ग्राहक तक्रार क्र. 01/2013
अर्ज दाखल तारीख : 03/01/2013
अर्ज निकाल तारीख: 27/04/2015
कालावधी: 02 वर्षे 03 महिने 25 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. राजेंद्र पांडुरंग फुरडे,
वय-47 वर्षे, धंदा – शेती व व्यापार,
रा.कंदलगांव, ता.बार्शी, जि.सोलापूर. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. अमरजित ऊर्फ अमर मुरलीधर हंबीरे,
प्रो, प्रा, हंबीरे मोटर्स अॅथोरॉईज्ड डिलर,
वय – 46 वर्षे , धंदा व्यापार,
रा. मॉडर्न बेकरीजवळ, समता कॉलनी,
उस्मानाबाद, ता.जि. उस्मानाबाद.
2. मा. व्यवस्थापक, ( क्रिटानु मलिक )
हिंदूस्थान मोटर्स लि.,
सर्व्हिस डिपार्टमेंन्ट, पी.ओ. हिंद मोटार,
जि. हुगली (पश्चिम बंगाल). ....विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्य.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.पी.पी.घोगरे
विरुध्द पक्षकार क्र.1 तर्फे विधीज्ञ : एकतर्फा.
विरुध्द पक्षकार क्र.2 तर्फे विधीज्ञ : श्री.सी.ए.महामूनी.
न्यायनिर्णय
मा. सदस्य श्री.मुकुंद बी.सस्ते, यांचे व्दारा :
अ) 1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदारास विप ने विक्री केलेली गाडीचे अकार्यक्षम इंजन बदलून मिळणेबाबत व पर्यायाने नुकसान भरपाई मिळणेबाबत सदरचा तक्रारी अर्ज केला आहे. तक्रारदार हे मु. पो ता. बार्शी जी. सोलापुर येथील मुळ रहीवाशी असून विप हे हिन्दूस्तान मोटर्स लिमीटेड चे उस्मानाबाद व परीसराचे अधिकृत विक्रेते आहेत. तसेच विप क्र.2 हे हिन्दूस्तान मोटर्सचे व्यवस्थापक असून ते या कंपनीचे गाडीचे उत्पादन करतात. दि.13/02/2012 रोजी विप कडे तक्रारदाराने मालवाहतूक गाडीची चौकशी केली. विप ने दिलेल्या हमी नुसार इंन्हाईस 5 अन्वये 404241 पैकी विप क्र.1 यांच्याकडे पावती क्र.44 अन्वये रु.1,11,305/- रोख भरुन एच.डी.एफ.सी. या वित्तीय संस्थेकडून संपुर्ण रक्कम जमा केली व वास्तवीक इन्हाईस बिलानुसार रु.4,04,241/- असतांना विप ने रु.4,20,000/- घेतले व विमा व अधिकच्या टॅक्सचे विवरण दिलेले नाही.
2) विप क्र.1 कडून गाडी घेतल्यापासून तक यांना गाडीबाबत वेगवेगळया समस्या जाणवू लागल्या जसे की गाडीने पिकअप न घेणे, गाडी गरम होऊन बंद पडणे, गाडीमध्ये थोडेही ओझे वाहून नेण्याची क्षमता नसणे, एवढेच नाही तर गाडी रिकामी देखील न चालणे, कंपनीचे प्रती लिटर 18 कि.मी. अॅव्हरेज असतांना केवळ 10 कि.मी. अॅव्हरेज मिळणे असे येऊ लागले व सदर तक्रारीचे निवारण विप क्र.1 यांना फोनव्दारे व प्रत्यक्ष भेटून सांगितले असता वेगवेगळी सबब सांगून विप ने सेवा दिलेली नाही.
3) तक्रारदाराने पुढे अशी तक्रार केलेली आहे की सदर वाहन ही त्याचे उदरनिर्वाहाच्या उद्देशाने असल्यामुळे त्याला आर्थीक नुकसान व वैयक्तिक स्वरुपात मोठी अडचण निर्माण झाली आहे विप क्र.1 ने एक वर्षाची वारंटी व गॅरंटी दिलेली असतांना देखील सदर गाडी दुरुस्त वा बदलून दिलेली नसल्याने नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे. अशा पध्दतीने तक्रारदाराने विप कडून एकूण रक्कम प्रतीमहा रु.30,000/- याप्रमाणे रु.3,30,000/- दि.13/02/2012 पासून ते तक्रार दाखल करे पर्यंत रु.3,30,000/- व मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- मागणी केली आहे.
ब) 1) यावर मंचामार्फेत विप क्र.1 व 2 यांना सदर प्रकरणात नोटिसा काढण्यात आल्या. विप क्र.1 दि.05/01/2013 ला नोटिस काढली असता दि.14/03/2013 रोजी विधिज्ञ हजर झाले. विप क्र.1 विरुध्द दि.01/10/2013 रोजी विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. विप क्र.1 बाबत दि.07/08/2014 चा स्वतंत्र आदेशानुसार एकतर्फा आदेश रद्द होऊन रु.500/- लिगल ऐडमध्ये भरल्यास एकतर्फा आदेश रद्द असा आदेश करण्यात आले व पुढील कारवाई म्हणून विप क्र.1 ने म्हणणे दाखल केले व युक्तिवाद दाखल केला तो कॉस्ट न भरल्यामुळे वाचण्यात व नोंदवण्यात आला नाही.
क) मंचामार्फत विप क्र.2 यांना नोटिस काढण्यात आली असता त्यांनी दि.06/06/2013 मंचात उपस्थित राहून आपले म्हणणे दाखल केले ते पुढीलप्रमाणे.
1. याबाबत विप क्र.2 चे म्हणणे पाहीले असता त्यात त्यांनी विप क्र.2 हे उत्पादक असून त्यांनी कोणत्याही स्वरुपाचे दोषपूर्ण उत्पादन पूरवलेले नाही. त्याचे म्हणण्यानुसार त्यांनी उत्पादनाची उच्च गुणवत्ता तपासूनच सदरचे उत्पादन हे डिलरकडे पाठविले त्यामुळे त्याच्या हद्दी पूरता तो तक्रारीस जबाबदार नाही असे म्हणणे दिले आहे. या संदर्भात त्यांनी मा. वरीष्ठ न्यायालयाचे काही न्यायनिर्णयाचे दाखले दिलेले आहे त्यामध्ये उत्पादनातील दोष सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदाराची असल्याचे मा. वरीष्ठ न्यायालयाचे न्याय निवाडा 1993 CPJ 72 NC, II 2005 CPJ 72 NC, II 2008 CPJ 111 NC चा संदर्भ देऊन सांगितले आहे त्यानुसार तक्रारदाराने त्याची तक्रार सिध्द करण्यासाठी कोणतेही उचीत पुरावे दिलेले नाही. याचे सोबत विप क्र.1 हे त्याचे डिलर आहे व डिलर हे विप क्र. 2 चे एजंट नाही त्यांच्या दोघांमधील करार हा प्रिंन्सीपल टू प्रिंन्सीपल असा आहे. तसेच उत्पादनातील दोष हा विहित पध्दतीने तज्ञ प्रशेगशाळेमार्फत अथवा तज्ञांमार्फत सिध्द होणे गरजेच आहे. म्हणून सदरची तक्रार नामंजूर करण्यात यावी असे नमूद केले आहे.
ड) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये निष्कर्ष
1) तक्रारदार विप चा ग्राहक आहे काय ? होय.
2) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? विप क्र.1 च्या हद्दी पुरता
होय विप क्र.2 च्या हद्दी
पुरता अंशत: होय.
3) तक्रारदार नुकसान भरपाई रक्कम
मिळण्यास पात्र आहे काय. अंशत: होय.
4) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
इ) कारणमिमांसा
1. तक्रारदाराने तक्रार केल्या नंतर विपला नोटिस बजावण्यात आली तथापि दि.01/10/2013 रोजी पर्यंत विप क्र.1 ने कोणतेही म्हणणे दाखल न नाही. नोटिसेस पोहचून देखील आपले मंचात ते न आल्यामुळे विप क्र.1 विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. दि.08/04/2013 रोजी विप क्र.2 ने मुदतीसाठी अर्ज देऊन अंतिमत: दि.06/06/2013 रोजी से दाखल केला. दि.07/08/2014 रोजी 500 च्या कॉस्टसह विप क्र.1 विरुध्द एकतर्फा आदेश रद्द करण्याचे आदेश झाले. तथापि कॉस्ट न भरल्यामुळे विप क्र.1 च्या हद्दी पर्यत युक्तिवाद रिड अॅण्ड रेकॉर्ड करण्यात आला नाही. अंतिमत: दि.12/09/2014 रोजी अंशत: युक्तिवाद ऐकला व तक्रारदार व विप ने पुढील युक्तिवादाची संधी देऊनही युक्तिवाद न केल्यामुळे प्रकरण निकाली काढण्यात आले.
2. सदरचे प्रकरण हे गुणवत्तेवर निकाली काढ्याच्या अनुषंगाने तक्रारदाराच्या तक्रारीचा अभ्यास केला असता त्याला विप क्र.1 व 2 ने दिलेली दोषपूर्ण सेवेसंदर्भात असून त्यामध्ये त्याची मुख्य तक्रार ही गाडीच्या क्षमतेबाबत व अॅव्हरेजबाबत तसेच त्याला मिळालेल्या अपू-या कागदपत्राबाबत व त्यांच्याकडून घेतलेल्या जास्तीच्या रक्कमेबाबत आहे.
मुद्दा क्र. 1 :
तक्रारदार हे विप क्र. 1 व 2 चे ग्राहक होता काय याचे उत्तर देतांना तक्रारदार हा विप क्र.1 व 2 चा ग्राहक होता असे देत आहे याचे कारण तक्रारदाराने विप क्र.1 मार्फत विप क्र. 2 ने उत्पादित केलेले वाहन खरेदी केलेले आहे. त्यामुळे तसेच विप क्र.1 हा विप क्र.2 ची वॉरंटी स्वत: मार्फत ग्राहकाला देत असल्यामुळे ग्राहकास होणारे नुकसानी करीता विप क्र.1 व 2 हे संयुक्तपणे जबाबदार असू शकतात व असतात.
मुद्दा क्र. 2
3. विप क्र.1 च्या हद्दी पुरता होय विप क्र.2 च्या हद्दी पुरता अंशत: होय. तक्रारदाराने त्याच्या वाहनातील दोषा संदर्भात विप क्र.1 कडे तक्रार केल्या नंतर तसेच त्याचे कागदपत्रा संदर्भात माहिती घेण्याकरीता त्याला समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही त्याच सोबत तक्रारदाराची तक्रार निराकरण करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा जसे की वर्क शॉप, यांत्रिकी कर्मचारी हे विप क्र.1 कडे नाहीत हे नाहीत हे तक्रारदाराचे म्हणणे विप क्र.1 किंवा 2 खोडून काढू शकला नाही त्यामुळे ते मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. तथापि उत्पादनातील दोष तक्रारदार संपूर्ण प्रमाणात सिध्द करु शकत नाही. या उलट विप क्र. 2 ने ऊत्पादनातील दोषा संदर्भात अत्यंत संयुक्तीकपणे खुलासा सादर केलेला आहे. त्यामुळे उत्पादनातील दोष याबाबत आमचे उत्तर नकारार्थी असून फक्त त्याला विक्री पश्चात विप क्र. 1 ने सेवा देण्यात त्रुटी केली व त्याने अर्जदाराकडून इन्हाईस रु.4,04,241/- ऐवजी रु.4,20,000/- घेऊन अतिरिक्त टॅक्स व विम्याचे पैसे घेऊन तसेच सेवा देण्यात त्रुटी केली आहे त्यामुळे मुद्दा क्र.1 ते 3 चे उत्तर होकारार्थी देऊन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करतो.
आदेश
तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
1) विप क्र.2 ने तक्रारदाराकडून घेतलेले अतिरीक्त रु.15,759/- (रुपये पंधरा हजार सातशे एकोणसाठ फक्त) द.सा.द.शे. 9 दराने दयावे.
2) विप क्र.2 ने तक यास झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) दयावे.
3) विप क्र.1 व 2 यांनी तक यास तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) दयावे.
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
5) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा, सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.