मे. अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत.
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता. पाटणकर
*************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक: एपिडिएफ/161/2008
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 02/09/2005
तक्रार निकाल दिनांक : 05/12/2011
(1) यश व्हेइकल प्रा लि. ...)
पत्ता: 1105, राईट टाऊन, जबलपूर ...)
पिन कोड नं. 482 02 (एम पी) ...)
(2) दि ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि. ...)
पत्ता: ऑफिस नं2 गणात्रा चेंबर, ...)
571, सदाशिवपेठ, पुणे – 30. ...) तक्रारदार
विरुध्द
आनंद रोडवेज अण्ड कविता रोडवेज ...)
पत्ता: 34, कॉमन सेल हॉल, मार्केट यार्ड, ...)
स्टेट बँके जवळ, पुणे – 37. ...) जाबदार
********************************************************************
द्वारा: मा.अध्यक्षा : श्रीमती प्रणाली सावंत
// निशाणी –1 वरील आदेश //
सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक मंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पिडिएफ/252/2005 असा नोंदणिकृत नंबर देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा मंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपिडिएफ/161/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
सदरहू प्रकरण मंचाकडे सन 2005 पासून प्रलंबित असल्यामुळे प्रकरण चालविण्याचे आहे अथा नाही याबाबत तक्रारदारांचे निवेदन येणेसाठी तक्रारदारांनी नोटीस काढली असता तक्रारदारांची ‘दिये गये पते से इस नाम का ऑफिस बंद हो गया है’
या शे-यासह परत आली आहे. अर्थात अशा परिस्थितीत सदरहू प्रकरण योग्य तजवीजी अभावी काढून टाकण्यात येत आहे.
( श्रीमती प्रणाली सावंत)
अध्यक्ष
(श्रीमती सुजाता पाटणकर)
सदस्य
दिनांक: 05/12/2011
पुणे.