::: आदेश निशाणी क्र.1 वर ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक :08.11.2011) 1. अर्जदार हीने, सदर दरखास्त, ग्राहक संरक्षण कयदा 1986 चे कलम 27 अन्वये गैरअर्जदाराविरुध्द आदेशाचे उल्ल्ंघन केल्याबाबत दाखल केले असून, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम- 27 अंतर्गत गैरअर्जदाराविरुध्द उचीत कार्यवाही करुन अर्जदारास न्याय मिळवून द्यावा, अशी प्रार्थना केली आहे. 2. अर्जदार/फिर्यादीची दरखास्त नोंदणी करुन, गैरअर्जदारास समन्स काढण्यात आले. गैरअर्जदार हजर. दरखास्त न्यायप्रविष्ट असतांना, दि.4.11.2011 ला अर्जदार हीने यांनी, नि.क्र.17 नुसार, मामल्यातील संपूर्ण रक्कम अर्जदार बाईला प्राप्त झालेली असल्याने, दरखास्त पुढे चालवायचे नाही, अशी पुरसीस दाखल केली. अर्जदार बाईला नि.क्र.17 चे पुरसीसबाबत विचारणा केली असता, बरोबर असल्याचे सांगीतले. सदर पुरसीस पूर्ण कोरम पुढे नि.क्र.1 वर आदेशाकरीता ठेवण्यात यावे, असा आदेश पारीत. 3. अर्जदार/फिर्यादीने पुरसीस नि.क्र.17 नुसार दरखास्त परत घेऊन, गैरअर्जदार/आरोपी विरुध्द दरखास्त पुढे चालवू इच्छीत नसल्याने, अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची दरखास्त परत घेतल्यामुळे काढून टाकण्यात येत आहे. (By way of withdrawal) (2) आरोपी/गैरअर्जदार यांनी दिलेले बेल बॉंन्ड रद्द करण्यात येत आहे. (Their Bail Bond Stand Cancelled) चंद्रपूर, दिनांक : 08/11/2011. |