Maharashtra

Nagpur

CC/739/2019

SOU. NANDA ISHWAR ROKDE - Complainant(s)

Versus

ANAND SAI URBAN CREDIT CO.-OPERATIVE SOCIETY LTD. THROUGH THE BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV. A.G. GAWANDE

16 Feb 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/739/2019
( Date of Filing : 31 Dec 2019 )
 
1. SOU. NANDA ISHWAR ROKDE
R/O. PLOT NO. 97, GANESH NAGAR, NAGPUR-440009
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ANAND SAI URBAN CREDIT CO.-OPERATIVE SOCIETY LTD. THROUGH THE BRANCH MANAGER
19, JUNA SUBHEDAR LAYOUT, SHARDA SQ. NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
2. ANAND SAI URBAN CREDIT CO.-OPERATIVE SOCIETY LTD. THROUGH THE SECRETARY
19, JUNA SUBHEDAR LAYOUT, SHARDA SQ. NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
3. ANAND SAI URBAN CREDIT CO.-OPERATIVE SOCIETY LTD. THROUGH THE PRESIDENT
19, JUNA SUBHEDAR LAYOUT, SHARDA SQ. NAGPUR-440024
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Feb 2021
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

 

  1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्वये दाखल केली असुन तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्तीने तक्रारीत कथन केले की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ही सहकारी पतसंस्‍था असून त्‍यांचे रजिस्‍टर्ड कार्यालय, शारदा चौक, सुभेदार लेआऊट, नागपूर येथे आहे.विरुध्‍द पक्ष क्रमांक २ व ३ हे या संस्‍थेचे अनुक्रमे सचिव व अध्‍यक्ष आहे. तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ची ग्राहक असून तक्रारकर्तीने त्‍यांचे मिळकतीची रक्‍कम रुपये ६,५०,०००/- विरुध्‍द पक्ष सोसायटीमध्‍ये वेगवेगळ्या मुदतीठेव मध्‍ये गुंतविलेली आहे. तक्रारकर्तीने  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ च्‍या सोसायटीमध्‍ये मुदतीठेव मध्‍ये ठेवलेल्‍या रकमेचा तपशील खालिलप्रमाणे आहे.

 

Sr.

No.

N.A.

No.

A/c No.Date of DepositDue DateAmt. Rs.

M.I.S.

Int. Rs.

Rate of Interest
12575300114621/06/20172/7/20191,00,000/-1083/-13%
22576300114921/06/20176/7/20191,00,000/-1083/-13%
31567300210824/07/201721/08/20191,00,000/-1042/-12.5%
41569300327524/08/201723/08/20201,00,000/-1125/-13.5%
52040300141821/09/20175/8/20201,00,000/-1083/-13%
6005300327017/02/20182/2/20211,50,000/-1625/-13%
        

 

  1. तक्रारकर्तीला वरील मुदतीठेवीवर विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांचेकडुन दर महिण्‍याला रुपये ७,०४१/- इतके व्‍याज देण्‍यात येत होते. परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ यांनी माहे मार्च २०१८ पासून तक्रार दाखल तारखेपर्यंत तक्रारकर्तीला व्‍याज देणे बंद केले आहे. तक्रारकर्तीने  विरुध्‍द पक्षाला मुदती ठेवीतील रक्‍कम व त्‍यावरील व्‍याजाची मागणी केली परंतु विरुध्‍द पक्ष तक्रारकर्तीला  रक्‍कम देण्‍याचे टाळत गेला. त्‍यामुळे तक्रारकर्तीने  विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना वकीलामार्फत दिनांक २४/६/२०१८ रोजी कायदेशीर नोटीस पाठविली व त्‍याव्‍दारे मुदती ठेवीतील रकमेची व्‍याजासह मागणी केली परंतु विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी तक्रारकर्तीच्‍या नोटीस ची दखल घेतली नाही त्‍यामुळे तक्रारकर्तीने  मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना आदेशीत करावे की, त्‍यांनी तक्रारकर्तीची  मुदती ठेवीतील रक्‍कम रुपये ६,५०,०००/- व्‍याजासह तक्रारकर्तीला  परत करावी.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना आदेशीत करावे की, त्‍यांनी तक्रारकर्तीला  मानसिक व शारीरिक ञासाकरीता व नुकसान भरपाई म्‍हणून रुपये १,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ३०,०००/- अदा करावे.
  1. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ मंचात हजर झाले नाही. करीता विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ४/२/२०२१ रोजी पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेज व तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिल मुद्दे उपस्थित करण्‍यात आले.

        अ.क्र.                  मुद्दे                                                           उत्‍तर

  1. तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?                         होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                 होय
  3. काय आदेश ?                                                                     अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमीमांसा

  1. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाचे पतसंस्‍थेमध्‍ये त्‍यांच्‍या मिळकतीची रक्‍कम रुपये ६,५०,०००/- वेगवेगळ्या मुदतीमध्‍ये गुंतविलेली होती. तक्रारकर्तीने  निशानी क्रमांक २ वर दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की, तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे. तक्रारकर्तीला मुदती ठेवीवर विरुध्‍द पक्ष सहकारी पतसंस्‍थेकडुन दरमहा रुपये ७,०४१/- इतके व्‍याज मिळत होते परंतु विरुध्‍द पक्षाने माहे मार्च २०१८ पासून तक्रारकर्तीला व्‍याज देणे बंद केले ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्ती प्रती न्‍युनतम सेवा असून अनुचित व्‍यापार पद्धतीचा अवलंब करणारी कृती आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची  तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांना आदेशीत करण्‍यात येत की, विरुध्‍द पक्ष क्रमांक १ ते ३ यांनी वैयक्तिक व संयुक्‍तपणे तक्रारकर्तीला मुदत ठेवी क्रमांक ०२५७५ मधील रक्‍कम रुपये १,००,०००/-, दिनांक २१/०६/२०१७ पासून द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावी.
  3. तक्रारकर्तीला मुदत ठेवी क्रमांक ०२५७६ मधील रक्‍कम रुपये १,००,०००/- दिनांक २१/०६/२०१७ पासून द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावी.
  4. तक्रारकर्तीला मुदत ठेवी क्रमांक १५६७ मधील रक्‍कम रुपये १,००,०००/- दिनांक २४/७/२०१७ पासून द.सा.द.शे. १२.५ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावी.
  5.  तक्रारकर्तीला मुदत ठेवी क्रमांक १५६९ मधील रक्‍कम रुपये १,००,०००/- दिनांक २४/८/२०१७ पासून द.सा.द.शे. १३.५ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावी.
  6.  तक्रारकर्तीला मुदत ठेवी क्रमांक २०४०  मधील रक्‍कम रुपये १,००,०००/- दिनांक २१/०९/२०१७ पासून द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावी.
  7. तक्रारकर्तीला मुदत ठेवी क्रमांक ००५ मधील रक्‍कम रुपये १,५०,०००/- दिनांक १७/०२/२०१८ पासून द.सा.द.शे. १३ टक्‍के व्‍याजासह तक्रारकर्तीला प्रत्‍यक्ष रक्‍कम अदा होईपर्यंत अदा करावी.
  8. विरुध्‍द पक्ष क्रमांक १ व ३ यांना निर्देशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारकर्तीला मानसिक व शारीरिक ञासाबद्दल व नुकसान भरपाई म्‍हणून रुपये ४०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये २०,०००/- अदा करावा.
  9. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  10. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  11. तक्रारकर्ती यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.