Rajendra Narayan Pawar filed a consumer case on 29 Sep 2010 against Altra Motor India Pvt. Ltd., in the Aurangabad Consumer Court. The case no is CC/10/175 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Maharashtra
Aurangabad
CC/10/175
Rajendra Narayan Pawar - Complainant(s)
Versus
Altra Motor India Pvt. Ltd., - Opp.Party(s)
Adv. Sachin Sarda
29 Sep 2010
ORDER
DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM AURANGABAD - 431001 2nd FLOOR , COLLECTOR OFFICE BUILDING , AURANGABAD - 431001
1. Altra Motor India Pvt. Ltd., F-89/5, Phase 1, Okhala Inudstrial Estate, New Delhi-20. New Delhi.Maharastra2. Mr. K.K. Bhan, M.D. & Legal Head, Altra Motor Pvt. Ltd.,F-89/5, Phase 1, Okhala Inudstrial Estate, New Delhi-20New Delhi.Maharastra3. Mr. Pritpal Baweja, Service Executive(PHC), Altra Motor India Pvt. Ltd., F-89/5, Phase 1, Okhala Inudstrial Estate, New Delhi-20.New Delhi.Maharastra4. Next Furniture Solution, Zero Emision Motor, D-1/2, Samyak Arcade, Cannought Place, Cidco, Town Centre, Aurangabad.AurangabadMaharastra5. THE DY.EXECUTIVE ENGINEER M.S.E.B. [SHRI NALBALWAR]NEAR DOODH DAIRY,JALNA ROAD,AURANGABADAURANGABADMAHARASHTRA
...........Respondent(s)
BEFORE:
Smt. Anjali L. Deshmukh ,PRESIDENT Smt.Rekha Kapadiya ,MEMBER
PRESENT :
Dated : 29 Sep 2010
JUDGEMENT
द्वारा घोषित - श्रीमती रेखा कापडिया, सदस्य --
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्याकडून बॅटरीवर चालणारे दुचाकी वाहन खरेदी केले. या वाहनात दोष असल्यामुळे गैरअर्जदार यांच्याकडे केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गेरअर्जदार यांच्याकतर्फे देण्यात आलेली जाहिरात पाहून बॅटरीवर चालणारे दुचाकी वाहन खरेदी केले. या वाहनाचे उत्पादक गैरअर्जदार क्रमांक 1 असून गेरअर्जदार क्रमांक 4 हे स्थानिक वितरक आहेत. सदरील वाहनाची एकूण किंमत 34086/- रुपये आहे. हे वाहन खरेदी केल्यानंतर पाच ते सहा महिन्यानंतर त्यात बॅटरी व शॉकऑब्झरमध्ये दोष निर्माण झाला. याबाबत त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 4 यांच्याकडे वाहन दुरुस्तीसाठी आणले असता त्यांनी डिलरशिप परत केल्याचे सांगून गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या बरोबर संपर्क साधण्यास सांगितले. अर्जदाराने अनेक वेळेस गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. बॅटरीवर चालणारे हे वाहन असल्यामुळे अन्य ठिकाणी दुरुस्तीसाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दिनांक 5/1/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 व 3 यांना वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठविली. गैरअर्जदार यांनी त्याची दखन न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून वाहनाची रक्कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी त्यांच्या वितरकामार्फत (गैरअर्जदार क्र 4 ) अर्जदारास बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक स्कूटर विकल्याचे मान्य केले आहे. त्यांनी वितरक व विक्रीपश्चात सेवा देण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 4 यांची नियुक्ती केली पण गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी अर्जदारास योग्य सेवा दिली नसल्याचे सांगून याबबात त्यांना जवाबदार धरता येत नसल्याचे म्हटले आहे. अर्जदारास देण्यात आलेल्या वाहनाच्या बॅटरीची वॉरंटी 6 महिन्याची होती. अर्जदाराने जानेवारी 2010 मध्ये नोटीसद्वारे बॅटरी व वाहन नादुरुस्त असल्याचे कळविले आहे. अर्जदाराने बॅटरीबाबत केलेली तक्रार ही वॉरंटी पूर्ण झाल्यानंतर केली असून गैरअर्जदार क्रमांक 4 हेच अर्जदारास वाहन दुरुस्ती सेवा देणारे आहेत. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 4 हेच जवाबदार असून त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्याची मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांची पोच पावती मंचास प्राप्त होऊनही ते हजर राहिले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी अर्जदारास इलेक्ट्रीक स्कूटर विकल्याचे मान्य केले आहे. वाहन नादुरुस्त झाल्यानंतर त्यांनी विक्री पश्चात सेवा दिलेली आहे. दिनांक 18/12/2009 रोजी त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना डिलरशिप परत केली व त्यानंतर सुध्दा त्यांनी तक्रारदाराच्या सदरील वाहनासंबंधिच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. इलेक्ट्रीक स्कूटरच्या दर्जाबद्दल गैरअर्जदार क्रमांक 1 हेच जवाबदार असून वितरक असेपर्यंत त्यांनी विक्री पश्चात सेवा दिलेली आहे त्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार खररीज करण्याची मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, गैरअर्जदार क्रमांक 1 हे बॅटरीवर चालणा-या इलेक्ट्रीक दुचाकीचे उत्पादक आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे अधिकारी असून गैरअर्जदार क्रमांक 4 हे त्यांचे स्थानिक विक्रेते आहेत. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 उत्पादीत बॅटरीवर चालणारे दुचाकी वाहन गैरअर्जदार क्रमांक 4 यांच्याकडून दिनांक 14/07/2008 रोजी 34086/- रुपयास खरेदी केले. वाहन खरेदी केल्यानंतर वॉरंटी काळातच बॅटरी व्यवस्थित चार्ज होत नसल्यामुळे व वाहनाचे शॉकऑब्झर काम करीत नसल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 4 यांच्याकडे तक्रार केलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी, जोपर्यंत त्यांच्याकडे गैरअर्जदार क्रमांक 1 यांची सदरील वाहनाची डिलरशिप होती, तोपर्यत विक्रीपश्चात सेवा दिलेली दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याशी, विक्रीचा व विक्रीपश्चात सेवेचा करार रद्रद केल्यानंतर तक्रारदारास व इतर ग्राहकांना विक्री पश्चात सेवा मिळालेली नसल्याचे दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपल्या जवाबात, अर्जदारास देण्यात येणा-या सेवेतील त्रुटीबाबत, गैरअर्जदार क्रमांक 4 यांना दोषी मानण्यात यावे असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 हे सदरील वाहनाचे उत्पादक असून वाहनाची गुणवत्ता तसेच विक्रीपश्चात सेवा देण्याची जवाबदारी सर्वस्वी गैरअर्जदार क्र 1 यांचीच असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी वितरक असताना त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी विक्री पश्चात सेवा दिल्याचे व गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून त्यांना स्पेअरपार्टस व बाकीच्या सर्व्हिसबद्दल कोणताही रिस्पॉन्स मिळत नसल्याबद्दल मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 4 यांची डिलरशिप परत केल्यानंतर नवीन डिलर मार्फत किंवा स्वत: उत्पादकाने ग्राहकांना सेवा देणे यास ते बांधिल आहेत. त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 4 यांना सेवा देण्यासंदर्भात दोषी धरावे हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे म्हणणे मंच मान्य करीत नाही. वाहनाची बॅटरी चार्ज न होणे, शॉक ऑब्झरचा दर्जा योग्य नसणे हा वाहनाचा उत्पादकीय दोष असल्याचे मंचाचे मत आहे. सदरील वाहन हे बॅटरीवर चालणारे वाहन असून अन्यत्र कोठेही याची दुरुस्ती होऊ शकत नाही व येथे विक्रीपश्चात सेवा देणारे कोणीही अधिकृत डिलर उपलब्ध नाही त्यामुळे सदरील वाहनाची गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी किंमत परत करणे योग्य ठरेल. कारण वाहन दुरुस्त झाले तरी पुन्हा विक्री पश्चात सेवा महत्वाची असल्यामुळे व गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी याबाबत कोणाचीही नियुक्ती न केल्यामुळे मंच गैरअर्जदार क्रमांक 1 यांना वाहनाची किंमत व्याजसह परत करण्याचा आदेश देत आहे.
आदेश
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी 34086/- रुपये दिनांक 14/07/2008 पासून 9 टक्के व्याजासह अर्जदारास 30 दिवसाच्या आत द्यावे व अर्जदाराने सदरील वाहन गैरअर्जदार क्रमांक 1 यांना परत करावे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चाबद्दल रु 5000/- 30 दिवसात द्यावे.
[ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.