निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 19/09/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 23/09/2011
तक्रार निकाल दिनांकः- 21/03/2013
कालावधी 01 वर्ष 05 महिने 26 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
विकास पि.पुरुषोत्तम डहाळे. अर्जदार
वय 33 वर्षे. धंदा.सराफा. अड.शैलेश.इंगळे.पाटील.
रा.मातोश्री नगर,कारेगांव रोड,परभणी.
विरुध्द
अनिल कम्युनिकेशन, गैरअर्जदार.
मोबाईल सेल आणि सर्व्हीसेस अड.व्ही.एच.कुलकर्णी.
स्टेशन रोड,परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवे बद्दल अर्जदाराने हि तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून 24/08/2010 रोजी मोबाईल विकत घेतला ज्याचा Model No X ARBONNK 551 असा आहे. व त्याचा रंग काळा आहे. सदरच्या मोबाईलचा Battery No K 551041000943 असा आहे व तसेच Charger No K 551042010 असा आहे. सदरचे मोबाईल अर्जदाराने गैरअर्जदाराकडून रु. 3,000/- देवुन खरेदी केलेले आहे. त्याचा पावती क्रमांक 291 असा आहे.अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदरचा मोबाईल खरेदी करते वेळी गैरअर्जदाराने त्याची वॉरंटी दिली होती, परंतु सदरचा मोबाईल घेतल्या नंतर कांही महिने व्यवस्थित चालला त्यानंतर सदरच्या मोबाईल मध्ये बिघाड झाला व कोणत्याही वेळी तो आपोआप स्वीच ऑफ होत होता. Charging सुध्दा होत नव्हते व सदरच्या मोबाईल वरुन दुस-याचे बोलने एकायला येत नव्हते व अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने सदरचा मोबाईल दोन वेळा दुरुस्त करुन दिला,परंतु मोबाईल चालत नाही त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, म्हणून अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे व विनंती केली आहे की, सदराचा मोबाईल दुरुस्त करुन द्यावा अथवा बदलून द्यावा व तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून 10,000/- रुपये व अर्जाचा खर्च म्हणून 5,000/- रुपये द्यावे,अशी मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ आपले शपथपत्र नि.2 वर दाखल केले आहे व तसे पुराव्यातील कागदपत्र नि. क्रमांक 4 वर अर्जदारांनी सदरचा मोबाईल खरेदी केल्याची पावती जोडली आहे ज्याचा पावती क्रमांक 291 तारीख 24/08/2010 असा आहे.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांस मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार हे त्यांच्या वकीला मार्फत 20/12/2011 रोजी हजर झाले त्यानंतर गैरअर्जदाराने नि.क्रमांक 9 वर दिनांक 03/02/2012 रोजी आपले लेखी म्हणणे सादर केले व त्यांच्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ नि. क्रमांक 10 वर आपले शपथपत्र दाखल केले.
गैरअर्जदाराने आपल्या लेखी जवाबात असे म्हणणे दाखल केले आहे की, सदरची तक्रार ही अपरीपक्व असून आवश्यक ती पार्टी न केली असल्यामुळे सदरची तक्रार खारीज होने योग्य आहे.तसेच गैरअर्जदाराने लेखी जबाबात परिच्छेद क्रमांक 3 मध्ये असे म्हणले आहे की, गैरअर्जदाराचा मोबाईल विक्री करण्याचा व्यवसाय आहे.सदर मोबाईलची गॅरंन्टी, वॉरंटी बाबत संबंधीत कंपनी पुर्णपणे जबाबदार असते तसेच अर्जदाराने मोबाईल खराब झाल्याबाबत नेमकी माहिती न देता खोटी माहिती दिली आहे व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, त्याचा फक्त विक्री करण्याचा व्यवसाय आहे व त्याच्या दुकानावर दुरुस्त केला जात नाही.म्हणून मोबाईल दुरुस्त करण्याचा प्रश्नच येत नाही व त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच येत नाही, व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने प्रस्तूत मोबाईल बद्दल कधीही विनंती केली नाही, व तसेच गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, सदर मोबाईलचा तांत्रिक अडचणीचा निवाडा कंपनी तर्फे किंवा संबंधीत कंपनीच्या काळजीवाहू यंत्रनेतर्फे करण्यांत येते व मोबाईल बदलुन देण्याचे संपूर्ण अधीकार देखील संबंधीत कंपनीस आहे त्यामुळे मोबाईल बदलून देण्याचा अधीकार गैरअर्जदाराच्या कक्षेत नसल्यामुळे मोबाईल बदलून देण्यासाठी नकार देण्याचा प्रश्नच येत नाही तसेच गैरअर्जदारांनी आपल्या लेखी जबाबात अधीक निवेदन या सदराखाली परिच्छेद कमांक 7 मध्ये असे म्हणले आहे की, ते फक्त विक्रीचा व्यवसाय करतात व सदर मोबाईलच्या तांत्रिक अडचनी करीता संबंधीत कंपन्याचे काळजीवाहू केंद्रे परभणी शहरात उपलब्ध आहेत. व त्या ठिकाणी सर्व अडचनी सोडवण्यात येतात याबाबतचा स्पष्ट उल्लेख सर्व ग्राहकांना देण्यांत येणा-या पावतीवर करण्यांत आलेला आहे व अर्जदाराच्या पावतीवर देखील आहे म्हणून ईतर सर्व ग्राहका प्रमाणे गैरअर्जदार यांनी अर्जदारास काळजीवाहू केंद्रा वर जाण्यास सांगीतले म्हणून गैरअर्जदारांनी विनंती केली आहे की, अर्जदारास कोणत्याही प्रकारची त्रुटीची सेवा दिली नाही म्हणून प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यात यावी.
सदरचे प्रकरणांत अर्जदारांस व गैरअर्जदारास मागील अनेक तारखेस युक्तिवादास संधी देवूनही ते गैरहजर आहेत त्यामुळे मंचानी सदरची तक्रार मेरीटवर निकाली काढण्याचा निर्णय घेतला.
अर्जदारांची तक्रार, अर्जदारानी दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र व तसेच गैरअर्जदाराने दाखल केलेले लेखी जबाब व शपथपत्र याची पहाणी केली असता निकाल देण्यासाठी उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदाराने अर्जदारास मोबाईल दुरुस्ती करण्याचे
नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय
2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्या क्रमांक 1 व 2
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून दिनांक 24/08/2010 रोजी रुपये 3,000/- देवुन मोबाईल खरेदी केला आहे व सदरच्या खरेदी बाबत अर्जदाराने पुरावा म्हणून नि.क्रमांक 4 वर पावती जोडली आहे.व तसेच अर्जदाराने त्याचे शपथपत्र दाखल केले आहे सदरच्या तक्रार अर्ज व कागदपत्रे व तसेच गैरअर्जदारांचा लेखी जबाब पाहिले असता हि गोष्ट सिध्द होते की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे व तसेच अर्जदाराने सदरचा मोबाईल खरेदी केल्या पासून त्यात बिघाड होता हि बाब गैरअर्जदाराच्या लेखी जबाबातून स्पष्ट होते व तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे की, सदरच्या मोबाईल दुरुस्तीसाठी अर्जदाराने संबंधीत काळजीवाहू केंद्राकडे जावे हे मंचास चुकीचे वाटते कारण अर्जदारहा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे व ग्राहक या नात्याने अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदरील मोबाईलच्या दुरसतीसाठी जाने हे योग्यच आहे व तसेच गैरअर्जदाराचे अध्यकर्तव्य आहे की, सदरचा मोबाईल घेवुन दुरुस्तीसाठी संबंधीत काळजीवाहू केंद्राकडे पाठवून अर्जदार ग्राहकास मोबाईल दुरुस्त करुन देने गैरअर्जदाराचे काळजीवाहू केंद्रास सदर तक्रारी मध्ये पार्टी न केल्यामुळे तक्रार खारीज करावे हे म्हणणे मंचास उचीत वाटत नाही, कारण अर्जदार हा काळजीवाहू केंद्राचा ग्राहक नसून गैरअर्जदाराचा ग्राहक आहे व तसेच सदरच्या तक्रारीवरुन लेखी जबाबा वरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे मोबाईल दुरुस्तीसाठी नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे व काळजीवाहू केंद्राकडे जान्यास सांगुन त्रास दिला आहे यातून हे निष्कर्ष होते की, अर्जदारास या बाबत झालेल्या मानसिक त्रासाची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे मंचाचे मत झाले आहे.
सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1 सदरचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 अर्जदाराने दिनांक 24/08/2010 रोजी पावती क्रमांक 291 ने खरेदी केलेला मोबाईल गैरअर्जदारांकडे दुरुस्तीसाठी जमा करावा व गैरअर्जदाराने सदरचा मोबाईल व बॅटरी स्वीकारुन आपल्या मार्फत तो अर्जदारास 30 दिवसांच्या आंत दुरुस्त करुन द्यावा
3 गैरअर्जदारानी अर्जदाराला दिलेल्या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,000/- फक्त ( अक्षरी रु एकहजार फक्त ) निकाल कळाल्यांपासून 30 दिवसांच्या आंत द्यावे.
4 तक्रारीचा खर्च संबंधीतांनी आपआपला सोसावा.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
सदस्य अध्यक्ष