Maharashtra

Gondia

CC/15/150

RAMENDRAKUMAR KASTOORCHAND JAISWAL - Complainant(s)

Versus

APOLLO MUNICH HEALTH INSURANCE COMPANY LTD., THROUGH REGIONAL MANAGER - Opp.Party(s)

MR.S.B.RAJANKAR

30 Dec 2016

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/15/150
 
1. RAMENDRAKUMAR KASTOORCHAND JAISWAL
R/O.GANESH NAGER, GURUNANAK WARD, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. APOLLO MUNICH HEALTH INSURANCE COMPANY LTD., THROUGH REGIONAL MANAGER
R/O.2 ND & 3 RD FLOOR, ILABS CENTRE, PLOT NO. 404-405, UDYOG VIHAR PHASE-III, GURGAON-122016, HARYANA
HARYANA
PANJAB
2. CANARA BANK, THROUGH BRANCH MANAGER
R/O. OLD BUS STAND ROAD, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M. G. CHILBULE PRESIDENT
 HON'BLE MR. H. M. PATERIYA MEMBER
 
For the Complainant:MR.S.B.RAJANKAR, Advocate
For the Opp. Party:
1. MR. S. V. KHANTED, Advocate for O. P. 1
2. MR. I. K. HOTCHANDANI, Advocate for O. P. 2
 
Dated : 30 Dec 2016
Final Order / Judgement

आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. एम. जी. चिलबुले

       तक्रारकर्त्याने  ग्राहक  संरक्षण  अधिनियम,  1986  च्या  कलम 12  अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-

2.    विरूध्द पक्ष क्रमांक 1 अपोलो म्युनिच हेल्थ इन्शुरन्स कंपनी ही ग्राहकाकडून विमा प्रव्याजी घेऊन त्यांना आरोग्य विमा विक्रीचा व्यवसाय करते.  विरूध्द पक्ष क्रमांक 2 कॅनरा बँक ही विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची कार्पोरेट एजंट म्हणून काम करते व तिच्या खातेदारांना विरूध्द पक्ष क्रमांक 1 च्या आरोग्य विमा पॉलीसी विकते.

3.    तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 2 मार्फत विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची Easy Health Group Insurance Policy क्रमांकः 120100/12001/2014/A 003873/103 रू.2,00,000/- ची रू.8,398/- देऊन दिनांक 20/12/2014 ते 19/12/2015 या कालावधीसाठी खरेदी केली.  सदर पॉलीसीमध्ये तक्रारकर्ता रमेन्द्रकुमार कस्तुरचंद जैस्वाल, त्याची पत्नी पुनमदेवी, मुलगा कौस्तुभ आणि मुलगी अंजू यांना रू.2,00,000/- पर्यंतच्या आरोग्य विम्याचे संरक्षण देण्यात आले होते.

4.    सदर विमा पॉलीसी कालावधीत दिनांक 15/04/2015 रोजी आरोग्यविषयक समस्येसाठी तक्रारकर्त्याला उपचाराकरिता KMJ Hospital & Research Center, Gondia येथे भरती व्हावे लागले.  तेथे तक्रारकर्त्यास दोन दिवस व्हेंटीलेटर वर ठेवण्यांत आले आणि आयसीयुमध्ये 5 दिवस ठेवण्यांत आले व दिनांक 21/04/2015 रोजी सुट्टी देण्यांत आली.  तक्रारकर्त्याच्या हॉस्पिटलायझेशनबाबत त्याचा मुलगा कौस्तुभ याने दिनांक 16/04/2015 रोजी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला सूचना दिली.

5.    वरील उपचारासाठी हॉस्पिटल बिल व औषधांचा खर्च मिळून रू.60,201/- इतका खर्च झाला.  आवश्यक सर्व प्रमाणपत्र व बिलासोबत तक्रारकर्त्याने वरील उपचार व औषधोपचार खर्च मिळावा म्हणून दिनांक 30/04/2015 रोजी विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे विमा दावा सादर केला.  आयसीयू मध्ये कां ठेवावे लागले याची विरूध्द पक्षाने दिनांक 19/05/2015 च्या पत्रान्वये स्पष्टीकरण मागितले.  त्याबाबतचा खुलासा करणारे डॉ. अमित जैस्वाल यांचे पत्र तक्रारकर्त्याने सादर केले.  परंतु विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दिनांक 11/06/2015 रोजी तक्रारकर्त्यास पत्र पाठवून तक्रारकर्ता Cronic Obstructive Pulmonary disease (COPD) ने गेल्या 5 वर्षापासून ग्रस्त होता व सदर बाब विमा प्रस्तावात लपवून ठेवल्याचे खोटे कारण देऊन तक्रारकर्त्याचा वाजवी विमा दावा नामंजूर केला.  प्रत्यक्षात तक्रारकर्त्याच्या आजाराचे कागदपत्रात तो गेल्या 5 वर्षापासून COPD (श्वसनक्रियेचा त्रास) ने ग्रस्त असल्याचे कोठेही नमूद नाही.  म्हणून तक्रारकर्त्याचा वाजवी विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती सेवेतील न्यूनता आहे. म्हणून तक्रारकर्त्याने तक्रारीत खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

      (1)   वैद्यकीय खर्चाची रक्कम रू.60,201/- दिनांक 30/04/2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12% व्याजासह देण्याचा विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला आदेश व्हावा.    

      (2)   विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडून शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.25,000/- आणि तक्रारखर्च रू.10,000/-  मिळावा.    

6.    तक्रारीचे पुष्‍ठ्यर्थ तक्रारकर्त्याने दिनांक 20/12/2014 ते 19/12/2015 या कालावधीची विमा पॉलीसी, हेल्थ इन्शुरन्स कार्ड, दावा नामंजुरीचे पत्र, क्लेम इंटीमेशन फॉर्म, क्लेम फॉर्म, स्टेटमेंट फॉर्म, डिसचार्ज कार्ड, डॉ. जैस्वाल यांनी निर्गमित केलेले पत्र इत्यादी दस्‍तावेज दाखल केले आहेत.

7.    विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने लेखी जबाबाद्वारे तक्रारीस सक्त विरोध केला आहे.  त्यांचे म्हणणे असे की, Easy Health Group Insurance Policy विकत घेतांना तक्रारकर्त्याने Enrollment Form (प्रस्ताव अर्ज) सादर केला तो जोडपत्र ‘A’ वर आहे.  सदर प्रस्ताव अर्जात तक्रारकर्त्याने दिलेल्या माहितीवर विश्वासून विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने विमा पॉलीसी दिलेली असून त्याबाबतच्या अटी व शर्ती जोडपत्र ‘B’ वर आहेत.  प्रस्ताव अर्जामध्ये तक्रारकर्त्याने घोषणापत्रात नमूद केले आहे की, पॉलीसीधारक व त्याच्या कुटुंबातील सदस्य यांचे प्राकृतिक स्वास्थ्य उत्तम आहे आणि गेल्या 5 वर्षात त्यांना कोणताही मोठ्या स्वरूपाचा आजार झाला नव्हता.  सदर घोषणापत्रातील माहिती खरी असल्याबाबत तक्रारकर्त्याने सही केली आहे.

      तक्रारकर्त्याचा विमा दावा आवश्यक दस्तावेजांसह विरूध्द पक्षाला दिनांक 08/05/2015 रोजी प्राप्त झाला.  त्याप्रमाणे तक्रारकर्त्यास आलेला खर्च रू.60,201/- हा “breathlessness, cough, cold & fever” यावरील उपचारासाठी झाला होता.  तसेच रूग्णाचा इतिहास – Hypertension (HTN) Chronic Obstructive Pulmonary disease (COPD) असा नमूद आहे.  तक्रारकर्त्याला Obstructive Sleep Apnoea Syndrome (OSAS), Lower respiratory tract infection/Type 2,  Respiratory failure इत्यादी विकार उद्भवले होते.  डिसचार्ज समरीत नमूद आहे की, तक्रारकर्त्याला पूर्वीपासून रक्तदाब आणि COPD (श्वसनाचा आजार) होता.  क्लेम फॉर्म, क्लिनिकल रिपोर्ट व डिसचार्ज कार्ड जोडपत्र ‘C’,  ‘D’ आणि ‘E’ वर आहेत.

      दिनांक 15/04/2015 च्या डॉक्टरांच्या टिपणीमध्ये तक्रारकर्ता 5 वर्षापासून OSAS आणि RV Dysfunction मुळे रक्तदाबाच्या विकाराने मागील पाच वर्षापासून ग्रस्त असल्याचे नमूद आहे.  परंतु प्रस्ताव अर्जात तक्रारकर्त्याने सदर बाब लपवून ठेवली आहे.  जर त्याने वरील आजाराबाबत माहिती प्रस्ताव अर्जात दिली असती तर विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने त्यास सदर पॉलीसी विकली नसती किंवा त्यासाठी वेगळ्या अटी लावल्या असत्या.  डॉक्टरांची टिपणी व इतर माहिती जोडपत्र ‘G’ वर आहे.

      विरूध्द पक्षाने स्वतंत्र इन्व्हेस्टीगेटरची नियुक्ती करून प्रकरणात माहिती मागितली असता त्याने देखील गेल्या 5 वर्षापासून तक्रारकर्ता OSAS आणि  HTN ने ग्रस्त असल्याचा अहवाल सादर केला.  तक्रारकर्त्याने आजाराबाबतची सत्य माहिती लपवून धोकेबाजीने पॉलीसी मिळविली असल्याने तो सदर पॉलीसीचा कोणताही लाभ मिळण्यास पात्र नाही. इन्व्हेस्टीगेटरचा अहवाल आणि दिनांक 15/11/2014 चे विमा दावा नामंजुरीचे पत्राची प्रत जोडपत्र ‘H’ वर आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्षाची कृती पॉलीसीच्या अटी व शर्तीस अनुसरून असल्याने त्याद्वारे सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झाला नसल्याने तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.

8.    विरूध्द पक्ष क्रमांक 2 ने लेखी जबाब दाखल करून तक्रारीतील कथन नाकबूल केले आहे.  तसेच तक्रारीत त्यांच्याविरूध्द  सेवेतील न्यूनतेबाबत कोणतेही कथन नसल्याने व त्यांचेविरूध्द कोणतीही मागणी नसल्याने त्यांचे विरूध्दची तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे.      

9     तक्रारकर्ता व विरूध्द पक्ष यांच्या परस्पर विरोधी कथनांवरून तक्रारीच्या निर्णितीसाठी  खालील  मुद्दे  विचारार्थ  घेण्यात  आले.   त्यावरील  निष्कर्ष व कारणमिमांसा खालीलप्रमाणेः-

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.

विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने सेवेत न्यूनतापूर्ण व्यवहार केला आहे काय?

होय

2.

तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहे काय?

अंशतः

3.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

अंतिम आदेशाप्रमाणे

- कारणमिमांसा

10.   मुद्दा क्रमांक 1 बाबतः-    सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडून स्वतःसाटी व त्याच्या कुटुंबासाठी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे रू.2,00,000/- ची Easy Health Group Insurance Policy विकत घेतल्याबाबत पॉलीसीची प्रत दस्त क्रमांक 1 वर दाखल केली असून ती विरूध्द पक्षाला मान्य आहे.  सदर पॉलीसी कालावधीत तक्रारकर्त्याची प्रकृती बिघडल्याने तो उपचारासाठी दिनांक 15/04/2015 ते 21/04/2015 पर्यंत Shri KMJ Memorial Hospital & Research Center, Gondia येथे भरती होऊन भरती होऊन उपचार घेतल्याबाबतचे डिसचार्ज कार्ड दस्त क्रमांक 7 वर आहे, त्यांत तक्रारकर्ता उपचारासाठी भरती झाला तेव्हा त्यास “breathlessness, cough, cold & fever” इत्यादी त्रास असल्याचे नमूद आहे. 

      सदर उपचाराबाबतची माहिती तक्रारकर्त्याचा मुलगा कौस्तुभ याने दिनांक 16/04/2015 रोजी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला दिली.  त्याची प्रत दस्त क्रमांक 4 वर आहे.  उपचाराबाबतच्या खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्यासाठी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे दिनांक 30/04/2015 रोजी दाखल केलेल्या क्लेम फॉर्मची प्रत दस्त क्रमांक 5 वर आहे, त्यांत हॉस्पिटलमध्ये असतांनाचा खर्च रू.57,483.14 आणि हॉस्पिटलमधून सुट्टी झाल्यानंतरचा औषधोपचार खर्च रू.2,718.50 अशी एकूण रू.60,201.64 ची मागणी केली आहे.  त्यासोबत हॉस्पिटल बिल आणि औषधी खर्चाच्या मूळ पावत्या विरूध्द पक्षाकडे सादर केल्याचे चेक लिस्ट मध्ये नमूद आहे.  क्लेम फॉर्मसोबत सादर केलेल्या स्टेटमेंट फॉर्मची प्रत दस्त क्रमांक 6 वर आहे.

      तक्रारकर्त्याचा विमा दावा विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दिनांक 11 जून, 2015 च्या पत्रान्वये नामंजूर केला, त्याची प्रत दस्त क्रमांक 3 वर आहे.  त्यांत विमा दावा नामंजुरीचे कारण खालीलप्रमाणे नमूद केले आहेः-

      “Mr. Ramendrakumar Kastoorchand Jaiswal  : History of Chronic Obstructive Pulmonary disease (COPD) since 5 years.          

            Aforementioned facts about the health condition of insured member was not disclosed to us at the time of application for health insurance coverage (Proposal Form no. CB00115140 dated 20-Dec-2014).  Please note that the said condition is material to us from underwriting            perspective.   

            In view of the above facts we hereby serve you this notice of 30 days    for termination of your policy (ab-initio).  Please note you are not             entitled for any benefit under the policy. 

            तक्रारकर्त्याच्या अधिवक्त्यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, सदर पत्रात नमूद केल्याप्रमाणे दिनांक 15/04/2015 रोजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याच्यार 5 वर्ष आधीपासून तक्रारकर्ता Chronic Obstructive Pulmonary disease (COPD) ने ग्रस्त होता हे विमा दावा मंजुरीसाठी विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने दिलेले कारण पूर्णतः निराधार व खोटे आहे.  तक्रारकर्ता 5 वर्षापासून सदर आजाराने ग्रस्त होता व त्याने त्यासाठी कुठेही उपचार घेतल्याबाबतचा कोणताही पुरावा‍ विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने सादर केलेला नाही.  तक्रारकर्ता हॉस्पिटलमध्ये भरती झाला तेव्हा त्याला श्वसनाचा त्रास उद्भवल्यामुळे स्वतः बोलू शकत नव्हता, त्यामुळे त्यास असा आजार 5 वर्षापासून असल्याचे त्याने डॉक्टरांना सांगण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.  डॉक्टरांनी जर अंदाजाने त्याबाबत कोणताही उल्लेख डॉक्टरांचे टिपण किंवा डिसचार्ज समरीमध्ये केला असेल तर पूर्वीच्या आजाराबाबत घेतलेल्या उपचाराबाबतच्या पुराव्याअभावी डॉक्टरांनी केलेली नोंद पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नाही.  तेवढ्या कारणावरून तक्रारकर्त्याचा वाजवी विमा दावा नामंजुरीची विरूध्द पक्ष क्रमांक 1 ची कृती सेवेतील न्यूनता आहे.  आपल्या युक्तिवादाचे पुष्ठ्यर्थ त्यांनी खालील न्यायनिर्णयांचा दाखला दिला आहे.

(1)        II (2005) CPJ 32 (NC) – Surinder Kaur & Ors. v/s LIC of India & Ors.

(2)        II (2012) CPJ 549 (NC) – LIC of India v/s Shauntala.

(3)        II (2013) CPJ 103- Kotak Mahindra Old Mutual Life Insurance Ltd. v/s Chander Isarsingh Dhansinghani & Anr.

            वरील तीनही न्यायनिर्णयात म्हटले आहे की,

            “17.   No record of treatment prior to proposal form had been produced by any doctor nor any reference of any doctor was received     by the hospital.  If the doctor who treated the deceased had recorded    the same in case history that was not sufficient to say that information            was given by the insured/diseased.  Therefore, the case history given in the record by itself may be just based on hearsay and remained             unsubstantiated, without there being any medical evidence are the statement of insured persons himself or of the complainants.  It could     just be recorded on the basis of ignorant attendants.  But the proof in such matters could not be taken lightly, particularly, when the beneficial protection provided by the life insurance is required to be withheld on just technical ground.  Imaginations and surmises cannot take the place of proof.” 

            याउलट विरूध्द पक्षाच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद असा की, Discharge Summary  मध्ये H/O, HTN. COPD असे तक्रारकर्ता किंवा त्याच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीवरून के.एम.जी. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी नमूद केले आहे.  तक्रारकर्त्याने सदर हॉस्पिटलकडून प्राप्त केलेली Doctor’s Note ची प्रत दाखल केली आहे, त्यांत तक्रारकर्त्यावर उपचार करणा-या डॉ. अजय जैस्वाल यांनी नमूद केले आहे कीः-

      K/C  of OSAS – 5 Yrs.

            ESS H. T.       -   5 Yrs. _ RV Disfunctioning

                                                 c  

 

            यावरून हे स्पष्ट आहे की, दिनांक 15/04/2015 रोजी तक्रारकर्ता के. एम. जी. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती होण्याच्या 5 वर्षापासून उच्च रक्तदाब (H.T.) आणि OSAS (Once Snitch Always Snitch)(श्वसनाचा त्रास) या आजाराने ग्रस्त होता.  सदर आजाराबाबत तक्रारकर्त्यास पॉलीसी प्रस्‍ताव अर्ज (Enrolment Form) भरतांना पूर्ण माहिती होती.  परंतु त्याने ती लपवून ठेवली आणि खालीलप्रमाणे खोटे प्रमाणपत्र लिहून दिले.

      “  4.      DECLARATION & WARRANTY ON DEHALF OF ALL PERSONS TO BE INSURED

            I confirm that I and other members proposed to be insured under this policy are in good health and have not suffered in last 5 years from any major disease/disorder/ailment or deformity (other than infrequent common cold. fever, loose motion, headaches, acidity, high cholesterol, asthma, thyroid problem, diabetes without any complication or hypertension without any complication).

And,

I/We are neither awaiting any treatment medical or surgical nor attending any follow up for any disease/condition/ailment/injury/addiction not specified in this declaration.

 

 

 Yes, I confirm                              No, I can’t confirm

 

I hereby declare and warrant on my behalf and on behalf of all persons proposed to be insured that the above statements are true and complete in all respects and that there is no other information which is relevant for insurance that has not been disclosed to Apollo Munich Health Insurance Co. Ltd. I agree that this declaration shall be the basis of the decision by Apollo Munich Health Insurance Company Ltd. to cover or not cover us under insurance.”

            तक्रारकर्त्याच्या सदर घोषणापत्रावर विश्वासून विरूध्द पक्ष क्रमांक 1 ने पॉलीसी दिली आहे.  तक्रारकर्त्याने त्याला असलेल्या आजाराची माहिती लपवून विरूध्द पक्षाचा विश्वासघात करून धोकेबाजीने पॉलीसी मिळविली असल्याने तो पॉलीसीचा कोणताही लाभ मिळण्यास पात्र नाही.

      आपल्या युक्तिवादाच्या पुष्ठ्यर्थ त्यांनी खालील न्यायनिर्णयांचा दाखला दिला आहे.

2011 (1) CPR 149 – Karnataka State Consumer Disputes Redressal Commission, Bangalore

                                 Virupamma  v/s  Bajaj Allianz Life Insurance Co. Ltd.

            मा. राज्य आयोगाने सदर प्रकरणात खालीलप्रमाणे अभिप्राय व्यक्त केला आहे.

      “ 15.     We have gone through the pleadings of both the parties.  Perused the exhibits filed in respect of the averments taken by the       complainant and the O.P.  It is seen that prior to death of the deceased, he had a history of Retroviral infection.  Before obtaining the policy, deceased while undergoing medical test with the panel doctor of OP has not disclosed the said fact.      

      17.       Based on the facts and circumstances of the case on hand also, we are of the firm opinion that there is no deficiency of service on the    part of the OP in repudiating the claim made by the complainant.  On the other hand it is pertinent to note that complainant in this case has      suppressed the disease which he had before obtaining the policy.  After considering the facts and circumstances of the case, complaint filed by the complainant is liable to be dismissed.”

            वरील निर्णयाप्रमाणेच सदर प्रकरणातील तक्रारकर्त्याने 5 वर्षापासून त्याला असलेला HT आणि OSAS हा आजार विमा प्रस्ताव सादर करतांना लपवून ठेवला आणि खोटे घोषणापत्र देऊन पॉलीसी मिळविली.  म्हणून तक्रारकर्ता सदर पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे पॉलीसी रद्द होण्यास पात्र असून कोणताही पॉलीसी लाभ मिळण्यास पात्र नसल्यामुळे त्याचा विमा दावा नामंजूरीची विरूध्द पक्षाची कृती पूर्णतः कायदेशीर आहे व त्यामुळे विरूध्द पक्षाकडून विमा ग्राहकाच्या सेवेत कोणताही न्यूनतापूर्ण व्यवहार झालेला नाही.

      उभय पक्षाचे कथन, दाखल दस्तावेज, त्यांच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद आणि दाखल न्यायनिर्णयांचा विचार करता तक्रारकर्ता दिनांक 15/04/2015 रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तेव्हा श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्याने त्याने रूग्णाचा पूर्वेतिहास डॉक्टरांना स्वतः सांगण्याची मुळीच शक्यता नाही.  त्यामुळे इतरांकडून माहिती मिळवून जर डॉक्टरांनी H/O, HTN & COPD असे डिसचार्ज कार्डमध्ये आणि डॉक्टरांच्या टिपणात नमूद केले असले तरी विरूध्द पक्षाने तक्रारकर्ता 5 वर्षापासून सदर आजाराने ग्रस्त होता व त्यासाठी डॉक्टराकडून औषधोपचार घेतले होते याबाबतचा पुरावा दाखल केला नसल्याने तक्रारकर्त्याने सादर केलेल्या माननीय राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिर्णयाप्रमाणे अशा पुराव्याअभावी डिसचार्ज समरी किंवा डॉक्टरांच्या टिपणीमधील नोंदी तक्रारकर्ता 5 वर्षापासून HTN & COPD ने ग्रस्त होता हे सिध्द करण्यासाठी पुरावा म्हणून ग्राह्य ठरत नाही.  त्यामुळे तक्रारकर्त्यास 5 वर्षापूर्वीपासून असा आजार असतांना व त्याची त्याला माहिती असतांना त्याने विमा प्रस्ताव अर्जात ती बाब लपवून ठेवली असे कारण देऊन तक्रारकर्त्याचा विमा दावा नामंजुरीची कृती निश्चितच सेवेतील न्यूनता ठरते.  म्हणून मुद्दा क्रमांक 1 वरील निष्कर्ष होकारार्थी नोंदविला आहे.    

11.   मुद्दा क्रमांक 2 व 3 बाबत– तक्रारकर्त्याने विरूध्द पक्षाकडे हॉस्पिटल बिल व औषधाच्या आणि चाचण्यांच्या खर्चाबाबतच्या बिलासह रू.60,201/- चा विमा दावा दाखल केला आहे.  विमा दाव्यासोबत दाखल केलेले बिल खोटे असल्याचे विरूध्द पक्षाचे म्हणणे नाही.  म्हणून तक्रारकर्ता उपचार व औषधोपचाराबाबत झालेल्या रू.60,201/- ची विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडून प्रतिपूर्ती विरूध्द पक्षाने विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 11 जून, 2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे.  9% प्रमाणे व्याजासह मिळण्यास पात्र आहे.  याशिवाय शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.5,000/- आणि तक्रार खर्च रू.5,000/- मिळण्यास तक्रारकर्ता पात्र आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 2 व 3 वरील निष्कर्ष त्याप्रमाणे नोंदविले आहेत.

       वरील निष्कर्षास अनुसरुन खालील आदेश पारित करण्‍यात येत आहे.

-// अंतिम आदेश //-

 

1.     तक्रारकर्त्याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या कलम 12 खालील तक्रार खालीलप्रमाणे अंशतः मंजूर करण्यांत येते.

2.    विरुध्द पक्ष क्रमांक 1 ला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास उपचार व औषधोपचाराबाबत झालेल्या रू.60,201/- ची प्रतिपूर्ती विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दिनांक 11 जून, 2015 पासून प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द. सा. द. शे.  9% प्रमाणे व्याजासह अदा करावी.

3.    विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 ला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रू.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रू.5,000/- द्यावा.

4.    विरूध्द पक्ष क्रमांक 1 ला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाची पूर्तता आदेश प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.

5.    विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांचेविरूध्द कोणताही आदेश नाही.

6.    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.

7.    प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत करावी. 

 
 
[HON'BLE MR. M. G. CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. H. M. PATERIYA]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.