तक्रार क्रमांक – 494/2009 तक्रार दाखल दिनांक – 30/07/2009 निकालपञ दिनांक – 31/05/2010 कालावधी - 00वर्ष 10 महिने 01दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर सौ. सपना आनंद हजारे रा. तळ मजला, गुरुदेव अपार्टमेंट, टिळक चौक, कासारहाट, कल्याण(प) 421301. .. तक्रारदार विरूध्द मे. क्विकॉन इंटरप्रायझेस, प्रो. श्री.अमित कुलकर्णी रा.तिसरा मजला, विनायक स्मृती, (सांरधर वाडा) ठिळक चौक, कासारहाट कल्याण(प) 421301. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क स्वतः, वि.प स्वतः आदेश (पारित दिः 31/05/2010) मा. सदस्य श्री. पी. एन. शिरसाट, यांचे आदेशानुसार 1. तक्रारदाराने हि तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार कलम 12 अन्वये दाखल केली असुन त्यातील कथन संक्षिप्तपणे खालील प्रमाणेः- तक्रारकर्ती हि गृहिणी असुन ती खाजगी कार्यालयामध्ये अर्ध वेळ नोकरी करीत आहे. तिला 8 वर्षाचा शुभम नावाचा मुलगा असुन त्याला संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणुन विरुध्द पक्षकाराकडुन दि.01/05/2009 रोजी संगणक रु.14,500/- एवढया किमतीस खरेदी केला. संगणक खरेदी केल्यानंतर 15 दिवसाचे आत बंद पडला. दुरुस्त करण्यासाठी खुप विलंब केला. तसेच दिनांक 05/07/2009 रोजी संगणक बंद पडला. तेव्हा विरुध्द पक्षकाराने त्यामधील काही भाग दिनांक 07/07/2009 रोजी घेऊन गेले परंतु दिनांक 27/07/2009 पर्यंत त्यांनी संगणक दुरूस्त करण्यासाठी किंवा जो भाग घेऊन गेले त्याची दुरूस्ती करण्यासाठी कोणतीही सेवा दिली नाही. त्यामुळे दुःखी होऊन तक्रारकर्तीने हि तक्रार दाखल केली व कथन केले की, तक्रार 2 वर्षाचे .. 2 .. सिमाकालावधी मध्ये तक्रार दाखल केली व तक्रारीचे ठिकाण कल्याण येथे घडले असल्यामुळे ते ठिकाण या मंचाचे अधिकार क्षेत्रामध्ये येते त्यामुळे या मंचाला हि तक्रार चालविण्याचा व निर्णयीत करण्याचा पुर्ण अधिकार आहे. तक्रारकर्तीची प्रार्थना खालील प्रमाणेः- 1.विरुध्द पक्षकाराने वस्तुची मुळ किंमत रु.14,500/- परत मिळाली. 2.मानसिक नुकसान भरपाई पोटी रु.10,000/-. 3.तक्रारीचा खर्च रु.3,000/- द्यावा.
2. वरील तक्रारीची मंचाची नोटिस निशाणी 4 वर विरुध्द पक्षकारास मिळाली. त्यांनी निशाणी 5 वर लेखी जबाब दाखल केला तक्रारदाराने निशाणी 6 वर प्रत्युत्तर व निशाणी 7 वर प्रतिज्ञापत्र दाखल केले व निशाणी 8 वर लेखी युक्तीवाद दाखल केले. विरुध्द पक्षकाराने निशाणी 9 वर लेखी युक्तीवाद व निशाणी 10 वर प्रतिज्ञापत्र दाखल केले. विरुध्द पक्षकाराने लेखी जबाब व लेखी युक्तीवादामध्ये खालीलप्रमाणे स्पष्टिकरण दिले. तक्रारकर्ती हि मंचाची दिशाभुल करीत आहे. तक्रारकर्तीने कोणतेही पुरावे दाखल केले नाहीत. तक्रारकर्तीनेच विरुध्द पक्षकाराची दिशाभुल केली आहे. संगणकाची कोणतीही वारंटी अथवा गॅरंटी दिली नाही. तांत्रिक दृष्टया नविन आणि जुना संगणक यामध्ये कोणताही फरक नसतो. तक्रारकर्तीनेच जुना किंवा वापरलेला संगणक तो तक्रारकर्तीचे खर्चाच्या आवाक्यात आहे असा संगणक द्यावा. तक्रारकर्तीने थोडया थोडया हप्त्यांने विरुध्द पक्षकाराचे पैसे परत केले. मानुसकीच्या खातीर तक्रारकर्तीला जास्त रक्कम लावली नाही. तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार नामधारी रक्कम रु.100/- लावुन सॉफ्टवेअर जोडुन दिले. नकली सॉफ्टवेअर जोडले नाही. त्यामुळे तक्रार रद्द ठरवावी व त्यासाठी विरुध्द पक्षकारास रु.14,000/- रक्कम द्यावी. तक्रारकर्तीने तिच्या प्रत्युत्तरामध्ये विरुध्द पक्षकाराचे सर्व आरोप खोडुन टाकले.
3. वरील तक्रारीसंबंधी उभय पक्षकारांनी सादर केलेली कागदपत्रे, प्रत्युत्तर, प्रतिज्ञापत्रे, लेखी जबाब, लेखी युक्तीवाद यांचे सुक्ष्मरितीने पडताळणी व अवलोकन केले असता न्यायिक प्रक्रियेसाठी एकमेव मुद्दा उपस्थित होतो तो येणेप्रमाणेः- अ)तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे विरुध्द पक्षकाराने सेवेमध्ये त्रृटी,
.. 3 .. न्युनता बेजबाबदारपणा तथा हलगर्जीपणा केला हे तक्रारदार सिध्द करु शकले काय? उत्तर – होय. कारण मिमांसा अ)स्पष्टिकरणाचा मुद्दाः- तक्रारीसोबत तक्रारकर्तीने दिनांक 01/05/2009 चे TAX INVOICE पावती क्रमांक 30 वर दाखल केले त्यामध्ये रक्कम रु.5,500/- एवढी लिहीली असा स्पष्ट उल्लेख आहे. Resale – IInd hard spares. No Warranty दुसरे Tax invoice दिनांक 01/05/2009 पावती क्र.32 मध्ये खालीलप्रमाणे स्पष्ट उल्लेख केला आहे. Quantity Description Unit price Amount 1 40 GB Hard Disk 1200 1200.00 (1 yr warranty) 1 16TFT Multimedia LCD 5254 5254.00 (Intex – 3 yr warranty) 1 600 VA UPS–MICROTEK 1900 1900.00 (2 yrs warranty on circuit and 1 yr on Battery) 1 2 GB Pen Drive(kingston) Warranty by respective Co., 300 300.00 8,654.00 Add 4% VAT 346.00 9,000.00 Terms: No warranty on physical damage/Burnt. वरील TAX INVOICE नुसार विरुध्द पक्षकाराने स्वतःचे हस्ताक्षरात 1 वर्ष, 2 वर्ष व 3 वर्षाची Warranty लिहून दिली आहे. त्यामुळे जरी ते TAX INVOICE No.30 च्या पावतीप्रमाणे रु.5,500/- तक्रारकर्तीस देणे लागत नाहीत कारण "त्यावर स्पष्टपणे RESALE – IInd hard spares Term – No warranty असा उल्लेख आहे." परंतु TAX INVOICE No.32 च्या पावती नुसार रु.9,000/- 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष WARRANTY असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे विरुध्द पक्षकार रु.9,000/-तक्रारकर्तीस देण्यास जबाबदार ठरतात. तसेच विरुध्द पक्षकार त्याचे लेखी युक्तीवादातील कथनानुसार परिच्छेद नं. 5 नुसार तक्रारकर्तीस संगणकाची काही रक्कम व नुकसान भरपाई देण्यास जबाबदार ठरतात. Para 5 of written argument Quote: All the terms and conditions about the payment and warranty were agreed verbally by the Complainant. The detail of each part with their respective warranty .. 4 .. was verbally told to the Complainant prior to confirmation of the order. सबब या तक्रारीसंबंधी हे मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे अंतीम आदेश 1.तक्रार क्र. 494/2009 हि अंतशः मंजुर करण्यात येत आहे. 2.विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्तीस रु. 9,000/- (रु. नौ हजार फक्त) रक्कम द्यावी व जुना संगणक घेऊन जावा. 3.विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्तीस रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) मानसिक नुकसान भरपाई द्यावी. 4.विरुध्द पक्षकाराने तक्रारकर्तीस रु.500/- (रु.पाचशे फक्त) न्यायिक खर्च द्यावी. 5.वरील आदेशाची तामिली सहि शिक्कयाची प्रत मिळाल्या तारखेपसुन 30 दिवसाचे आत परस्पर करावी. 6.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
7.तक्रारकर्तीयांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही.
दिनांक – 31/05/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट )(सौ.शशिकला श.पाटील ) सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे |