न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 34 व 35 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांचे पती महेंद्र जैन हे Chronic Liver Disease या व्याधीने आजारी असलेमुळे त्यांना Liver Transplant ची शस्त्रक्रिया करणेसाठी अपोलो हॉस्पीटल, मुंबई येथे दि. 13/4/2020 रोजी दाखल केलेले होते. मात्र शस्त्रक्रियेनंतर दि.16/4/2020 रोजी त्यांचे निधन झाले. शस्त्रक्रिया करणेपूर्वी हॉस्पटलमधील डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाणे रक्कम रु. 20 लाख फीचे पॅकेजची रक्कम तक्रारदार यांनी जमा केलेली होती. त्यामध्ये शस्त्रक्रियेअगोदरच्या व त्यानंतरच्या खर्चाचा समावेश होता. मात्र शस्त्रक्रिया यशस्वी होण्यापूर्वी केवळ 3 दिवसांच्या कालावधीमध्ये निधन पावल्यामुळे तक्रारदार यांनी हॉस्पीटलकडील उरलेल्या कालावधीसाठी राहिलेल्या पॅकेज फीमधील रक्कम परत करण्याची विनंती केली. मात्र सदरच्या पॅकेजमधील रक्कम ही Transplantation of Liver Surgery व त्यानंतरच्या उपचाराच्या खर्चाची असताना वि.प. यांनी उरलेली रक्कम देण्यास नकार दिला आहे. तदनंतरही वि.प. यांनी तक्रारदारांना चर्चेसाठी निमंत्रण देवून ठोस मागितलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. याकरिता, प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांचे पती महेंद्र जैन हे Chronic Liver Disease आजारी असलेमुळे त्यांना Liver Transplant ची शस्त्रक्रिया करणेसाठी अपोलो हॉस्पीटल, मुंबई येथे दि. 13/4/2020 रोजी दाखल केलेले होते. मात्र शस्त्रक्रियेनंतर दि.16/4/2020 रोजी त्यांचे निधन झाले. शस्त्रक्रिया करणेपूर्वी हॉस्पटलमधील डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाणे रक्कम रु. 20 लाख फीचे पॅकेजची रक्कम तक्रारदार यांनी जमा केलेली होती. त्यामध्ये शस्त्रक्रिये अगोदरचे व त्यानंतरच्या खर्चाचा समावेश होता. (The package of transplantation of lever surgery was inclusive of pre and post hospitalization expenses). मात्र तक्रारदार यांचे पती शस्त्रक्रिया यशस्वी होणेपूर्वी केवळ 4 दिवसांच्या कालावधीत निधन पावले. याकरिता तक्रारदार यांनी हॉस्पीटलकडे उरलेल्या कालावधीसाठी राहिलेल्या पॅकेज फीमधील रक्कम रु.10 लाख परत करणेची विनंती केली. सदरचे पॅकेजमधील रक्कम ही Transplantation of Liver Surgery व त्यानंतरच्या उपचाराच्या खर्चाची असताना वि.प. यांनी उरलेली रक्कम देण्यास नकार दिलेला आहे. वारंवार वि.प. यांना कळवूनही त्यांनी सदरची रक्कम देणेस टाळाटाळ केली आहे. वरील गोष्टीवरुन वि.प. यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारास द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे असे तक्रारदार यांचे कथन आहे. याकरिता तक्रारदार यांनी वि.प. कडून रक्कम रु. 10 लाख मिळावेत तसेच सदरचे रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे दि.16/4/2020 पासून व्याज द्यावे व मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 25,000/- देणेचे आदेश व्हावेत असे तक्रारदार यांचे कथन आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत वि.प. यांच्या दवाखान्याचे बिल, नवी मुंबई महापालिका यांचे प्रमाणपत्र, वि.प. यांनी डेथ समरी इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प. यांना प्रस्तुत तक्रारीचे नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी आपले म्हणणे दाखल केले नाही. सबब, वि.प. यांचेविरुध्द नि.1वर एकतर्फा आदेश करणेत आला.
5. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | नाही. |
3 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
6. तक्रारदार यांचे पती महेंद्र जैन हे Chronic Liver Disease आजारी असलेमुळे त्यांना Liver Transplant ची शस्त्रक्रिया करणेसाठी अपोलो हॉस्पीटल, मुंबई येथे दि. 13/4/2020 रोजी दाखल केलेले होते. मात्र शस्त्रक्रियेनंतर दि.16/4/2020 रोजी त्यांचे निधन झाले. शस्त्रक्रिया करणेपूर्वी हॉस्पटलमधील डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाणे रक्कम रु. 20 लाख फीचे पॅकेजची रक्कम तक्रारदार यांनी जमा केलेली होती. त्यामध्ये शस्त्रक्रिये अगोदरचे व त्यानंतरच्या खर्चाचा समावेश होता. (The package of transplantation of lever surgery was inclusive of pre and post hospitalization expenses). मात्र तक्रारदार यांचे पती शस्त्रक्रिया यशस्वी होणेपूर्वी केवळ 4 दिवसांच्या कालावधीत निधन पावले. तक्रारदारांनी यासंदर्भातील कागदपत्रे तक्रार दाखल करतेवेळी दाखल केली आहेत. त्यांचे अवलोकन करता वि.प. अपोलो हॉस्पीटलमध्ये तक्रारदार यांनी घेतलेल्या Liver Transplant व त्यासंदर्भातील तपासण्या यांची बिले दाखल केलेली आहेत. तसेच तक्रारदार यांचे पतीचे निधन झालेचे मेडीकल सर्टिफिकेटही तक्रारदार यांनी दाखल केलेले आहे. सदर तक्रारअर्जाचे कामी वि.प. यांना नोटीस लागू होवूनही वि.प. “अपोलो हॉस्पीटल” हे या आयोगासोर हजरही नाहीत व त्यांनी आपले म्हणणेही दाखल केलेले नाही. याकरिता त्यांचे विरुध्द या आयोगाने एकतर्फा आदेश यापूर्वीच पारीत केलेले आहेत.
7. तक्रारदार यांचे कथनानुसार तक्रारदार यांचे पतीचे Liver Transplant हे आपॅरेशन झाल्यानंतर तक्रारदारांचे पती हे दि. 16/4/2020 रोजी मयत झालेले आहेत. तक्रारदार यांचे पतीचे ऑपरेशन दि.13/4/2020 रोजी झाले. मात्र केवळ तीनच दिवसांत त्यांचे निधन झालेले आहे व संपूर्ण पॅकेजची फी ही रक्कम रु 20 लाख होती व यामधील The package of transplantation of lever surgery was inclusive of pre and post hospitalization expenses अशा पध्दतीचे हे पॅकेज होते. सबब, तक्रारदार यांच्या पतीचे शस्त्रक्रिया यशस्वी होण्यापूर्वी केवळ तीन दिवसांच्या कालावधीमध्ये निधन झाल्यामुळे उरलेल्या कालावधीसाठी राहिलेल्या पॅकेज फीमधील रक्कम परत करणेची विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे. तक्रारदार यांनी आपल्या लेखी युक्तिवादामध्ये तक्रारदार यांचे पतींना त्यांच्या मुलाने लिव्हर दिली होती व त्याचे बिल स्वतंत्र करणे गरजेचे असलेमुळे त्याचे बिलाची रक्कम रु. 4,79,889/- रिफंड म्हणून दाखविली व तक्रारदार यांचेकडून जादा रक्कम रु. 5 लाख घेतली व बिल रक्कम रु. 20 लाख असे केले असे तक्रारदार यांचे लेखी युक्तिवादामध्ये कथन आहे.
8. मात्र तक्रारदार यांचे असे जरी कथन असले तरी त्यांनी दाखल केलेल्या बिलांचा विचार करता सदरचे बिलांवरुन
Non invasive procedure Rs. 1,60,360/-
OT Pharmacy Rs. 24,405/-
Surgical package Rs. 13,00,000/-
Ward Pharmacy Rs. 35,354/-
................................
Rs. 15,20,111/-
अशी एकूण रक्कम Service Amount रु.15,20,111/- असल्याचे दिसून येते व त्यामध्ये डिपॉझिट केलेली रक्कम ही रक्कम रु. 20 लाख असलेचे दिसून येते. मात्र रिफंड या सदराखाली रक्कम रु.4,79,889/- अशी रक्कम असलेचे दिसून येते तसेच “Bill Amount in Words” यामध्ये रु Rs. Fifteen Lakh Twenty Thousand one Hundred eleven (रु.15,20,111/-) अशीच असलेचे निरिक्षण या आयोगाने नोंदविले आहे. And refunded Rs.4,79,889 only to Mr Mahendra Jain असे असलेचे दिसून येते. सबब, तक्रारदाराने लेखी युक्तिवादामध्ये सदरचे रक्कम रु.4,79,889/- हे बिल तक्रारदार यांचे मुलाने लिव्हर दिली होती या करिता असलेचे नमूद केलेले आहे. तसेच तक्रारदार यांचेकडून जादा रक्कम रु. 5 लाख घेतली असेही नमूद केलेले आहे. मात्र वर नमूद रक्कम ही कोणत्या कारणासाठी रिफंड केली अगर कोणत्या कारणासाठी घेतली हे तक्रारदार याने पुराव्यानिशी शाबीत केलेले नाही. वास्तविक वि.प. या आयोगासमोर हजर नसलेने तक्रारदार यांनी सदरची बाब ही या आयोगासमोर पुराव्यानिशी शाबीत करणे आवश्यक होते. मात्र दाखल बिलांवरुन रु.4,79,889/- ही रक्कम Refunded to Mr. Mahendra Jain म्हणजेच तक्रारदार यांचे मयत पती यांना सदरची रक्कम परत केलेचे दिसून येते. सबब, तक्रारदार कथन करतात ते कारण तक्रारदार यांनी पुराव्यानिशी शाबीत न केलेने तक्रारदार यांनी अर्जात मागितलेली मागणी मान्य करता येत नाही असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. तसेच तक्रारदार यांचे कथनावरुन सदरचे पॅकेज हे जरी प्रि व पोस्ट ऑपरेटीव्ह याकरिता असले तरीसुध्दा पोस्ट-ऑपरेटीव्हनंतर तक्रारदार यांचे पतीचे निधन हे ऑपरेशननंतर तीन दिवसांनंतर झालेचे या आयेागास दिसून येते. सबब, ऑपरेशननंतर असणारे पॅकेज हे कितीचे होते व काय होते हे आयेागासमोर दिसून येत नाही. सबब, तक्रारदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो.
2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
3. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.