जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 204/2008. प्रकरण दाखल तारीख - 06/06/2008 प्रकरण निकाल तारीख - 05/09/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. महंमद फारुख पि. शेख मोईन वय -- वर्षे धंदा व्यापार अर्जदार. रा. महमद अली रोड नांदेड, ता. जि. नांदेड. विरुध्द. 1. अपोलो टायर्स लि. द्वारा,रजिस्ट्रडे कार्यालय, 6वा मजला, / दि.26.08.2008 चे आदेशाने चेरुपूरीम बिल्डींग, शनमुगम रोड, / वगळले. कोंची-461604. 2. मेसर्स दातीवाला अन्ड कंपनी, जूना मोंढा, नांदेड ता. व जि. नांदेड. गैरअर्जदार 3. मेसर्स दातीवाला अन्ड कंपनी, जूना मोंढा, नांदेड, ता. व जि. नांदेड. 4. तेहरा टायर्स, / दि.26.08.2008 चे आदेशाने 9, ओपन थेयटर्स मार्केट, / वगळले. रेल्वे स्टेशन रोड,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.जे.एस.गूहीलोत गैरअर्जदार 2 व 3 तर्फे - स्वतः गैरअर्जदार क्र.1 व 4 तर्फे - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष ) यातील तक्रारकर्ते महंमद फारुख यांची तक्रार अशी की, त्यांचा माल वाहतूकीचा व्यवसाय आहे, त्यांचेकडे उत्तम चालक व वाहक आहेत. गैरअर्जदार क्र.2 हे अपोलो टायर्स चे अधिकृत विक्रेते आहेत व गैरअर्जदार क्र. 3 हे सब डिलर आहेत. अर्जदाराने बिल नबर 865 व 884 याप्रमाणे गैरअर्जदार क्र. 3 कडून दि.01.01.2008 व 11.01.2008 रोजी अपोलो कंपनीचे टायर्स खरेदी केले होते. त्याबाबत गैरअर्जदार क्र. 3 ने हमी घेतली होती. सदरचे टायर्स पूढे जाऊन खराब झाले, त्यांची तपासणी करण्यात आली परंतु त्यांचा खोटा अहवाल कंपनीतर्फे देण्यात आला. टायर्सची तपासणी करण्याचे वेळी अर्जदार यांना बोलाविण्यात आले नाही, अहवाल खोटा देण्यात आला होता व टायर काढीत असताना अकूशल व्यक्तीकडून नूकसान झाले असे सांगून अर्जदाराचा क्लेम नामंजूर करण्यात आला तो अयोग्य कारणासाठी नामंजूर केला म्हणून त्यांनी संबंधीताना नोटीस दिली परंतु त्यांनी त्यांची दखल घेतली नाही, रक्कम दिली नाही. म्हणून त्यांनी ही तक्रार दाखल करुन एकूण रु.65,500/- नूकसान भरपाई मिळावी, तसेच दावा खर्च म्हणून रु.2,000/- व सदरच्या रक्कमेवर 12 टक्के व्याज मिळावे अश्या मागण्या केल्या आहेत. या मूळ प्रकरणात गैरअर्जदार क्र. 1 व 4 यांनी समाविष्ट करण्यात आले आहे परंतु अर्जदार यांनी त्यांना नोटीस पाठविण्याच्या दृष्टीने काळजी घेतली नाही, म्हणून गैरअर्जदार क्र. 1 व 4 यांचे विरुध्दचे प्रकरण खारीज करण्यात आले. त्या बाबतचा आदेश दि.26.08.2008 रोजी पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र.2 ने आपला जवाब दाखल केला व असे नमूद केले की, सदर टायर हे तपासणीसाठी पाठविले होते, त्यांचा अहवाल आलेला आहे, त्यामध्ये टायरमध्ये कोणताही दोष नव्हता जो काही दोष आहे तो अर्जदाराचा आहे. त्यामूळे त्यांना या प्रकरणात जबाबदार ठरवू शकत नाहीत. त्यांनी अर्जदाराच्या नोटीसला उत्तर दिलेले आहे. जवळपास असेच गैरअर्जदार क्र.3 चा जवाब आहे. यूक्तीवादाचे वेळी त्यांचे विरुध्द ही तक्रार खारीज करण्यात आलेली आहे ते गैरअर्जदार क्र. 1 व 4 चे प्रतिनीधीने आपले निवेदन सादर केले. अर्जदाराने पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले, त्यांनी पावती क्र. 865 व पावती क्र.884 च्या पावत्या दाखल केल्या आहेत, क्लेम फॉर्म, गैरअर्जदार क्र. 4 ने दिलेला टायर्स चा अहवाल, गैरअर्जदार यांना दिलेली नोटीस, गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांना पाठविलेल्या पावत्या, इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत.गैरअर्जदार तर्फे श्री. संजय जैन यांची साक्ष शपथपञाद्वारे नोंदविण्यात आली. यूक्तीवादाचे वेळी अर्जदार गैरहजर, गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे कोणीही हजर नाही, अपोलो टायर्स कंपनीचे प्रतिनीधी हजर, त्यांनी यूक्तीवाद केला. सदर प्रकरणात सदरचे टायर्स हे मूळात दोषयूक्त होते, त्यामध्ये उत्पादकीय दोष होता ही बाब सिध्द करण्याची जबाबदारी अर्जदार यांची आहे. आणि अर्जदाराने सदरच्या टायरमध्ये उत्पादकीय दोष होता ही बाब स्वतंञ पूराव्याने सिध्द केलेली नाही. त्यांनी जे दस्ताऐवज दाखल केले त्याप्रमाणे अर्जदाराच्या टायर्सची कंपनीने तपासणी करुन, त्यांनी अयोग्य व्यक्तीकडून दोषपूर्ण पध्दतीने टायर्स काढले व जोडले असा जो अहवाल दिलेला आहे तो दाखल केलेला आहे. माञ, हे अहवाल चूकीचे आहे, व वस्तूस्थितीमध्ये टायरमध्ये उत्पादकीय दोष होता हे सिध्द करण्याची स्वतंञ जबाबदारी अर्जदाराची आहे. अर्जदाराने आपली जबाबदारी पार पाडली नाही व ही बाब सिध्द केली नाही. या संबंधी तज्ञ व्यक्तीचा पूरावा दिलेला नाही. यांच कारणावरुन ही तक्रार खारीज करण्यात येते. वरील सर्व बाबीवरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. 2. दोन्ही पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.विजयसिंह राणे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक |