(घोषित द्वारा श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष ) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे आहे. तक्रारदार दिनांक 11/7/2007 रोजी त्यांच्या ऑफिसमध्ये सकाळी 10 वाजता बसलेले असताना त्यांच्या डोक्यामध्ये अचानक दुखू लागले व ते लगेच 5 मिनीटे बेशुध्द झाले, त्यांच्या सोबत असलेले त्यांचे क्लायंट आणि मित्र यांनी त्यांना अपेक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी उपचार सुरु केले. त्यांनी तक्रारदारास Cerebral VST (SSS Trhombosis) Rt. From tral various intract symphiomatic seigmas. Throbossis झाल्याचे सांगितले. त्यानंतर डॉ माझीद यांनी तक्रारदाराची एचआयव्ही टेस्ट करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी तक्रारदाराकडून रु 480/- घेऊन दिनांक 11/7/2007 रोजी तक्रारदाराचे ब्लड टेस्टसाठी घेतले. दिनांक 12/7/2007 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्यांच्या दवाखान्यात इंजक्शन आणि इतर औषधी देऊन एचआयव्ही आणि Thrombosis वर उपचार सुरु केला. दिनांक 13/7/2007 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदारास डिसचार्ज दिला त्यावेळेस त्यांनी कॉस्मो पॅथॉलॉजीचा रिपोर्ट त्यांनी तक्रारदारास दिला त्याच वेळेस तक्रारदारास एचआयव्ही असल्याबद्दल सांगितले. हे ऐकल्यानंतर तक्रारदार निराश झाले आणि अंथरुणाला खिळले. साधारण तीन ते चार तास म्हणजे 4 वाजेपर्यंत ते एखाद्या डेड बॉडीसारखे अंथरुणाला खिळून होते. तक्रारदाराच्या नातेवाईकांनी तक्रारदारास घरी आणले. घरी आणल्यानंतर तक्रारदार नैराश्यामध्ये गेले त्यांना कुठलीही गोष्ट आठवत नव्हती, ते कोणाशीही बोलू शकत नव्हते, काम करु शकत नव्हते, अनसाऊंडेड माईंड व्यक्तीसारखे त्यांची अवस्था झाली होती. ही अवस्था दुस-या दिवशीपर्यंत होती. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी, गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी दिलेला रिपोर्ट सर्वासमक्ष दिल्यामुळे तक्रारदाराची प्रतिमा मलीन झाली, त्याचबरोबर त्यांना नैराश्याचा त्रास सुरु झाला. दिनांक 16/7/2007 रोजी तक्रारदार पुन्हा एकदा बेशुध्द झाल्यामुळे त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल करावे लागले. दिनांक 18/7/2007 रोजी त्यांना डिसचार्ज देण्यात आला. डॉ भारत हरणे यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तक्रारदाराने कुशल पॅथॉलॉजी सिडको औरंगाबाद येथे पुन्हा एकदा एचआयव्हीची टेस्ट केली. त्याचा रिपोर्ट दिनांक 14/7/2007 रोजी नॉन रिअक्टीव्ह (एचआयव्ही निगेटीव्ह) आला. त्यानंतर दिनांक 6/12/007 रोजी तक्रारदारानी ब्रेन पॅथॉलॉजी आणि लॅब्रोटरी औरंगाबाद यांच्याकडे सुध्दा एचआयव्हीची टेस्ट केली त्याचाही रिपोर्ट निगेटीव्ह आला. तक्रारदार एचआयव्ही पॉझिटीव्ह नसताना सुध्दा कॉसमॉस पॅथॉलॉजी यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून त्यांना प्रमाणपत्र दिले त्यामुळे तक्रारदारास नैराश्य आणि मानसिक त्रास झाला तसेच इतर लोकांचा त्यांना तिरस्कार सहन करावा लागला, तो आज सुध्दा चालू आहे. तक्रारदारांच्या पक्षकारास, तक्रादारास एचआयव्ही असल्याचे कळाल्यामुळे त्यांनी दिलेली कामे काढून घेतली. त्यामुळे तक्रारदाराची आर्थिक कमाई सुध्दा कमी झाली व त्यामुळे तक्रारदार अधिकच निराश झाले. हे सर्व गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी चुकीचा अहवाल दिल्यामुळे झाले असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. या सर्वामुळे तक्रारदारस त्यांचे ऑफिस बंद करावे लागले. दिनांक 12/7/2007 रोजी गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिलेला रिपोर्ट गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तक्रारदाराच्या नातेवाईकासमक्ष व मित्रांसमक्ष उघडपणे दिला व तक्रारदारास एचआयव्ही असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व नातेवाईकामध्ये तक्रारदारास एचआयव्ही असल्याचे समजले व नातेवाईक त्यांच्यापासून दूर राहू लागले. या सर्वामुळे तक्रारदार एका रुममध्ये एकटे राहू लागले व त्यांना आत्महत्या करावी अशी इच्छा होऊ लागली. परंतु घरातील / कुटूंबातील सदस्यामुळे तक्रारदाराने आत्महत्तेचा विचार सोडून दिला. तक्रारदारास दोन मुले आहेत. हया रिपोर्टबद्दल सर्व नातेवाईकांना माहिती झाल्यामुळे तक्रारदाराच्या मुलांचे लग्न होण्यास अडचण निर्माण झाली. दिनांक 24/9/2007 रोजी तक्रारदारानी गैरअर्जदार क्रमांक 3 यांना कायदेशिर नोटीस पाठविली. या सर्व प्रकारामुळे तक्रारदारास 5 लाखाचे आर्थिक नुकसान झाले. तसेच भविष्यातील नुकसानीसाठी रु 1400000/- असे एकूण रु 1900000/- आणि मानसिक व शारीरिक त्रासाची नुकसान भरपाईची मागणी तक्रार करतात. तक्रारदारानी शपथपत्र आणि कागदपत्रे लिटरेचर , निवाडे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1,2व 3 यांनी एकत्रीतपणे त्यांचा लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, ही मेडिकल निग्लीजन्सची तक्रार आहे. मा.सर्वोच्च न्यालयाच्या निकालानुसार तज्ञाचा पुरावा आवश्यक आहे. तक्रारदारानी तो दिलेला नाही. दोन्ही गैरअर्जदाराने विमा काढलेला आहे तर, विमा कंपनीला पक्षकार केलेले नाही, नॉन रिजॉइंडर ऑफ पार्टी म्हणून तक्रार नामंजूर करावी अशी मागणी करतात. गैरअर्जदार क्रमांक 1,2 व 3 यानी तक्रारदारास, मेडिकल प्रोसीजरप्रमाणे तपासले व उपचार केले. दोन्ही गैरअर्जदार, हे मेडिकल क्षेत्रामधील सुविद्य आहेत. डॉ.माझीद डीएम आहेत तर, डॉ सारा हया डीपीबी डिग्री घेतलेल्या आहेत. तक्रारदार दिनांक 11/7/2007 रोजी तीन चार दिवसापासून डोके दुखणे व इतर आजारासाठी दवाखान्यात उपचारासाठी आले. त्यानंतर पेशंटच्या ब्रेनचे सीटी स्कॅन व एमआरआय करण्यात आले. त्यामध्ये त्यांना व्हेनोस इन्फ्रॅक्ट सेकंडरी सुपेरियर सॅजिटल सायनस थ्रोंबोसिस झाल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पेशंटच्या पत्नीचे काउसेलिंग केल्यानंतर HIV (ELISA) टेस्ट्स करण्यात आल्या. त्या रिअक्टीव आहे हे कळाल्यानंतर, WHO च्या गाईडलाईनप्रमाणे 3 (consecative HIV Test) करण्यात आल्या. त्यानंतर पेशंटच्या पत्नीचे Conselling करुन पुन्हा एकदा ELISA आणि Westorn Blot test confirmation साठी करावी लागेल असे पेशंटच्या पत्नी व नातेवाईकांना सांगण्यात आले. पुन्हा एकदा केलेली ELISA test ही नॉनरिअक्टिव्ह ठरली व त्याचा रिपोर्ट ही पेशंटच्या पत्नीस सांगितला. पेशंटला एचआयव्ही झालेला आहे हे कधीही सांगितलेले नाही तसेच एचआयव्हीसाठी उपचारही केला नाही. पेशंटवर फक्त Thrombosis साठीच व्यवस्थित उपचार करत होता, त्याना दिनांक 13/7/2007 रोजी 12.15 वाजता डिसचार्ज देण्यात आला. पेशंटवर योग्य तो उपचार केला त्यामुळे सेवेतील त्रुटी किंवा अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला नाही म्हणून सदरील तक्रार नामंजूर करावी अशी मागणी गैरअर्जदार करतात. गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार आणि त्यांच्यामध्ये कुठलाही पॉलिसीचा करार झालेला नव्हता. तसेच गैरअर्जदार डॉक्टरांनी त्यांच्याकडून पॉलिसी घ्यावयास पाहिजे आणि पॉलिसीच्या अटी व शर्ती नुसार त्यांची जबाबदारी ठरेल.तक्रारदारानी तक्रारीमध्ये नमूद केलेले मुद्दे त्यांना मान्य नाहीत. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर करावी अशी मागणी गैरअर्जदार करतात. दोन्हीही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदाराची अशी तक्रार आहे की, ते डोके दुखत होते यावरील उपचारासाठी गैरअर्जदाराच्या दवाखान्यात गेले असता तिथे त्यांची एचआयव्ही साठी टेस्ट करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली असल्याचे गैरअर्जदारांनी, त्यांच्या सर्व नातेवाईक, मित्र मंडळी समोर त्यांना सांगितले. त्यामुळे त्याना मोठा मानसिक व शारीरिक धक्का बसला व समाजामध्ये त्यांच्या नावास कलंक लागला. त्यांच्या मुलांची त्यामुळे लग्न होणार नाहीत, सर्व पक्षकार Briefs परत घेऊन गेले, त्यामुळे आर्थिक त्रास झाला. गैरअर्जदार डॉक्टरानी WHO च्या गाईडलाईन्सनुसार तक्रारदाराची एचआयव्ही टेस्ट केली नाही. गैरअर्जदाराच्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट केल्यानंतर चारच दिवसात ही टेस्ट दिनांक 14/7/2007 रोजी कुशल पॅथॉलॉजी लॅबरोटरीमध्ये केली असता, त्यात पेशंट एचआयव्ही निगेटीव्ह असल्याचे सांगितले. त्यानंतरही दिनांक 06/12/2007 रोजी पुन्हा एकदा ब्रेन पॅथॉलॅजी लॅबमध्ये एचआयव्ही टेस्ट केली ती सुध्दा निगेटिव्ह आली. म्हणजेच गैरअर्जदार डॉक्टरानी WHO च्या गाईडलाईननुसार टेस्टस केल्या नव्हत्या असे दिसून येते. WHO नुसार --- If the test comes out positive, then confirmatory testing is done, i.e. the sample is then tested with two OR three different kits one after another according to the strategy / algorithm of testing, adopted. गैरअर्जदारानी पुन्हा एकदा टेस्ट केली ती नॉन रिअक्टिव्ह (एचआयव्ही निगेटिव ) निघाली असे त्यांच्या लेखी जवाबात म्हणतात, असे असेल तर, पहिला एचआयव्ही पॉझिटिव्हचा रिपोर्ट तक्रारदारास दयायलाच नको होता. तसेच दुसरा एचआयव्ही निगेटिव रिपोर्ट गैरअर्जदारानी तक्रारदारास दिलेला नाही व मंचातही दाखल केला नाही. याचाच अर्थ, गैरअर्जदारानी WHO च्या गाईडलाईन नुसार confirmative tests केलेल्याच नव्हत्या ( Western Blot वगैरे) गैरअर्जदारानी, त्यांच्या लेखी जवाबात, शपथपत्रामध्ये सुध्दा WHO च्या Guide line नुसार टेस्ट केल्या होत्या असे म्हणतात. तक्रारदार हे त्यांच्याकडे आणल्यानंतर ते शुध्दीवर होते असेही म्हणतात, आणि तरीही तक्रारदाराच्या पत्नीचे conselling करुन ELISA प्रमाणे टेस्ट करुन त्याचा रिपोर्ट (एचआयव्ही पॉझिटीव्ह) पेशंटच्या पत्नीला व इतर नातेवाईकांना सांगितले असे म्हणतात. WHO च्या गाईडलाईन्सप्रमाणे What is HIV conselling HIV/AIDS counselling/education is a confidential dialogue between a client and a counsellor aimed at providing information on HIV/AIDS and bringing about behaviour change in the client. It is also aimed at enabling the client to take a decision regaridng HIV tesing and to understand the implications of the test results. The steps in HIV counselling are : HIV pre-test counselling/information: This involves provision of basic information on HIV/AIDS and risk assessment to direct walk in clients. HIV post test counselling: Here the client is helped to understand and cope with the HIV test result. In case of a negative test result, the counsellor reiterates basic information on HIV and assists the client to adopt behavious that reduces the risk of getting infected with HIV in the future, in case the client is in the window perild, a repeat test is recommended. Those clients with suspected tuberculosis are fefreeed to the nearest microscopy centre. In case of a positive test result, the counsellor assists the clients to understand the implications of the positive test result and helps in coping with the test result, The counsellor also ensures access to treatment and care and supports disclosure of the HIV status to the spouse. Follow up counselling: In follow up counselling there is a re emphasis on adoption of sefe behaviours to prevent transmission of HIV infection to others. Follow up counselling also includes establishing linkages and referrals to services for care and support including ART, nutrition, home based care and legal support. ELISA नुसार टेस्ट घेण्यापूर्वी, जर ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आली तरी, पुन्हा एकदा पेशंटशी conselling करणे तेही confidential रित्या त्यांच्याशी संवाद साधणे (Mandetory) बंधनकारक आहे. असे असतानाही गैरअर्जदार डॉक्टरानी पेशंटला न सांगता, त्याना विश्वासात न घेता त्यांच्या पत्नीस व इतर नातेवाईकांना पेशंट HIV पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. गैरअर्जदार डॉक्टर त्यांच्या लेखी जवाबात व शपथपत्रात हे मान्य करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. गैरअर्जदार डॉक्टर WHO च्या गाईडलाईन पाळून टेस्ट केली असे म्हणतात परंतु रिपोर्ट देताना तो अत्यंत गुपीत ठेवायचा असतो, तरीही पेशंटच्या पत्नीस व इतर नातेवाईकांना तो सांगितला. म्हणजेच डॉक्टरानी WHO च्या गाईडलाईन्स पाळलेल्या नाहीत हे स्पष्ट होते. HIV बद्दलच्या WHO च्या लिटरेचरवरुन Confidential Information gathered during counselling must not be shared with others. The HIV test result must be reported only to the client unless the client states the desire to share the test result with a family member, partner or close friend confidentiality is defined as the state of being “private”. Maintaining the clients privacy by restricting access to personal and confidential information, especially HIV test results, demonstrates sensitiveity towards and respect for the basic rights of the client. Shared confidentiality This refers to sharing of HIV status and other health information of a client among health care providers involved in the treatment and care of the client, The purpose of sharing information is to ensure that the client receives better treatment and care. डॉक्टराना, कॉन्सिलिंग करताना जी माहिती मिळालेली असते ती इतर कुणाला सांगावयाची नसते. एचआयव्ही टेस्टचा रिझल्ट केवळ, त्या पेशंटलाच सांगावयाचा असतो. जर पेशंटने पत्नी किंवा जवळच्या मित्रासमोर सांगण्याची इच्छा व्यक्त केल्यासच त्यांच्यासमोर सांगितली जाते. इतकी गौप्यता हया ठिकाणी पाळावयाची असतानाही गैरअर्जदार डॉक्टरानी रिपोर्ट पेशंटच्या पत्नीस व इतर नातेवाईकांना सांगितला. म्हणजेच WHO च्या गाईडलाईन्स, तत्वाचे त्यांनी पालन केले नसल्याचे दिसून येते. डॉक्टरानी ज्या नातेवाईक / मित्रमंडळीसमोर रिपोर्ट सांगितला, त्यातील दोघांचे शपथपत्र तक्रारदारानी दाखल केले आहे. क्लायन्ट / पेशंटची प्रायव्हसी पाळत, एचआयव्हीच्या टेस्ट बाबत , कुणालाही ही माहिती न देणे हा त्या क्लायन्ट / पेशंटचा मुलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकारावर या गैरअर्जदार डॉक्टरानी सर्वांना रिपोर्ट सांगून गदा आणलेली दिसून येते. गैरअर्जदार डॉक्टरानी एचआयव्ही टेस्ट घेताना सुध्दा, तक्रारदाराची परवानगी घेतलेली नव्हती. ती सुध्दा WHO च्या गाईडलाईन्सच्या विरुध्द आहे. Informed consent for HIV testing The client agrees to HIV testing through giving his/her informed consent informed consent is a deliberate and autonomous permission given by a client to a health care provider to proceed with the proposed HIV test procedure . This permission is based on an adequate understanding of the advantages, risks, potential consequences and implications of an HIV test result, which could be both positive and negative. This permission is entirely the choice of the client and can never be implied or presumed. ही टेस्ट करण्याची परवानगी देणे व न देणे हे पेशंट / क्लायन्टच्या निवडीवर/ मर्जीवर अवलंबून असते ही परवानगी दुस-यातर्फे किंवा घेतली असे समजून टेस्ट करता येत नाही. हे सर्व बंधनकारक असताना सुध्दा, गैरअर्जदार डॉक्टरानी त्यांच्याच म्हणण्यानुसार, पेशंटची परवानगी घेतली नाही, तर त्यांच्या पत्नीस व नातेवाईकास सांगितले असे म्हणतात. एकीकडे ELISA , WHO च्या गाईडलाईन्सप्रमाणे सर्व टेस्ट केल्या म्हणतात, परंतु प्रस्तूतच्या प्रकरणात तक्रारदाराची टेस्ट करताना सर्व मार्गदर्शक तत्वे पायदळी तुडविल्याचे दिसून येते. गैरअर्जदारानी तर WHO च्या गाईडलाईनप्रमाणे टेस्ट केली असती तर त्याना लगेचच पेशंट हा nonreactive दिसून आला असता म्हणजेच त्यानी confirmative test केली नाही. त्यांच्याच म्हणण्यानुसार, त्यांनी लगेच दुसरी टेस्ट केली ती नॉन रिअक्टीव्ह होती असे म्हणतात. परंतु त्याचा रिपोर्ट दिला नाही. ELISA प्रमाणे confirmative साठी पुन्हा एकदा repeat test जर केली म्हणतात तर, पूर्वी केलेला रिपोर्ट तक्रारदारास दयायलाच नको होता व पेशंटच्या पत्नीस व नातेवाईकाना, प्रथम केलेल्या टेस्टचा रिझल्ट सांगावयास नको होता. गाईडलाईन नुसार, repeat test नंतरचा रिझल्ट त्यांना सांगणे गरजेचे होते. ते त्यांनी तक्रारदारास सांगितले नाही, म्हणूनच तक्रारदारानी इतर ठिकाणी दोन वेळा एचआयव्हीची टेस्ट केली ती निगेटीव आली. गैरअर्जदारानी repeat test , confirmative किंवा western Blot test केलीच नाही म्हणून ते दुसरा रिपोर्ट तक्रारदारासही देऊ शकले नाहीत व मंचातही दाखल केला नाही. हयावरुन गैरअर्जदार डॉक्टरानी पेशंटची एचआयव्ही टेस्ट ही WHO च्या गाईडलाईन्स प्रमाणे केलेली नव्हती व त्याची मार्गदर्शक तत्वाचे पालन केले नाही हे दिसून येते. रिझल्ट/रिपोर्ट पेशंटला न सांगता, त्यांच्या पत्नीस व नातेवाईकास सांगितला हे एका डॉक्टराकडून न शोभणारे कृत्य झाले आहे. एकीकडे डॉक्टर, पेशंट Thrombosis ने आजारी होता, तो शुध्दीवर होता, डॉक्टरानी Thrombosis वरच उपचार केला, एचआयव्ही वर उपचार केला नाही असे म्हणतात, उपचार केल्यानंतर लगेचच चांगला होऊन त्याला डिसचार्ज देण्यात आला म्हणतात असे असूनही अशी काय घाई (इमर्जन्शी) होती की, त्या उपचारासाठी डॉक्टराना एचआयव्ही टेस्टसाठी पेशंटच्या परवानगीची गरज वाटली नाही. पेशंट बरा झाल्यावर त्यालाच त्या टेस्टचा रिझल्ट सांगता आला असता. अशी कुठलीही घाई नसताना सुध्दा, गैरअर्जदारानी पेशंटला,टेस्टचा रिझल्ट / रिपोर्ट न सांगता, WHO च्या गाईडलाईन्सच्या विरुध्द त्यांच्या पत्नीस व नातेवाईकास हा रिपोर्ट सांगितला त्यामुळे वैयक्तिक तक्रारदारास तसेच त्यांच्या पत्नीस व मुलांना सुध्दा त्याचा त्रास भोगावा लागतो आहे हे अगदी खरे आहे. शासनाने एड्स / एचआयव्ही बाबत जरी अनेक वर्षापासून जाणीवजागृती मोहीम राबविली असली तरी अजुनही भारतीय समाजात या रोगाकडे एक कलंक म्हणून पाहिले जाते व अशा पेशंटचे लैंगिक वर्तन वाईट असा निष्कर्ष काढण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे तक्रारदारास, एड्स / एचआयव्ही झाल्याचे त्यांच्या पत्नीस,नातेवाईकास सांगितल्यामुळे नैराश्य आले व त्यांनी टोकाला जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असे तक्रारीत नमूद केले ते योग्य वाटते. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडतात, त्याच्या मुला मुलीचे विवाह ठरत नाहीत , कुणी मुलगी करुन घेत नाही व मुलगी देत नाही हे कटू पण हया समाजातील एक सत्य आहे. समाज हया घराकडे बहिष्कृत असल्यासारखे वागतो. जोडीदाराच्या नजरेत अविश्वास दिसून येतो. तक्रारदार आपल्या तक्रारीत हेच मांडतात.तक्रारदार व्यवसायाने वकिल आहेत ही बातमी कळाल्यानंतर, त्यांच्याकडील कामे क्लायंटने काढून घेतली, भविष्यात त्यांच्या मुलांच्या विवाहाचाही प्रश्न निर्माण होईल. हे सर्व भयंकर आहे व त्यातून स्वत: तक्रारदार,त्यांची पत्नी व मुले गेलेली आहेत व हया सर्वास केवळ गैरअर्जदारच जबाबदार आहेत.भारतीय समाजामध्ये अजुनही एचआयव्ही/एड्सग्रस्तांकडे एक सामाजिक कलंक अशा नजरेनेच पाहिले जाते ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी डॉक्टरानी अत्यंत जबाबदारीने व संवेदनशिलतेने, वागून एचआयव्ही/ एड्सबाबत WHO च्या गाईडलाईन्सप्रमाणे चाचण्या करुन घेणे आवश्यक असताना प्रस्तूत प्रकरणी डॉक्टरानी अत्यंत बेजबाबदारपणे केस हाताळलेली दिसून येते व गाईडलाईन्सचा भंग करुन एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट प्रथम तक्रारदाराच्या पत्नीस, नातेवाईकास व मित्र मंडळींना सांगितले हे अत्यंत अनुचित आहे. एड्स या शब्दामुळे पत्नीची कायमची साशंकता तक्रारदाराचे आयुष्य उध्दस्त करु शकते. हया सर्वास केवळ गैरअर्जदारच जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे. भविष्य काळात तक्रारदाराच्या वकिली व्यवसायात होणारा विपरित परिणाम लक्षात घेता, तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. म्हणून मंच एक exempllory अक्शन म्हणून गैरअर्जदार डॉक्टरांना रु 10 लाखाचे नुकसानभरपाई/ दंड ठोठावण्याच्या निष्कर्षाप्रत आले आहे यामुळे भविष्यकाळात डॉक्टर मंडळी एचआयव्ही टेस्ट करताना नियम काटेकोरपणे पाळतील. गैरअर्जदार क्रमांक 1 हॉस्पिटल मधील दोन्ही डॉक्टरानी वरीलप्रमाणे निष्काळजीपणा व सेवेत त्रुटी ठेऊन तक्रारदारास मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रास दिला म्हणून Vicarious liability म्हणून हॉस्पिटल सुध्दा तेवढेच जबाबदार ठरते असे मंचाचे मत आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 डॉ माझीद यांनी WHO च्या गाईडलाईन्सचा भंग करुन पत्नी व नातेवाईक व इतरासमोर एचआयव्हीचा रिपोर्ट जाहीरपणे सांगितला, तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 WHO नुसार Confirmative Test / western Blot Test केली नाही, त्याचा रिपोर्टही दिला नाही. त्यामुळे दोन्ही डॉक्टर तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार ठरतात.गैरअर्जदार क्रमांक 4 न्यु इंडिया अश्युरन्स कंपनीने त्यांच्या जवाबात गैरअर्जदार डॉक्टरांनी त्यांच्याकडून पॉलीसी घेतली होती किंवा नाही याबद्दल कांहीही नमूद केले नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 4 यांच्या विरुध्द कुठलाही आदेश नाही. गैरअर्जदार क्रमांक 1,2 व 3 यांनी कुठल्या इन्शुरन्स कंपनीकडून पॉलिसी घेतली हे त्यांच्या लेखी जवाबात नमूद केले नाही. मंच खालील लिटरेचरचा व निवाडयांचा आधार घेऊन आदेश पारित करीत आहे. - Laboratory Diagnosis of HIV infection.
2. “ Manual of Quality accurance parties in HIV testing Laboratories. Where in it is stated that “Here it is important that the issues related to confidentiality receive great. Since this method is based on testing for diagnosis, of HIV / AIDS cases, it is imperative to respect the individuals need to maintain confidentiality.” 3. Book—“HIV—Law, Ethics and Human Rights” edited by D.C.Jaya Surya. In page 149 of the book it is observed that “ on HIV- infected person can sue the Doctor, hospital or other persons for unauthorised release of information, when as a consequence he or she suffers damages.” - 1998 AIR SCW 3662
5. Vaidyanathan Lakshman (Dr) V.s Speciality Ranbaxy Ltd. 2004. (1) CPR 400 at 410, 411, (WBSCDRC, Lalcutta) 6. Operational Guidelines for integrated counselling and testing centres. वरील विवेचनावरुन व कागदपत्रावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे. आदेश 1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे. 2. गैरअर्जदार क्रमांक 1,2,3 यांनी वैयक्तिक व संयुक्तपणे या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास नुकसान भरपाई म्हणून रक्कम रु 10 लाख द्यावेत. मुदतीत रक्कम न दिल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 % व्याजदर आकारला जाईल. (श्रीमती रेखा कापडिया) (श्रीमती अंजली देशमुख) सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |