Complaint Case No. CC/20/64 | ( Date of Filing : 10 Jul 2020 ) |
| | 1. Shri.Vijay Ramchandra Khanke | Naginabagh ward,Datala Road,Chandrapur Tah.Dist.Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Alchemist limited Through Board of Director | Flat no 1511, Undivided Fund Portion,Hemkund Chaimbar,89,Neharu place,New Delhi | Delhi | Delhi |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, श्री अतुल डी. आळशी, मा. अध्यक्ष,) (पारीत दिनांक १९/०१/२०२२) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १४ सह १२ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- विरुध्द पक्ष हे ‘अल्केमिस्ट टाऊनशिप इंडिया लिमीटेड’ आणि ‘अल्केमिस्ट इन्फ्रा रियल्टी लिमीटेड’ अशा शिर्षकाखाली महाराष्ट्रासह भारतभर कार्यक्षेञ असलेली टाऊनशिप प्रोजेक्ट तयार करणारी आस्थापना/कंपनी असून गृहविक्रीचा व्यापार करतात. विरुध्द पक्षाने संपूर्ण भारतभर व्यापार पसरविण्यासाठी जागोजागी शाखा स्थापीत केल्या आहेत. विरुध्द पक्षाने त्यांची एक शाखा चंद्रपूर येथे उघडली होती. सदर चंद्रपूर येथील कार्यालयाचे अधिका-यांनी लोकांना सदर कंपनीत आकर्षक प्रलोभन दाखवून गुंतवणूक करण्यास प्रेरीत केले व त्यांनी दुप्पट लाभ देण्याची हमी दिल्यामुळे तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे हमीपञ क्रमांक TA02042535 प्रमाणे रक्कम रुपये ७,००,०००/- ३ वर्षे कालावधीकरिता तसेच हमीपञ क्रमांक TA02042396 प्रमाणे रक्कम रुपये ३,००,०००/- ३ वर्षे कालावधीकरिता मासिक वेतन ठेवी योजनेअंतर्गत गुंतविले. सदर गुंतवणुकीबाबत विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता यांचे नावे स्वतंञ हमीपञ जारी केले. सदर हमी पञ तक्रारीमध्ये निशानी क्रमांक ४ वरील दस्त क्रमांक अ-१ ते अ-१० वर दाखल आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता यांचे नावे स्वतंञरीत्या जारी केलेल्या हमीपञाचे विवरण खालिलप्रमाणे..
अ.क्र. | ग्राहक आय.डी. क्रमांक | प्रमाणपञ दिल्याची तारीख | प्रमाणपञ क्रमांक | रक्कम रुपये | वचन कालावधी | परिपक्वता तारीख | मासिक उत्पन्न योजना/परिपक्वता रक्कम | १ | TYY0076657 | १८/११/२०१५ | TA02042535 | ७,००,०००/- | 3 वर्षे | २१/०४/२०१७ | ७,०००/- | २ | TY00017465 | २६/०४/२०१६ | TA02042396 | ३,००,०००/- | ३ वर्षे | 1६ वर्षे | २४९९/- |
तक्रारकर्त्याने परिपक्वता तिथीनंतर विरुध्द पक्ष यांचे चंद्रपूर येथील शाखेत मुळ प्रमाणपञ जमा करुन गुंतवणूकीच्या रकमेची मागणी केली माञ विरुध्द पक्षाने टाळाटाळीची उत्तरे दिली व रक्कम परत केली नाही. सबब तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु नोटीस प्राप्त होऊनसुध्दा त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे तक्रारकर्त्याने आयोगासमक्ष विरुध्द पक्ष यांचे विरुध्द तक्रार दाखल करुन त्यामध्ये पुढीलप्रमाणे मागणी केली आहे. - विरुध्द पक्षाने तक्रारकर्ता यांना हमीपञ क्रमांक TA02042535 प्रमाणे परिपक्वता रक्कम रुपये ७,००,०००/- वर सप्टेंबर २०१६ पासून दिनांक २८/१०/२०१८ पर्यंत मासिक वेतन भरपाई रक्कम रुपये ७,०००/- एकूण २६ महिण्यांचे रुपये १,८२,०००/- सह संपूर्ण एकूण रक्कम रुपये ८,८२,०००/- रकमेवर दिनांक ०१/११/२०१८ पासून रक्कम तक्रारकर्त्याचे पदरी पडेपावेतो द.सा.द.शे. १८ टक्के दराने नुकसान भरपाई, हमीपञ क्रमांक TA02042396 प्रमाणे परिपक्वता रक्कम रुपये ३,००,०००/- वर सप्टेंबर २०१६ पासून दिनांक ०५/०४/२०१९ पर्यंत मासिक वेतन भरपाई रक्कम रुपये २,४९९/- प्रमाणे एकूण ३२ महिण्यांचे रुपये ७९,९६८/- सह एकूण रक्कम रुपये ३,७९,९६८/- रकमेवर दिनांक ०१/०५/२०१९ पासून रक्कम तक्रारकर्त्याचे पदरी पडेपावेतो द.सा.द.शे. १८ टक्के दराने नुकसान भरपाई, शारीरिक, आर्थिक व मानसिक ञासाकरिता रुपये २,५०,०००/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये २५,०००/- देण्याचे आदेशीत व्हावे अशी मागणी केली आहे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्षाला नोटीस काढण्यात आले. इंडिया पोस्ट कडून प्राप्त ट्रॅक रिपोर्टनुसार विरुध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त होऊनही ते आयोगासमक्ष उपस्थित झाले नाही. करिता विरुध्द पक्षाविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक २७/१०/२०२१ रोजी निशानी क्रमांक १ वर पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, शपथपञ आणि लेखी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे १. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्षाचे ग्राहक आहे कायॽ होय २. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिली होय आहे कायॽ ३. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे मासिक वेतन ठेवी योजनेअंतर्गत तसेच मुदत ठेवी अंतर्गत रक्कम गुंतविल्याबाबत हमी पञ प्रकरणात निशानी क्रमांक ४ वरील दस्त क्रमांक अ-१ ते अ-१० वर दाखल आहे. यावरुन तक्रारकर्ते हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे गुंतविलेली रक्कम परिपक्वता तारीख उलटून गेल्यानंतरही परत केली नाही. तक्रारकर्त्याचा हा आक्षेप विरुध्द पक्ष यांनी तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढलेला नाही तसेच आपल्या समर्थनार्थ कोणतेही म्हणणे प्रकरणात दाखल केले नाही. अशा परिस्थीतीत विरुध्द पक्षाने गुंतवणुकीची परिपक्वता रक्कम परत न करुन तक्रारकर्त्याप्रति दिलेली न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे सिध्द होत असल्याचे आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेंचणावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्यांची तक्रार क्र. २०/६४ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना परिपक्वता रक्कम रुपये ७,००,०००/- व त्यावर मासिक वेतन भरपाई रक्कम रुपये १,८२,०००/- असे एकूण रक्कम रुपये ८,८२,०००/- तसेच परिपक्वता रक्कम रुपये ३,००,०००/- व त्यावर मासिक वेतन भरपाई रक्कम रुपये ७९,९६८/- असे एकूण रक्कम रुपये ३,७९,९६८/- निकाल तारेखपासून द.सा.द.शे. ६ टक्के व्याजासह तक्रारकर्ता यांना प्रत्यक्ष मिळेपर्यंत अदा करावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.
| |