Maharashtra

Nagpur

CC/10/733

Shri Dhanraj Gopichand Kukade - Complainant(s)

Versus

Anuprabha Co-Op.Housing Society Ltd. Through Shri Anand Dasharath Gawande - Opp.Party(s)

Adv. N.K.Ghagarkar

04 Oct 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/733
 
1. Shri Dhanraj Gopichand Kukade
Plot No. 8, Flat No. B-4, Type B, Near CMPDI, Kasturba Nagar, Jaripataka Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Anuprabha Co-Op.Housing Society Ltd. Through Shri Anand Dasharath Gawande
165, Abhyankar Nagar, Nagpur 440010
Nagpur
Maharashtra
2. Shri Premras Gopalrao Rabbewar
Plot No. 47, Near Mankapur Post Office, Mankapur, Napgur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE PRESIDENT
 HON'ABLE MRS. ALKA PATEL MEMBER
 HON'ABLE MS. GEETA BADWAIK MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्रीमती गीता बडवाईक, सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये.
 
-आदेश-
 (पारित दिनांक    04.10.2012)
 
1.          तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून, तक्रारकर्त्‍यांच्‍या तक्रारीचा आशय असा आहे की, त्‍यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडून मौजा मानकापूर, प्‍लॉट क्र. 8, ख.क्र.57/2 मधील नवरत्‍न अपार्टमेंट्स या ईमारतीतील गाळा क्र. बी-4, टाईप बी, पहिला माळ्यावरील घेण्‍याचा करार दि.27/04/1998 रोजी केला. गैरअर्जदार क्र. 1 यांनी या व्‍यवहारास ना हरकत प्रमाणपत्र दिले.
 
            गैरअर्जदार क्र. 2 यांनी सदर गाळा हा गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडून दि.12.03.1993 च्‍या करारानुसार रु.1,63,914/- मध्‍ये घेण्‍याचे निश्चित केले होते. परंतू पुढे गाळ्याची उर्वरित रक्‍कम देण्‍यास गैरअर्जदार क्र. 2 हे असमर्थ ठरल्‍याने त्‍यांनी तो तक्रारकर्त्‍यास विकला. तक्रारकर्त्‍याने करारानुसार एल आय सी हाऊसिंग फायनांसची रक्‍कम रु.1,15,000/-, जी गैरअर्जदार क्र. 2 ने कर्ज म्‍हणून घेतली होती, ती अदा केली. गैरअर्जदार क्र. 1 ला रु.25,000/- द्यावयाचे होते. तसेच गैरअर्जदार क्र. 2 ला द्यावयाची रक्‍कमही रु.16,288.70 तक्रारकर्ता त्‍यांना द्यावयास तयार आहे, परंतू गैरअर्जदार क्र. 1 अद्यापही गाळ्याचे बांधकाम पूर्ण करुन देत नाहीत. अर्धवट बांधकाम असल्‍याने तेथे राहणे शक्‍य नव्‍हते, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने अपूर्ण बांधकाम पूर्ण केले व त्‍याकरीता त्‍यांना रु.41,210/- खर्च आला. सदर रक्‍कम ही गैरअर्जदार क्र. 1 ला द्यावयाच्‍या रकमेपेक्षा जास्‍त असल्‍याने, तक्रारकर्त्‍याने त्‍याचेकडून कोणतीही रक्‍कम न घेता गैरअर्जदार क्र. 1 ने गाळ्याचे विक्रीपत्र करुन देण्‍याची मागणी केली. वारंवार पत्रव्‍यवहारही केला. परंतू गैरअर्जदार क्र. 1 ने गाळ्याचे विक्रीपत्र करुन दिले नाही. सदर इमारतीमधील सर्व गाळेधारकांना गेरअर्जदार क्र. 1 ने विक्रीपत्र करुन दिलेले आहेत. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक त्रास होत असल्‍याने, त्‍यांनी मंचासमोर सदर तक्रार दाखल करुन, वादग्रस्‍त गाळ्याचे विक्रीपत्र गैरअर्जदार क्र. 2 यांनी रु.16,288.70 घेऊन करुन द्यावे, गैरअर्जदार क्र. 1 ने नोंदणी व्‍यतिरिक्‍त कुठलाही खर्च न आकारता विक्रीपत्र करुन द्यावे, गैरअर्जदार क्र. 1 ने केलेल्‍या अवास्‍तव मागणीमुळे झालेल्‍या मानसिक त्रासाच्‍या भरपाईबाबत रु.20,000/- मिळावे आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत. आपल्‍या तक्रारीचे पुष्‍टयर्थ तक्रारकर्त्‍याने एकूण 23 दस्‍तऐवज दाखल केलेले आहेत व ते पृ.क्र. 10 ते 51 वर दाखल आहेत.
 
2.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना पाठविली असता, त्‍यांनी तक्रारीस लेखी उत्‍तर दाखल केले.
3.          गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्‍या लेखी उत्‍तरात तक्रारकर्त्‍याने रु.1,15,000/- दिले व रु.25,000/- खरेदीच्‍या वेळेस द्यावयाचे होते ही बाब मान्‍य करुन इतर कथन अमान्‍य केले. त्‍यांच्‍या मते सदर इमारतीचे बांधकाम विकासकाने पूर्ण न केल्‍याने, त्‍यांनी पुढे ते बांधकाम पूर्ण केले व तक्रारकर्ते वगळून सर्व गाळेधारकांनी त्‍याबाबत रु.30,000/- ही रक्‍कम दिली आहे. तसेच अनेक खर्चादाखल रु.86,725/- ही रक्‍कम व्‍याजासह घेणे असल्‍याचे गैरअर्जदार क्र. 1 ने लेखी उत्‍तरात नमूद केले आहे.
 
4.          गैरअर्जदार क्र. 2 यांनी लेखी उत्‍तरामध्‍ये करारामध्‍ये गैरअर्जदार क्र. 1 यांनी ना हरकत दिलेली आहे व रु.16,286.70 दिल्‍यास विक्रीपत्र करुन देण्‍यात येईल. नोंदणीकृत करारानुसार गेरअर्जदार क्र. 1 यांनी गाळ्याचे विक्रीपत्र करुन देण्‍यास जबाबदार आहे. त्‍यामुळे गैरअर्जदार क्र. 2 यांची त्‍यात कुठलीही जबाबदारी नाही असे नमूद करुन सदर तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली.
 
5.          तक्रारकर्त्‍यांनी प्रतिज्ञालेख दाखल करुन, कराराचे परिच्‍छेद क्र. 7 मध्‍ये असे नमूद केले आहे की, रु.1,40,000/- दिल्‍यानंतर, गैरअर्जदार क्र. 2 व तक्रारकर्ते सर्व प्रकारच्‍या देण्‍यातून मुक्‍त होतील. त्‍याप्रमाणे रु.1,15,000/- चा धनादेश तक्रारकर्त्‍यांनी त्‍यांना दिला. उर्वरित रु.25,000/- 03.06.1998 पूर्वी द्यावयाचे होते असाही उल्‍लेख सदर परिच्‍छेदात केलेला आहे. गाळ्याचा ताबापत्र वा ताबा घेतांना काही बांधकाम अपूर्ण अवस्‍थेत होते. त्‍याबाबत गैरअर्जदार क्र. 1 यांना कळविले होते. बांधकाम तक्रारकर्त्‍याने स्‍वखर्चाने पूर्ण केलेले आहे व त्‍याकरीता त्‍यांना रु.41,210/- खर्च आल्‍याने, उर्वरित रक्‍कम रु.25,000/- देण्‍याचा प्रश्‍न उरत नाही. गैरअर्जदार क्र. 1 ने मागणी केलेली रक्‍कम या गैरअर्जदार क्र. 2 ने पूर्वीच बिल्‍डरला अदा केलेले आहेत. गैरअर्जदार क्र. 1 यांची मागणी ही अवास्‍तव व अवाजवी आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्‍याला विक्रीपत्र करुन द्यावे आणि तक्रारकर्त्‍याच्‍या इतर मागण्‍या मंजूर करण्‍याची मागणी त्‍यांनी केली.
 
6.          सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आल्‍यावर, मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. तसेच प्रकरणात दाखल दस्‍तऐवज व प्रतिज्ञापत्र यांचे अवलोकन केले असता मंचासमोर पुढील प्रश्‍न उपस्थित होते. तक्रारकर्त्‍याची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र आहेत काय ?
-निष्‍कर्ष-
7.          मंचाने तक्रारीमध्‍ये दाखल थकीत रकमेचे समायोजन केलेले दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता, तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र. 2 ला काहीही देणे लागत नाही. ना हरकत प्रमाणपत्र व विक्रीच्‍या करारनाम्‍याच्‍या प्रतीचे अवलोकन केले असता, तक्रारकर्ता रु.25,000/- गैरअर्जदार क्र. 1 यांना देणे लागतो. परंतू गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्‍याच्‍या वादग्रस्‍त गाळ्याचे सार्वजनिक सोईचे व काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण न केल्‍याने तक्रारकर्त्‍याला त्‍या स्‍वखर्चाने पूर्ण करुन घ्‍याव्‍या लागले आणि त्‍याकरीता त्‍यांना रु.42,210/- इतका खर्च आला. सदर बाब खोटी असल्‍याबाबत गैरअर्जदार क्र. 1 यांनी नाकारली नाही. केवळ त्‍यांनी वेगवेगळया शिर्षकाखाली रकमेची मागणी केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांना जर रक्‍कम गाळे धारकाकडून घ्‍यावयाची होती तर त्‍यांनी ना हरकत प्रमाणपत्र कसे काय दिले. तसेच विक्रीच्‍या करारनाम्‍यामध्‍ये या रकमा कुठेही नमूद केलेल्‍या नाही व मंचासमोर तक्रार दाखल झाल्‍यानंतर लेखी उत्‍तरामध्‍ये या रकमा घेणे असल्‍याचा उल्‍लेख केलेला आहे. दस्‍तऐवजातील पत्रांच्‍या प्रतीचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्‍याने बराच काळ बांधकाम पूर्ण करण्‍याबाबत व विक्रीपत्राची मागणी करण्‍याबाबत गैरअर्जदार क्र. 1 यांना विनवण्‍या केलेल्‍या आहेत. अपूर्ण बांधकामाबाबत, विक्रीपत्राबाबत तक्रारकर्त्‍याने वारंवार गैरअर्जदार क्र. 1 यांचेशी पत्रव्‍यवहार करुन तगादा लावलेला आहे, परंतू गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्‍यास दाद दिली नाही. गैरअर्जदार क्र. 1 यांची ही कृती मंचाला रास्‍त वाटत नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.
 
8.          तक्रारकर्त्‍याला विक्रीच्‍या करारनाम्‍याप्रमाणे जी रक्‍कम द्यावयाची होती त्‍यापैकी रु.25,000/- अदा करावयाचे राहिले होते. परंतू गाळ्याचे अपूर्ण बांधकाम तक्रारकर्त्‍याने पूर्ण केलेले असल्‍याने व त्‍यादाखल झालेला खर्च या रकमेपेक्षा अधिक असल्‍याने मंचाचे मते तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र. 1 यांना काही देणे लागत नाही. त्‍यामुळे वादग्रस्‍त गाळ्याचे विक्रीपत्र गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्‍याला करुन देणे योग्‍य राहील. विक्रीपत्राचा खर्च हा तक्रारकर्त्‍याने करावा. तसेच गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्‍याला इतक्‍या कालावधीपर्यंत गाळ्याचे विक्रीपत्र करुन न दिल्‍याने, तक्रारकर्ता हा गाळ्याच्‍या वैधानिक हक्‍कापासून वंचित राहिला. त्‍यामुळे त्‍याला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला, म्‍हणून तक्रारकर्ता सदर त्रासाची भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे.  
 
            उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन व उपलब्‍ध कागदपत्रांवरुन मंच सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)    गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी मौजा मानकापूर, प्‍लॉट  क्र. 8, ख.क्र.57/2 मधील नवरत्‍न अपार्टमेंट्स या ईमारतीतील पहिल्‍या      माळ्यावरील गाळा क्र. बी-4, टाईप बी चे विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याला करुन द्यावे.  विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.
3)    गैरअर्जदार क्र. 1 यांनी तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक त्रासाबाबत भरपाई म्‍हणून रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.2,000/- द्यावे.
4)    गैरअर्जदार क्र. 2 यांच्‍याविरुध्‍दची तक्रार खारिज करण्‍यात येते.
5)    सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 यांनी आदेशाची प्रत     मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.
 
 
 
 
 
[HON'ABLE MRS. ROHINI KUNDLE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. ALKA PATEL]
MEMBER
 
[HON'ABLE MS. GEETA BADWAIK]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.