Maharashtra

Sangli

CC/09/2199

SHRI MAHADEV SITARAM THOMBARE - Complainant(s)

Versus

AJINKYA NAGARI SAHAKARI PATSANSTHA MARYADIT SANGLI AND OTHERS 12 - Opp.Party(s)

ADV. N.M.JAGADALE

12 Aug 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/09/2199
 
1. SHRI MAHADEV SITARAM THOMBARE
STATION ROAD SANGLI
SANGLI
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. AJINKYA NAGARI SAHAKARI PATSANSTHA MARYADIT SANGLI AND OTHERS 12
HARBHAT ROAD SANGLI
SANGLI
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
  Geeta Ghatge MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                            नि.२७
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
                                                    
                                           मा.अध्‍यक्ष : श्री.अनिल य.गोडसे    
                                         मा.सदस्‍या :  श्रीमती गीता घाटगे   
                            
ग्राहक तक्रार अर्ज क्र.२१९९/०९
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख   :  २३/१०/२००९
तक्रार दाखल तारीख  :  २४/१०/२००९
निकाल तारीख       १२/०८/२०११
-------------------------------------------
 
श्री महादेव सिताराम ठोंबरे
व.व. ५७, धंदा मजुरी
रा.वांगीकर प्‍लॉट, स्‍टेशन रोड, सांगली                                  ..... तक्रारदारú
  
 विरुध्‍द
 
१.  अजिंक्‍य नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादित
   मुख्‍य शाखा ओक बिल्‍डींग, हरभट रोड,
   जुने मुरलीधर मंदीराशेजारी, सांगली
२. अजिंक्‍य नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादित सांगली
    उपशाखा शिंदे मळा
३. संजय बंडुजी पवार
    समर्थ कॉलनी, दत्‍त मंदिराशेजारी, ११० फुटी रोड,
    सांगली
४. श्री राजेंद्र रामचंद्र कासार,
    गुड होम टेरेस, पत्रकार नगर
५. निलेश हणमंत पवार, व्‍हाईस चेअरमन
    विघ्‍नहर्ता, पत्रकार नगर, सांगली
६. श्री महंमद दावलसाब शेख, संचालक
    रा. भारत नगर, कोल्‍हापूर रोड, सांगली
७. श्री अरुण दत्‍तात्रय सुर्यवंशी, संचालक
    रा.द्वारा अजिंक्‍य टॉवर्स, गाळा नं.४,
    माळी टॉकीज शेजारी, सांगली
८. श्री अजय दिनकरराव चोपडे, संचालक
    रा.गणेशनगर, स्‍वीमिंग टॅंक, ३ री गल्‍ली, सांगली
९. सौ लिलाताई शंकर राणे, संचालक
    रा. सरकारी तालीम समोर, गवळी गल्‍ली, सांगली
१०. श्री पोपट बाळकृष्‍ण राउत, संचालक
    रा. अरिहंत कॉलनी, १०० फुटी रोड, सांगली
११. श्री प्रमोद बळवंत कांबळे,
    रा.चैत्‍यगृह, १६१०, गणेशनगर, ४ थी गल्‍ली,
    सांगली
१२. श्री भारत तुकाराम जाधव, संचालक
    द्वारा अजिंक्‍य टॉवर, गाळा नं.३, माळी गल्‍ली,
    सांगली
    (दि.१०/८/२०११ रोजीचे मंचाचे आदेशान्‍वये वगळले.)
१३. सौ कुसुम महादेव कदम
    नूतन नामदेव मंदिर शेजारी, सांगली                 .....जाबदार
                              
                                  तक्रारदारú तर्फेò           : +ìb÷. एन.एम.जगदाळे
 जाबदार क्र.१ ते ११ व १३ : एक‍तर्फा
 जाबदार क्र.१२           : वगळले
 
नि का त्र
 
द्वारा- अध्‍यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने मुदत ठेवी अन्‍वये गुंतविलेली रक्‍कम परत दिली नाही म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार अजिंक्‍य नागरी सहकारी पतसंस्‍था मर्यादित (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे पतसंस्‍था असा केला जाईल) यांचेकडे रक्‍कम मुदतठेवी अंतर्गत गुंतविली होती. तक्रारदार यांच्‍या मुदत ठेवीची रक्‍कम मागणी करुनही जाबदार यांनी अदा केली नाही. सबब, आपल्‍याला रक्‍कम देवविण्‍यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ नि.३ अन्‍वये प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण ४ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणी जाबदार क्र. १ ते ११ व १३ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्‍यात आला.
 
३.    प्रस्‍तुत प्रकरणी जाबदार क्र.१२ यांना नि.२४ अन्‍वये दाखल करण्‍यात आलेल्‍या अर्जावरील मंचाच्‍या आदेशान्‍वये वगळणेत आले.
 
४.    तक्रारदारांनी त्‍यांची रक्‍कम जाबदार पतसंस्‍थेमध्‍ये गुंतविल्‍याबाबतची प्रत नि.२६ चे यादीने दाखल केली आहे. तक्रारदार यांनी ठेवपावती क्र.८१८, ८१९ व ८२० अन्‍वये प्रत्‍येकी रक्‍कम रु.४०,०००/- जाबदार यांचेकडे दि.२४/५/२००६ रोजी गुंतविल्‍याचे दिसून येते. सदर ठेवपावत्‍यांपैकी ठेवपावती क्र.८१८ व ८१९ वर दि.१०/७/२००६ पर्यंत व्‍याज मिळाल्‍याचे तसेच ठेव पावती क्र.८२० वर दि.२०/७/२००६ पर्यंत व्‍याज मिळाल्‍याचे तक्रारदार यांनी नि.२१ वर निवेदनाद्वारे नमूद केले आहे व त्‍याच्‍या पृष्‍ठयर्थ नि.२३ वर शपथपत्र दाखल केले आहे. सदर ठेवपावतीवर व्‍याजाचा दर हा १० टक्‍के दर्शविला आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी गुंतविलेली रक्‍कम व त्‍यावर १० टक्‍के दराने व्‍याज मंजूर करण्‍यात येत आहे. सदरचे व्‍याज हे ज्‍या तारखेपासून मिळाले नाही, त्‍या तारखेपासून मंजूर करण्‍यात येत आहे.
 
५.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार पतसंस्‍थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
 
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. २ ते ११ व १३ यांना  पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो. रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने ज्‍या पतसंस्‍थेमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्‍थाच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो. 
 
६.    तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्‍कम मिळण्‍यासाठी या न्‍यायमंचात धाव घ्‍यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्‍यामुळे सदरची मागणी अंशत: मान्‍य करण्‍यात येत आहे.
 
सबब, मंचाचा आदेश की,
दे
 
१. यातील जाबदार क्र.१ पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.८१८, ८१९ वरील गुंतविलेली एकूण रक्‍कम रु.८०,०००/-व या रकमेवर दि.११/७/२००६ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्‍याज अदा करावे.
 
२. यातील जाबदार क्र.१ पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.८२० वरील गुंतविलेली एकूण रक्‍कम रु.४०,०००/-व या रकमेवर दि.२१/७/२००६ पासून द.सा.द.शे. १०% दराने व्‍याज अदा करावे.
 
३.  यातील जाबदार क्र.१ पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- अदा करावेत.
 
४. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.२५/९/२०११ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांकò: १२/०८/२०११    
 
                  (गीता सु.घाटगे)                     (अनिल य.गोडसे÷)
                       सदस्‍या                                       अध्‍यक्ष           
                          जिल्‍हा मंच, सांगली                      जिल्‍हा मंच, सांगली.  
       
 
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[ Geeta Ghatge]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.