Maharashtra

Nagpur

RBT/CC/666/2018

JAGDISH CHANDRA SATYANARAYAN SHUKLA - Complainant(s)

Versus

ANOOP C. SAGDEO - Opp.Party(s)

ADV. J. C. SHUKLA

05 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. RBT/CC/666/2018
 
1. JAGDISH CHANDRA SATYANARAYAN SHUKLA
VIMAL VILLA , U-45, NARENDRA NAGAR, NAGPUR 440015
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ANOOP C. SAGDEO
PLOT NO. 28, SAMARTH NAGAR (WEST), WARDHA ROAD, NAGPUR 440015
NAGPUR
MAHARASHTRA
2. SHRI. CHARUDATTA R. SAGDEO
PRABHA NIWAS, RAHATE COLONY, WARDHA ROAD, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
3. SMT. V.C. SAGDEO
R/O. PRABHA NIWAS, RAHATE COLONY, WARDHA ROAD, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
4. SHRI. AVINASH CHARUDATTA SAGDEO
R/O. PRABHA NIWAS, RAHATE COLONY, WARDHA ROAD, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:ADV. J. C. SHUKLA, Advocate
For the Opp. Party:
Dated : 05 Mar 2020
Final Order / Judgement

आदेश

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये -

 

  1.          तक्रारकर्त्‍याची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे अशी की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे रक्‍कम रुपये 5,00,000/- डिपॉझिट म्‍हणून ठेवले होते. विरुध्‍द पक्ष 1 ते 4 यांना आर्थिक निधीची आवश्‍यकता असल्‍यामुळे त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून डिपॉझिट घेतले होते आणि ते परत करण्‍यासाठी विरुध्‍द पक्ष यांनी इंडियन ऑव्‍हरसिज बॅंकेचा दि. 20.03.2017 चा चेक क्रं. 237405, तक्रारकर्त्‍याला दिला. परंतु खात्‍यामध्‍ये रक्‍कम नसल्‍यामुळे सदरहू चेक हा वटविल्‍या गेला नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना दि. 29.03.2017 रोजी नोटीस पाठवून रक्‍कमेची मागणी केली. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी रक्‍कम दिली नाही. म्‍हणून तक्रारकर्ता यांनी वर्तमान तक्रार दाखल करुन रक्‍कम रुपये 5,00,000/-, 18 टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला देण्‍यात यावे आणि शारीरिक व मानसिक त्रासाकरिता रुपये 50,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 15,000/- देण्‍यात याव्‍या अशा मागण्‍या केल्‍या आहेत.
  2.     सदरहू तक्रार दाखल झाल्‍यानंतर या मंचाने ती दाखल सुनावणीच्‍या स्‍तरावर अस्‍वीकृत केली. त्‍यामुळे तक्रारकर्ते यांनी FA No. A/17/266 हे दाखल केले. सदरहू अपील राज्‍य आयोगाने दि. 21.09.2018 रोजी निकाली काढून वर्तमान तक्रार ही गुण-दोषावर निकाली काढण्‍याकरिता परत पाठविली. सदरहू मुळ तक्रार क्रमांक 219/2017 ही आता RBT/CC/666/2018 प्रमाणे नोंदणी केल्‍यानंतर विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 यांना नोटीस काढण्‍यात आल्‍या. परंतु विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 हजर न झाल्‍यामुळे वर्तमान तक्रार ही त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचे आदेश करण्‍यात आले.
  3.     तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता व त्‍यांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नोंदविली.

अ.क्रं. मुद्दे             उत्‍तर

  1.   तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे काय ?     होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली  काय ? होय
  3. काय आदेश  ?    अंतिम आदेशानुसार

कारणमिमांसा

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -आम्‍ही तक्रारकर्ता यांचा युक्तिवाद ऐकला आणि त्‍यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, विरुध्‍द पक्ष 1 यांनी दि. 10.09.2015 रोजी रक्‍कम रुपये 5,00,000/- घेतल्‍याबाबत डिपॉझिट रसीद लिहून दिलेली आहे आणि ती परत करण्‍यासाठी दि. 20.03.2017 चा चेक ही दिला होता. सबब तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक असून डिपॉझिट म्‍हणून ठेवलेली रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र आहे आणि विरुध्‍द पक्ष यांनी सदरहू रक्‍कम वेळेवर परत न केल्‍यामुळे सेवे मध्‍ये त्रुटी केल्‍याचे दिसून येते. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 च्‍या दि. 22.08.2018 च्‍या पत्राप्रमाणे असे दिसून येते की, त्‍यांनी सदरहू रक्‍कम ही मेसर्स सी.आर.सगदेव अॅन्‍ड कंपनी यांच्‍यासाठी स्‍वीकारलेली होती. म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 हे वैयक्तिकरित्‍या अथवा संयुक्‍तरित्‍या सदरहू रक्‍कम तक्रारकर्त्‍याला परत करण्‍यास जबाबदार आहेत.

          सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                         अंतिम आदेश

  1.  तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2.  विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला त्‍यांची डिपॉझिट रक्‍कम रुपये 5,00,000/- त्‍वरित द्यावे आणि सदरहू रक्‍कमेवर दिनांक 21.01.2017 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.
  4.  वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 4 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारीची ब व क फाईल तक्रारकर्त्‍याला परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.