Maharashtra

Chandrapur

CC/20/146

Tarabai M.Ramteke - Complainant(s)

Versus

Alchemist Limited Through Board of Directors - Opp.Party(s)

Adv.N..B.Potdukhe

19 Jan 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/20/146
( Date of Filing : 21 Dec 2020 )
 
1. Tarabai M.Ramteke
R/o. Bhim Nagar,Ward No.4,Durgapur,Chandrapur,Dist-CHandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
2. Murlidhar Yashwant Ramteke
R/o. Bhim Nagar,Ward No.4,Durgapur,Chandrapur,Dist-CHandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
3. Shri.Gitesh Kushal Telang
R/o. Bhim Nagar,Ward No.4,Durgapur,Chandrapur,Dist-CHandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Alchemist Limited Through Board of Directors
Plot no.5,Rajiv Gandhi I.T Park,Chandigarh-160101 OR Undivided phant Portion,Hemkundh Chember 89,Nehuru Place,New Delhi-110019
Delhi
Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 19 Jan 2022
Final Order / Judgement

  ::: नि का ल  प ञ   :::

(आयोगाचे निर्णयान्वये, श्री अतुल डी. आळशी, मा. अध्‍यक्ष,)

       (पारीत दिनांक १९/०१/२०२२)

 

                       

  1. प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ सह ३८ अन्‍वये तक्रारकर्ता क्रमांक १  व २ यांनी आममुखत्‍यार तसेच सदर प्रकरणात तक्रारकर्ता क्रमांक ३ असलेले श्री गितेश खुशाल तेलंग यांचेमार्फत दाखल केली असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालिलप्रमाणे. 
  2. विरुध्‍द पक्ष हे ‘अल्‍केमिस्‍ट टाऊनशिप इंडिया लिमीटेड’ आणि ‘अल्‍केमिस्‍ट इन्‍फ्रा रियल्‍टी लिमीटेड’ अशा शिर्षकाखाली महाराष्‍ट्रासह भारतभर कार्यक्षेञ असलेली टाऊनशिप प्रोजेक्‍ट तयार करणारी आस्‍थापना/कंपनी असून  गृहविक्रीचा व्‍यापार करतात. विरुध्‍द पक्षाने संपूर्ण भारतभर व्‍यापार पसरविण्‍यासाठी जागोजागी शाखा स्‍थापीत केल्‍या आहेत. विरुध्‍द पक्षाने त्‍यांची एक शाखा चंद्रपूर येथे उघडली होती. सदर चंद्रपूर येथील कार्यालयाचे    अधिका-यांनी लोकांना सदर कंपनीत आकर्षक प्रलोभन दाखवून गुंतवणूक करण्‍यास प्रेरीत केले व त्‍यांनी दुप्‍पट लाभ देण्‍याची हमी दिल्‍यामुळे तक्रारकर्ता क्रमांक १ यांनी विरुध्‍द पक्ष यांचेकडे रक्‍कम रुपये १,१०,०००/-, ५ वर्ष ६ महिण्‍याकरिता, तक्रारकर्ता क्रमांक २ यांनी रक्‍कम रुपये १,००,०००/- आणि दुस-यांदा रक्‍कम रुपये ४०,०००/- अनुक्रमे ३ वर्ष व २ वर्ष ९ महिण्‍यांकरिता, आणि तक्रारकर्ता क्रमांक ३ यांनी रक्‍कम रुपये ४०,०००/- ६ वर्षाकरिता मुदत ठेव म्‍हणून जमा/गुंतविले. सदर गुंतवणुकीबाबत विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ता क्रमांक १ ते ३ यांचे नावे स्‍वतंञ हमीपञ जारी केले. सदर हमी पञ तक्रारीमध्‍ये निशानी क्रमांक ४ वरील दस्‍त क्रमांक अ-१ ते अ-५ वर दाखल आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ता क्रमांक १ ते ३ यांचे नावे स्‍वतंञरीत्‍या जारी केलेल्‍या हमीपञाचे विवरण खालिलप्रमाणे..

 

अ.क्र.

ग्राहक आय.डी. क्रमांक

प्रमाणपञ दिल्‍याची तारीख

प्रमाणपञ क्रमांक

रक्‍कम रुपये

वचन कालावधी

परिपक्‍वता तारीख

परिपक्‍वता रक्‍कम

TL00002089

१२/०४/२०१३

TA00102127

११००००/-

५ वर्षे ६ म

२२/०९/२०१८

२२००००/-

TC00111074

१५/०७/२०१३

TA01072208

१०००००/-

३ वर्षे

०९/०८/२०१६

२०००००/-

TC00111073

१५/०७/२०१३

TA01072210

४००००/-

२ वर्षे ९ म

०९/०५/२०१६

८००००/-

TLL0483192

२१/०२/२०१४

TA01175738

४००००/-

६ वर्षे

३१/०१/२०२०

८००००/-

 

 

तक्रारकर्त्‍यांनी परिपक्‍वता तिथीनंतर विरुध्‍द पक्ष यांचे चंद्रपूर येथील शाखेत मुळ प्रमाणपञ जमा करुन गुंतवणूकीच्‍या परिपक्‍व रकमेची मागणी केली माञ विरुध्‍द पक्षाने टाळाटाळीची उत्‍तरे दिली व रक्‍कम परत केली नाही. सबब तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍द पक्षाला वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा त्‍यांनी प्रतिसाद न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांनी आयोगासमक्ष विरुध्‍द पक्ष यांचे विरुध्‍द तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये पुढीलप्रमाणे मागणी केली आहे.

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्ता क्रमांक १ यांना परिपक्‍वता रक्‍कम रुपये २,२०,०००/- वर दिनांक १/१०/२०१८ पासून रक्‍कम प्रत्‍यक्ष पदरी पडेपावेतो द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने नुकसान भरपाई रक्‍कम, तक्रारकर्ता क्रमांक २ यांना परिपक्‍वता रक्‍कम रुपये २,००,०००/- वर दिनांक १/०९/२०१६  पासून रक्‍कम प्रत्‍यक्ष पदरी पडेपावेतो द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने नुकसान भरपाई रक्‍कम तसेच परिपक्‍वता रक्‍कम रुपये ८०,०००/- वर दिनांक १/०६/२०१६  पासून रक्‍कम प्रत्‍यक्ष पदरी पडेपावेतो द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने नुकसान भरपाई रक्‍कम आणि तक्रारकर्ता क्रमांक ३ यांना परिपक्‍वता रक्‍कम रुपये ८०,०००/- वर दिनांक १/०२/२०२०  पासून रक्‍कम प्रत्‍यक्ष पदरी पडेपावेतो द.सा.द.शे. १८ टक्‍के दराने नुकसान भरपाई रक्‍कम देण्‍यात देण्‍याचे तसेच शारीरिक, आर्थिक व मानसिक ञासाकरिता रक्‍कम तक्रारकर्ता क्रमांक १,२ व ३ यांना अनुक्रमे १,००,०००/-, १,००,०००/- व ५०,०००/- आणि  तक्रारीचा खर्च रक्‍कम रुपये २५,०००/- देण्‍याचे आदेशीत व्‍हावे अशी मागणी केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍यांची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍यात आले. इंडिया पोस्‍ट कडून प्राप्‍त ट्रॅक रिपोर्टनुसार विरुध्‍द पक्ष यांना नोटीस प्राप्‍त होऊनही ते आयोगासमक्ष उपस्थित झाले नाही. करिता विरुध्‍द पक्षाविरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा आदेश दिनांक २५/११/२०२१ रोजी निशानी क्रमांक १ वर पारित करण्‍यात आला.
  3. तक्रारकर्त्‍यांनी दाखल केलेली तक्रार, दस्‍तावेज तसेच तक्रार आणि दस्‍तावेज यालाच त्‍यांचे लेखी युक्तिवाद समजण्‍यात यावे अशी पुरसिस दाखल यावरुन  खालिल मुद्दे आयोगाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमीमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

 

    अ.क्र.                 मुद्दे                                                              निष्‍कर्षे

    १.  तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्षाचे ग्राहक आहे कायॽ                       होय

    २.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यांप्रति न्‍युनतापूर्ण सेवा दिली           होय

        आहे कायॽ

      ३.  आदेश कायॽ                                                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

 

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

  1. तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडे मुदत ठेव म्‍हणून रक्‍कम गुंतविल्‍याबाबत हमी पञ प्रकरणात निशानी क्रमांक ४ वरील दस्‍त क्रमांक अ-१ ते अ-५ वर दाखल आहे. यावरुन तक्रारकर्ते हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहे, हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

 मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1. तक्रारकर्त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडे गुंतविलेली मुदत ठेव रक्‍कम परिपक्‍वता तारीख उलटून गेल्‍यानंतरही परत केली नाही. तक्रारकर्त्‍यांचा हा आक्षेप विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढलेला नाही तसेच आपल्‍या  समर्थनार्थ कोणतेही म्‍हणणे प्रकरणात दाखल केले नाही. अशा परिस्‍थीतीत विरुध्‍द पक्षाने गुंतवणुकीची परिपक्‍वता रक्‍कम परत न करुन तक्रारकर्त्‍यांप्रति दिलेली न्‍युनतापूर्ण सेवा दिल्‍याचे सिध्‍द होत असल्‍याचे आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक ३ बाबतः-

  1. मुद्दा क्रमांक १ व २ च्‍या विवेंचणावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.   

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍यांची तक्रार क्र. २०/१४६ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता क्रमांक १ यांना परिपक्‍वता रक्‍कम रुपये २,२०,०००/- तक्रारकर्ता क्रमांक २ यांना परिपक्‍वता रक्‍कम रुपये २,००,०००/- आणि परिपक्‍वता रक्‍कम रुपये ८०,०००/- तसेच तक्रारकर्ता क्रमांक ३  यांना परिपक्‍वता रक्‍कम रुपये ८०,०००/- या संपूर्ण रकमेवर  निकाल तारेखपासून ६ द.सा.द.शे. टक्‍के व्‍याज तक्रारकर्ते यांना प्रत्‍यक्ष मिळेपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ता क्रमांक १ ते ३ यांना शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
  4. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावेत.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.