Maharashtra

Pune

PDF/323/2009

Catherina Peter - Complainant(s)

Versus

Ameer Waikar - Opp.Party(s)

30 Dec 2011

ORDER

 
Complaint Case No. PDF/323/2009
 
1. Catherina Peter
Gurunanak Nagar, Pune
...........Complainant(s)
Versus
1. Ameer Waikar
Shukrawar Peth, Pune
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा-श्री. एस.के.कापसे, मा. सदस्‍य
                            :- निकालपत्र :-
                      दिनांक 30 डिसेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे-
1.                     तक्रारदारांनी जाबदेणार श्री. अमीर वाईकर यांच्‍याकडे रुपये 10,750/- दिनांक 6/6/2007 रोजी रक्‍कम वाढविण्‍यासाठी दिले होते. श्री. वाईकर यांनी आवश्‍यक पुर्तता केली जाईल असे आश्‍वासन दिले होते. तक्रारदार दोन महिन्‍यांनंतर खाते तपासण्‍यासाठी गेले असता श्री. अमीर यांनी रुपये 1600/- चा डेबिट बॅलेन्‍स निर्माण केल्‍याचे तक्रारदारांना कळले तसेच श्री. अमीर यांची बदली झाल्‍याचेदेखील कळले. सदरहू रुपये 1600/- चा डेबिट बॅलेन्‍स ऑन लाईन न भरल्‍यास तक्रारदारांना रुपये 450/- दंड पडणार होता. रुपये 1600/- चा डेबिट बॅलेन्‍स क्लिअर करण्‍यासाठी श्री. अमीर यांनी तक्रारदारांना न सांगताच, तक्रारदारांची परवानगी न घेताच, त्रिवेणी इंजिनिअरींगचे 30 शेअर्स विकले. श्री. सुधाकर राव, एरिया मॅनेजर यांच्‍याकडे तक्रार केली असता त्‍यांनी तक्रारदारांचा अपमान करुन जर डेबिट बॅलेन्‍स पोटी रुपये 1600/- भरले तरच त्रिवेणी इंजिनिअरींगचे 30 शेअर्स रिप्‍लेस केले जातील असे सांगितले. म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून रुपये 10,750/-, रुपये 1600/-, कुरिअर खर्च रुपये 200/- मागतात तसेच इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2.                जाबदेणारांतर्फे श्री.व्‍ही.व्‍ही.एस.शिवप्रकाश यांनी शपथपत्राद्वारे लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी इक्विटी शेअर्स मध्‍ये गुंतवणूक करण्‍यासाठी जाबदेणार यांच्‍याकडे डिमॅट व ट्रेडिंग खाते उघडले होते. तक्रारदारांनी रुपये 10,750/- रक्‍कम वाढविण्‍यासाठी म्‍हणून दिलेले नव्‍हते तर तक्रारदारांच्‍या सांगण्‍यावरुन स्‍टॉक ब्रोकिंगसाठी दिलेले होते. शेअर मार्केट मध्‍ये फक्‍त नफाच होईल अशा प्रकारचे आश्‍वासन जाबदेणार यांच्‍या कोणत्‍याही प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दिलेले नव्‍हते. जाबदेणार स्‍वत:हून शेअर्स विकण्‍याची अथवा विकत घेण्‍याची कुठलीही ऑर्डर देत नाहीत, फक्‍त क्‍लायंटच्‍या सांगण्‍यावरुनच व्‍यवहार केले जातात. तक्रारदार जूलै 2009 पासून जाबदेणार यांच्‍याबरोबर ट्रेडिंग करीत आहेत. पुर्वी कधीही तक्रारदारांनी तक्रार केलेली नव्‍हती. तक्रारदारांनी खाते उघडतांना जो अर्ज भरला होता त्‍यावरील अटी व शर्ती मान्‍य केल्‍या होत्‍या, त्‍यावर सही केली होती. सदरहू अटी व शर्तीनुसारच तक्रारदारांनी वेळेत पेमेंट न केल्‍यामुळे दंड आकारण्‍यात आलेला होता. तक्रारदारांना वेळोवेळी फायनान्‍शीअल स्‍टेटमेंट पाठविण्‍यात येत होते, जर त्‍यात काही त्रुटी/तफावत आढळली तर ती NSE यांच्‍या मार्गदर्शक सुचनांनुसार 30 दिवसांच्‍या आत जाबदेणार यांच्‍या निदर्शनास आणणे आवश्‍यक होते. तक्रारदारांनीच रक्‍कम भरण्‍यासाठी अॅव्‍हेलेबल नसल्‍यामुळे, डेबिट बॅलेन्‍स पर्यन्‍तचे होल्‍डींग्‍ज विकण्‍यास सांगितले होते व नंतर परत आल्‍यावर त्रिवेणी इंजिनिअरींगचे 30 शेअर्स तक्रारदारांना विकत घ्‍यायचे होते. प्रस्‍तूत तक्रार चालविण्‍याचा मा. मंचास अधिकार नाही. जाबदेणार यांच्‍यावर NSE गाईडलाईन्‍स बंधनकारक असल्‍यामुळे सदरहू तक्रार NSE यांच्‍यासमोरच चालू शकते. सबब प्रस्‍तूत तक्रार नामंजुर करण्‍यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
3.                उभय पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचानी पाहणी केली.  जाबदेणार यांनी तक्रारदारांना रक्‍कम वाढवून मिळेल, शेअर्सच्‍या व्‍यवहारात फक्‍त फायदाच होईल अशा प्रकारचे कुठलेही लेखी आश्‍वासन दिले होते या संदर्भातील पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. तसेच जर तक्रारदारांना व्‍यवहारांमध्‍ये काही तफावत/त्रुटी आढळली होती तर ती त्‍यांनी जाबदेणार यांच्‍या निदर्शनास 30 दिवसांच्‍या आत आणून देणे आवश्‍यक होते, तक्रारदारांनी तसे केल्‍याचे दिसून येत नाही. तक्रारदारांनी केवळ नफा होण्‍याच्‍या हेतूनेच, फक्‍त शेअर्स मधील व्‍यवहारांसाठीच जाबदेणार यांच्‍याकडे रक्‍कम जमा केलेली होती, त्‍यामुळे सदरहू व्‍यवहार हा कमर्शिअल हेतूनेच, नफा मिळविण्‍याच्‍या हेतूनेच केल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार जाबदेणार यांचे ग्राहक नाहीत. तसेच तक्रारदारांनी जाबदेणार यांनी दिलेली कॉन्‍ट्रॅक्‍ट नोट ट्रेड दिनांक 29/6/2007 दाखल केलेली आहे. सदरहू नोट खाली “This contract constitutes and shall be deemed to constitute as provided overleaf an agreement between you and me/us, and in the event of any claim (whether admitted or not), difference or disputes in respect of any dealings, and contracts of a date prior or subsequent to the date of this contract (including any questions whether such dealings, transactions or contracts have been entered into or not) shall be referred to arbitration as provided in the Rules, Bye-Laws and Regulations of the National Stock Exchange of India Ltd.” तसेच “The provisions printed overleaf form a part of contract” असेही नमूद करण्‍यात आलेले आहे. उभय पक्षकारात झालेला करार हा दोघांवरही बंधनकारक असतो. जाबदेणार यांच्‍यावर National Stock Exchange of India Ltd यांचे बंधन असते, त्‍यामुळे प्रस्‍तूत तक्रार या मंचासमोर चालू शकत नाही असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. 
                  वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे-
          - आदेश :-
1.     तक्रार नामंजुर करण्‍यात येत आहे.
2.    खर्चाबद्यल आदेश नाही.
           आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.