Maharashtra

Dhule

CC/13/35

Shri Rasciklal Prathapchand Oswal - Complainant(s)

Versus

Alankit Helth care TPA Ltd. - Opp.Party(s)

L.P.Thakur

15 May 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/13/35
 
1. Shri Rasciklal Prathapchand Oswal
kalprusha, Agresun chowk Malgoan Road, Dhule
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Alankit Helth care TPA Ltd.
R.R.House,Ideal Industrial Estate,Senapati Bapat Marg.Lower parel(West)Mumbai 13
Mumbai
Maharashtra
2. Planet Health Premises
211Nav Neelam Premises R.G.Thadani Marg Worli Mumbai-18
Mumbai
Maharashtra
3. Oriental Ins.Co.Ltd.
Oriental house,7J Tata Road Charchgate Mumbai-20
Mumbai
Maharashtra
4. Arogham Dhanasampad
Hermb Recident Near Kalayant Corior shranpur link Road Canada corner Nashik
Nashik
Maharashtra
5. Shri Shirish S.Sancheti
3 Bafana Market Opp. Mahanagarpalika Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,धुळे.

 

मा.अध्‍यक्षा-श्रीमती.वी.वी.दाणी.      मा.सदस्‍या-श्रीमती.एस.एस.जैन.

                                  ----------------------------------------                          ग्राहक तक्रार क्रमांक  ३५/२०१३

                                  तक्रार निकाली दिनांक १५/०५/२०१३

 

श्री.रसीकलाल प्रतापचंद ओसवाल.                     ----- तक्रारदार.

उ.व.६१ वर्षे,धंदा-शेती व व्‍यापार.

रा.कल्‍पवृक्ष,अग्रसेन चौक,

जे.जे.शाह हॉस्‍पीटल जवळ,

मालेगांव रोड,धुळे.ता.जि.धुळे.

              विरुध्‍द

(१)अलकींत हेल्‍थ केअर टीपीए ली.                 ----- सामनेवाले.

आर.आर.हाऊस,आयडीया इंड.इस्‍टेट

न्‍यु एम्‍पायर मिल्‍ससमोर,सेनापती बापट

मार्ग,लोअर परेल(पश्चिम)

मुंबई ४०००१३.

(२)प्‍लॅनेट हेल्‍थ प्रिमायसेस

२११,नव निलम प्रिमायसेस,

आर.जी.थंडाणी मार्ग,वरळी.

मुंबई-४०० ०१८

(३)दि.ओरिएंन्‍टल इंन्‍शुरन्‍स कं.लि.

ओरिएंन्‍टल हाऊस,४ था मजला,

७ जे.टाटा रोड,चर्चगेट.

मुंबई-४०० ०२०.

(४)आरोग्‍यम धनसंपदा.

१ ला मजला,हेरंब रेसीडेन्‍सी,

कलायतन कोरीओर जवळ,

शरणपूर ञंबक लिंग रोड,

कॅनडा कॉर्नर,नाशिक ४२२००५

(५)श्री.शिरीष एस.संचेती.

३ बाफना मार्केट,

महानगरपालीकेसमोर,धुळे.

धुळे ४२४००१.

 

न्‍यायासन

(मा.अध्‍यक्षाः श्रीमती.वी.वी.दाणी.)

(मा.सदस्‍याः श्रीमती.एस.एस.जैन.)

उपस्थिती

(तक्रारदारा तर्फे वकील श्री.एल.पी.ठाकूर.)

--------------------------------------------------------------------

निकालपत्र

(द्वाराः मा.अध्‍यक्षा - श्रीमती.वी.वी.दाणी.)

 

(१)      तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले नं. १ ते ४ यांची मेडिक्‍लेम पॉलिसी सामनेवाले नं.५ यांच्‍याकडून घेतली आहे व त्‍याचा प्रिमियम धुळे येथून अदा केला आहे.  तक्रारदार यांना ह्दय विकाराचा ञास होत असल्‍याने त्‍यांचेवर बायपास शस्‍ञक्रीया करण्‍यात आली.  त्‍याकामी रक्‍कम रु.६,६७,९८०/- एवढा खर्च आलेला आहे.  सदर खर्चाची रक्‍कम सामनेवाले यांच्‍याकडून मिळणेकामी तक्रारदारांनी सदरचा अर्ज दाखल केलेला आहे. 

 

(२)       याकामी तक्रारदार यांनी नि.नं.२ वर शपथपञ आणि नि.नं.४ सोबत एकूण ६ कागदप‍ञे दाखल केली आहेत.  तक्रारदार यांचा, सदर तक्रार अर्ज दाखल करुन घेण्‍याच्‍या मुद्यावर, युक्तिवाद ऐकला.  यावरुन आमच्‍यासमोर खालील मुद्दा उपस्थित होतो व त्‍याचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत. 

 

मुद्दा :

  निष्‍कर्षः

(अ)तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, ग्राहक संरक्षण कायदा कलम    11 प्रमाणे या मंचाचे कार्यक्षेञात आहे काय ?

नाही.

(ब)आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

 

 

विवेचन

 

(३)     मुद्दा क्र. ‘‘’’ तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या अर्जातील कलम १२ कार्यक्षेञामध्‍ये तक्रार अर्जास कारण, सामनेवाले नं.५ यांची वस्‍ती, पॉलिसी धुळे येथेच काढली असल्‍याने व त्‍यानुसार धुळे येथे सेवा देण्‍याचे सामनेवाले यांनी कबूल केले असल्‍याने व सामनेवाले नं.३ चे शाखा कार्यालय धुळे येथे असल्‍याने या मे.कोर्टास सदरचा तक्रार अर्ज चालविण्‍याचे कार्यक्षेञ व अधिकारक्षेञ आहे असे नमूद केले आहे.  यावरुन असे दिसते की तक्रारदार यांना असे म्‍हणावयाचे आहे की, सामनेवाले नं.१ ते ४ यांची पॉलिसी सामनेवाले नं.५ यांची वस्‍ती व पॉलिसी धुळे येथून काढलेली असल्‍याने धुळे मंचास कार्यक्षेञ येत आहे.   

          परंतु सदर मेडिक्‍लेम पॉलिसी ही सामनेवाले नं. १ ते ४ यांची आहे.  सामनेवाले नं. १ ते ३ हे मुंबई व सामनेवालेनं.४ हे नाशिक येथील नमूद कार्यालयीन पत्‍त्‍यावर काम करीत आहेत.  याचा अर्थ सामनेवाले   हे मुंबई व नाशिक येथे कामकाज करीत आहेत. आणि सामनेवाले नं.५ हे धुळे येथे वास्‍त्‍व्‍यास असून तेथे काम पाहतात व त्‍यांच्‍या मार्फत पॉलिसी घेतली आहे असे तक्रारदारांचे म्‍हणणे आहे.   परंतु सामनेवाले नं. ५ हे विमा कंपनी नाही. 

          या बाबत तक्रारदार यांनी नि.नं.४ वरील दस्‍तऐवज यादी सोबत नि.नं.४/१ वर पॉलिसीची प्रत दाखल केली आहे.   सदर कागदपञ पाहता त्‍यावर तक्रारदारांचे नांव आहे, पंरतु सदर पॉलिसी ही ओरिएंटल इं‍शुरन्‍स कं.लि.यांनी त्‍यांच्‍या मुंबई येथील नमूद पत्‍त्‍यावरुन तक्रारदार यांना दिलेली दिसत आहे.   यावरुन असे दिसते की, सदर पॉलिसी सामनेवाले यांनी दिली आहे.  परंतु सामनेवाले यांचे कार्यालय मुंबई येथे असल्‍याने ती पॉलिसी मुंबई येथून देण्‍यात आली आहे हे स्‍पष्‍ट होते.     सामनेवाले यांची धुळे येथे शाखा असल्‍याबाबत तक्रारदारांनी कोणताही खुलासा केलेला नाही.   त्‍यावरुन सामनेवाले यांची धुळे येथे शाखा नाही असे दिसते.  यावरुन तक्रारदार यांना धुळे येथून पॉलिसी देण्‍यात आलेली नाही हे स्‍पष्‍ट होत आहे. 

          तसेच तक्रारदार यांनी एजंटची पावती दि.११-११-२०११ ची नि.नं.६ वर दाखल केली आहे.   सदर पावती पाहता ती स्‍वप्‍नील शिरीष संचेती यांनी दिलेली दिसत आहे.  ते सामनेवाले विमा कंपनीचे ऑथोराईज्‍ड एंजट आहेत.  त्‍यांनी तक्रारदाराकडून विमा हप्‍त्‍यापोटी चेकने रक्‍कम स्‍वीकारली असे नमूद केले आहे.  सदर पावती ही स्‍वप्‍नील शिरीष संचेती यांनी दिलेली आहे.  परंतु तक्रारदार यांनी सामनेवाले नं. ५ स्‍वप्‍नील शिरीष संचेती यांना सदर प्रकरणात सामनेवाले म्‍हणून सहभागी केलेले नसून, सामनेवाले नं.५ म्‍हणून शिरीष एस.संचेती यांना सहभागी केलेले आहे.  सदर पावती ही सामनेवाले नं.५ यांनी दिलेली दिसत नाही.  त्‍यामुळे ही पावती विचारात घेता येत नाही.  तसेच एजंट यांनी विम्‍याची रक्‍कम धुळे येथे स्‍वीकारली यावरुन सदर पॉलिसी धुळे येथून दिली असे स्‍पष्‍ट होत नाही.  कारण एजंट म्‍हणजे विमा कंपनी नसून ती विमा कंपनीसाठी काम करणारी ञयस्‍थ व्‍यक्‍ती असते.  यामुळे सामनेवाले नं.५ यांची विमा हप्‍त्‍याची रक्‍कम चेकने स्‍वीकारली या कारणाने त्‍यांचेवर विमा क्‍लेम देण्‍याची जबाबदारी आहे असे स्‍पष्‍ट होत नाही.   सामनेवाले नं.५ हे एजंट असल्‍याने त्‍यांना सदर अर्जात सहभागी करण्‍याची आवश्‍यकता नाही.

 

    ग्राहक संरक्षण कायदा कलम 11   :  

(1) Subject to the other provisions of this Act, the District Forum shall have jurisdiction to entertain complaints where the value of the goods or services and the compensation, if any, claimed [does not exceed rupees twenty lakhs].

(2) A complainant shall be instituted in a District Forum within the local limits of whose jurisdiction.

(a) the opposite party or each of the opposite parties, where there are more than one, at the time of the institution of the complaint, actually and voluntarily resides or [carries on business or has a branch office or] personally works for gain, or

(b) any of the opposite parties, where there are more than one, at the time of the institution of the complaint, actually and voluntarily resides, or [carries on business or has a branch office],or personally works for gain, provided that in such case either the permission of the District Forum is given, or the opposite parties who do not reside, or [carry on business or have   a branch office],or personally work for gain, as the case may be, acquiesce in such institution, or

(c) the cause of action, wholly or in part, arises.

Objects and Reasons – Clause 8 (old) seeks to amend section 11 to enhance the jurisdiction of the District Forum to entertain complaints where the value of the goods or services and the compensation claimed does not exceed rupees twenty lakhs.  This will be more convenient of  the complainants and also reduce the number of complaints filed with the state Commission and National Commission.  

 

        या कलमा प्रमाणे, कोणतेही प्रकरण त्‍याच जिल्‍हा ग्राहक मंचाच्‍या ठिकाणी चालू शकते, ज्‍या ठिकाणी सामनेवाले राहतात व व्‍यवसाय करतात.  किंवा ज्‍या ठिकाणी त्‍यांची शाखा असते. ज्‍या ठिकाणी कारण घडले असेल त्‍याच ठिकाणी प्रकरण दाखल करता येते.  परंतु ज्‍या ठिकाणी तक्रारदार राहतात किंवा व्‍यवसाय करतात, त्‍या ठिकाणी प्रकरण दाखल करता येत नाही.  सदर प्रकरणात सामनेवाले यांची धुळे येथे शाखा नाही.  सदर विमा हप्‍त्‍याची रक्‍कम धुळे येथून अदा केली, त्‍यामुळे धुळे येथून पॉलिसी घेतली असा अर्थ होत नाही.    सामनेवाले यांचे कार्यालय व शाखा मुंबई येथे आहे.  तक्रारदार यांना सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या मुंबई येथील कार्यालयातून पॉलिसी दिलेली आहे.  व तक्रारदार यांनी सदर पॉलिसी मुंबई येथून स्‍वीकारलेली आहे.   त्‍यामुळे सदर तक्रार अर्ज हा धुळे मंचाच्‍या कार्यक्षेञामध्‍ये दाखल करण्‍यास पाञ नाही.  याचा विचार होता वरील प्रकरण चालविण्‍याचे प्रांतीय अधिकार क्षेञ “territorial jurisdiction” या मंचास नाही.  या कायदेशीर मुद्यावर, सदर तक्रारदाराने दिलेला अर्ज दाखल करुन घेता येत नाही असे आमचे मत आहे.  जरुर तर तक्रारदार हे योग्‍य त्‍या कार्यक्षेञ असलेल्‍या मंचात तक्रार दाखल करु शकतात.   म्‍हणून मुद्दा क्र. चे उत्‍तर आम्‍ही नकारार्थी देत आहोत. 

 

 

()       या कमी मंचामार्फत खालील न्‍यायनिवाडयांचा आधार घेण्‍यात आला आहे.

·        II (2011) CPJ 88 (NC)

          Neha Singhal  Vs  Unitech Limited.   And

Abhishek Singhal  Vs  Unitech Limited

·        I (2012) CPJ 81

Saluja Ford  Vs  Hira Lal Thakur & Ors.

·        1997 (1) Bom. C.R. (Cons.) 1 (N.C.D.R.C. New Delhi)

Rajaram Com Producers Punjab Ltd Vs Suryakant Nitin Kumar Gupta.

          The State Commission has held that part of cause of action had arisen at Rajanand Gaon as the various complainants were entitled to receive the share certificate at that place.  Thus according to the State Commission the matter falls under Clause (c ) of the above referred sub-section.  The learned counsel for the respondents has been unable to satisfy us that how receipt or non receipt of share certificate at a certain place gives cause of action to the applicant.  When a Company goes public and various applicants from different places apply for shares it does not mean that the cause of action will accrue to the applicants at the places they reside or are expected to receive the share certificates.  The applications for the shares will be deemed to have been accepted at the place where the Company has its registered office or from where the shares are to be dispatched.  Post Office will be deemed to be acting as agent for share holders for delivery of shares to them.   As noticed above, the petitioner Company has its registered office at Chandigarh while its place of work is at Mandsaur (M.P.).   It has  no branch office at Rajanand Gaon.

     The District Forum has assumed jurisdiction mainly on the ground that complainants were residing at Rajanand Gaon.  Section 11 does not lay down that the complainant can file a complaint at the place where he is residing.

 

          वरील उल्‍लेख केलेल्‍या न्‍यायनिर्णयात तक्रारदार हे राजनांदगावचे होते व त्‍या ठिकाणी त्‍यांना शेअर्सचे प्रमाणपञ मिळणार होते.  कंपनीचे रजिष्‍टर्ड ऑफीस हे चंदीगड येथे होते व कामकाजाचे क्षेञ हे मंदसौर (एम.पी.) येथे होते.  कंपनीची शाखा ही राजनांदगावला नव्‍हती.  या राष्‍ट्रीय आयोगाच्‍या निकालानुसार सदर प्रकरण चालविण्‍याचे कार्यक्षेञ राजनांदगाव होऊ शकत नाही.  प्रस्‍तुत प्रकरणात सामनेवाले यांची धुळे येथे शाखा नसून धुळे येथून पॉलिसी दिलेली नाही.   त्‍यामुळे धुळे मंचास हे प्रकरण चालविण्‍याचे प्रांतीय अधिकार नाही.   

          वरील सर्व कारणांचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.

आदेश

 

          तक्रारदारांचा तक्रार अर्ज, दाखल करुन घेण्‍याच्‍या टप्‍प्‍यावरच, खारीज करण्‍यात येत आहे.

 

धुळे.

दिनांकः १५/०५/२०१३

 

 

 

              (श्रीमती.एस.एस.जैन.)    (श्रीमती.वी.वी.दाणी.)

                    सदस्‍या               अध्‍यक्षा

                  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,धुळे.

 

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.