Maharashtra

Nagpur

CC/305/2019

SHRI. VASANTRAO MODKUJI SUPARE - Complainant(s)

Versus

ANAND NAGARI SAHAKARI PAT SANSTHA LTD. NAGPUR, THROUGH PRESIDENT - Opp.Party(s)

ADV. RAJENDRA B. BOMEWAR

26 Nov 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/305/2019
( Date of Filing : 30 May 2019 )
 
1. SHRI. VASANTRAO MODKUJI SUPARE
R/O. C/O. CHANDRAKANT D. FATING, PLOT NO. 16 SHAKTI MATA NAGAR, GALLI NO. 5, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. ANAND NAGARI SAHAKARI PAT SANSTHA LTD. NAGPUR, THROUGH PRESIDENT
R/O. PLOT NO. 49, JUNA SUBHEDAR LAY OUT, NEAR ADARSHA MANGAL KARYALAY NAGPUR-24
NAGPUR
MAHARASTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. RAJENDRA B. BOMEWAR, Advocate for the Complainant 1
 ADV. V.T.BHOSKAR/KETAN V. BHOSKAR, Advocate for the Opp. Party 1
Dated : 26 Nov 2020
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1.        तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की,  विरुध्‍द पक्ष ही महाराष्‍ट्र को-ऑप.सोसायटी 1960 अंतर्गत नोंदणीकृत संस्‍था असून तिचा नोंदणी क्रमांक 527/95/26995 असा आहे. विरुध्‍द पक्ष आनंद नागरी सहकारी पत संस्‍था लि.नागपूर या नावाने वेगवेगळया योजने अंतर्गत ठेवी स्‍वीकारण्‍याचे आणि त्‍यांच्‍या सदस्‍यांना कर्ज पुरविण्‍याचा व्‍यवसाय करतात. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष सोसायटीचा सदस्‍य असून त्‍याचे विरुध्‍द पक्षाकडे बचत खाते असून त्‍याचा क्रमांक 9 असा आहे. दि. 23.02.2019 च्‍या खाते वहीनुसार तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे दि. 23.02.2011 ला त्‍याच्‍या बचत खात्‍यात रुपये 8,52,689/- इतकी रक्‍कम होती आणि दि. 23.02.2019 ला रुपये 2,08,524/- एवढी रक्‍कम शिल्‍लक होती. विरुध्‍द पक्षाने दि. 14.03.2019 ला दिलेल्‍या लेखी उत्‍तरानुसार ते विरुध्‍द पक्षाला मान्‍य आहे.
  2.        डिसेंबर 2014 पर्यंत तक्रारकर्ता नियमितपणे सदर बचत खात्‍यातून रक्‍कम काढणे व जमा करीत होता. परंतु सन 2015 पासून विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या बचत खात्‍यातून रक्‍कम काढण्‍यास मनाई केली. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यात सन 2013 पासून व्‍याज जमा केले नाही. तक्रारकर्त्‍याची पत्‍नी Bone Marrow Aspiration  ने आजारी आहे व तिच्‍यावर नॅशनल कॅन्‍सर इ‍न्‍स्‍टीटयुट नागपूर येथे उपचार सुरु आहे. तक्रारकर्त्‍याला उत्‍पन्‍नाचे दुसरे साधन नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला बचत खात्‍यामधून रक्‍कम काढण्‍यास मनाई केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षा विरुध्‍द हुडकेश्‍वर पोलिस स्‍टेशन येथे तक्रार नोंदविली. त्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये 20,000/- व रुपये 30,000/- चे दोन धनादेश दि. 24.06.2015 ला दिले व अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याला एकूण रुपये 50,000/- प्राप्‍त झाले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने अनेक वेळा विरुध्‍द पक्षाला बचत खात्‍यातील रक्‍कमेची मागणी केली असता विरुध्‍द पक्षाने रक्‍कम परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 22.04.2019 रोजी विरुध्‍द पक्षाला वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने त्‍याच्‍या बचत खाता क्रं. 9 मधून रक्‍कम काढण्‍याची परवानगी द्यावी. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खाता क्रं. 9 मध्‍ये सन 2013 पासून जमा न केलेले व्‍याज जमा करावे. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई देण्‍याचा ही आदेश द्यावा.
  3.        विरुध्‍द पक्ष यांनी आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, त्‍यांची महाराष्‍ट्र को-ऑप.सोसायटी अॅक्‍ट 1960 अंतर्गत नोंदणीकृत असून त्‍याचा रजि.क्रं. 527/95 असा आहे. ते ग्राहकांकडून ठेवी स्‍वीकारतात व कर्ज पुरविण्‍याचा व्‍यवसाय करतात. तक्रारकर्ता हा संस्‍थेचा सदस्‍य असून त्‍याचा संस्‍थेतील बचत खाता क्रं. 9 हा आहे.  तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात आज तारखेला रुपये 2,08,524/- एवढी रक्‍कम शिल्‍ल्‍क आहे. तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार त्‍याला त्‍याचे बचत खाते वापरण्‍यास मिळणेबाबत दाखल केली आहे आणि विरुध्‍द पक्ष संस्‍थेने त्‍याचे बचत खाते वापरण्‍यास परवानगी दिलेली नाही.
  4.        तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष पत संस्‍थेचे सन 2012 पर्यंत अध्‍यक्ष होते व त्‍यांच्‍या कार्य काळात त्‍यांनी विविध लोकांना त्‍यांच्‍या आर्थिक स्थितीची तसेच कर्ज परतफेडीची तपासणी न करता कर्ज वाटप केले, त्‍यामुळे संस्‍थेला आर्थिक नुकसान झाले. वि.प.ने पुढे नमूद केले की, त.क.च्‍या कुटुंबातील व्‍यक्‍ती संस्‍थेचे सदस्‍य तसेच वसुली अभिकर्ता होते. तक्रारकर्त्‍याचा संस्‍थेचा अध्‍यक्ष पदाचा कालावधी पूर्ण झाल्‍यावर सध्‍याच्‍या संचालक मंडळाने कार्यभार हाती घेतल्‍यावर कर्जधारकांनी कर्ज परतफेड करण्‍याबाबत मोठा हलगर्जीपणा केले असल्‍याचे निदर्शनास आले आणि तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या कार्यकाळात काहीच कार्यवाही केली नसल्‍याचे दिसून आले. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष संस्‍थेने गंगाधर डी. रोहणकर, करुणा रोहनकर, सरिता भांडे, अर्चना पंचबुध्‍दे यांची वसुली अभिकर्ता म्‍हणून नेमणूक केली. वसुली अभिकर्त्‍यांना कर्ज वसुली कार्यक्रम राबवितांना निदर्शनास आले की, ब-याच कर्जधारकांनी सांगितले की, त्‍यांनी तक्रारकर्ता वसंतराव सुपारे आणि व्‍यवस्‍थापक, श्री.महेंद्र भाजीपाले आणि त्‍यावेळचे सचिव, देवेंद्र भाजीपाले यांना रक्‍कम दिली आहे, यावरुन दिसून येते की, सदर तक्रारकर्त्‍याने महेंद्र भाजीपाले व सचिव देवेंद्र भाजीपाले यांच्‍या संगनमताने त्‍यांनी कर्जधारकाकडून रक्‍कम वसुल केली व ती संस्‍थे मध्‍ये जमा केली नाही. त्‍यामुळे संस्‍थेला फार मोठा तोटा झाला. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने संस्‍थेतील अनियमिततेची  चौकशी करण्‍याकरिता कमिटी नियुक्‍त केली आहे व चौकशी सुरु आहे.  वसुली अभिकर्ता श्री. रोहणकर आणि इतर अभिकर्ता यांनी सादर केलेल्‍या अहवालानुसार विविध कर्ज धारक यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार त्‍यांनी तक्रारकर्ता, महेंद्र भाजीपाले, देवेंद्र भाजीपाले यांच्‍याकडे कर्ज हप्‍त्‍याची रक्‍कम भरलेली आहे, त्‍यांनी कर्ज वसुल केलेली रक्‍कम संस्‍थेच्‍या खात्‍यात जमा करण्‍यास कसूर केलेला आहे, त्‍यामुळे संस्‍थेला तक्रारकर्त्‍याचे खाते वापरण्‍यास मनाई करण्‍यास बाध्‍य करण्‍यात आले. कारण तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यात जमा असलेली रक्‍कम त्‍याच्‍या मिळकतीची नसून ती संस्‍थेची रक्‍कम आहे.
  5.        वसुली अभिकर्ताकडून मिळालेल्‍या माहितीनुसार विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याशी संपर्क साधला व त्‍यांच्‍याकडून स्‍पष्‍टीकरण मागितले. परंतु तक्रारकर्ता स्‍पष्‍टीकरण देण्‍यास अपयशी ठरला. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष संस्‍थेने दि. 03.08.2015 ला तक्रारकर्त्‍या विरुध्‍द हुडकेश्‍वर पोलिस स्‍टेशन मध्‍ये तक्रार दाखल केली. तक्रारकर्त्‍याने पोलिस स्‍टेशनमध्‍ये त्‍याच्‍या कार्यकाळात वाटप करण्‍यात आलेल्‍या कर्ज रक्‍कम वसुली करता संस्‍थेला मदत करण्‍याचे आश्‍वासन दिलेले आहे परंतु तक्रारकर्त्‍याने दिलेल्‍या आश्‍वासनाचे पालन केले नाही. त्‍यामुळे संस्‍थेला फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.तक्रारकर्त्‍याने खरा प्रकार मा. आयोगा पासून लपवून ठेवून चुकिची तक्रार नोंदविली असल्‍यामुळे सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.    
  6.        तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद याचे अवलोकन केले व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नोंदविले.

 मुद्दे उत्‍तर

1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे कायॽ         होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली कायॽ          नाही

3. काय आदेशॽ                                  अंतिम आदेशानुसार  

 

                              कारणमिमांसा

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत-  तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍द पक्षाच्‍या सोसायटी मध्‍ये बचत खाते क्रं. 9 आहे हे नि.क्रं. 2 वर दाखल केलेल्‍या दस्‍ताऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते.   
  2.        तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष पत संस्‍थेचे सन 2012 पर्यंत अध्‍यक्ष होते व त्‍यांच्‍या कार्य काळात त्‍यांनी विविध लोकांना त्‍यांच्‍या आर्थिक स्थितीची तसेच कर्ज परतफेडीची तपासणी न करता कर्ज वाटप केल्‍यामुळे संस्‍थेला आर्थिक नुकसान झाले. तक्रारकर्त्‍याचा संस्‍थेचा अध्‍यक्ष पदाचा कालावधी पूर्ण झाल्‍यावर सध्‍याच्‍या संचालक मंडळाने वसुलीबाबतचा कार्यभार हाती घेतल्‍यावर असे निदर्शनास आले की,  कर्जधारकांनी कर्ज परतफेड करण्‍याबाबत मोठा हलगर्जीपणा केला असून  तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या कार्यकाळात काहीच कार्यवाही केली नसल्‍याचे दिसून आले. विरुध्‍द पक्ष संस्‍थेने संस्‍थेतील अनियमिततेची चौकशीकरिता कमिटी स्‍थापन केली होती व सदर कमिटीने नेमलेल्‍या वसुली अभिकर्ता यांनी सादर केलेल्‍या अहवालानुसार तक्रारकर्ता (संस्‍थेचे माजी अध्‍यक्ष)  व संस्‍थेतील व्‍यवस्‍थापक, सचिव यांनी कर्जधारकांकडून वसुल केलेली रक्‍कम संस्‍थेच्‍या कर्ज खात्‍यात जमा न करता परस्‍स्‍पर संगनमताने स्‍वतःच्‍या उपयोगात आणली. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍या विरुध्‍द हुडकेश्‍वर पोलिस स्‍टेशन नागपूर येथे तक्रार नोंदविली असल्‍याचे दिसून येते.  तक्रारकर्त्‍या विरुध्‍द पोलिस स्‍टेशन मध्‍ये दाखल गुन्‍हयाचा तपास अहवाल व दुय्यम सहकारी निबंधक यांचा चौकशी अहवाल येणे बाकी आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यावर येत असलेली जबाबदारी ठरविणे बाकी असल्‍याचे दिसून येते.  म्‍हणून तक्रारकर्त्‍याला त्‍याचे बचत खाते वापरण्‍यास परवानगी देण्‍याचा आदेश या मंचाद्वारे पारित करणे उचित होणार नाही असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज.

 

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

 

  1. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.