Maharashtra

Chandrapur

CC/15/13

Sau Durgadevi Damodhar Sarda At Chandrapur - Complainant(s)

Versus

Amit Naseree Manager Cox & king limited chandrapur - Opp.Party(s)

Adv. Rajesh Thakur

20 Nov 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/15/13
( Date of Filing : 02 Feb 2015 )
 
1. Sau Durgadevi Damodhar Sarda At Chandrapur
At Ganjward Chandrapur
Chandrapur
Maharashtra
2. Shri Damodhar Shivraj Sarda
At Ganjward Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Amit Naseree Manager Cox & king limited chandrapur
At Near Sapan Tokies Chandrapur
Chandrapur
Maharashtra
2. Shri Sunil Dongre ,Manager Cox & king ,Divison -5
Mehar Complex Bhole Petrol Pump Dharmpeth Amarawati Road Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Shrik Khojja , Aurangabad
Suyash Compelx kalda Coner Aurangabad
Augangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 20 Nov 2018
Final Order / Judgement

 

 ::: नि का ल प ञ:::

 (मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्‍या) (पारीत दिनांक :- 20/11/2018)

     अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अंतर्गत  गैरअर्जदाराविरूध्‍द प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.

 


१.    गैरअर्जदार क्रमांक एक यांचे चंद्रपूर येथे कार्यालय आहे. गैरअर्जदार क्रमांक एक ते दोन यांची प्रसिद्ध टूर व्यवस्थापन ची कंपनी आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 2 यांच्यावर विश्वास ठेऊन अर्जदार क्रमांक एक व दोन यांनी  व त्यासोबत 40 व्यक्तींनी गैरर्जदार कमांक एक ते दोन यांना पर्यटनसाठी नियुक्त केले त्याप्रमाणे गैरअर्जदार कमांक एक हे अर्जदार क्रमांक एक व दोन यांच्याकडे टूर साठी सर्व दस्तावेज घेण्यासाठी आले आणि त्याप्रमाणे प्रवासा दरम्यान योग्य सुविधा देण्याची हमी दिली. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 1 ते 2 यांनी दिनांक 12 मे  2013 ला युरोप टूर तयार केला. आणि त्याप्रमाणे हैदराबाद ते हैदराबाद हा प्रवास निश्चित झाला आणि युरोप करिता प्रवासातील सर्व चार सदस्य गैरअर्जदार क्रमांक ३  मार्फत गैरअर्जदार  क्रमांक 2 यांनी 42 prepaid सिमकार्ड खरेदी करून सर्व सदस्यांना दिली. तसेच अर्जदार क्रमांक एक व दोन यांना सुद्धा सिमकार्ड देण्यात आले. सदर सिमकार्ड करता अर्जदार यांनी गैरअर्जदार  क्रमांक एक ते तीन यांना प्रत्येकी रुपये ११२६+१००० असे एकूण रु.4,352 चे सिमकार्ड चे अदा केले. प्रवासाचा कालावधी हा दहा दिवसाचा होता पूर्वी सिमकार्ड योग्यपणे काम करीत नव्हते अर्जदार क्रमांक 2 यांनी गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांना सेवेच्या न्‍युनतेबद्दल कळविले. वास्तविक अर्जदार क्रमांक 2 हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि प्रवास दरम्यान त्यांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन करिता ते सिमकार्ड खरेदी केलेले होते. सहल सुरू झाल्यानंतर गैरअर्जदार कमांक 1 ते 3 यांनी सिमकार्ड व्यवस्थित सुरू झाले नाही.गैरअर्जदार  कमांक १ ते 3  यांनी रुपये 1126 प्रत्येक सिमकार्डचे शुल्क आकारले. त्याप्रमाणे गैरअर्जदार  क्रमांक 1 ते 3 यांच्यामार्फत एकूण २३६४६/-  चे एकूण एकवीस सिम कार्ड देण्यात आले. परंतु सीमकार्ड योग्य प्रकारे चालू झाले नाही. त्यामुळे अर्जदार क्रमांक 2 यांनी गैरअर्जदार  कमांक २  यांच्या नागपूर येथील अधिकारी सुशील डोंगरे यांच्याकडे तक्रार नोंदविली त्यां सीम कार्ड द्वारे कोणत्याही प्रकारचा काल न करता पैसे कमी होऊ लागले आणि कॉल यायचा पण नाही व नेटवर्क सुद्धा उपलब्ध नाही अशी तक्रार केली. अर्जदारांकडून  क्रमांक 1 ते 3 यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची योग्य सुविधा पुरवली नाही यावरून गैरअर्जदार कमांक एक ते तीन यांची सेवेत न्यूनता दिसून येते . सबब दिनांक १८.०५.२०१३  रोजी अर्जदार क्रमांक 2 यांनी गैर अर्जदाराला ई-मेल पाठवून झालेल्या त्रासाची निराकरण करण्यास सांगितले होते परंतु ते निराकरण न झाल्यामुळे अर्जदार क्रमाक २ यांच्या व्यवसायातील नियमित ग्राहक आणि कर्मचारी यांच्यासोबत संपर्क न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी अर्जदार यांच्याकडून एकहजार  अतिरिक्त शुल्क आकारले परंतु १०००/-  आकारून सुद्धा सिम कार्ड रिचार्ज केला नाही .त्यानंतर दिनांक २०/५/२०१३  रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांचे व्यवस्थापक श्री सुशील डोंगरे यांना  ई-मेल पाठवून रिचार्ज विचार करण्यास सांगितले परंतु गैरहजर कमांकर एक ते तीन यांनी कोणत्याच प्रकारे अर्जदार क्रमांक 2 यांच्या तक्रारीचे निराकरण केले नाही. गैरअर्जदार  क्रमांक 1 ते 3 यांनी दिलेल्या असुविधेमुळे अर्जदार क्रमांक 2 यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अर्जदार क्रमांक एक व दोन यांना युरोप टूर चा पुरेपूर आनंद घेता आला नाही .त्यामुळे अर्जदार क्रमांक 2 यांचे महत्त्वाचे पक्षकार फाईल परत घेऊन गेले. गैरअर्जदराचा  कृत्यामुळे अर्जदाराची मानसिक परिस्थिती खालावली व त्यांना रक्त दाबाचा ताण  सहन करावा लागला त्यामुळे अर्जदार क्रमांक एक व दोन ची मानसिक परिस्थिती खालावली. सबब  दिनांक २०/८/२०१३  रोजी अर्जदार क्रमांक एक व दोन यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना वकिलामार्फत नोटीस पाठवून झालेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु दिनांक २३.०९.२०१३ रोजी यांनी खोट्या आशयाचे उत्तर पाठवले. तसेच गैरअर्जदार  क्रमांक 3 यांनी अर्जदार क्रमांक 2 यांना ई-मेल पाठवून कबूल केले की त्यांनी पुरवलेल्या सेवेत न्यूनता आहे व सिमकार्ड व रिचार्ज रक्कम परत करण्याचे  कळविले . परंतु गैरअर्जदार ३  यांनी आजपर्यंत रक्कम परत केली नाही. सबब  सदर तक्रार अर्जदार यांनी दाखल केलेली आहे.



2.      अर्जदारांची मागणी अशी आहे की अर्जदार क्रमांक एक व दोन यांनी सिम कार्ड साठी दिलेले रुपये चार हजार ४३५२/- परत देण्याचा आदेश अर्जदार यांच्या बाजूने व्हावा तसेच क्रमांक 1 ते 3 यांनी दिलेल्या न्यूनतापूर्ण सेवेमुळे अर्जदारांचे  व्यवसायाचे नुकसान झाल्यमुळे  झालेल्या आर्थिक नुकसानापोटी रु.1,80,000/- देण्याचा आदेश द्यावा  तसेच गैरअर्जदार 1 ते 3 यांनी दिलेल्या सेवेत न्यूनता अर्जदार क्रमाक १ व २  यांना युरोप प्रवास मध्ये आनंद घेता आला नाही. त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून रुपये १,००.०००/- देण्याचा आदेश गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांच्याविरोधात व्हावा तसेच मानसिक शारीरिक त्रासापोटी रुपये १,००.०००/- अर्जदाराला देण्यात यावे.
3.      अर्जदाराची तक्रार स्वीकृत करून गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना नोटीस काढण्यात आले गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी उपस्थित राहून अर्जदाराच्या तक्रारीतील म्हणणे खोडून काढून पुढे कथन केले की अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक एक व दोन विरुद्ध केलेल्या तक्रारीस कोणतेही कारण घडलेले नसल्यामुळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी. तसेच सदर तक्रार चालवण्याचे अधिकारक्षेत्र या मंचाला  नाही. गैरअर्जदार कंपनीच्या अटी व शर्तीनुसार त्यात लवादाचा क्लोज असल्यामुळे ग्राहक मंचाला सादर तक्रार चालविण्याचा अधिकार नाही.गैरअर्जदार क्र. एक व दोन हे गैर अर्जदार क्रमाक ३ कडून मिळालेल्या सीम करिता  जबाबदार नाही. तसेच सीम रिचार्ज  बद्दल अर्जदार क्रमाक १ व २ ह्यांनी गैर अर्जदार क्रमाक १ २ कडून केलेल्या सेवेच्य करारातील अटी व शर्ती मध्ये कोणताही क्लाज नव्हता. गैरअर्जदार क्रमाक तीनच्या निर्मितीबद्दल गैरअर्जदार  क्रमांक एक व दोन हे जबाबदार नाही. सदर कंपनीही प्रतिष्ठित कंपनी असून अर्जदाराने सही करताना पूर्ण करार वाचूनच  त्यावर स्वाक्षरी केलेली होती. अर्जदाराने गैरहजर कमांक तीन कडून घेतलेल्या सीम च्या सेवेबद्दल सर्वस्वी गैरअर्जदार क्रमाक 3 जबाबदार आहे. गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांनी रुपये ४३५२/- रुपये सीम साठी घेतलेले नाहीत सिमकार्ड रिचार्ज बद्दल गैरअर्जदार  क्रमाक  एक व दोन हे जबाबदार नाहीत. सहली दरम्यान काही असुविधा झाल्यास त्याबद्दल गैरअर्जदार १ व २ जवाबदार राहतील,परतू अर्जदार क्र. १व २ ह्यांनी सहल पूर्ण झाल्यानंतर फीडबॅक मधेही अर्जदारांनी गैरअर्जदाराच्या  असुविधेबद्दल रिमार्क दिलेले नाहीत. हे म्हणणे खोटे आहे की त्यामुळे अर्जदाराचे रुपये १,८०,०००/-  चे नुकसान झालेले आहे,कारण याबाबतचे कोणतेही दस्तऐवज अर्जदाराने दाखल केलेले नाही. तसेच टूर मॅनेजर अर्जदाराला त्याबद्दल  काहीही वाच्यता केली नाही. तसेच अर्जदार कमांक २ ह्यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे  रक्तदाबाचा त्रास झाला त्याबद्दल हि कोणतेही दस्तावेज अर्जदाराने दाखल केले नाही. सबब गैरअर्जदार क्रमांक एक व दोन यांच्यामुळे अर्जदाराला  सिमकार्ड नेटवर्क व रिचार्ज ची सुविधा मिळाली नाही ही बाब चुकीची व खोटी असल्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी.

4. गैरर्जदार क्रमाक ३ ह्यांना मंचातर्फे नोटीस पाठविला असता गैरअर्जदार क्रमाक ३ ह्यांनी नोटीस प्राप्त होऊन सुद्धा मंचात हजर न झाल्यामुळे त्‍यांचे विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश मंचाने दिनांक 8/8/2018      रोजी करण्यात आले

5.   अर्जदाराची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद व गैरअर्जदार क्र. १,व २ यांचे लेखी म्‍हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्‍तीवाद तसेच अर्जदार व गैरर्जदार यांचे तोंडी युक्तिवादावरून तक्रार निकाली कामी खालील मुद्दे कायम करण्‍यात येत आहे.

मुद्दे                                                               निष्‍कर्ष

1. तक्रारकर्ता हे गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचे ग्राहक

   आहेत काय ?                                           होय

2.  गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी तक्रारकर्त्‍यास सेवासुविधा

   पुरविण्‍यात कसूर केल्याची बाब तक्रारकर्ता सिद्ध करतात काय ?    नाही

3.   आदेश काय ?                                                                   अंतीम आदेशानुसार 

कारण मिमांसा

 मुद्दा क्र.1 व 2 बाबत ः-

6.     अर्जदार क्र.1 व 2 हयांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे टूर कंपनीकडून युरोप टूर ठरवला व त्‍याप्रमाणे तो त्‍यांनी पूर्ण केला त्‍याबद्दलचे दस्‍तऐवज अर्जदार हयांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत दाखल केलेले आहेत व ही बाब गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांनादेखील मान्‍य आहे.सबब अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 व 2 चे ग्राहक आहेत. तसेच गैरअर्जदार क्र.3 हयांचेकडून अर्जदार क्र.1 व 2 हयांनी टूर दरम्‍यान व्‍यवसाय व्‍यवस्‍थापनाबद्दल कर्मचारी यांचेशी बोलण्‍याकरीता सीम कार्ड रिचार्जसहीत खरेदी केले ही बाब सुध्‍दा अर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍त क्र.10 वरून सिध्‍द होत असल्‍यामुळे अर्जदार क्र.1 व 2 हे गैरअर्जदार क्र.3 चे ग्राहक आहेत. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   अर्जदार क्र.1 व 2 हयांनी त्‍यांच्‍या तक्रारीत ही बाब नमूद केली आहे की गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांनी ठरविलेल्‍या सहलीदरम्‍यान त्‍याच्‍या कामाच्‍या ठिकाणी संपर्कात राहण्‍यासाठी त्‍यांनी गैरअर्जदार क्र.3 हयांचेकडून सीमकार्ड रीचार्जसहीत खरेदी केले. त्‍यासाठी त्‍यांनी रू.4252/- गैरअर्जदार क्र.1 ते 3 हयांना दिले, परंतु अर्जदार क्र.1 व2 हयांनी अर्जदाराने सीमकार्ड बद्दल रक्‍कम दिल्‍याचे कोणतेही दस्‍तऐवज दाखल केलेले नाहीत. तसेच गैरअर्जदार क्र.1 व2 ने दाखल केलेले उत्‍तर व अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्‍यातील कराराचेअवलोकन केले असता असे दिसून येते की गैरअर्जदार क्र.1 व 2 व अर्जदार हयांच्‍यातील सहलीबाबत झालेल करारात अटी व शर्तींमध्‍ये असे कुठेही नमूद नाही की सहलीला येणा-या लोकांना सीमकार्ड व रिचार्ज सेवासुविधा गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांचेकडून राहील, तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे निरीक्षण केले असता फल्‍कन बिझीनेस कॉम लि.तर्फे सीमकार्डबद्दल पेमेंट झालेले आहे. तसेच अर्जदार क्र.1 व 2 हयांनी त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये असे नमूद केले आहे की, सहल पूर्ण झाल्‍यावर गैरअर्जदार क्र.3 हयांनी अर्जदारास मेल पाठवून सीमकार्ड रिचार्जच्‍या असुविधेबद्दल दिलगीरी व्‍यक्‍त करून रक्‍कम परत करण्‍याबद्दल म्‍हटले परंतु अजूनपर्यंत सदर सीमकार्ड व रिचार्जची रक्‍कम परत केली नाही, त्‍याबद्दलचा दस्‍तऐवज अर्जदारानेच नि.क्र.4 वर दस्‍त क्र.10 वर दाखल केलेला आहे. वरील सर्व बाबींचा विचार केला असता मंचाचे मते अर्जदार क्र.1 व 2 हयांनी फक्‍त सहलीकरिता गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांची सेवा घेतलेली होती व त्‍या सहलीबाबत सदर तक्रारीत गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांनी अर्जदाराला कोणतीही न्‍युनतापूर्ण सेवा दिली नाही ही बाब सिध्‍द होते.

8.      अर्जदार क्र.1 व 2 हयांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांचेमार्फत केलेल्‍या सहलीदरम्‍यान गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून खरेदी केलेल्‍या सीमकार्ड व रिचार्जची सेवा अर्जदार हयांना प्रवासादरम्‍यान घेता आली नाही ही बाब अर्जदार हयांनी तक्रारीत दाखल केलेल्‍या नि.क्र.4 सह दस्‍त क्र.10 वरून स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे वारंवार प्रवासादरम्‍यान तक्रार करूनही गैरअर्जदार क्र.3 हयांनी सेवा  व्‍यवस्‍थीत पुरविली नासल्‍यामुळे अर्जदार क्र.2 हयांना त्‍यांच्‍या कर्मचा-यांशी संपर्क साधता न येऊन व्‍यवसायासंबंधी सुचना देता आल्‍या नाहीत ही बाब जरी बरोबर असली तरी अर्जदार क्र.1 व 2 हयांनी वरील बाबीच्‍या पुष्‍टयर्थ कोणतेही दस्‍तऐवज तक्रारीत दाखल केलेले नाहीत. तसेच गैरअर्जदार क्र.3 च्‍या सेवेत दिलेल्‍या गैरसोयीमुळे अर्जदारास रक्‍तदाबाचा त्रास सहन करावा लागला हयाबद्दलही कोणतेही दस्‍तऐवज तक्रारीत दाखल केलेले नाहीत. परंतु ही बाब सिध्‍द होत आहे की अर्जदार क्र.1 व 2 हयांना गैरअर्जदार क्र.3 चे सीमकार्डची सेवा सहलीदरम्‍यान व्‍यवस्‍थीत पुरवली नाही.

मुद्दा क्र. 3 बाबत :-  

9.   मुद्दा क्र. १ व 2 च्‍या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. 

आदेश

 

 
 

            (1) तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र.13/2015 अंशतः मंजूर करण्‍यात येते.

            (2) गैरअर्जदार क्र.3 हयांनी अर्जदारांस सीमकार्ड साठी दिलेली रक्‍कम

                रू.4352/- परत करावी.

            (3) गैरअर्जदार क्र.3 हयांनी अर्जदार क्र.1 व2 हयांना दिलेल्‍या न्‍युनतापूर्ण

                सेवेमुळे त्‍यांना झालेल्‍या मानसीक व शारिरीक त्रासापोटी रू.5000/- व

                तक्रारीच्‍या खर्चापोटी रू.5000/- गैरअर्जदार क्र.3 हयांनी अर्जदार क्र.1 व 2

                हयांना द्यावे.

            (4) गैरअर्जदार क्र.1 व 2 विरूध्‍द कोणताही आदेश नाही. 

            (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी .

 

                             

(श्रीमती.कल्‍पना जांगडे(कुटे))  (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ))  (श्री. श्री.अतुल डी. आळशी)                     

      सदस्‍या                     सदस्‍या                      अध्‍यक्ष 

                जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.