सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 39/2015
तक्रार दाखल झाल्याचा दि. 30/07/2015
तक्रार निकाल झाल्याचा दि. 05/11/2015
श्री राजन मनोहर धुरी
वय 38 वर्षे, व्यवसाय – नोकरी,
राहणार- कलमठ (बिडयेवाडी), ता.कणकवली,
जिल्हा – सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
1) अक्षय मोबाईल,
महापुरुष मंदिरासमोर, श्रीराम सदन,
बाजारपेठ, कणकवली, ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग
2) विश्वकर्मा मोबाईल सर्व्हिसेस,
श्री प्रसाद पांचाळ,
मॅक्स सर्व्हीस सेंटर, एस.एम.हायस्कुलसमोर,
कणकवली, ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग
पिन- 416 602
3) सिध्दीविनायक मोबाईल सर्व्हिसेस,
जी-4, स्वानंद कॉम्प्लेक्स, चर्च रोड,
प्रभाकर प्लाझाच्या मागे, नवी शाहूपुरी,
कोल्हापूर, पिन 416 001
4) मॅनेजर,
कार्बन क्लिनिक,
कार्बन कस्टमर केअर सर्व्हीस,
डी-170, ओखला इंडस्ट्रीयल एरिया,
फेज – 1, नवी दिल्ली – 110 020
इंडिया. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री कमलाकांत ध. कुबल, प्रभारी अध्यक्ष.
2) श्रीमती वफा ज. खान, सदस्या.
तक्रारदार - व्यक्तीशः
विरुद्ध पक्ष – गैरहजर.
आदेश नि.1 वर
(दि.05/11/2015)
द्वारा : श्री कमलाकांत धर्माजी कुबल, प्रभारी अध्यक्ष.
1) तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष कंपनीकडून खरेदी केलेला Carbon Titanium S 5 या मोबाईल हँडसेटमध्ये निर्मिती दोष असल्यामुळे मोबाईलची रक्कम सव्याज परत मिळणेसाठी विरुध्द पक्ष यांचेविरुध्द दाखल करण्यात आलेली आहे.
- तक्रारदाराची तक्रार दाखल करुन घेऊन विरुध्द पक्ष यांना नोटीसा बजावण्यात आल्या.
3) दरम्यान तक्रारदार यांनी नि.15 वर अर्ज दाखल करुन विरुध्द पक्ष कंपनीने तक्रारदारास Carbon Titanium pack S 360 हा नवीन हँडसेट दि.18/10/2015 रोजी दिलेला असून त्यास दि.18/10/2015 ते 18/10/2016 पर्यंत वॉरंटी दिल्याचे कथन केले आहे. त्यामुळे तक्रारदाराची विरुध्द पक्ष 1 ते 4 यांचेविरुध्द कोणतीही तक्रार नसल्याने सदरचे प्रकरण निकाली काढण्याबाबत विनंती केलेली आहे. सदरच्या अर्जास अनुसरुन हे मंव खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारदाराच्या नि.15 च्या अर्जास अनुसरुन सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 05/11/2015
sd/- sd/-
(वफा ज. खान) (कमलाकांत ध.कुबल)
सदस्या, प्रभारी अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.