Maharashtra

Nagpur

CC/547/2016

Pravin Shaligram Shende, POA Pramod Shaligram Shende - Complainant(s)

Versus

Anurag Enterprises, Micromax Service Centre - Opp.Party(s)

POA Pramod Shaligram Shende

22 Aug 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/547/2016
 
1. Pravin Shaligram Shende, POA Pramod Shaligram Shende
R/o. D 207-208, Nabard Staff Qtrs. 459, Salisbury Park, Gultekadi, Pune 411 037
PUNE
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Anurag Enterprises, Micromax Service Centre
1st and 2nd floor, Wade Bhawan, Agrasen Chowk, Gandhibagh, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. MICROMAX INFORMATICS LTD.
Office- Micromax House, 90-B, Sector 18, Gurgaon, 122015, Haryana
GURGAON
HARYANA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 
For the Complainant:POA Pramod Shaligram Shende, Advocate
For the Opp. Party:
Dated : 22 Aug 2017
Final Order / Judgement

(मंचाचा निर्णय : श्री. विजय प्रेमचंदानी - मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये) 

1.          तक्रारकर्त्‍यानी विरुध्‍द पक्षाविरुध्‍द ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली असुन तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन असे आहे की, तक्रारकर्त्याने दि.08.07.2015 रोजी मायक्रोमॅक्‍स कॅनव्‍हास स्‍पार्क या मॉडेलचे दोन मोबाईल खरेदी केले. त्‍यातील एक मोबाईल स्‍वतःचे वापराकरीता व दुसरा भावासाठी खरेदी केला आहे. मोबाईलमध्‍ये सेटींग करुन ठेवलेला अलाराम योग्‍य वेळी न वाजल्‍यामुळे मोबाईलमधील घड्याळीचे निरीक्षण केले असता तिने चुकीची वेळ दर्शवित असल्‍याने तक्रारकर्त्‍याचे निदर्शनास आले. मोबाईलचा वापर करतांना प्रत्‍येक वेळी मोबाईलमधील घड्याळीची वेळ ही आपोआप बदलली जात होती, असेही लक्षात आले. कंपनीचे नागपूरमधील अधिकृत सर्व्‍हीस सेंटर अनुराग एन्‍टरप्राईजेसमध्‍ये सदर मोबाईल तक्रारकर्त्‍याने दुरुस्‍तीकरीता दिला होता. परंतु सर्व्‍हीस सेंटरकडून सांगण्‍यात आलेली वेळ ही त्‍याने स्‍वतः न कधी पाडल्‍याने तक्रारकर्त्‍याचे भावास वारंवार नाहक खेपा मारण्‍याचा त्रास झाला. तसेच बरेचदा मोबाईल दुरुस्‍त झाला आहे असे सांगून वस्‍तुतः त्‍या मोबाईलची कुठलीही दुरुस्‍ती केली नसल्‍याचे लक्षात येत होते. नाईलाजाने तक्रारकर्त्‍याने कंपनीशी ई-मेलव्‍दारे संपर्क केला असता त्‍यांनी दिलगीरी व्‍यक्‍त करुन तक्रारकर्त्‍याचे तक्रार अग्रक्रमाने लक्ष दिले जाईल असे सांगितले. परंतु दरवेळी मोबाईल नुसताच ठेऊन व त्‍यात कोणतीही दुरुस्‍ती न करणे एवढीच कृती केली असल्‍याचे लक्षात आल्‍याने आपली फसवणूक होत आहे हे तक्रारकर्त्‍याचे भावाला कळून आले. दि.10.10.2015 पासुन मोबाईल दुरुस्‍ती झाल्‍याचे मेसेज तक्रारकर्त्‍याचे भावाला दुस-या मोबाईलवर येऊन लागले. तेव्‍हा पासुन वारंवार ते सांगितील तश्‍या वेळी व तश्‍या प्रकारे संपर्क साधून देखिल दि.01.11.2015 रोजी आणखी 6 दिवसाची वाढीव मुदत घ्‍या असे सांगून मोबाईल परत करण्‍याबाबत चालधकल करीत वेळ मारुन नेली. दि.18.11.2015 रोजी तक्रारकर्त्‍याचे भावाने विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांचे पत्‍त्‍यावर स्‍पीडपोष्‍टाने सविस्‍तर तक्रार दिली. विरुध्‍द पक्षांनी मोबाईल दुरुस्‍त करुन किंवा त्‍या मोबाईलची किंमत द्यावी अशी विनंती भावाव्‍दारे विरुध्‍द पक्षांकडे केली. त्‍यावर विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी तक्रारकर्त्‍याचे भावाला एसएमएसव्‍दारे संपर्क साधून तक्रारीचे समाधानकारक निवारण करुन देण्‍याची इच्‍छा आहे असे कळविले. तक्रारकर्त्‍याला मानसिक शारीरिक त्रास झाला याबाबत विरुध्‍द पक्ष क्र.2 ला दि.06.01.2016 रोजी पत्र पाठविले. तरीसुध्‍दा त्‍यावर त्‍यांनी कोणतीही दखल घेतली नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

2.         तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे  नादुरुस्‍त मोबाईलची संपूर्ण रक्‍कम देण्‍याचे आदेश व्‍हावेत तसेच तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.  

3.         तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस पाठविण्‍यात आली. सदर नोटीस विरुध्‍द पक्षांना प्राप्‍त होऊनही मंचासमोर हजर झाले नाही, म्‍हणून सदर प्रकरणी निशाणी क्र.1 वर विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांचे विरुध्‍द दि.09.03.2017 रोजी प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यांत आला.

4.           तक्रारकर्त्‍याची तक्रार व दस्‍तावेज तसेच तोंडी युक्‍तीवाद ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल करण्‍यात आलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील कारणमिमांसेवरुन अंतिम आदेश पारित करीत आहे. 

                                      - // कारणमिमांसा // -

5.             तक्रारकर्त्याने दाखल तक्रारीतील दस्‍तावेजांवरुन असे निदर्शनास येते की, विरुध्‍द पक्ष क्र.2 हे मोबाईलचे निर्माते आहेत व तक्रारकर्त्‍याने सदर मोबाईल रु.4,999/- मध्‍ये विकत घेतलेला होता. सदर मोबाईलमध्‍ये बिघाड झाला असल्‍याने तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 कडे मोबाईल सुधारण्‍याकरीता दि.29..07.2015 रोजी दिला होता ही बाब तक्रारकर्त्‍याने दाखल जॉबशिट दि.29.07.2015 वरुन सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने दाखल ई-मेलव्‍दारा विरुध्‍द पक्षांकडे पाठविलेल्‍या पत्राची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, तक्रारकर्त्‍याचे मोबाईलमध्‍ये वारंवार बिघाड होत असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षांनी मोबाईल सुधारण्‍याकरीता कोणतेही प्रयत्‍न केलेले नाही. सबब तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ग्राहक असे सिध्‍द झालेले आहे. तसेच विरुध्‍द पक्षांनी तक्रारकर्त्‍याचा मोबाईल सुधारणा करुन दिला नाही व नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा प्रकरणात हजर झाले नाही. तसेच त्‍यांची बाजू मांडली नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने तक्रारीत विरुध्‍द पक्षांविरुध्‍द लावलेले आरोप सिध्‍द होत आहेत. व विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याप्रती अनुचित व्‍यवहार प्रथेचा अवलंब केला आहे असेही सिध्‍द होते. सबब खालिल प्रमाणे अंतिम आदेश मंच पारित करीत आहे. 

- // अंतिम आदेश // -

1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

2.  विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍यास मोबाईलची किंमत रु.5,000/-  परत करावी.

3.  विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी 2,500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,500/-  द्यावे.

4.  विरुध्‍द पक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आंत करावे.

5.   उभय पक्षकारांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.

6.   तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.