Maharashtra

Ahmednagar

CC/15/464

Kiran Chandrakant Gangawane - Complainant(s)

Versus

Anil Bankatlal Gandhi,Prop.Shubham Construction, - Opp.Party(s)

B.M.Kale

05 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/15/464
( Date of Filing : 04 Nov 2015 )
 
1. Kiran Chandrakant Gangawane
Bhisegaon,Station Road,Karjat,Tal Karjat,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Anil Bankatlal Gandhi,Prop.Shubham Construction,
Opp.Shilavihar,Shilavihar Road,Savedi,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
2. Sunil Bankatlal Gandhi,Prop.Shubham Construction,
Opp.Shilavihar,Shilavihar Road,Savedi,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:B.M.Kale, Advocate
For the Opp. Party: Adv.S.B.Mundada & S.S.Gupta, Advocate
Dated : 05 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.

2.   तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणेः-

     तक्रारदार हे शासकीय नोकर असून ते सावेडी अहमदनगर येथील रहिवासी आहेत. त्‍यांनी सामनेवाला नं.1 व 2 यांचेकडून Earth Galaxy Apartment मध्‍ये एक फ्लॅट खरेदी केला आहे. सामनेवाला हे शुभम कन्‍र्स्‍टकशन या नावाने व्‍यवसाय करतात. तक्रारदाराने खरेदी केलेला फ्लॅट 310 स्‍क्‍वेअर फुटाचा असून सावेडी येथे आहे. त्‍याची चतुर्सिमा तक्रारदाराने तक्रार अर्जात नमुद केलेली आहे. तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, सामनेवाला यांनी बिल्‍डींगचे कंम्‍प्‍लीशन सर्टीफिकेट दिलेले नाही व महानगरपालीकेचे सर्टीफिर्केट दिले नाही. तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्‍ये दिनांक 14.02.2012 रोजी करारनामा झाला व दुय्यम निबंधक अहमदनगर यांचेकडे तसा दस्‍त क्र.756/2012 नुसार करण्‍यात आला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराला दिनांक 23.04.2013 रोजी खरेदीखत करुन दिले. त्‍या खरेदीखताचा दस्‍त क्र.2375/2013 असा आहे. महानगरपालीकेने सदरच्‍या बिल्‍डींगचे बांधकामासाठी सामनेवाला यांना लायसन नं.158 दिनांक 18.05.2011 रोजी करुन दिलेले आहे. सदरची खरेदी ही रक्‍कम रु.8,50,000/- मध्‍ये करण्‍यात आलेली आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून फ्लॅटचा ताबा मिळाल्‍यानंतर त्‍यांचे लक्षात आले की, प्‍लॅन नुसार बांधकाम केलेले नसून त्‍यात बदल करण्‍यात आलेले आहे. आणि सामनेवाला यांनी सदरचे बांधकाम हे करारनाम्‍यानुसार करुन देण्‍याचे कबूल केलेले होते. तसेच सर्व सोयी सुविधा ठरल्‍यानुसार दिलेल्‍या नाहीत. विज मंडळाकडून विज कनेक्‍शन मिळवून दिलेले नाही. त्‍याबाबत 5,000/- रुपये तक्रारदाराने सामनेवालाना दिलेले आहेत. तसेच पाण्‍याचे कनेक्‍शन चार्जेस म्‍हणून 10,000/- रुपये तक्रारदाराने सामनेवालाला दिलेले आहेत. परंतु सामनेवालाने विज कनेक्‍शन व पाण्‍याचे कनेक्‍शन तक्रारदारास दिलेले नाही. अशा प्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदाराला त्‍यांचे सेवेत त्रुटी दिलेली आहे. तसेच सामनेवालाने बाल्‍कनी, कारपेट एरीया याविषयी कोणतेही स्‍पष्‍टीकरण दिले नाही. सामनेवालास तक्रारदाराने दिलेली रक्‍कम तक्रारदाराला परत करावी असे कथन केलेले आहे. सामनेवालानी खिडक्‍याची बरोबर फिनीशिंग केलेली नाही. जिन्‍यामध्‍ये बरेच अंतर असल्‍यामुळे अपघात होण्‍याची शक्‍यत आहे. पेंटीग व कलरींगचे काम डिफेक्‍टीव केलेले आहे. टाईल्‍स तुटल्‍या आहेत, विज व पाण्‍याचे कनेक्‍शन दिलेले नाही. ते देण्‍यास सामनेवाला यांनी उशीर केलेला आहे. वेगळे पाण्‍याचे कनेक्‍शन दिलेले नाही. केवळ विज कनेक्‍शन पुर्ण युनिट मिळून दिलेले आहे. संपुर्ण बिल्‍डींगचे बांधकाम हे डेंजरस कन्‍डीशनमध्‍ये आहे, त्‍यामुळे अपघात होऊ शकतो. सामनेवालाने दिलेले कम्‍प्‍लीशन सर्टीफिकेट भोगस दिलेले आहे. ज्‍या प्रमाणे सामनेवालानी जाहीरात केली होती, त्‍याप्रमाणे सोयी सुविधा दिलेल्‍या नाहीत.  अशा प्रकारे सामनेवालाने त्‍यांचे सेवेत त्रुटी केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदाराने मंचात तक्रार दाखल करुन त्‍यांची तक्रारीमध्‍ये केलेल्‍या विनंती प्रमाणे मागणी केलेली आहे.     

3.   सामनेवाला नं.1 यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी क्र.16 वर प्रकरणात दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये सामनेवाला नं.1 यांनी असे कथन केले की, सामनेवाला नं.1 यांनी तक्रारदाराला फ्लॅट विकत दिला आहे ही बाब मान्‍य केलेली आहे. त्‍यांचे Earth Galaxy Apartment  याची सामनेवाला नं.1 यांचे शुभम कन्‍स्‍ट्रक्‍शन या फर्मशी सामनेवाला नं.2 सुमित बंकटलाल गांधी यांचा कोणताही संबंध नाही. सामनेवाला हे स्‍वतः बांधकाम क्षेत्रातील तज्ञ असून त्‍यांनी संपुर्ण अपार्टमेंटचे यशस्‍वीपणे बांधकाम केलेले आहे. सर्व ग्राहकांना उत्‍कृष्‍ट व चांगल्‍या प्रकारची सेवा पुरविलेली आहे. इतर ग्राहकांनी आजपर्यंत कोणत्‍याही सोयी सुविधेविषयी तक्रार दिलेली नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांचे अपार्टमेंट मधील सदनिका क्र.101 चे बुकींग केले आहे. सदरच्‍या सदनिकेची किंमत रक्‍कम रुपये 13,50,000/- अशी आहे. त्‍याप्रमाणे तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्‍ये दिनांक 14.02.2012 रोजी दुय्यम निबंधक यांचेसमोर साठेखत करण्‍यात आलेले आहे.  त्‍याचा दस्‍त क्र. 756/2012 असा नोंदविण्‍यात आला आहे. सदर साठेखत करारनाम्‍यामध्‍ये सर्व अटी व शर्ती उभयतांना मान्‍य होत्‍या व आहेत. संपर्ण्‍ुा अपार्टमेंटचे बांधकाम पुर्ण झाल्‍यावर त्‍यास रंगरंगोटी करुन तक्रारदार हे स्‍वतः त्‍या जागेवर येऊन स्‍वतः हुन बांधकाम पुर्ण झाल्‍याची खात्री करुन घेतलेली आहे. त्‍यानंतर तक्रारदारांनी खरेदीखत करुन घेतलेले आहे. दिनांक 20.08.2013 रोजी सदर सदनिकेचे खरेदीखत अहमदनगर येथील सह.दुय्यम निबंध यांचकडे दस्‍त क्र.4036 /2013 अन्‍वये खरेदीखत लिहून नोंदवून दिलेले आहे. त्‍यानंतर सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा व कब्‍जा दिलेला आहे. पुढे सामनेवाला यांनी असे कथन केले आहे की, महानगरपालीकेकडील मंजुर प्‍लॅन प्रमाणे आणि करारनाम्‍यातील अटी व शर्तीप्रमाणे सदनिकेचे बांधकाम सर्व सोयी सुविधेनुसार पुर्ण केलेले आहेत. त्‍यामध्‍ये अंतर्गत लाईट फिटींग व पिण्‍याचे पाण्‍याचे नळ कनेक्‍शन फिटींगसह पुर्ण करुन दिलेले आहे. त्‍यामुळे सदर मिळकतीमध्‍ये लाईटचे मिटर व विज पुरवठा तक्रारदार यांनी स्‍वतंत्रपणे घेणे आवश्‍यक होते. तसेच महानगरपालीकेकडून नळाचे कनेक्‍शन घेणे आवश्‍यक होते. यामध्‍ये सामनेवाला यांचा कोणताही दोष नाही. तक्रारदार यांची सदरील सदनिकेचा ताबा घेतेवेळी कोणतीही तक्रार नव्‍हती. सामनेवाला यांनी संपुर्ण सोयी सुविधा देऊन योग्‍य व उत्‍कृष्‍ट दर्जाचे बांधकाम केलेले आहे. सदरची तक्रार चुकीची दाखल केलेली आहे. तसेच या तक्रारीस मिस जॉंईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज या तत्‍वाची बाध येते. तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदयाचे तरतुदीप्रमाणे गैरवापर करुन तक्रार दाखल केलेली आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्‍यात यावी अशी मंचाला विनंती केली आहे.  

4.   सामनेवाला नं.2 यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी 18 ला दाखल केलेली आहे. सामनेवाला नं.2 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीत असे कथन केलेले आहे की, मौजे सावेडी येथील स.नं.36 मधील प्‍लॉट नं.45 व 46 चे क्षेत्र 310 चौ.मी.होते. त्‍यामध्‍ये सदरील सामनेवाला नं.2 यांचा निम्‍मा हिस्‍सा अविभक्‍त हिस्‍सा याचे क्षेत्र 155 चौ.मी.होते. सामनेवाला नं.2 यांनी दिनांक 08.11.2011 रोजी सदरील प्‍लॉट मधील त्‍यांचा असलेला निम्‍मा अविभक्‍त हिस्‍सा शुभम कन्‍स्‍ट्रक्‍शन यांचे प्रोप्रायटर अनिल बंकटलाल गांधी यांचे लाभात विना मोबदला बक्षिसपत्राने करुन दिलेला आहे. तसे बक्षिसपत्र दुय्यम निबंधक यांचे कार्यालयास नोंदणी क्र.5905/2011 असा नोंदणी करण्‍यात आलेला आहे. त्‍यानुसार सदरचे मिळकतीचा फेरफार मंजुर करण्‍यात आलेला आहे. सदरचे मिळकतीशी सामनेवाला नं.2 यांचेशी कोणताही व्‍यवहार केलेला नाही. विनाकारण तक्रारदाराने सामनेवाला नं.2 यांना विनाकारण तक्रारीत सामील करुन घेतलेले आहे. अशा प्रकारे सदर तक्रार अर्ज हा मिस जॉईंडर ऑफ नेसेसरीज पार्टीस या तत्‍त्‍वाची बाध येते. सदरची तक्रार ही खारीज करण्‍यात यावी अशी सामनेवाला नं.2 यांनी मंचाला विनंती केली आहे.

5.   तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्र, शपथपत्र सामनेवाला नं.1 व 2 यांनी दाखल केलेले जबाब व कागदपत्रे तसेच तक्रारदाराचे वकील श्री.काळे व सामनेवाला नं.1 व 2 यांचे वकील श्री.मुंदडा व श्री.गुप्‍ता यांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील प्रमाणे न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.  

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय.?                                                         

 

... होय.

2.

सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात त्रुटी केली आहे काय.?                                                         

 

... नाही.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1 व 2 ः- तक्रारदार यांनी त्‍यांचे तक्रारीमध्‍ये असे कथन केले आहे की, त्‍यांनी सामनेवाला यांचे सावेडी अहमदनगर येथील Earth Galaxy Apartment  मध्‍ये एक सदनिका खरेदी केली. त्‍याबाबतचा करारनामा हा सामनेवाला नं.1 व तक्रारदार यांचेमध्‍ये झालेला आहे. त्‍यानुसार सदरचा करारनामा नोंदणीकृत झालेला आहे. सदरचा करारनाम्‍याची सामनेवालाचे अटी व शर्ती दोन्‍ही पक्षकार यांना मान्‍य आहेत. त्‍यानुसार संपुर्ण सदनिकेचे बांधकाम झाल्‍यानंतर दिनांक 20.08.2013 रोजी त्‍यासह खरेदी खत तक्रारदाराचे लाभात करण्‍यात आलेले आहे. या संपुर्ण बाबी सामनेवाला यांना मान्‍य आहेत. तक्रारकर्ताने पुढे तक्रारीत असे कथन केलेले आहे की, सदर सदनिकेचा ताबा घेतल्‍यानंतर त्‍यामध्‍ये खिडक्‍यांचे बरोबर फिनीशिंग केलेले नाही. जिन्‍याच्‍या पाय-यामध्‍ये बरेच अंतर आहे. पेटींग व कलरींग बरोबर केलेले नाही. टाईल्‍स तुटलेल्‍या आहेत. लाईट फिटींग व लाईट कनेक्‍शन आणि पाण्‍याचे कनेक्‍शन पुरविण्‍यात आलेले नाही. सदरचे सदनिकेचा ताबा देण्‍यास सामनेवाला यांनी उशीर केलेला आहे. संपुर्ण बिल्‍डींगचे कन्‍स्‍ट्रक्‍शन हे उच्‍च प्रतिचे नसल्‍यामुळे अपघात घडू शकतो. कंम्‍प्‍लीशन सर्टीफिकेट हे भोगस दिलेले आहे. त्‍याप्रमाणे सामनेवालाने कराराप्रमाणे सदनिकेचे बांधकाम केलेले नाही. अशा प्रकारे संपुर्ण त्रुटी असल्‍याचे तक्रारीमध्‍ये कथन केलेले आहे. मात्र सामनेवाला नं.1 यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये कथन केलेले आहे की, त्‍यांचे संपुर्ण बांधकाम हे करारनाम्‍यामध्‍ये नमुद असल्‍याप्रमाणे व महानगपालीकेकडून घेतलेल्‍या प्‍लॅन प्रमाणे करुन देण्‍यात आलेले आहे. मात्र विज मिटर व नळ कनेक्‍शन हे तक्रारदाराने ताबा घेतल्‍यानंतर घ्‍यावयाचा होता. यात सामनेवालाचा कोणताही दोष नाही असा बचाव घेतला. तक्रारदाराने केलेले तक्रारीतील कथनाप्रमाणे करारनामा प्रकरणात दाखल केलेला नाही. तसेच कोणत्‍या प्रकारचे बांधकाम करण्‍यात आले व टाईल्‍स कोणत्‍या प्रकारच्‍या बसविल्‍या होत्‍या, कलरींग व पेटींगचे काम बरोबर केलेले नाही. या संपुर्ण बाबीबाबत तक्रारदाराने कोणताही कागदोपत्री पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. किंवा सदरच्‍या सदनिकेचे फोटो प्रकरणात दाखल केलेले नाहीत. तसेच प्रकरणात कोणत्‍याही तज्ञास नियुक्‍त करुन सदनिकेचे बांधकाम निकृष्‍ट दर्जाचे आहे किंवा नाही असा तज्ञाचा अहवाल प्रकरणात दाखल करणे आवश्‍यक होते. परंतू तसा तक्रारदारांनी अहवाल दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारदारास सामनेवालाने सेवेत त्रुटी दिली या बाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. केवळ कथन केलेले आहे आणि कथन हा पुरावा होऊ शकत नाही. तक्रारदार यांनी सदर सदनिकेचे सन 2013 मध्‍ये ताबा घेतलेला आहे. आणि सदरची तक्रारी सन 2015 मध्‍ये दाखल केलेली आहे. सामनेवालाने असे कथन केलले आहे की, ज्‍यावेळी ताबा देण्‍यात आला त्‍यावेळी तक्रारदाराने कोणतीही तक्रार केलेली नाही. सदरची तक्रारी चुकीची दाखल केलेली आहे. प्रकरणाचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये बांधकाम निकृष्‍ट दर्जाचे किंवा त्‍यात सोयी सुविधा दिल्‍या नाही याबातचे दस्‍त किंवा इतर सदनिकाधारकांची शपथपत्रे किंवा छायाचित्रे तक्रारदाराने दाखल करणे आवश्‍यक होते. परंतू तसे केलेले नाही. यावरुन सामनेवालाने त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली ही बाब स्‍पष्‍ट होत नाही. तसेच सामनेवाला नं.2 यांचे सदरचे कथना विषयी काहीही संबंध नाही. त्‍यांच्‍या हक्‍कात सामनेवालाने प्‍लॉट सामनेवाला नं.2 यांनी सामनेवाला नं.1 यांचे नावे बक्षिसपत्र म्‍हणुन करुन दिलेला आहे. व तसे नोंदणीकृत नंबर सदरचे बक्षिसपत्रास देण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे सामनेवाला नं.2 यांचा सामनेवाला नं.1 शुभम कन्‍स्‍ट्रक्‍शन यांचेशी कोणताही संबंध नाही. ही बाब स्‍प्‍ष्‍ट झाली आहे. सामनेवाला नं.2 यांना या प्रकरणात विनाकारण पक्षकार म्‍हणून सामील केलेले आहे. त्‍यामुळे सामनेवाला नं.2 यांनी सेवेत त्रुटी दिली असे म्‍हणता येणार नाही. संपुर्ण तक्रारीचे अवलोकन करता ही बाब स्‍पष्‍ट होते की, सामनेवाला यांनी त्‍यांचे सेवेत त्रुटी केलेली नाही. सबब सदरची तक्रार खारीज करण्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. म्‍हणुन मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.3   मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्‍तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.  

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

2.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.  

4.   तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.