नि.नं. 18
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 115/2011
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – 19/04/2011
तक्रार दाखल तारीख – 21/04/2011
निकाल तारीखः - 03/02/2012
----------------------------------------------
सौ मंगल रामचंद्र गोसराडे
व.व.55, धंदा – घरकाम
रा.ईश्वर कृपा, कोकणे गल्ली, मिरज
ता.मिरज जि.सांगली .... तक्रारदार
विरुध्द
1. अन्नपूर्णा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.मिरज
बालगंधर्व नाटयगृहासमोर, माधवसह निवास,
मिरज, जि. सांगली
2. चेअरमन, श्री भिमराव गणपती गोसराडे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.पहिला स्टॉप, सुभाषनगर, मिरज
3. व्हाईस चेअरमन, श्री परशुराम सिध्दु गोसराडे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.रेवणी गल्ली, मिरज
4. संचालक, श्री रफीक इस्माईल धत्तुरे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.मोमीन गल्ली, मिरज
5. संचालक, श्री दत्तात्रय बळवंत यादव
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.दत्त चौक, मिरज
6. संचालक, श्री यल्लाप्पा दत्तात्रय हरताळे
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.गोलीकर वड्डी, मिरज
7. संचालक, श्री भुपाल मारुती कोळी
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.मु.पो. इनाम धामणी ता.मिरज
8. संचालक, श्री पोपट चंदर मंडले
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.जनहित कॉलनी, मिरज
9. संचालक, श्री बाळासो राजाराम मदगुम
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.टाकळी रोड, मिरज
10. संचालक, श्री अशोक बाळू जाधव
वय वर्षे – सज्ञान, धंदा – व्यापार
रा.नदीवेस, पिरजादे प्लॉट, मिरज .... जाबदार
तक्रारदार तर्फे – अॅड श्री ए.ए.कोपार्डे
जाबदार क्र.१ ते 10 – एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
1. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार सोसायटीने दामदुप्पट ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार अन्नपूर्णा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.मिरज (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘सोसायटी’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम गुंतविलेली होती. सदरचे ठेवींची मुदत पूर्ण झाली आहे. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमेची सोसायटीकडे मागणी केली असता सोसायटीने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.4 अन्वये एकूण 4 कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
2. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र. 1 ते 10 यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.1 वर “ एकतर्फा” आदेश करण्यात आले.
3. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार सोसायटीबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र.2 ते 10 यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून सोसायटीने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने सोसायटीच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो.
4. प्रस्तुत प्रकरणी नि.4 अन्वये दाखल करण्यात आलेल्या ठेवपावत्यांचे अवलोकन करता ठेवींची मुदत पूर्ण झाल्याचे दिसून येते तसेच तक्रारदारांना या ठेवींवर व्याज मिळाल्याचे दिसून येत नाही. तक्रारदारांनी नि.17 ला दाखल केलेल्या व्याजनिवेदनामध्येही त्यांना जाबदार यांचेकडून व्याजपोटी काहीही रक्कम मिळालेली नाही असे नमूद केले आहे. सबब, या दामदुप्पट ठेवींतील मुदतीनंतर मिळणारी रक्कम ठेवीची मुदत संपलेचे दुस-या दिवशीपासून द.सा.द.शे.10 टक्के व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे. हे व्याजदर मंजूर करीत असताना जाबदार सोसायटीने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्याची बाब विचारात घेण्यात आलेली आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
1. यातील जाबदार सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावत्या क्र.000320 व 000321 मधील प्रत्येकी रक्कम रु.40,000/- (रुपये चाळीस हजार फक्त) दि.10/10/2007 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्के व्याजासह अदा करावी.
2. यातील जाबदार सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्पट ठेव पावती क्र.000322 मधील रक्कम रु.20,000/- (रुपये वीस हजार फक्त) दि.10/10/2007 पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्के व्याजासह अदा करावी.
3. यातील जाबदार सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.2,000/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
4. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार सोसायटीने दि.18/3/2012 पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांक: 03/02/2012
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.