Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/15/126

Samiksha Suresh Sirbhate through Suresh Mahadevrao Sirbhate - Complainant(s)

Versus

Akash Institute Branch Hingna through Director Shri Chandrakant Sateja - Opp.Party(s)

Shri N.Y. Lade

30 Dec 2021

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. CC/15/126
( Date of Filing : 10 Jun 2015 )
 
1. Samiksha Suresh Sirbhate through Suresh Mahadevrao Sirbhate
Occ: Service R/o Vikas nagar near Swarswati Vidhyamandir Baitul Taluka Baitul
Baitul
M P
...........Complainant(s)
Versus
1. Akash Institute Branch Hingna through Director Shri Chandrakant Sateja
R/o 21 Opp. Shradhanand peth Anathalaya South Ambazari Road Shradhandpeth Chouk Nagpur Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Aakash Institute ( Main Branch)
Office Address : Aakash Tower Plot No.4 MLU Pocket Sector -11 Dwraka New Delhi - 110075
New Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 30 Dec 2021
Final Order / Judgement

श्री. अविनाश प्रभुणे, मा. सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये.

 

1.               वि.प.क्र. 2 आकाश इंस्‍टीट्युट मुख्‍य शाखा असून ते आय आय टी, जे ई ई, एन ई ई टी सारख्‍या परीक्षा देणा-या विद्यार्थ्‍यांना ते शिक्षणाची, राहण्‍याची, खाण्‍याची, वैद्यकीय सोई पुरविण्‍याची सेवा मोबदला घेऊन देतात. वि.प.क्र. 1 ही त्‍यांची नागपूरमधील हिंगणा शाखा आहे. वि.प.ने सदर सोयी विद्यार्थ्‍यांकडून मोबदला घेऊनही न पुरविल्‍याने तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल केलेली आहे.

 

2.               तक्रारकर्तीची तक्रार अशी आहे की, तिने वि.प.च्‍या इंस्‍टीट्युटमध्‍ये दि.04.04.2013 रोजी अग्रीम रक्‍कम भरुन प्रवेश घेतला आणि नंतर रु.3,80,085/- वेळोवेळी भरुन प्रवेश घेतला. सर्व रकमांच्‍या पावत्‍या वि.प.ने तक्रारकर्तीला दिल्‍या. परंतू वि.प.ने सांगितल्‍याप्रमाणे शिकवण्‍यास प्रशिक्षित शिक्षक वर्ग उपलब्ध नव्‍हता. वसतीगृहामधील खोल्‍यांमध्‍ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी राहत असल्‍याने त्‍यांना अभ्‍यास करतांना बाधा निर्माण होत होती. तसेच इमारतींमध्‍ये क्षमतेपेक्षा जास्‍त विद्यार्थी राहण असल्‍याने स्‍नानगृह, स्वच्‍छता गृह, भोजनाकरीता रांगा लागत असल्‍याने गैरसोय निर्माण झाली. जेवण हे निकृष्‍ट दर्जाचे पुरविण्‍यात येत होते. शुध्‍द पाण्‍याची व्‍यवस्‍था नव्‍हती.  इमारतीमध्‍ये हवा खेळती राहत नव्‍हती. पावसाळयाचे पाणी जमा झाल्‍याने भिंतीवर, गाद्या, कपडे आणि पुस्‍तके यांचेवर बुरशी वाढायला लागली होती. याबाबत आणि पुरविण्‍यात येणा-या सुविधा असमाधानकारक असल्याबाबत दि.11.08.2013 रोजी दोनदा श्री. चंद्रकांत सतेजा यांना सुचित केले असता त्‍यांनी त्यात कुठलीही सुधारणा केली नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्ता आणि इतर मुली त्‍यांचे स्‍वग्रामी अस्‍वस्‍थ मनस्थितीमध्‍ये परत आले आणि त्‍यांनी त्‍यांची गैरसोय पालकांना सांगितली असता तेव्‍हा उभय पक्षांमध्‍ये सभा आयोजित करण्‍यात आली आणि चर्चेअंती व विरुध्‍द पक्षांचे वार्डन व इतर कर्मचा-यांनी सांगितले की, काही विद्यार्थीनींच्‍या प्रकृती अस्‍वाथ्‍यामुळे सर्वांना दि.07.08.2013 घरी जावयास लावले. दि.17.08.2013 रोजी सतेजा सर यांना ई-मेलद्वारे सदर असुविधांची माहिती देण्‍यात आली. त्‍यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्‍याने शेवटी दि.20.01.2015 ला त्‍यांचेवर कायदेशीर नोटीसची बजावणी करण्‍यात आली असता वि.प.ने त्‍यास उत्‍तर दिले नाही. तक्रारकर्त्‍याला त्‍यामुळे मानसिक त्रास झाला, म्‍हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार दाखल केली असून  वि.प.कडे भरणा केलेली रक्‍कम रु.3,80,085/- व्‍याजासह मिळावी, शारिरीक आणि मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.   

 

3.                  सदर तक्रारीची नोटीस वि.प.क्र. 1 व 2 यांचेवर बजावण्‍यात आली असता वि.प.क्र. 1 आयोगासमोर उपस्थित न झाल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. वि.प.क्र. 2 यांनी तक्रारीस प्राथमिक आक्षेपासह लेखी उत्‍तर दाखल केले.

 

4.               वि.प.क्र. 2 यांनी शिक्षण ही वस्‍तू नसल्‍याने आणि शैक्षणिक संस्‍था या सेवा पुरवित नसल्‍याने सदर तक्रार ही ग्रा.सं.का.नुसार चालविण्‍यायोग्‍य नाही. तसेच तक्रारकर्ती हा अज्ञान असल्‍यानेही तक्रार चालू शकत नाही. पुढे आपल्‍या परिच्‍छेदनिहाय लेखी उत्‍तरामध्‍ये वि.प.क्र. 2 ने ते एक शैक्षणिक संस्‍था असून मेडीकल आणि इंजिनियरींगला जाणा-यांकरीता मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्‍याचे महत्‍वाचे काम करतात. याकरीता त्‍यांनी फ्रेंचाइजी  नियुक्‍त केले आणि ते इच्‍छुक विद्यार्थ्‍यांना गुणवत्‍तायुक्‍त प्रशिक्षण देतात.  वि.प.क्र. 2 वसतीगृहाची आणि भोजनाची सुविधा देत नाही. ते मेडीकल आणि इंजिनियरींग प्रवेश परीक्षेकरीता शिक्षण, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन नविन पध्‍दतीने आणि सुविधेने देतात. तसेच स्‍टेट बोर्डच्‍या परीक्षेकरीता मार्गदर्शन करतात. तसेच तक्रारकर्त्‍याने तक्रारीत केलेल्‍या असुविधा अमान्‍य करुन ते विद्यार्थ्‍यांना लायब्ररी, शंका निरसन करण्‍याची सुविधा,  क्‍लासेस व्‍यतिरिक्‍त अतिरिक्‍त वेळेस अभ्‍यास करण्‍याकरीता वेगळे रुम, चांगला शिक्षक वर्ग, शुध्‍द पाणी, प्रशिक्षित सिक्‍युरीटी गार्ड, पालकांना त्‍यांच्‍या पाल्‍याच्‍या प्रगतीची माहिती एसएमएस द्वारे देणे अशा सुविधा देतात. तसेच वसतीगृहापासून कॉलेजपर्यंत बसची सेवा दिल्‍याची बाब अमान्‍य केली.  तसेच श्री. पाल्‍यारपवार आणि तुम्‍मरवार यांनी तक्रार केली व वार्डन आणि पीयुष यांनी मान्‍य केले ही बाबसुध्‍दा नाकारली आहे. तक्रारकर्त्‍याची तक्रार ही काल्‍पनिक असून बनावटी असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले आहे. तसेच त्‍यांचे विद्यार्थी देशभर चांगल्या कॉलेजमध्‍ये प्रवेश मिळवित आहे.  सदर तक्रार ही दुर्बल मुले आणि त्‍यांचे पालक यांनी त्यांच्‍या उबदार वातावरणातून शिक्षणाकरीता बाहेर पडल्‍यावर सर्व सुविधायुक्‍त पंचतारांकित जिवन पाहिजे, जे शिक्षणाची गुणवत्‍तेवरुन लक्ष विचलित करणारे आहे. तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील संपूर्ण कथन नाकारुन सदर तक्रार ही दंडासह खर्चासह खारीज करावी. वि.प.क्र. 2 चे पुढे असे म्‍हणणे आहे की, अशा परिस्थितीत तक्रारकर्तीने सत्र पूर्ण केले आणि शंका उपस्थित करणा-या क्‍लासेसलासुध्‍दा तो उपस्थित होती. सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकार आयोगाला नसल्‍याचा पुनरुच्‍चार करीत त्‍यांच्‍या क्‍लासमधील विद्यार्थी उच्‍च गुण मिळवून देशातील चांगल्‍या ठिकाणी प्रवेश घेतला आहे असेही नमूद केले आहे.

 

5.         सदर प्रकरण युक्‍तीवादाकरीता आल्‍यावर आयोगाने उभय पक्षांचा तोंडी युक्‍तीवाद त्‍यांचे वकीलांमार्फत ऐकला. तसेच उभय पक्षांनी दाखल केलेली कथने आणि दस्‍तऐवज यांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ उपस्थित झालेले मुद्दे  व त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे.

 

 

अ.क्र.                   मुद्दे                                                                उत्‍तर

1.       तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ? आणि                              तक्रार आयोगासमोर चालविण्‍यायोग्‍य आहे काय  ?                                  होय.

2.       तक्रारकर्तीची तक्रार विहित कालमर्यादेत आहे काय ?                       होय.

3.       वि.प.च्या सेवेत त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब आहे काय?        होय.

4.       तक्रारकर्ती काय आदेश मिळण्‍यास पात्र आहे ?              अंतिम आदेशाप्रमाणे.

 

  • नि ष्‍क र्ष –

 

 

6.                              मुद्दा क्र. 1तक्रारकर्तीने वि.प.कडे JEE (Main and Advanced)-2015 करीता प्रवेश घेण्‍याकरीता आणि वसतीगृहाच्‍या सोईकरीता रु.2,38,509/- वि.प.ला दिल्‍याचे त्‍यांनी निर्गमित केलेल्‍या पावत्‍यांवरुन दिसून येते. वि.प.क्र. 2 ने सदर प्रकरणी शिक्षण ही वस्‍तू नसून तक्रारकर्ती त्‍यांची ग्राहक होत नाही आणि म्‍हणून सदर तक्रार चालविण्‍याचे अधिकार या आयोगाला नाही असा आक्षेप घेतला आहे. तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दस्‍तऐवज क्र. अ-1 वर वि.प.क्र. 2 चे माहिती पुस्‍तक सादर केलेले आहे. सदर माहिती पुस्‍तकाचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये पृ.क्र. 3 ची सुरुवात

 

TRANSPORTATION   

  • Local Transportation  
  • Free Pickup & Drop facility to your hometown on Festive Holidays  

 

अशी करण्‍यात आलेली आहे.तसेच पुढे CONTENTS मध्‍ये  Library facility, Why Residential, Residential Schedule, Aakash Residency, Dining facility,  Transportation Uniformity  अशा शिर्षकांचा समावेश आहे आणि यामध्‍ये या सर्व नमूद सोई-सुविधा समाविष्‍ट असल्‍याचे वि.प.चे म्‍हणणे आहे. अशा सुविधांकरीता  समावेश आहे.  तसेच प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, वैद्यकीय अधिकारी, वॉर्डन इ. व्‍यवस्‍था पुरविण्‍याबाबत माहितीपुस्तिकेमध्‍ये नमूद केलेले असल्‍याने आणि या व्‍यवस्‍था पुरविण्‍याचे मोबदल्‍यात त्‍यांनी रु.6,500/-, रु.19,500/-, रु.5,000/-, रु.26,600/-, रु.26,000/- होस्‍टेल फी, होस्‍टेल आणि बुक अँड बोर्ड या शिर्षकांतर्गत घेतल्‍याचे दाखल पावत्‍यांच्‍या प्रतींवरुन स्‍पष्‍टपणे दिसून येते आणि सदर पावती ही आकाश रेसिडेंसी यांनी दिलेली असल्‍याने वि.प.चे म्‍हणणे की त्‍यांनी वसतीगृहाची सोय उपलब्‍ध करुन दिलेली नव्‍हती आणि ते फक्‍त शैक्षणिक सत्र चालवितात हे मान्‍य करण्‍यायोग्‍य नाही. त्‍यांनी वसगीगृहाची आणि शैक्षणिक बाबीकरीता लागणा-या साहित्‍याची आणि पुस्‍तकाची सुध्‍दा सेवा तक्रारकर्त्‍याला उपलब्‍ध करुन दिलेली असल्‍याने वि.प.चा तक्रारकर्ता ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, नवी दिल्ली, 3 सदस्यीय खंडपिठाने “Manu Solanki & Ors - Versus- Vinayaka Misssion University, decided on 20.01.2020, I (2020) CPJ 210 (NC)” ग्राहक तक्रारी व रिवीजन पिटिशन मध्ये ग्राहक सरंक्षण कायद्याअंतर्गत शिक्षण क्षेत्रासंबंधित तक्रारी निवारण करताना लागू असलेल्या विविध कायदेशीर तरतुदींचा विस्तृत ऊहापोह करीत दि 20.01.2020 रोजी आदेश पारित केला. मा राष्ट्रीय आयोगाने खाजगी शिकवणी वर्ग (प्रायवेट Coaching Classes) शैक्षणिक संस्था (Educational Institution) या व्याख्येत मोडत नसल्याचे स्पष्ट करीत त्यांची शाळा व कॉलेजशी तुलना करणे शक्य नसल्याचे स्पष्ट निरीक्षणे नोंदविली आहेत. तसेच खाजगी शिकवणी वर्गांच्या सेवेत त्रुटि अथवा अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब असल्यास त्याविरुद्ध ग्रा.सं कायद्या अंतर्गत तक्रार निवारण्याचे आयोगास अधिकार क्षेत्र असल्याचे स्पष्ट निरीक्षणे वरील आदेशात परिच्छेद क्रं 45 व 46 मध्ये नोंदविली आहेत. सबब, वि.प.चा सदर आक्षेप फेटाळून लावण्‍यात येतो. वि.प.ने शिक्षणासोबत इतरही सेवा पुरविल्‍याचे स्पष्ट असल्याने सदर तक्रार ही आयोगासमोर चालविण्‍यायोग्‍य असल्‍याचे आयोगाचे स्पष्ट मत आहे. म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

  1.                               मुद्दा क्र. 2सदर प्रकरणी विद्यार्थ्‍यांना वि.प.क्र. 2 च्‍या वसतीगृहामध्‍ये गेल्‍यावर त्‍यांनी आश्‍वासित केलेल्‍या सुविधा मिळाल्‍या नाहीत आणि माहिती पुस्तिकेमध्‍ये नमूद उच्‍च शिक्षीत तज्ञ मंडळीकडून विद्यार्थ्‍यांना शिकविण्‍यात येणार असे म्‍हटले आहे आणि वि.प.ने राहण्‍याची, भोजनाची, शिक्षणाची आणि वाहतूकीची सुविधा उपलब्ध करुन देण्‍याकरीता वि.प.ने तक्रारकर्तीकडून रु.2,38,509/- स्विकारले आहे. प्रत्‍यक्षात मात्र शिकवीणारा वर्ग हा कुशल शिक्षकवर्ग नव्‍हता आणि उपरोक्‍त नमूद सुविधांमध्‍ये अनेक त्रुट्या असल्याने तक्रारकर्तीने सदर रक्‍कम ही परत मिळण्‍याकरीता वारंवार वि.प.ला ई-मेलद्वारे, पत्राद्वारे आणि नोटीसद्वारे सुचित केले आहे. परंतू वि.प.ने त्‍याकडे दुर्लक्ष केले आणि अद्यापर्यंत त्‍यांनी न पुरविलेल्‍या सेवेबाबत घेतलेली रक्‍कम परत केली नसल्‍याने वादाचे कारण सतत सुरु आहे. तसेच दि.09.06.2015 रोजी दाखल केलेली तक्रार ग्रा.सं. कायदा 1986, कलम 24 –ए नुसार असलेल्या 2 वर्षाच्या कालमर्यादेत दाखल केल्याचे दिसते. सबब, मुद्दा क्र. 2 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

 

  1.                               मुद्दा क्र. 3सदर प्रकरणात दाखल केलेल्‍या ई-मेलच्‍या प्रतींचे अवलोकन केले असता सर्व पालकांतर्फे नियुक्‍त करण्‍यात आलेले अजय पाल्यारपवार व अभय तुम्‍मुरवार यांनी वि.प.क्र. 2 ला सुध्‍दा वारंवार पत्रव्‍यवहार आणि ई-मेलद्वारे विद्यार्थ्‍यांच्‍या होणा-या गैरसोयीची माहिती दिलेली आहे. तसेच विद्यार्थ्‍यांना शिकविणारे शिक्षक वर्ग हा निकृष्‍ट दर्जाचा होता आणि त्‍यामुळे वि.प.क्र. 2 च्‍या नावाची गुणवत्‍ता खालावत असल्‍याबाबतही अजय पाल्यारपवार यांनी दि.11 ऑगस्‍ट, 2013 रोजी कळविले आहे. यावरही वि.प.क्र. 2 यांनी त्‍यांच्‍या शिक्षण संस्‍थेमध्‍ये गुणवत्‍ता नसलेले शिक्षक शिकवित असल्याचे माहिती झाल्‍यावरही त्‍यामध्‍ये सुधारणा केली नाही. ‘’आकाश इंस्‍टीट्युट’’ म्‍हणजे उच्‍च गुणवत्‍ता असलेली शिक्षण संस्‍था नावारुपास आलेली संस्‍था असल्‍याचे वि.प.क्र. 2 चे म्‍हणणे आहे आणि याच नामांकितपणामुळे ते विद्यार्थ्‍यांकडून भरपूर शुल्‍क आकारतात. परंतू नागपूर येथील सदर संस्‍था ही तक्रारकर्त्‍याकडून केवळ संस्‍थेच्‍या नावाचे आकर्षक जाहिरात आणि व्‍यवस्‍थापन दर्शवून भरपूर शुल्‍क आकारीत असल्‍याचे दाखल दस्‍तऐवजावरुन दिसून येते. उच्‍च शैक्षणिक अर्हता नसलेला शिक्षक वर्ग ठेवून केवळ लाभ मिळविण्‍याचे दृष्‍टीने त्‍याबाबत वि.प.ने बरीच रक्‍कम वसूल केल्याचे दाखल पावत्‍यांवरुन दिसून येते.            

        

9.               वि.प.क्र.2 तक्रारकर्तीला कुठलीही राहण्‍याची, खाण्‍याची आणि वसतीगृह ते कॉलेज ये-जा करण्‍याकरीता गाडीची व्‍यवस्‍था पुरविण्‍याचे आश्‍वासन दिले  नाही, त्यामुळे तक्रारकर्ती सेवेतील त्रुटी झाली असे नमूद करु शकत नाही असे वि.प.क्र. 2 ने लेखी उत्‍तरात म्‍हटले आहे. परंतू माहिती पुस्‍तीकेमध्‍ये आकाश रेसिडेंसी म्‍हणून जाहिरात दिली आहे आणि त्‍यामध्‍ये “2 Year Residential Programme For AIPMT/IIT-JEE/AIEEE”  नागपूर सेंटर असे नमूद करण्‍यात आले आहे. तसेच पुढे याच माहितीपुस्‍तीकेमध्‍ये डायनींग, आंघोळीकरीता गरम पाणी, थंड पाणी, पॉवर बॅक अप (जनरेटर), सीक रुम विथ मेडीकल फॅसिलीटी, डॉक्‍टर ऑन कॉल, टेबल टेनिस, चेस, कॅरम बोर्ड इ., अभ्‍यासाकरीता स्‍वतंत्र खोल्‍या आणि लायब्ररी इ. सोई पुरवून उत्‍कृष्‍ट दर्जाचे शैक्षणिक वातावरण निर्मितीकरीता उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल असेही नमूद आहे. तसेच “You Care We Care Home Care” शिर्षक देऊन घराप्रमाणे काळजी घेण्‍याचे आश्‍वासन दिले नाही. वि.प.क्र. 2 मात्र लेखी उत्‍तरामध्‍ये या सर्व बाबी नाकारीत आहे. वि.प.क्र. 2 चा असा दृष्‍टीकोन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारा असल्‍याचा दिसून येतो. तसेच मुलांना प्रवेश देतांना त्‍यांना आणि त्‍यांच्‍या पाल्‍यांना अशी आकर्षक माहिती पत्रके दाखवून व त्‍यांच्‍याकडून अवाढव्‍य प्रमाणात त्‍या सेवेकरीता शुल्‍क आकारुन प्रत्यक्षात मात्र त्‍या मुलांची गैरसोय होत असतांना आणि त्‍यांनी तक्रारी केल्‍यावरही आणि वसतीगृह सोडून जाण्‍याची पाळी येईपर्यंत तक्रारींवर दुर्लक्ष करणे हे वि.प.क्र. 1 आणि 2 चे वर्तन तक्रारकर्त्‍यांच्‍या बाबतीत अक्षम्‍य निष्‍काळजीपणा केल्‍याचे निदर्शनास येते. सबब, वि.प.क्र. 2 ने तक्रारीवर घेतलेले सर्व आक्षेप फेटाळून लावण्‍यात येत असून वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्‍यास आश्‍वासित केलेली सेवा न पुरवून सेवेत त्रुटी केल्‍याचे व दिशाभूल करणा-या जाहिराती देऊन अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे दस्‍तऐवजासह स्‍पष्‍ट होते आणि म्‍हणून मुद्दा क्र. 3 वरील निष्‍कर्ष होकारार्थी नोंदविण्‍यात येतात.

 

10.              मुद्दा क्र. 4सदर प्रकरणात तक्रारकर्तीने तिच्‍या वसतीगृहातील खोल्‍यांमध्‍ये पावसाळयाचे पाणी जमा होत होते. पावसाळयाचे पाणी जमा झाल्‍याने भिंतीवर, गाद्या, कपडे आणि पुस्‍तके यांचेवर बुरशी वाढायला लागली होती असे तक्रारकर्तीचे म्‍हणणे आहे आणि त्‍याबाबत त्‍यांनी त्यांच्‍या पालकांनी नियुक्‍त केलेल्‍या श्री.पाल्‍यारपवार आणि तुम्‍मरवार यांचेमार्फत वेळोवेळी तक्रारी केल्‍याचे दाखल ई-मेलच्‍या प्रतींवरुन दिसून येते. परंतू तक्रारकर्त्‍याच्‍या आरोग्‍याशी खेळणा-या वि.प.ने याबाबत कुठलीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. वसतीगृहातील मुलांना त्‍यांची खाण्‍याची राहण्‍याची गैरसोय होत असल्‍याने ते सोडण्‍याची पाळी आली आणि ही बाब त्‍यांच्‍या वार्डनने मान्‍य केल्‍याचे तक्रारीत तक्रारकर्त्‍याने नमूद केले आहे. वि.प.क्र. 2 ने जरी ही बाब नाकारली असली तरी संबंधित नमूद वार्डनचे नकार देणारे कुठलेही प्रतिज्ञापत्र किंवा इतर दस्‍तऐवज दाखल केलेला नाही. तक्रारकर्तीची तक्रार आयोगात दाखल झाल्‍यानंतर नोटिस बजावल्‍यानंतरही वि.प.क्र. 1 आयोगासमोर उपस्थित झाला नाही अथवा तक्रारीस व दस्‍तऐवजांना समर्पक उत्‍तर देऊन ते खोडून काढलेले नाही. त्‍यामुळे वि.प.क्र. 1 ला तक्रारीतील सर्व बाबी मान्‍य असल्याचे गृहीत धरण्यास आयोगास हरकत वाटत नाही. तक्रारकर्तीने ज्‍या सुविधा वि.प.कडून मिळतील म्‍हणून मोबदला दिला आहे, त्‍या त्‍यांना मिळाल्‍या नसल्‍याने त्‍यांनी वि.प.ला त्‍याबाबत दिलेली रक्‍कम ही व्‍याजासह मिळण्‍यास ते पात्र असल्‍याचे आयोगाचे मत आहे.

 

11.        वि.प.च्या वकिलांनी मौखिक युक्तीवादा दरम्यान त्याच्या निवेदनाच्या समर्थनार्थ मा. राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली व मा राज्य आयोग, रांची,झारखंड यांचे खालील न्‍याय निवाडे दाखल केले.

 

1) FIITJEE LTD Vs S Balavignesh, Revision Petition No 2684 of 2014, decided on 09.01.2015,( NC),

2) Homeopathic Medical College & Hospital v/s Miss Gunita Virk”. Vol 1(1996) CPJ 379(NC),

3) Ansuman das Gupta - Versus- FIITJEE & Anr, First Appeal No 88 of 2008, decided on 15.05.2008, IV (2008) CPj 4(2020) CPJ 210 (Jharkhand State Commisssion)”

 

प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारकर्तीने स्‍वतःच्‍या वैयक्‍तीक कारणास्‍तव प्रवेश रद्द केलेला नसून वि.प.च्‍या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्तीला प्रवेश रद्द करावा लागला. मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, नवी दिल्ली, 3 सदस्यीय खंडपिठाने “Manu Solanki & Ors - Versus- Vinayaka Misssion University, (supra) या प्रकरणी दि 20.01.2020 रोजीच्या आदेशात नोंदविलेले निष्कर्ष प्रस्‍तुत प्रकरणात लागू आहेत. त्यामुळे वि.प.ने सादर केलेले वरील निवाडे प्रस्तुत प्रकरणी गैरलागू असल्याचे आयोगाचे मत आहे.

 

12.              तक्रारकर्तीने पृ.क्र. 32, 33 वर दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजानुसार, वि.प.क्र. 2 ने दि.18.09.2013 रोजी सार्वजनिक सुचना देऊन त्‍यांची फ्रेंचाईजी ही 13 फेब्रुवारी, 2015 ला समाप्‍त होत असल्‍याचे वर्तमानपत्रातून जाहिर केले आहे. दि.13 फ्रेब्रुवारी, 2015 नंतर प्रवेश घेणा-यांनी स्‍वतःच्‍या जोखिमेवर घ्‍यावी असेही त्‍यांनी सुचित केले आहे. यावरुन असे दिसून येते की, वि.प.क्र. 1 चे व्‍यवस्‍थापन हे सदोष होते. तसेच वि.प.क्र. 2 ने 13 फेब्रुवारी, 2015 नंतर प्रवेश घेणा-यांबाबत काही प्रश्‍न किंवा कायदेशीर बाबी निर्माण झाल्‍यास ते जबाबदार राहणार नाही असे नमूद केले आहे. यावरुन असे निष्‍पन्‍न होते की, 13 फेब्रुवारी, 2015 पूर्वी प्रवेश घेणा-यांकरीता काही प्रश्‍न उत्‍पन्‍न झाल्‍यास वि.प.क्र. 2 चे वि.प.क्र. 1 फ्रेंचाईजी असल्‍याने वि.प.क्र. 2 वि.प.क्र. 1 च्‍या प्रत्‍येक योग्‍य वा अयोग्‍य बाबीस जबाबदार राहतील. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रारीतील गैरसोईस वि.प.क्र. 2 आपण जबाबदार नाहीत म्‍हणून नाकारु शकत नाही. फ्रेंचाईजीच्‍या प्रत्‍येक कृतीस वि.प.क्र. 2 जबाबदार आहेत. तसेच वि.प.च्‍या प्रत्‍येक जाहिरातीमध्‍ये आकाश इंस्‍टीट्युटचे छापील चिन्‍ह आणि नाव असल्‍याने, 13 फेब्रुवारी, 2015 पूर्वी प्रवेश घेतला असल्‍याने  वि.प.क्र. 2 सदर तक्रारीस नाकारु शकत नाही. वि.प.क्र. 2 ने संपूर्ण तक्रार नाकारण्‍याचे पुष्‍टयर्थ कुठलेही समर्थनीय दस्‍तऐवज दाखल केलेले नाही. तक्रारकर्त्‍याला नियमित स्‍वरुपात आणि चांगल्या वातावरणात अभ्‍यास करता आला नाही, वि.प.च्‍या चांगल्‍या शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन मिळाले नाही, राहण्‍याच्‍या आणि खाण्‍याच्‍या गैरसोईमुळे त्‍याला मानसिक आणि शारिरीक त्रास झाला या सर्वांमुळे तक्रारकर्तीच्‍या शैक्षणिक कालावधीचे आणि भविष्‍यामध्‍ये त्‍याचे आधारावर असलेल्‍या पुढील शिक्षणाचे नुकसान झाले. तक्रारकर्तीने तक्रारीमध्‍ये तिने वि.प.कडे एकूण रु.3,80,085/- रक्‍कम दिल्याने ती परत मिळण्‍याची मागणी केलेली आहे. आयोगाने दाखल पावत्‍यांच्‍या प्रतींचे अवलोकन केले असता तक्रारकर्तीने रु.1,41,576/- ही रक्‍कम दोन पावत्‍यांमध्‍ये सारख्‍याच धनादेशाच्‍या क्रमांकाची एक प्रोव्‍हीजनल रीसीप्‍ट व दुसरी फी रीसीप्‍ट म्‍हणून अभिलेखावर सादर केलेली आहे आणि हीच रक्‍कम दोनवेळेस मागितली आहे. संपूर्ण पावत्‍यांच्‍या प्रतींचे काळजीपूर्वक अवलोकन केले असता तक्रारकर्ती तिने दिलेली मोबदला रक्‍कम रु.2,38,509/- व्‍याजासह परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे.  

 

 

13.              वि.प.च्‍या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्तीला त्‍याचा प्रवेश रद्द करावा लागला. परिणामी त्‍याच्‍या तक्रारकर्तीचे भविष्‍यातील शिक्षणावर परिणाम झाला. तक्रारकर्तीला सदर त्रासाबाबत आर्थिक नुकसान भरपाई जरी दिली तरी तिच्‍या भविष्‍यावर झालेला आणि तिच्‍या कारकीर्दीवर झालेला परिणाम हा भरुन नीघू शकत नाही. असे जरी असले तरी तक्रारकर्ती माफक नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. तक्रारकर्तीच्‍या पालकांनी वि.प.ला होत असलेल्‍या गैरसोईची आणि मोबदला देऊन सुविधा उपलब्ध करुन न दिल्‍याने त्‍याला वारंवार वि.प.क्र. 1 व 2 सोबत पत्रव्‍यवहार (ई-मेल), नोटीस इ. कारवाई करावी लागली. सदर कार्यवाहीचा खर्च मिळण्‍याससुध्‍दा तक्रारकर्ती पात्र असल्‍याचे आयोगाचे मत आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील एकंदर वस्‍तुस्थितीचा विचार करता वि.प.क्र. 1 व 2 यांचेमधील अंतर्गत वाद हा तक्रारकर्तीच्‍या नुकसानीस जबाबदार आहे. वि.प.क्र. 1 च्‍या वर्तणुकीने वि.प.क्र. 2 ची फ्रेंचाईजी संपुष्‍टात आलेली आहे. 

 

14.              प्रस्तुत तक्रारीत अंतिम आदेश पारित करण्यात येत असल्याने सर्व प्रलंबित किरकोळ अर्ज निकाली काढण्यात येतात.

 

 

15.              प्रकरणातील वस्‍तुस्थिती, पुराव्‍याचा व वरील नमूद कारणांचा निष्‍कर्षानुसार आणि उपलब्‍ध दस्‍तऐवजानुसार विचार करता आयोग सदर प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. 

 

अंतिम आदेश 

 

1)   तक्रारकर्तीची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येत असून वि.प.क्र. 1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला रु.2,38,509/- शेवटची रक्‍कम दिल्‍याचे दि.02.02.2014 पासून प्रत्यक्ष अदायगी पर्यन्त द.सा.द.शे.12% व्याजासह परत करावे.

2)   वि.प.क्र. 1 व 2 ने तक्रारकर्तीस झालेल्‍या शारिरीक आणि मानसिक त्रासापोटी रु.30,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.10,000/- द्यावेत.

3)   वि.प.क्र. 1 व 2 ने संयुक्‍तपणे किंवा पृथ्‍थकपणे वरील आदेशाची पुर्तता निकालपत्राची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

4)   उभय पक्षकारांना निकालपत्राची प्रत निःशुल्‍क पाठविण्‍यात यावी.

 

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. AVINASH V. PRABHUNE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.