Maharashtra

Wardha

CC/88/2013

SMT.JYOTI SUDHAKARRAO GHAYAVAT + 3 - Complainant(s)

Versus

ANIL BHAIYYAJI SARAF +1 - Opp.Party(s)

ADV. DARDA

25 Sep 2014

ORDER

DIST. CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
SEWAGRAM ROAD
NEAR YASHWANT COLLEGE
WARDHA-442001
MAHARASHTRA (PH.NO.07152-243550 )
 
Complaint Case No. CC/88/2013
 
1. SMT.JYOTI SUDHAKARRAO GHAYAVAT + 3
WARDHA
WARDHA
MAHARASHTRA
2. KAUSTUBH SUDHAKARRAO GHAYAVAT
WARDHA
WARDHA
MAHARASHTRA
3. SRUSHTHI SUDHAKARRAO GHAYAVAT
WARDHA
WARDHA
MAHARASHTRA
4. SMT.SUSHILA GANPATRAO GHAYAVAT
WARDHA
WARDHA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ANIL BHAIYYAJI SARAF +1
HINGANI,SELOO
WARDHA
MAHARASHTRA
2. RELIANCE GENERAL INSURANCE CO.LTD. THROUGH MANAGER
NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Prakash L. Jadhav PRESIDENT
 HON'BLE MR. Milind R. Kedar MEMBER
 HON'BLE MS. Smita N. Chandekar MEMBER
 
For the Complainant:ADV. DARDA, Advocate
For the Opp. Party: Atul Songade, Advocate
 D.G.Thool, Advocate
ORDER

( पारीत दिनांक : 25/10/2014 )

( द्वारा मा. अध्‍यक्ष श्री.प्रकाश एल.जाधव )

 1.    अर्जदार यांनी प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये वैयक्‍तीक विमा दाव्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- व इतर खर्च मिळण्‍याकरीता गैरअर्जदार यांच्‍या विरुध्‍द दाखल केला आहे.  

2.    अर्जदारांची तक्रार अशी आहे की, अर्जदार क्र.1 चे पती, अर्जदार क्र.2 व 3 चे वडील तसेच अर्जदार क्र.4 चा मुलगा सुधाकर घायवट यांचा दिۖनांक 27/01/2012 रोजी विसापुर फाटा, नगर दौड रोडवर अपघात झाला व सदर अपघातात सुधाकर घायवट हे जखमी होवुन मरण पावले. गैरअर्जदार क्र.1 हे अपघातग्रस्‍त वाहन महिंद्रा झायलो क्र.एम.एच.32/सी-6651 चे नोदनीकृत मालक असुन सदर वाहनाचा गैरअर्जदार क्र.2 कडे विमा पॉलिसी क्र.1705712311004996 प्रमाणे विमा काढला असुन सदरील प्रिमीयम रकमेमध्‍ये वैयक्‍तीक विमा दावा फायदा या सदराखाली रु.400/- चा 8 व्‍यक्‍ती करीता प्रत्‍येकी रु.1,00,000/- चा विमा काढलेला आहे. श्री.सुधाकर घायवट हे त्‍यांचे मित्रांसह उपरोक्‍त वाहनातुन दर्शनाकरीता गेले होते व दिۖनांक 27/01/2012 विसापुर फाटा, नगर दौड रोडवर अपघात झाला व सदर अपघातात सुधाकरराव घायवट हे जखमी होवून मरन पावले. त्‍यामुळे विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार अर्जदार क्र.1 ते 4 हे मयत सुधाकरराव घायवट यांचे वारस या नात्‍याने विमा रक्‍कम रु.1,00,000/- मिळण्‍यास हकदार आहे.

3.     अर्जदार यांनी असे कथन केले की, सुधाकरराव घायवट यांच्‍या मृत्‍युनंतर अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्‍या कडे विमा दाव्‍याच्‍या रकमेची मागणी केली असता गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यानंतर अर्जदार यांनी त्‍यांच्‍या वकीलामार्फत गैरअर्जदार क्र.2 यांना रजीस्‍टर्ड पोस्‍टाने नोटीस पाठवुन वैयक्‍तीव विमा दावा फायद्याची रक्‍कम रु 1,00,000/- ची मागणी केली. गैरअर्जदार क्र.2 यांना सदर नोटीस प्राप्‍त होवुनही त्‍यांनी अर्जदारांच्‍या नोटीसला उत्‍तर दिले नाही तसेच नोटीस मधील मागणीची पुर्तताही केली नाही. अर्जदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन वैयक्‍तीव विमा दावा फायद्या रक्‍कम रु 1,00,000/- ची मागणी केली आहे.

4.    गैरअर्जदार क्र.1 यांनी प्रस्‍तुत प्रकरणात आपला लेखी जवाब नि.क्र.12 वर दाखल केला असुन त्‍यात मान्‍य केले की, प्रस्‍तुत प्रकरणातील अपघातग्रस्‍त वाहन         महिंद्रा झायलो क्र.एम.एच.32/सी-6651 चे नोदनीकृत मालक आहे व सदर वाहनाचा विमा हा गैरअर्जदार क्र.2 यांच्‍या कडे काढला असुन तो अस्‍तीत्‍वात आहे. सदर वाहनाचा दिनांक 27/01/2012 रोजी विसापुर फाटा, नगर दोड रोडवर अपघात झाला व सदर अपघातात सुधाकरराव घायवट हे जखमी होवुन घटनास्‍थळी मरण पावले. इतर सर्व आरोप त्‍यांनी अमान्‍य केले आहे. गैरअर्जदार क्र.1 च्‍या म्‍हणण्‍या प्रमाणे अर्जदाराने सदर अपघाताच्‍या नुकसान भरपाईसाठी मोटार वाहन कायदा नुसार प्रकरण क्र.77/2013 दाखल केली असुन कलम 140 नुसार अर्जदाराला रु.50,000/- नो फॉल्‍ट लायबीलीटी या सदराखाली मिळालेले आहे. त्‍यामुळे अर्जदार हे प्रस्‍तुत तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र नाही. एकाच कारणास्‍तव दोन वेगवेगळया कोर्टात एकाच बाबीची मागणी करता येत नाही त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार अर्ज खारीज करण्‍यात यावा. प्रत्‍यक्षात गाडीचे नुकसान झाले असल्‍यामुळे त्‍यांनी ग्राहक तक्रार क्र.81/2013 नुसार प्रकरण दाखल केले आहे. अर्जदार यांनी केलेली मागणी चुकीची असल्‍यामुळे ती रद्द करण्‍यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्र.1 यांनी केली आहे.

5.    गैरअर्जदार क्र.2 यांनी प्रस्‍तुत प्रकरणात आपला लेखी जवाब नि.क्र.19 वर दाखल केला असुन त्‍यात कबुल केले आहे की, प्रकरणात नमुद वाहन हे त्‍यांच्‍याकडे विमाकृत केले असुन दिۖनांक 27/01/2012 रोजी झालेल्‍या अपघातात सुधाकर घायवट हे जखमी होवुन घटनास्‍थळीच  मरण पावले. परंतु इतर आरोप अमान्‍य केले आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे असे कथन केले आहे की, त्‍यांनी आपली कर्तव्‍य योग्‍यरित्‍या व कायद्याला अनुसरुन तसेच परिस्थितीची शहानिशा, पडताळणी व आय.आर.डी.अे चे रिपोर्टप्रमाणे कुशलतेने पार पाडले आहे. त्‍यामुळे कंपनीने दिۖलेल्‍या सेवेत कमतरता असल्‍याचे किंवा दिۖरंगाई करण्‍याचे प्रश्‍नच उद्भवत नाही. अर्जदाराची प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या तरतुदीस अनुसरुन नसल्‍यामुळे खारीज करण्‍यात यावी. प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक या संज्ञेत बसत नाही. गैरअर्जदार क्र.2 यांना कमतरतेच्‍या सेवेसाठी जवाबदार धरता येत नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍यांच्‍या सेवेमध्‍ये कसल्‍याही प्रकारची उणीव केलेली नसुन, काटेकोरपणे पुर्तता केलेली आहे. त्‍यामुळे अर्जदाराची तक्रार ही आधारहीन व अवास्‍तव असल्‍यामुळे खारीज करण्‍याची विनंती गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍यांच्‍या लेखी जवाबामध्‍ये केली आहे.

6.     अर्जदार यांनी त्‍यांच्‍या कथनाच्‍या पुष्‍ठयर्थ नि.क्र.20 नुसार अर्जदार क्र.1                      श्रीमती ज्‍योती वि.सुधाकरराव घायवट यांचे शपथपत्र, नि.क्र.4/1 नुसार एफ.आय.आर ची नक्‍कल, नि.क्र.4/2 नुसार घटनास्‍थळ पंचनामा, नि.क्र.4/3 नुसार  शवविच्‍छेदन अहवाल, नि.क्र.4/4 नुसार विमा पॉलीसी, नि.क्र.4/5 नुसार गैरअर्जदार यांना पाठविलेली नोटीस इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केले आहेत. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी मोटार वाहन कायदा नुसार दाखल प्रकरण क्र.77/2013 मधील लेखी जवाबाची प्रत दाखल केली आहे. अर्जदार यांनी त्‍यांचा लेखी युक्तिवाद नि.क्र.25 वर दाखल केला असुन गैरअर्जदार क्र.2 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍या पृष्‍ठर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले नाही.

7.    अर्जदार व गैरअर्जदारांचा वाद, प्रतिवाद, त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला युक्तिवाद पाहता आमच्‍या समोर खालील मुद्दे उपस्थित होतात. ते मुद्दे  व त्‍यावरील उत्‍तर पुढील कारणे मिमांसात नमूद केल्‍यानुसार खालीलप्रमाणे आहे.

  1. मुद्दा क्रमांक 1 – गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी त्रृटीपूर्ण सेवा  व अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे काय ?  उत्‍तर – होय फक्‍त गैरअर्जदार क्र.2 यांनी.
  2. मुद्दा क्रमांक 2 – अर्जदार मागणीप्रमाणे लाभ मिळण्‍यास हक्‍कदार

आहे काय ? उत्‍तर – होय.

-: कारणे व निष्‍कर्ष :-

मुद्दा क्र.1 व 2 ः   अर्जदार क्र.1 चे पती, अर्जदार क्र.2 व 3 चे वडील तसेच अर्जदार क्र.4 चा मुलगा सुधाकर घायवट यांचा दिۖनांक 27/01/2012 रोजी महिंद्रा झायलो क्र.एम.एच.32/सी-6651 या वाहनास विसापुर फाटा, नगर दौड रोडवर अपघात झाला व सदर अपघातात सुधाकर घायवट हे जखमी होवुन मरण पावले तसेच सदर अपघातग्रस्‍त वाहन हे गैरअर्जदार क्र.1 यांच्‍या मालकीचे आहे व ते वाहन गैरअर्जदार क्र.2 कडे विमाकृत केले होते हे वादग्रस्‍त नाही.

8.     सुधाकर घायवट यांचा शवविच्‍छेदन अहवाल, अपघात घटनास्‍थळ पंचनामा व एफ.आय.आर च्‍या प्रतीचे अवलोकन केले असता असे दिۖसुन येते की, दिۖनांक 27/01/2012 रोजी वाहनास अपघात होवुन त्‍यामध्‍ये सुधाकरराव घायवट हे जखमी झाले व डोक्‍यावर झालेल्‍या जखमांमुळे घटनास्‍थळीच मृत्‍यु पावले. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 यांच्‍या कडे वैयक्‍तीक विमा दावा फायदा या सदराखाली रु.400/- चा 8 व्‍यक्‍ती करीता प्रत्‍येकी रु.1,00,000/- चा विमा काढलेला आहे ही बाब गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी कबुल केली आहे. विमा पॉलिसीची छायांकीत प्रत नि.क्र.4 वर दाखल असुन सदर विमा पॉलिसीचे अवलोकन केले असता असे दिۖसुन येते की, गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.1 कडुन वैयक्‍तीक विमा दावा फायदा या सदराखाली रु.400/- चा 8 व्‍यक्‍ती करीता प्रत्‍येकी रु.1,00,000/- चा विमा काढलेला आहे. सदर अपघातात सुधाकरराव घायवट यांचा मृत्‍यु झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या वारसदारांना विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍यास गैरअर्जदार क्र.2 हे बांधील आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी त्‍यांच्‍या लेखी जवाबात महत्‍वाचा आक्षेप घेतला आहे तो म्‍हणजे अर्जदाराने सदर अपघाताच्‍या नुकसान भरपाईसाठी मोटार वाहन कायदा कलम 166 नुसार, प्रकरण क्र.77/2013 दाखल केली असुन कलम 140 नुसार अर्जदाराला रु.50,000/- नो फॉल्‍ट लायबीलीटी या सदराखाली नुकसान भरपाई मिळालेले आहे. त्‍यामुळे अर्जदार हे प्रस्‍तुत तक्रारीतील मागणी मिळण्‍यास पात्र नाही. एकाच कारणास्‍तव दोन वेगवेगळया कोर्टात एकाच बाबीची मागणी करता येत नाही. प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक या संज्ञेत बसत नाही.

9.    ही बाब सत्‍य आहे की, अर्जदाराने सदर अपघाताच्‍या नुकसान भरपाईसाठी मोटार वाहन कायदा नुसार प्रकरण क्र.77/2013 दाखल केली असुन कलम 140  नुसार अर्जदाराला रु.50,000/- नो फॉल्‍ट लायबीलीटी या सदराखाली मिळालेले आहे. सदरील प्रकरण हे कलम कलम 140 व 166 मोटार वाहन कायदा नुसार दाखल करण्‍यात आले आहे. परंतु विमा पॉलीसीचे अवलेाकन केले असता, गैरअर्जदार क्र.1 यांनी वैयक्तिक अपघात विमा हे निनावी प्रवाशांसाठी वेगळे प्रिमीयम भरुन प्रति व्‍यक्‍ती रु.1,00,000/- चा विमा उतरविला होता ही बाब गैरअर्जदार क्र.2 यांनी मोटार वाहन कायदा नुसार दाखल प्रकरण क्र.77/2013 मध्‍ये दाखल केलेल्‍या लेखी जवाबात कबुल केले असुन, पुढे असे म्‍हटले आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांनी वैयक्तिक अपघात विमा हे निनावी आठ प्रवाशांसाठी वेगळे प्रिमीयम रु.400/- जमा केले असल्‍यामुळे अर्जदार फक्‍त रु.1,00,000/- मिळण्‍यास हकदार आहे. म्‍हणुन अर्जदार हे सुधाकरराव घायवट यांचे वारसदार म्‍हणुन अपघातानंतर विमा पॉलिसीची रक्‍कम रु.1,00,000/- मिळण्‍यास हकदार आहे.

10.    अपघाताच्‍या वेळी सुधाकरराव घायवट हे अपघातग्रस्‍त वाहनातुन प्रवास करीत असतांना अपघातात जखमी झाले व अपघातस्‍थळीच त्‍यांचा मृत्‍यु झाला व अर्जदार हे त्‍याचे वारसदार आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी वैयक्तिक अपघात विमा प्रिमीयम रक्‍कम घेवुन आश्‍वासीत केले होते. त्‍यामुळे अर्जदार हे ग्राहक संरक्षण कायद्यात नमुद ग्राहक या संज्ञेत मोडतात असे मंचाचे मत आहे.

      

Oriental Insusrance Co.Ltd…..V/s…….Mahabunni and another, 2008 ACJ 1158 या न्‍यायनिवाडयाचे अवलोकन करता यात मा. उच्‍च न्‍यायालय कर्नाटक यांनी असे नमुद केले आहे की, “Insurance company in absence of any special contract can question liability sought to be fastened beyond the requirements of terms of section 147 of Motor Vehicles Act – ; terms of any special contract are enforceable elsewhere and not before the Tribunal under Motor Vehicles Act.” 

 

11.    सदर प्रकरणामध्‍ये गैरअर्जदार क्र.1 व 2 मध्‍ये गैरअर्जदार क्र.1 यांनी रु.400/- देवुन 8 प्रवाशांचा विमा उतरविल्‍याने स्‍पेशल कंडीशन मध्‍ये येतो, म्‍हणुन  मोटार व्‍हेइकल ट्रिबुनल मंचात हे प्रमाणे चालु शकत नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुत प्रकरण मंचासमोर चालविण्‍यास योग्‍य आहे व तसा अधीकार मंचास येतो तसेच सदर प्रकरण हे मंचाच्‍या अधिकार क्षेत्रात येते.

12.     गैरअर्जदार क्र.2 हे विमा पॉलीसीची रक्‍कम रु.1,00,000/- मिळण्‍यास अर्जदार हकदार आहे असे कबुल करतात. परंतु अर्जदार यांनी सदर रकमेची मागणी करुन व त्‍या नंतर नोटीस देवुनही गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदारास विमा पॉलिसीप्रमाणे रु.1,00,000/- नुकसान भरपाई का दिली नाही याचा स्‍पष्‍ट खुलासा लेखी जवाबामध्‍ये दिला नाही किंवा अर्जदार यांनी दिलेल्‍या नोटीसला उत्‍तर देवुन दिला नाही. त्‍यामुळे अर्जदाराला सहाजीकच मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला. म्‍हणुन अर्जदार हा त्‍याला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रु.5000/- गैरअर्जदार क्र.2 कडुन मिळण्‍यास पात्र आहे असे मंचास वाटते. तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराला विमा दाव्‍याची रक्‍कम रु.1,00,000/- न दिल्‍यामुळे त्‍याला प्रस्‍तुत तक्रार मंचात दाखल करावी लागली व खर्च सोसावा लागला. सदर तक्रारखर्चाची रक्‍कम रु.1000/- गैरअर्जदार क्र.2 कडुन मिळण्‍यास अर्जदार हकदार आहे असे मंचाचे मत आहे. सदर तक्रार 2013 पासुन सुरु आहे. सदर काळ लक्षात घेता व सर्व बाबींचे अवलोकन करता तक्रार खर्च रु.1000/- देणे योग्‍य राहील असेही मचाचे मत आहे.

13.     वरील सर्व विवेचनाचा आधार घेता उपरोक्‍त सर्व मुद्दयाचे उत्‍तर होकारार्थी  देण्‍यात येत आहे.  त्‍यानुसार मंच खालील प्रमाणे आदेश   पारित करीत आहे.

आदेश

1)     अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2)      गैरअर्जदार क्र.2 यांनी सर्व अर्जदारांना विमा दाव्‍याची रक्‍कम रु.1,00,000/-  

          तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांकापासुन म्‍हणजेच दिनांक  

     25/09/2013 पासुन द.सा.द.शे. 6 % दराने संपुर्ण रक्‍कम प्राप्‍त होईस्‍तोवर 

     व्‍याज अदा करावे.

3)   गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराला झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल

           नुकसान भरपाई म्‍हणून रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून 1000/-रुपये

           द्यावे.

4)   गैरअर्जदार क्र.2 यांनी उपरोक्‍त आदेशाची पुर्तता आदेश पारित दिनांकापासून

           30 दिवसाच्‍या आत करावी. अन्‍यथा उपरोक्‍त आदेश क्र.2 च्‍या रक्‍कमेवर

           प्रस्‍तुत प्रकरण दाखल तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 25/09/2013 पासुन

     द.सा.द.शे. 6%  ऐवजी द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज दराने संपुर्ण रक्‍कम प्राप्‍त

     होईस्‍तोवर व्‍याज देण्‍यास गैरअर्जदार क्र.2 जबाबदार राहील.

5)   गैरअर्जदार क्र.1 यांना प्रस्‍तुत प्रकरणातुन मुक्‍त करण्‍यात येत आहे.

6)      मा. सदस्‍यांसाठीच्‍या ‘ब’ व ‘क’ फाईल्‍स संबंधितांनी परत घेवून जाव्‍यात.

7)   निकालपत्राच्‍या प्रति सर्व संबंधित पक्षांना माहितीस्‍तव  व उचित 

     कार्यवाही करिता पाठविण्‍यात याव्‍यात.

 

         

 
 
[HON'BLE MR. Prakash L. Jadhav]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Milind R. Kedar]
MEMBER
 
[HON'BLE MS. Smita N. Chandekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.