ग्राहक तक्रार क्र. 33/2014
दाखल तारीख : 01/03/2014
निकाल तारीख : 13/03/2015
कालावधी: 01 वर्षे 0 महिने 13 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. श्री. हरीश्चंद्र पांडव माळी,
वय-38 वर्षे, धंदा – व्यापार,
रा.जिल्हा कोर्टासमोर वडापाव सेंटर, उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. आनंद गुणवंत भालेराव, वय -45 वर्षे, धंदा-मुख्य प्रवर्तक,
2. लक्ष्मण रामा डोलारे, वय -26 वर्ष, धंदा – शेळीपालन,
3. यशवंत रामचंद्र वारे, वय-36 वर्षे, धंदा- कापड दुकान,
4. सोमनाथ उत्रेश्वर सुतार वय-48 वर्षे, धंदा – सुतारकाम,
5. अनिल सटवा भालेराव वय 50 वर्षे, धंदा- रेशन दुकानदार,
6. सौ. सरिता सुरेश पाटील वय-36 वर्षे, धंदा- घरकाम,
7. उत्रेश्वर संतराम भालेराव वय -65, वर्ष, धंदा- शेतमजूर,
8. सौ. मनोरमा आनंद भालेराव, वय-22 वर्षे, धंदा- घरकाम,
9. बाळासाहेब गोरोबा लांडगे, वय-46 वर्ष, धंदा- किराना दुकान,
10. अभिमन्यू बापुराव चांगन, वय-25 वर्ष, धंदा –शेळीपालन
11. भानुदास गोविंद गायकवाड, वय-57, धंदा- नौकरी,
सर्व सदस्य सुरेश साहेबराव पाटील
ग्रामिण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या.
कसबेतडवळे, ता.जि. उस्मानाबाद
12. योगेश नारायण रायबान, वय-30 वर्षे,
धंदा- पिग्मी एजन्ट, रा. रायबान गल्ली,
उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारांतर्फे विधिज्ञ : श्री.आर. ए. सुर्यवंशी.
विरुध्द पक्षकार क्र. 1 ते 11 विरुध्द तक्रार रद्द.
विरुध्द पक्षकार क्र.12 विरुध्द एकतर्फा आदेश पारीत.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते, यांचे व्दारा:
अ) 1. तक्रारदाराचे विप क्र. 12 शी मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे व विप क्र. 12 यांनी पिग्मी भरणा करण्याबाबत विनंती केल्यामुळे तक्रारदार यांनी व्यवसायातील बचत म्हणून विप योचे संस्थेकडे संक्षेप ठेव बचत (पिग्मी) क्र.386 दि.25/10/2010 रोजीपासून पतसंस्थेचे अधिकृत एजन्ट विप क्र.12 यांचेकडे रोख स्वरुपात वेळोवेळी एकूण रक्कम रु.29,900/- दि.08/10/2011 पर्यंत भरणा केलेले आहेत. त्याबाबत पासबुकमध्ये नोंदी व सहया आहेत. दि.10/10/2011 रोजी विप पतसंथेच्या कर्यालयास भेट दिली असता सदरचे कार्यालय कायमस्वरुपी बंद असल्याचे कळाले. त्यानंतर दि.30/11/2013 रोजी तक्रारदाराने विप यांचेशी संपर्क साधुन रक्कम रु.29,900/- ची मागणी केली असता विप यांनी सदरची रक्कम आज देतो उदया देतो असे म्हणून आजतागायत रक्कम देण्यास टाळाटाळ केली. म्हणून दि.04/12/2013 रोजी नोटिस पाठवली असता सदर नोटिसचे उत्तर दिले नाही. म्हणून तक्रारदारास सदरची तक्रार दाखल करावी लागली म्हणून भरलेली रक्कम रु.29,900/- व त्यावरील व्याज तसेच मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व्याजासह मिळावी अशी विनंती केली आहे.
ब) सदर प्रकरणात विप क्र.1 ते 11 यांना मंचामार्फत नोटिसा पाठविण्याबाबत तक्रारदाराने कोणतेही स्टेप्स न घेल्यामुळे दि.10/05/2014 रोजी सदर प्रकरण त्याच्या विरुध्द रद्द करण्यात आले.
क) सदर प्रकरणात विप क्र.12 याला मंचा मार्फत नोटिस पाठविण्यात आल्या असता पाकीटावर सदर नावाची व्यक्ति येथे राहत नाही सबब परत असा शे-यासह पाकीट परत आले. म्हणून त्याच्या विरुध्द दि.12/05/2012 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्यात आला.
ड) तक्रारदाराची तक्रार, सोबत दाखल केलेले कागदपत्रांचे व विप क्र.1 ते 11 यांचे विरुध्द
रद्द झालेली तक्रार, विप क्र.12 विरुध्दचा एकतर्फा आदेश इ. परिस्थीतीचे अवलोकन केले असता आमच्या मते खालील मुद्दे निघतात त्याची उत्तरे त्या समोर आम्ही खाली दिलेल्या कारणासाठी लिहली आहेत.
मुद्दे उत्तर
1) तक हा विप चा ग्राहक आहे काय ? होय.
2) विप ने सुवेत त्रुटी केली आहे काय ? विप क्र.12 पुरते नाही.
2) तक हा अनुतोषास पात्र आहे काय ? नाही.
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
इ) कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 :
1. विप क्र.1 ते 11 यांच्यासाठी नोटिस बजावणीकामी आवश्यक त्या स्टेप्स तक्रारदाराने न घेतल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार रद्द करण्यात आली आहे. विप क्र.12 ला नोटिस मिळाली असून नोटिस मिळूनही तो गैरहजर राहिल्यामुळे त्याच्या विरुध्द एकतर्फा आदेश झाला आहे. तक्रारदाराच्या विधिज्ञाने दि.28/08/2014 रोजी एक साधा अर्ज दिलेला आहे त्यामध्ये अशी विनंती केली आहे की विप क्र.1 ते 11 विरुध्द डिसमिसल ऑर्डर रद्द करण्यात यावी. तथापि दि.13/10/2014 रोजी सदरच्या अर्जावर तक्रारदाराचे विधिज्ञ गैरहजर राहिले तसेच दिलेल्या अर्जावर रद्द करण्या संदर्भातील कारणमीमांसा नमूद केलेली नाही व सोबत शपथपत्रही जोडलेले नाही या कारणामुळे तक्रारदराच्या विधिज्ञाचा विनंती अर्ज अमान्य करण्यात आला. तथापि रेकॉर्डवरील कागदपत्राच्या आधारे गैरतक्रारदार क्र.12 ने त्याच्याकडे जमा असलेली पिग्मीची रक्कम पतसंस्थेत जमा केलेली असल्याचे आढळून येते. त्यामुळे त्याच्या पुरती सेवेत त्रुटी केलेली दिसून येत नाही व बाकीच्या गैरअर्जदारा विरुध्द तक्रार रद्द झालेली असल्यामुळे त्यावर आम्ही भाष्य करु शकत नाही. त्यामुळे तक्रारदाची तक्रार ही रद्द करण्यात येते.
आदेश
1) तक ची तक्रार ना मंजूर करण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाही.
3) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद