Maharashtra

Nagpur

CC/344/2017

SHRI. MANSARAM DODKUJI SHENDE - Complainant(s)

Versus

Amar- Asha Co-Op, Housing Society Ltd., Through President, Kamlakar Dagoji Borkar - Opp.Party(s)

Adv. Anuradha Deshpande

20 Mar 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/344/2017
( Date of Filing : 14 Aug 2017 )
 
1. SHRI. MANSARAM DODKUJI SHENDE
R/O. PLOT NO. 191, SATYASAI SOCIETY, DATTAWADI, NAGPUR
...........Complainant(s)
Versus
1. Amar- Asha Co-Op, Housing Society Ltd., Through President, Kamlakar Dagoji Borkar
Madhur Milan, plot no. 7, Near Chhota Tajbag, Raghuji Nagar, Nagpur-24.
Nagpur
Maharashtra
2. Amar- Asha Co-Op, Housing Society Ltd., Through President, Shalik Bapurao Meshram
Madhur Milan, plot no. 7, Near Chhota Tajbag, Raghuji Nagar, Nagpur-24.
Nagpur
Maharashtra
3. Amar- Asha Co-Op, Housing Society Ltd., Through secretary, Smt. Chhaya Harihar Bhivgade
Madhur Milan, plot no. 7, Near Chhota Tajbag, Raghuji Nagar, Nagpur-24.
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 
For the Complainant:Adv. Anuradha Deshpande , Advocate
For the Opp. Party:
Dated : 20 Mar 2019
Final Order / Judgement

आदेश

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये  -

  1.       तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की,  विरुध्‍द पक्ष ही महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था कायदा 1960 प्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्‍था म्‍हणून पंजीबध्‍द आहे आणि सदरहू संस्‍थेचा नोंदणी क्रमांक NGP/ASG/1231/1984  असा आहे. सदरहू संस्‍था भूखंड विकत घेऊन त्‍यावर  ले आऊट पाडून प्‍लॉट विकण्‍याचा व्‍यवसाय करते. तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून प्‍लॉट क्रं. 154/8 एकूण क्षेत्रफळ 1200 चौ.फु़., मौजा- दाभा, प.ह.नं. 7, खसरा क्रं. 165/166 हा रक्‍कम रुपये 900/- मध्‍ये खरेदी करण्‍याचे निश्चित केले आणि विरुध्‍द पक्ष क्रं. 1 यांनी दिनांक 19.03.1987 रोजी सदरहू भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले आणि ते सह. दुय्यम निबंधक, नागपूर शहर 1 यांच्‍या  कार्यालयात अ.क्रं. 1284 वर नोंदलेले आहे आणि सदरहू विक्रीपत्रा बरोबर ले आऊटचा नकाशा जोडलेला आहे. या विक्रीपत्रानंतर तक्रारकर्त्‍याला  भूखंडाचा ताबा पत्र देण्‍यात आला नाही. तक्रारकर्त्‍याने सदरहू भूखंड नियमित करुन ताबा देण्‍याची  विनंती वारंवांर विरुध्‍द पक्षाकडे केली. परंतु त्‍यांनी सदरहू मागणी पूर्ण केली नाही. तक्रारकर्त्‍याने चौकशी केल्‍यानंतर असे समजले की, सदरहू भूखंड हा विनायक रामशरणदास अग्रवाल व इतर यांच्‍या मालकिचा आहे आणि विरुध्‍द  पक्षाचे नांव रेकॉर्डवर नसल्‍याचे समजले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना दिनांक 18.12.2014 रोजी नोटीस पाठविली आणि त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याची मागणी पूर्ण केली नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने वर्तमान प्रकरण मंचासमक्ष दाखल केलेले आहे. तक्रारकर्त्‍याने असे नमूद केले की, तक्रारीचे कारण सतत घडत आहे आणि त्‍याला रुपये 2,00,000/- नुकसान भरपाई व खर्च देण्‍यात यावा . तसेच विरुध्‍द पक्ष यांनी सदरहू भूखंडावर तक्रारकर्त्‍याचे  नामांतरण करुन देण्‍यासाठी सहकार्य करावे अथवा विरुध्‍द पक्ष स्‍वतःचा मालकी हक्‍क सिध्‍द करण्‍यास असमर्थ असेल तर त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला प्‍लॉटची किंमत आजच्‍या बाजारभावाने द्यावी आणि त्‍यावर 24 टक्‍के  व्‍याज द्यावे अशी विनंती केली.
  2.        विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ते मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍यात आले.  
  3.        तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद व त्‍यांचा  तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविला.

         मुद्दे                                      निष्‍कर्ष  

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?             होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय    अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला काय?       होय
  3. काय आदेश                                      अंतिम आदेशाप्रमाणे

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 2 बाबत –  तक्रारकर्त्‍याने सदरहू प्‍लॉट बाबतचे विक्रीपत्र दाखल केलेले आहे आणि ते सह. दुय्यम निबंधक नागपूर शहर 1 यांच्‍याकडे अ.क्रं. 1284 या क्रमांकावर नोंदलेले आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना दि.18.12.2014 ला नोटीस सुध्‍दा पाठविली होती परंतु विरुध्‍द पक्ष यांनी सदरहू नोटीस प्रमाणे पूर्तता केली नाही. तक्रारकर्त्‍याच्‍या कथनाप्रमाणेच विरुध्‍द पक्षांनी सदरहू मिळकतीच्‍या मालकीबाबत काही कागदपत्रे दाखल न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या नावांने नामांतरण झालेले नाही आणि भूखंडाचा ताबा ही दिलेला नाही. सबब अशा प्रकारे विक्रीपत्र करुन देऊन विरुध्‍द पक्ष यांनी अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे आणि सर्व बाबींची पूर्तता न केल्‍यामुळे आपल्‍या सेवेत त्रुटी केलेली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.
  2.        विरुध्‍द पक्ष हा सदरहू प्‍लॉटचा मालक असल्‍याबाबतचा कोणताही पुरावा अभिलेखावर नसल्‍यामुळे सदरहू भूखंडाची शासकीय दराने येणारी किंमत तक्रारकर्त्‍याला  देणे वाजवी आहे असे आमचे मत आहे. तक्रारकर्त्‍याला शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- देणे योग्‍य आहे असे आमचे मत आहे.

        सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येते.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची  तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात  येते.
  2. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला 1200 चौ.फु़.एवढया आकाराच्‍या अकृषक भूखंडाची शासकीय दराने आदेशाच्‍या दिनांकाच्‍या दिवशी मौजा- दाभा, खसरा क्रं. 165/166, या भागासाठी येणारी किंमत द्यावी आणि सदरहू रक्‍कमेवर आदेश पारित तारखेपासून द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने रक्‍कमेच्‍या प्रत्‍यक्ष अदाएगीपर्यंत व्‍याज द्यावे.
  3. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला  शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावेत.
  4. विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी या आदेशाचे पालन केल्‍यानंतर उभय पक्षांनी सह. दुय्यम निबंधक, नागपूर शहर यांच्‍या सक्षम कार्यालयात जाऊन अ.क्रं. 1284 वर दिनांक 19.03.1987 रोजी नोंदविलेले विक्रीपत्र रद्द करण्‍यासाठी उभय पक्षांनी कार्यवाही करावी आणि त्‍याचा खर्च विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी सहन करावा.
  5. वरील आदेशाची पूर्तता विरुध्‍द पक्ष क्रं. 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या आदेशाची प्रत मिळाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.
  6. उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  7. तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्‍याला परत करावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.