निकालपत्र :- (दि. 26/09/2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवालाक्र. 1 यांनी हजर राहून म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला क्र. 1 यांचे वकिलांनी युक्तीवाद केला. सामनेवाला क्र. 2 हे गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार वसंतराव हेरवाडे यांचे मालकीची गट नं. 900 व 912 या जमीनी स्वत: स्वखर्चाने कसतात. सदर जमिनीत घेतलेला ऊस सन 2009 मध्ये सामनेवाला क्र. 2 श्री. सदाशिवराव मंडलीक सह. साखर कारखाना मर्या, हमीदवाडा या कारखान्यास तक्रारदारांचे वडील श्री वसंतराव हेरवाडे सामनेवाला क्र. 1 संस्थेचे सभासद असून त्यांचे नावे दिर्घ मुदतीचे पाणीपुरवठा कर्जाचे हप्ते वेळेवर भागविले आहेत. सन 2009 पर्यंत कोणतीही थकबाकी नव्हती असे असतानाही सामनेवाला क्र. 2 यांनी संगनमताने दि. 18/03/2009 रोजी रक्कम रु. 43,452/- सामनेवाला क्र. 1 संस्थेस जमा केली. सदरची रक्कम तक्रारदारांनी मागणी करुनही दिली नाही. सबब, रक्कम रु. 43,452/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने देण्याचा आदेश व्हावा. तसेच तक्रारीचा खर्च रक्कम रु; 3,000/- व मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु. 50,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 2 कारखान्यास पाठविलेल्या ऊसाची पावती, तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 व 2 यांना पाठविलेल्या पत्रांची प्रत, तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 1 विरुध्द केलेले माहितीचे अधिकारानुसार अपिल, तक्रारदार यांनी सामनेवाला क्र. 2 विरुध्द सह. निबंधक, सहकारी संस्था, कागल यांचेविरुध्द केलेल्या अपिलाचे निकालपत्र, तक्रारदारांनी शिवाजी विद्यापिठात भरलेल्या पावत्या, तक्रारदारांचे शिलाई मशिन खरेदीची व विक्रीची पावती, तक्रारदारांचे सोन्याचे दागिने विक्रीची पावती, व मोबाईल खरेदीची पावती इत्यादीच्या झेरॉक्स प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र. 1 संस्थेने त्यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात,तक्रारदार हे सामनेवाला संस्थेचे ग्राहक होत नाहीत. तक्रारदारांचे वडील श्री. वसंतराव हेरवाडे यांचे नावांवर शेतजमीन आहे. तक्रारदारांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही. तक्रारदारांचे वडील श्री. वसंतराव हेरवाडे यांनी मध्यम मुदत कर्ज सन 1984 साली घेतले होते. सदरचे कर्ज थकीत गेलेले आहे. सभासदांच्या कर्जाची वसुली थकबाकीत गेली असेल तर त्याची वसुली करण्याचा अधिकार सामनेवाला संस्थेला आहे. सन 2009 मध्ये तक्रारदारांचे वडील श्री. वसंतराव हेरवाडे यांचे नांवे असलेल्या जमिनीतील ऊस तक्रारदारांनी सामनेवाला क्र. 2 कारखान्यास पाठविला होता. तक्रारदारांचे वडील श्री. वसंतराव हेरवाडे यांचे कर्ज थकीत असल्याने सदर संस्थेने केलेले कारवाईत कोणतीही त्रुटी राहिलेली नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला क्र. 2 कारखाना यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी त्यांच्या म्हणण्याअन्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद विस्तृत व सविस्तरपणे ऐकला आहे. तक्रारदारांचे वडील श्री. वसंतराव हेरवाडे यांचे नावे शेतजमीन आहे व सदर शेतीमध्ये ऊस हे पीक घेतलेले आहे ही वस्तुस्थिती मंचाचे निदर्शनास येत आहे. तक्रारदार व त्यांचे वडील हे एकत्र कुटूंब आहे. प्रस्तुत प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता तक्रारदाराचे वडीलांनी सामनेवाला क्र. 1 संस्थेमध्ये कर्ज घेतलेले आहे व सदरचे कर्ज थकीत आहे ही वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येत आहे. सहकार संस्थेच्या कर्जाची वसुली लिकींग पध्दतीची असलेने सामनेवाला क्र. 2 यांना तक्रारदारांच्या मालकीचा ऊसपुरवठा केलेला असला तरी तक्रारदारांचे थकीत असलेल्या कर्जापोटी सामनेवाला क्र. 2 साखर कारखाना व सामनेवाला क्र. 1 संस्था यांनी ऊस बिलाची रक्कम जमा केली. तसेच सदर रक्कम सामनेवाला क्र. 1 संस्थेने थकीत कर्जापोटी भरणा करुन घेतली यामध्ये सामनेवाला संस्थेची कोणतीही सेवा त्रुटी नसल्याचे दिसून येते. सबब, तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब, आदेश. आ दे श 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |