This is due to many reasons including lack of operator skill,increased gas content,obesity, anatomic variants, and limitations to explore patients with previous laparotomies.  

 

Conclusions :-  Graded-compression Ultrasound still remains our first-line method in patients referred with clinically suspected acute appendicitis; nevesrtheless,due to variable diagnostic accuracy, individual skill is requested not only to perform a successful exam, but also in order to triage those equivocal cases that, subsequently, will have to undergo assessment by means of Computed Tomography.          

 

 वर नमूद Medical Literature  चा विचार करता जाबदार यांनी मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे या कामी दाखल केलेले आहेत.

 

1 ) Supreme Court of India

 

Civil Appeal No.3541/2002

 

Martin F.D’Soiza  Vs.    Mohd. Ishfaq

 

2) 2016 (1) ALL MR (JOURNAL) 64

 

National Consumer Disputes Redresssal Fourm, New Delhi

Ram Chandra Rai Vs Dr. Md. Zaheer

 

     तक्रारदार जर जाबदार यांचेकडे फेरतपासणीसाठी जाबदार यांचेकडे आले असते तर दि. 21-01-20156 रोजी जे निदान दिशा डायग्‍नोस्‍टीक  सेंटरमध्‍ये झाले तेच निदान जाबदार यांचेकडे झाले असते तथापि याचा अर्थ असा नाही की,  दि. 20-01-2016 ला अॅपल सरस्‍वती हॉस्‍पीटलमध्‍ये जे निदान झाले ते चुकीचे आहे व दिशा डायग्‍नोस्‍टीक  सेंटरचे अहवालामध्‍ये पुर्णता हे कथन केले आहे,  “Recent Appendicular Perforation With  Peritonitis “   व डॉक्‍टरांनी सदरचा Recent शब्‍द अतिशय महत्‍वाचा आहे असे कथन केले आहे.  याचाच अर्थ अपेंडिक्‍सला फार सुज येवून ते नुकतेच किंवा आत्‍ताच फुटले आहे व दाखल (Medical Litarature)  मध्‍ये स्‍पष्‍टपणे नमूद आहे,  अल्‍ट्रासाऊंड सोनोग्राफीमध्‍ये प्रथमदर्शनी अपेंडिक्‍स शक्‍यतो दिसून येत नाही.  कारण ज्‍यावेळी सोनोग्राफी केली जाते त्‍यावेळी पोटात गॅस असलेने व वातामुळे सोनोग्राफीचे किरण (Rays)  आतमध्‍ये न जाता ते Reflect  होत असतात व सदरचा भाग त्‍यामुळे दिसून येत नाही व अपेंडिक्‍स  दिसणेचे प्रमाण 71%  ते 97 %  इतके आहे. सबब, वर नमूद वैदयकीय साहित्‍याचा आधार घेत   जाबदार यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेमध्‍ये कोणताही निष्‍काळजीपणा केलेला नाही यावर हे मंच ठाम आहे.   

12)  तक्रारदाराला जर जाबदार यांना जबाबदार धरावयाचे होते तर तक्रारदाराने सदरचे दि. 20-01-2016 रोजीचे अल्‍ट्राससाऊंडमध्‍ये काहीही दिसले  नसले तरीसुध्‍दा पोटात दुखणे चालूच असलेने दुसरेच दिवशी म्‍हणजेच दि. 21-04-2016 ला फेरतपासणीसाठी येणे निश्चितच जरुरीचे होते.  तक्रारदार पुन्‍हा हीच तक्रार घेऊनच गेला असता तर निश्चितच याची योग्‍य ती दखल घेवून जाबदार डॉक्‍टरांनी या संदर्भात योग्‍य  ती तपासणी अथवा योग्‍य तो औषधोपचार केला असता मात्र जाबदार यांचेकडे न जाताच केवळ दि. 21-01-2016 रोजीचा अल्‍ट्रासाऊंड रिपोर्ट वेगळा आलेने जाबदार यांना दोषी धरणे हे मंचास संयुक्तिक वाटत नाही.  सबब त्‍यांनी सेवा देण्‍यामध्‍ये कसूर करणेचा प्रश्‍नच उदभवत नाही.  जाबदार यांना ज्‍याप्रमाणे दि. 20-01-2016 रोजी Ultrasound मध्‍ये Observation  दिसून आले  त्‍यास अनुसरुन त्‍यांनी औषधोपचाराची गरज नाही असे सांगितले व यात जाबदार यांचा काहीच हलगर्जीपणा नाही, जी बाब एखादया मशिनव्‍दारेच स्‍पष्‍ट झाली आहे त्‍यावरुनच जाबदार डॉक्‍टर यांनी सदरचा सल्‍ला दिलेला आहे.  निश्चितच दि. 21-01-2016 चे Ultrasound चे अहवाल हा सल्‍ला जाबदार डॉक्‍टरांनी दिला नसता व सदरचा जाबदार डॉक्‍टर यांनी हलगर्जीपणा अथवा वैद्यकीय सेवा देणेत कसूर केली याबाबत तज्ञ अभिप्रायाची (Expert Opinion) आवश्‍यकता नाही असे या मंचाचे ठाम मत आहे. जी बाब आपल्‍याला स्‍पष्‍टपणे चुकीची नाही हे दिसत आहे.  त्‍यासाठी Expert Opinion चीही आवश्‍यकता नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.                                    

 

13) जाबदार यांनी याबाबत काही मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडेही दाखल केलेले आहेत.

2009(3)ALL MR ( JOURNAL) 60

 

Consumser Disputes Redressal Commission Maharashtra State

 

Shri Andip Vinayak Aher         Vs          Dr. RukminiManohar Karad 

 

 

Consumer Protection Act (1986).S.2 Consumer complaint – Medical negligence – Burden is on complainant to prove that  the opp. party doctor was guilty of medical negligence and medical negligence of the doctor has got to be proved by adducing expert evidence.   

 

14)  तक्रारदाराने, जाबदार यांचे निष्‍काळजीपणाचा कोणताही पुरावा या मंचासमोर दाखल केलेला नाही की, ज्‍यामुळे जाबदार हा खरोखरच सेवा देणेत असमर्थ ठरला आहे ही बाब मंचासमोर शाबीत होते.  सबब, वर नमूद बाबींचा विचार करता सदरचा जाबदार यांनी कोणताही पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. सबब, जी शाबीतीची बाब आहे तीच बाब तक्रारदार शाबीत करु शकला नसलेने हे मंच त्‍यांचेविरुध्‍द  तक्रार अर्ज नामंजूर करणेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 

                 

 सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.  सबब, आदेश.

   

                                                    - आ दे श -                     

              

1)     तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो. 

2)    खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.   

3)  आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.