नि.३३
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष –अनिल य.गोडसे
मा.सदस्या -श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १३३२/२००८
---------------------------------------
तक्रार अर्ज नोंद तारीख – ११/२/२००८
तक्रार दाखल तारीखः – १७/१२/२००८
निकाल तारीखः - १४/१०/२०११
----------------------------------------
श्री दत्तात्रय आप्पाण्णा अब्दागिरे
वर्षे – ५४ वर्षे, धंदा – व्यापारी
रा.२२१/१, पार्वती कॉम्प्लेक्स,
वखार भाग, जि.सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
१. आनंद रत्नी कमॉडिटीज लि.
मेंबर, मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लि.
३ रा मजला, डेक्कन प्राईड,
श्री सुवर्ण सहकारी बॅंकेच्या वर, डेक्कन जिमखाना,
पुणे – ४११ ००४
२. आनंद रत्नी कमॉडिटीज लि.
मेंबर, मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया लि.
शाखा वेंकटेश असेट, दुसरा मजला,
सांगली-मिरज रोड, सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : +ìb÷.श्री जे.एस.कुलकर्णी
जाबदार क्र.१ व २ तर्फे : +ìb÷. श्री एम.आय.मुलाणी
नि का ल प त्र
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री.अनिल य.गोडसे.
१. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार हे व्यापारी आहेत. जाबदार ही कमॉडिटी मध्ये व्यापारी करणारी कंपनी आहे. जाबदार यांचा व्यवसाय हा मल्टीकमॉडिटी एक्स्चेंज या स्वरुपाचा आहे. तक्रारदार यांनी जाबदार यांच्या व्यवसायामध्ये ट्रेडींग अकाऊंट उघडले होते. सदर अकाऊंटच्या द्वारे निरनिराळया वस्तू जाबदार यांचेद्वारे खरेदी करणे व विक्री करणे असा व्यवसाय तक्रारदार करीत होते. असा व्यवसाय करीत असताना तक्रारदार यांच्या परवानगीशिवाय जाबदार यांनी झिंक आणि कॉपर या तक्रारदार यांनी खरेदीसाठी नोंदविलेल्या वस्तू तक्रारदार यांच्या परवानगीशिवाय विक्री केल्या त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले. सदर झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुतचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रार अर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ च्या यादीने १८ कागद दाखल केली आहेत.
३. जाबदार यांचेविरुध्द याकामी नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आला होता. तो त्यांनी रद्द करुन घेवून नि.१७ वर आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदाराचा बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार हा ग्राहक होत नाही असा तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच तक्रारदार व जाबदार यांचेत झालेल्या करारानुसार सदरचा वाद लवादामार्फत सोडविण्याची अट असल्याने प्रस्तुतचा तक्रारअर्ज चालविण्याचे या मंचास अधिकार नाही. जाबदार यांनी तक्रारदार व जाबदार यांचेत झालेल्या कराराप्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अर्जात नमूद कमॉडिटीची विक्री केली आहे. तक्रारदार यांना जाबदार यांनी कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. सबब तक्रारदार यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे जाबदार यांनी त्यांचे म्हणण्यामध्ये नमूद केले आहे. जाबदार यांनी नि.१८ ला शपथपत्र व नि.१९ चे यादीने ४ कागद दाखल केले आहेत. तक्रारदार यांनी नि.२० ला प्रतिउत्तर दाखल केले आहे. त्यामध्ये जाबदार यांचे म्हणण्यातील मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी नि.२२ ला लेखी युक्तीवाद व तक्रारदार यांनी नि.२६ ला लेखी युक्तिवादाबाबत पुरसिस दाखल केली आहे.
४. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, जाबदार यांनी दिलेले म्हणणे, दाखल लेखी युक्तिवाद, प्रतिउत्तर यांचे अवलोकन केले. दोन्ही विधिज्ञांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार हा जाबदार यांचा ग्राहक होतो का ? हा प्रमुख मुद्दा मंचाचे निष्कर्षासाठी उपस्थित झाला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जातच त्यांचा व्यवसाय ट्रेडर असल्याचे नमूद केले आहे. तक्रारदार व जाबदार यांचेतील व्यवसायाचे स्वरुप हे कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये पैसे गुंतविण्याचे आहे. तक्रारदार यांचा व्यवसाय पूर्णत: व्यापारी कारणासाठी असल्याचे दिसून येते. जाबदार यांनी युक्तिवादाचे दरम्यान अनेक निवाडे दाखल केले आहेत. त्यामध्ये सन्मा.राज्य आयोग महाराष्ट्र यांनी तक्रारअर्ज क्र.७७/२०१० अतुल मेहता विरुध्द मे.ऍंजल ब्रोकिंग च्या कामी दि.७/६/२०१० रोजी दिलेला निवाडा व त्यातील निष्कर्ष महत्वपूर्ण ठरतो.
What we find that complainant is admittedly an investor and he desires to trade in the shares and for the trading purpose, services of opponent are hired. Thereby the transaction between the complainant and the opponent is a commercial transaction or a trading transaction. Such transaction is not covered within the definition of consumer.
सन्मा. राज्य आयोग यांनी दिलेल्या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदार यांचे व्यवसायाचे स्वरुपही व्यापारी कारणासाठीचे आहे त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक सरंक्षण कायद्यातील तरतुदींनुसार जाबदार यांचे ग्राहक होत नाहीत या निष्कर्षाप्रत सदरचा मंच आला आहे. तक्रारदार हे ग्राहक होत नसल्यामुळे तक्रारदार हे इतर कोणताही अनुतोष मिळणेस पात्र आहेत का नाहीत याबाबत कोणतेही विवेचन करणे संयुक्तिक होणार नाही असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहे.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दि. १४/१०/२०११
(सुरेखा बिचकर) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत : तक्रारदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.
जाबदार यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने दि. / /२०११.