Maharashtra

Nagpur

CC/704/2015

NAMAN PINACK HALAIE - Complainant(s)

Versus

APPLE AUTOMOBILES - Opp.Party(s)

SANDHYA MANIYAR

25 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/704/2015
( Date of Filing : 07 Nov 2015 )
 
1. NAMAN PINACK HALAIE
R/O, H-162, ABHYANKAR ROAD, SITABULDI, NAGPUR.
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. APPLE AUTOMOBILES
C-42, OPP. PROVINCIAL, AUTOMOBILES, MIDC, HINGNA, NAGPUR.
Nagpur
Maharashtra
2. APPLE AUTOMOBILES, THR. PROPRIETOR, UJWAL CHANDAK
C-42, OPP. PROVINCIAL, AUTOMOBILES, MIDC, HINGNA, NAGPUR.
Nagpur
Maharashtra
3. APPLE AUTOMOBILES, THR. PROPRIETOR, VIJAY SAPATE
C-42, OPP. PROVINCIAL, AUTOMOBILES, MIDC, HINGNA, NAGPUR.
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:SANDHYA MANIYAR, Advocate
For the Opp. Party:
Dated : 25 Jun 2020
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.       तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ही नोंदणीकृत संस्‍था असून विरुध्‍द पक्ष क्रं. 2 व 3 हे या संस्‍थेचे मालक आहेत व  ते दैनदिन कार्यभार सांभाळतात. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून सन 2008 मध्‍ये मारुती स्विफ्ट कार खरेदी केली असून त्‍याचा रजि.क्रं. क्रं. एम.एच.31 सी.आर.9559, चेसिस क्रं. 336886 व  इंजिन क्रं.1104462 असा आहे. तसेच विरुध्‍द पक्षाचे सर्विस स्‍टेशन अमरावती रोड, वाडी पोलिस स्‍टेशनच्‍या समोर, वाडी, नागपूर येथे होते. परंतु आता हे सर्विस स्‍टेशन सी-42, प्रोव्‍हीन्‍शल अॅटोमोबाईलच्‍या समोर, एम.आय.डी.सी. हिंगणा, नागपूर येथे आहे.

 

  1.        तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने उपरोक्‍त नविन वाहन विरुध्‍द पक्ष क्रं. 1 कडून विकत घेतले होते. त्‍यानंतर त्‍याने काही लहान-सहान दुरुस्‍तीकरिता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 च्‍या सर्विस स्‍टेशन मध्‍ये सदरचे वाहन दिले. सदरच्‍या वाहनात दुरुस्‍ती झाल्‍यानंतर तक्रारकर्ता वाहन घेण्‍याकरिता गेला असता त्‍याला दुरुस्‍ती करण्‍याकरिता जास्‍तीचे काम निघाल्‍याचे दिसून आले. कारण तक्रारकर्ता वाहन घेऊन जात असतांना वाहनाने आग पकडली व विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची दुरुस्‍ती न केल्‍याची बाब लपवून ठेवली.  तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की,  विरुध्‍द पक्षाकडे नविन कार दुरुस्‍तीकरिता दिली होती, तेव्‍हा विरुध्‍द पक्षाने वाहन व्‍यवस्थित दुरुस्‍त करुन त्‍यांची संपूर्ण तपासणी केल्‍यानंतरच वाहन सुपूर्द करण्‍याची जबाबदारी होती. विरुध्‍द पक्षाकडे वाहनाचे काम करणारे उत्‍कृष्‍ट मॅकनिक उपलब्‍ध नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास हा त्रास सहन करावा लागला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास दि. 21.07.2014 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली व रुपये 7,75,000/- ची मागणी केली. त्‍यावर वि.प.ने वकिलामार्फत दि. 28.07.2014 रोजी नोटीसचे उत्‍तर पाठविले व त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने त्‍याच्‍या सर्विस स्‍टेशन मध्‍ये तक्रारकर्त्‍याचे कोणतेही वाहन दुरुस्‍त केलेले नाही. परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास केवळ वाहन दुरुस्‍तीचे कोटेशन दिले होते. अशा प्रकारे विरुध्‍द पक्षामुळे तक्रारकर्त्‍यास शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.  

 

  1.        तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने सेवेत त्रुटी केली असून अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये 7,75,000/- देण्‍याचा आदेश द्यावा अशी  विनंती केली आहे.
  2.        विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांना मंचामार्फत नोटीस बजाविण्‍यात आली होती. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष 1 ते 3 हे मंचासमक्ष हजर झाले नाही अथवा आपले म्‍हणणे अथवा लेखी उत्‍तर सादर न केल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 18.05.2017 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.           तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद इत्‍यादीचे अवलोकन केले असता खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.

         मुद्दे                                                                    उत्‍तर

  1.  तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय?            होय.
  2.  विरुध्‍द पक्षाने सेवेत त्रुटी केली आहे काय?             नाही
  3.  काय आदेश ?                              अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून सन 2008 मध्‍ये मारुती स्विफ्ट कार क्रं. एम.एच.31 सी.आर.9559, चेसिस क्रं. 336886 व  इंजिन क्रं.1104462 ही खरेदी केली होती. तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 4 वर  आर.टी.ओ.रजिस्‍ट्रेशनची प्रत, अॅपल अॅटोमोबाईलचे कोटेशन बिल, फोटोग्राफ, जॉब इस्‍टीमेट, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला पाठविलेली कायदेशीर नोटीस, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीसला पाठविलेले उत्‍तर व विरुध्‍द पक्ष हे मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 13.01.2017 रोजी हितवाद या इंग्रजी वृत्‍तपत्रातून प्रसिध्‍द केलेली जाहीर नोटीस इत्‍यादी बाबतचे दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत, यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते.  तक्रारकर्त्‍याने नि.क्रं. 4(2) वर वाहनाच्‍या दुरुस्‍तीबाबतचे कोटेशन दाखल केलेले आहे. सदरचे कोटेशन हे ऑईल फिल्‍टर, ऑईल चार्ज, फिल्‍टर टॅंक, एअर फिल्‍टर किलनिंग इत्‍यादीकरिता रक्‍कम रुपये 1500/- चे घेतले असल्‍याचे असून त्‍यावर "PAID"  असा ठप्‍पा लावलेला आहे. यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून कोटेशन बिल मध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे  सफाईकरिता रुपये 1,500/- घेतले असल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून वाहन दुरुस्‍त करुन घेतल्‍यानंतर सुध्‍दा वाहनात आग लागल्‍याबाबतचे छायाचित्राची प्रत दाखल केली आहे. परंतु तक्रारकर्त्‍याचे वाहन हे 6 वर्षे जुने असून तक्रारकर्त्‍याने त्‍याचे इन्‍श्‍युरन्‍स काढलेले नसल्‍याचे दिसून येते. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनात आग लागली परंतु सदरच्‍या वाहनात कोणत्‍या कारणाने आग लागली याबाबत तक्रारकर्त्‍याने तज्ञाचा अहवाल दाखल केलेला नाही, त्‍यामुळे   तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाला लागलेल्‍या आगीकरिता विरुध्‍द पक्षाला जबाबदार धरता येणार नाही. तक्रारकर्त्‍याने सागर अॅटोमोबाईल, कर्वे नगर, वर्धा रोड, यांनी सदरच्‍या वाहनाचे निरीक्षण करुन वाहन दुरुस्‍तीकरिता रुपये 6,15,000/- इतक्‍या खर्चाचे जॉब कार्ड इस्‍टीमेट दिलेले असल्‍याचे दस्‍तऐवज दाखल केलेले आहे. परंतु वाहनाला आग कोणत्‍या कारणाने लागली याबाबतचा तज्ञ अहवाल दाखल केलेला नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सेवा देण्‍यात त्रुटी केली असे म्‍हणता येणार नाही.

 

सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येते.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

  1. उभय पक्षांनी खर्चाचे वहन स्‍वतः सोसावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’  व  ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.