Maharashtra

Aurangabad

CC/10/177

G.D. Sarkalawad - Complainant(s)

Versus

Altra Motor India Pvt. Ltd., - Opp.Party(s)

Adv. Sachin Sarda

29 Sep 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM AURANGABAD - 431001 2nd FLOOR , COLLECTOR OFFICE BUILDING , AURANGABAD - 431001
Complaint Case No. CC/10/177
1. G.D. SarkalawadR/o. Shrikrushnanagar, H.No.154, Behind Chankyapuri, Shahnoorwadi, AurangabadAurangabadMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Altra Motor India Pvt. Ltd.,F-89/5, Phase 1, Okhala Inudstrial Estate, New Delhi-20. New Delhi.Maharastra2. Mr. K.K. Bhan, M.D. & Legal Head, Altra Motor Pvt. Ltd.,F-89/5, Phase 1, Okhala Inudstrial Estate, New Delhi-20.New Delhi.Maharastra3. Mr. Pritpal Baweja, Service Executive(PHC), Altra Motor India Pvt. Ltd., F-89/5, Phase 1, Okhala Inudstrial Estate, New Delhi-20.New Delhi.Maharastra4. Next Furniture Solution, Zero Emision Motor, D-1/2, Samyak Arcade, Cannought Place, Cidco, Town Centre, Aurangabad.AurangabadMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
Smt. Anjali L. Deshmukh ,PRESIDENT Smt.Rekha Kapadiya ,MEMBER
PRESENT :

Dated : 29 Sep 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

द्वारा घोषित -  श्रीमती रेखा कापडिया, सदस्‍य  --

 अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून बॅटरीवर चालणारे दुचाकी वाहन खरेदी केले. या वाहनात दोष असल्‍यामुळे गैरअर्जदार यांच्‍याकडे केलेल्‍या तक्रारीची दखल न घेतल्‍यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे.
      अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार त्‍यांनी गेरअर्जदार यांच्‍याकतर्फे देण्‍यात आलेली जाहिरात पाहून बॅटरीवर चालणारे दुचाकी वाहन खरेदी केले. या वाहनाचे उत्‍पादक गैरअर्जदार क्रमांक 1 असून गेरअर्जदार क्रमांक 4 हे स्‍थानिक वितरक आहेत. सदरील वाहनाची एकूण किंमत 32750/- रुपये आहे. हे वाहन खरेदी केल्‍यानंतर पाच ते सहा महिन्‍यानंतर त्‍यात बॅटरी व शॉकऑब्‍झरमध्‍ये दोष निर्माण झाला. याबाबत त्‍यांनी गैरअर्जदार क्रमांक 4 यांच्‍याकडे वाहन दुरुस्‍तीसाठी आणले असता त्‍यांनी डिलरशिप परत केल्‍याचे सांगून गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍या बरोबर संपर्क साधण्‍यास सांगितले. अर्जदाराने अनेक वेळेस गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्‍न केला. बॅटरीवर चालणारे हे वाहन असल्‍यामुळे अन्‍य ठिकाणी दुरुस्‍तीसाठी सुविधा उपलब्‍ध नसल्‍यामुळे दिनांक 5/1/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 व 3 यांना वकीलामार्फत कायदेशिर नोटीस पाठविली. गैरअर्जदार यांनी त्‍याची दखन न घेतल्‍यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून वाहनाची रक्‍कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. 
 
            गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी मंचात दाखल केलेल्‍या जवाबानुसार त्‍यांनी त्‍यांच्‍या वितरकामार्फत (गैरअर्जदार क्र 4 ) अर्जदारास बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक स्‍कूटर विकल्‍याचे मान्‍य केले आहे. त्‍यांनी वितरक व विक्रीपश्‍चात सेवा देण्‍यासाठी गैरअर्जदार क्रमांक 4 यांची नियुक्‍ती केली पण गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी अर्जदारास योग्‍य सेवा दिली नसल्‍याचे सांगून याबबात त्‍यांना जवाबदार धरता येत नसल्‍याचे म्‍हटले आहे. अर्जदारास देण्‍यात आलेल्‍या वाहनाच्‍या बॅटरीची वॉरंटी 6 महिन्‍याची होती. अर्जदाराने जानेवारी 2010 मध्‍ये नोटीसद्वारे बॅटरी व वाहन नादुरुस्‍त असल्‍याचे कळविले आहे. अर्जदाराने बॅटरीबाबत केलेली तक्रार ही वॉरंटी पूर्ण झाल्‍यानंतर केली असून गैरअर्जदार क्रमांक 4 हेच अर्जदारास वाहन दुरुस्‍ती सेवा देणारे आहेत. त्‍यामुळे गैरअर्जदार क्रमांक 4 हेच जवाबदार असून त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍याची मागणी केली आहे.
      गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांची पोच पावती मंचास प्राप्‍त होऊनही ते हजर राहिले नाहीत त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारित करण्‍यात आला.
      गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी दाखल केलेल्‍या जवाबानुसार त्‍यांनी अर्जदारास इलेक्‍ट्रीक स्‍कूटर विकल्‍याचे मान्‍य केले आहे. वाहन नादुरुस्‍त झाल्‍यानंतर त्‍यांनी विक्री पश्‍चात सेवा दिलेली आहे. दिनांक 18/12/2009 रोजी त्‍यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना डिलरशिप परत केली व त्‍यानंतर सुध्‍दा त्‍यांनी तक्रारदाराच्‍या सदरील वाहनासंबंधिच्‍या अडचणी सोडविण्‍याचा प्रयत्‍न केला. इले‍क्‍ट्रीक स्‍कूटरच्‍या दर्जाबद्दल गैरअर्जदार क्रमांक 1 हेच जवाबदार असून वितरक असेपर्यंत त्‍यांनी विक्री पश्‍चात सेवा दिलेली आहे त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खररीज करण्‍याची मागणी केली आहे.
      गैरअर्जदार क्रमांक 1 व 4 यांनी मंचात दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे आढळून येते की, गैरअर्जदार क्रमांक 1 हे बॅटरीवर चालणा-या इलेक्‍ट्रीक दुचाकीचे उत्‍पादक आहेत. गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे अधिकारी असून गैरअर्जदार क्रमांक 4 हे त्‍यांचे स्‍थानिक विक्रेते आहेत. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 उत्‍पादीत बॅटरीवर चालणारे दुचाकी वाहन गैरअर्जदार क्रमांक 4 यांच्‍याकडून दिनांक 17/07/2008 रोजी 32750/- रुपयास खरेदी केले. वाहन खरेदी केल्‍यानंतर वॉरंटी काळातच बॅटरी व्‍यवस्थित चार्ज होत नसल्‍यामुळे  व वाहनाचे शॉकऑब्‍झर काम करीत नसल्‍यामुळे गैरअर्जदार क्रमांक 4 यांच्‍याकडे तक्रार केलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी, जोपर्यंत त्‍यांच्‍याकडे गैरअर्जदार क्रमांक 1 यांची सदरील वाहनाची डिलरशिप होती, तोपर्यत विक्रीपश्‍चात सेवा दिलेली दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याशी, विक्रीचा व विक्रीपश्‍चात सेवेचा करार रद्रद केल्‍यानंतर तक्रारदारास व इतर ग्राहकांना विक्री पश्‍चात सेवा मिळालेली नसल्‍याचे दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपल्‍या जवाबात, अर्जदारास देण्‍यात येणा-या सेवेतील त्रुटीबाबत, गैरअर्जदार क्रमांक 4 यांना दोषी मानण्‍यात यावे असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 हे सदरील वाहनाचे उत्‍पादक असून वाहनाची गुणवत्‍ता तसेच विक्रीपश्‍चात सेवा देण्‍याची जवाबदारी सर्वस्‍वी गैरअर्जदार क्र 1 यांचीच असल्‍याचे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी वितरक असताना त्‍यांच्‍या ग्राहकांना वेळोवेळी विक्री पश्‍चात सेवा दिल्‍याचे  व गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍याकडून त्‍यांना स्‍पेअरपार्टस व बाकीच्‍या सर्व्हिसबद्दल कोणताही रिस्‍पॉन्‍स मिळत नसल्‍याबद्दल मंचात दाखल केलेल्‍या  कागदपत्रांवरुन दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 4 यांची डिलरशिप परत केल्‍यानंतर नवीन डिलर मार्फत किंवा स्‍वत: उत्‍पादकाने ग्राहकांना सेवा देणे यास ते बांधिल आहेत. त्‍यामुळे गैरअर्जदार क्रमांक 4 यांना सेवा देण्‍यासंदर्भात दोषी धरावे हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे म्‍हणणे मंच मान्‍य करीत नाही. वाहनाची बॅटरी चार्ज न होणे, शॉक ऑब्‍झरचा दर्जा योग्‍य नसणे हा वाहनाचा उत्‍पादकीय दोष असल्‍याचे मंचाचे मत आहे. सदरील वाहन हे बॅटरीवर चालणारे वाहन असून अन्‍यत्र कोठेही याची दुरुस्‍ती होऊ शकत नाही व येथे विक्रीपश्‍चात सेवा देणारे कोणीही अधिकृत डिलर उपलब्‍ध नाही त्‍यामुळे सदरील वाहनाची गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी किंमत परत करणे योग्‍य ठरेल. कारण वाहन दुरुस्‍त झाले तरी पुन्‍हा विक्री पश्‍चात सेवा महत्‍वाची असल्‍यामुळे व गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी याबाबत कोणाचीही नियुक्‍ती न केल्‍यामुळे मंच गैरअर्जदार क्रमांक 1 यांना वाहनाची किंमत व्‍याजसह परत करण्‍याचा आदेश देत आहे.
 
                                आदेश
  1.  गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी 32750/- रुपये दिनांक 17/07/2008 पासून 9 टक्‍के व्‍याजासह अर्जदारास 30 दिवसाच्‍या आत द्यावे व अर्जदाराने सदरील वाहन गैरअर्जदार क्रमांक 1 यांना परत करावे.
  2. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चाबद्दल रु 5000/- 30 दिवसात द्यावे.

     


[ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT