तक्रार क्र. CC/41/16 दाखल दि. 06.05.2016
आदेश दि. 15.10.2016
तक्रारकर्ता :- 1. भगतराम भगवानदास कौरानी
वय – 53 वर्षे, धंदा – व्यापार
रा.गुरुनानक वार्ड, सिंधी कॉलनी
भंडारा
-: विरुद्ध :-
विरुद्ध पक्ष :- 1. अजिंक्य बिल्डकॉम,
व्दारा प्रोप्रा श्री प्रशांत पुंडलीक निखाडे
रा.राजस्व कॉलनी,पटवारी भवनच्या मागे
राष्ट्रीय महामार्ग क्र.6, भंडारा
गणपूर्ती :- मा. अध्यक्ष श्री मनोहर चिलबुले
मा. सदस्य हेमंतकुमार पटेरिया
उपस्थिती :- तक्रारकर्तीतर्फे अॅड.एन.पी.देवगडे
व अॅड. एस.एस.वडनेरकर
वि.प. – एकतर्फी
.
(आदेश पारित द्वारा मा. सदस्य श्री हेमंतकुमार पटेरिया)
-// आ दे श //-
(पारित दिनांक 15 ऑक्टोबर 2016)
1. तक्रारकर्तीने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटीबाबत दाखल केलेली आहे.
तक्रारीचा आशय खालीलप्रमाणे
2. विरुध्द पक्ष यांनी गुरुनानक वॉर्ड, शास्त्रीनगर, भंडारा येथे गट क्रमांक 583/1 आणि 584/1 या भुखंडावर श्री साई अपार्टमेंट क्र.1 ने बांधकाम करुन एकुण 16 सदनिका (Flats) विकण्याचे प्रयोजन 2012 साली केले होते. तक्रारकर्तीने त्यापैकी तिस-या मजल्यावरील क्रमांक 302 ही सदनिका विरुध्द पक्षाकडून विकत घेण्याचा करार दिनांक 04/05/2012 रोजी केला. करारानुसार सदर सदनिकेची रक्कम रुपये 15,51,000/- (पंधरा लाख एक्कावन्न हजार) ठरली होती व त्या अनुषंगाने तक्रारकर्तीने विरुध्द पक्षास पुढीलप्रमाणे रक्कम दिल्या आहेत.
1. दिनांक 05/04/2012 रुपये 1,00,000/-(एक लक्ष)
2. दिनांक 04/05/2012 रुपये 3,00,000/-(तीन लाख)
अशी एकुण रक्क्म रुपये 4,00,000/-(चार लाख) विरुध्द पक्षास दिले. करारानुसार उर्वरित रक्कम रुपये 11,51,000/-(अकरा लाख एक्कावन्न हजार) पैकी रुपये 10,00,000/-(दहा लाख) चार समान हप्त्यांमध्ये व रुपये 1,51,000/-(एक लाख एक्कावन्न हजार) ताबा घेतेवेळी म्हणजेच 30/4/2012 पुर्वी तक्रारकर्तीने विरुध्द पक्षास दयावयाचे होते.
3. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास उर्वरीत रक्कम रुपये 11,51,000/- देय असणारी रक्कम बँकेकडून गृह कर्ज घेऊन घ्यावयाचे होते. त्या अनुषंगाने तक्रारकर्त्याने जुन 12 मध्ये बँकेत चौकशी केली असता गृह कर्ज काढण्याकरीता अपार्टमेंटच्या परवानगीची कागदपत्रे, मंजुर नकाशा व इतर आवश्यक दस्तावेज जरुरी आहे. तक्रारकर्त्याने गृह कर्ज काढण्याकरीता संबंधीत दस्ताऐवज देण्यासाठी विरुध्द पक्षाला विनंती केली. परंतु विरुध्द पक्षाने बांधकाम मंजुरीकरीता फाईल नगरपरिषद भंडारा येथे प्रलंबीत असल्याचे सांगून तक्रारकर्त्यास कागदपत्रे गृह कर्जाकरीता उपलब्ध करुन दिली नाही. विरुध्द पक्ष यांनी दिनांक 30/04/2013 पर्यंत सदनिकेचे सर्व बांधकाम पुर्ण करुन उर्वरित रक्कम तक्रारकर्तीकडून घेवून सदर सदनिकेचा ताबा देण्याचा करार केला होता. परंतु विरुध्द पक्ष यांनी ठरलेल्या मुदतीत सदनिकेचे आणि संपुर्ण अपार्टमेंटचे बांधकाम पुर्ण केले नाही.
4. तक्रारकर्तीने तक्रार दाखल करेपर्यंत विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचे सदनिकेला केवल प्लास्टर केलेले होते. सदर सदनिकेच्या भिंतींना पुटींग, रंग इत्यादि केलेले नाही. विजेच्या व नळाच्या जोडण्या देखील केल्या नाहीत. टाईल्स, स्वयंपाक घरातील ओटा, खिडक्या, दरवाजे, ग्रील्स या देखील विरुध्द पक्ष यांनी सदर सदनिकेस बसविल्या नाहीत. केवल सदर सदनिकेचीच नव्हे तर इमारतीचे काम देखील विरुध्द पक्ष यांनी अर्धवट केले आहे. सर्व सदनिकांच्या नळाच्या व सांडपाण्याच्या पाईपच्या जोडण्या इमारतीच्या मुख्य पाईपला बसविण्याचे काम सुध्दा केलेले नाही.
5. तक्रारकर्तीने दिड वर्षापासून सतत विरुध्द पक्षास सदनिकेचे बांधकाम पुर्ण करुन ताब्या देण्यासाठी विनंती केली. तथापि विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीचे विनंतीला दाद देत नसल्याने तक्रारकर्तीने विरुध्द पक्षास आपले वकीलामार्फत दिनांक 17/08/2015 ला नोटीस पाठविली परंतु विरुध्द पक्षाने सदर नोटीस स्विकारली नाही.
6. विरुध्द पक्ष यांनी गृहकर्ज काढण्याकरीता संबंधीत दस्तावेज न देणे आणि सदनिकेचे बांधकाम ठराविक वेळेत न करणे ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी असल्यामुळे सदरहू तक्रार न्यायमंचात दाखल केली आहे आणि खालील प्रमाणे मागणी केली आहे.
1. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारास इसारापोटी दिलेली रक्कम
रुपये 4,00,000/- दिनांक 5/4/2012 पासुन
द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासकट परत करण्याचा
गैरअर्जदारास आदेश व्हावा.
2. तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी
आणि गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रृटीबाबत नुकसान भरपाई
म्हणुन रुपये 5,00,000/- देण्याचा गैरअर्जदारास आदेश
व्हावा.
3. तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 50,000/- देण्याचा आदेश
व्हावा.
विरुध्द पक्षास नोटीस मिळून सुध्दा ते सदरहू प्रकरणात हजर न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फी प्रकरण चालविण्याचा निर्णय दिनांक 10/10/2016 ला न्यायमंचाने घेतला.
7. तक्रारकर्तीने तक्रारीच्या पृष्ठर्थ्य दस्तऐवज यादीप्रमाणे 6 दस्तऐवज दाखल केले आहे. Ex.4 वर दाखल केले आहे.
8. तक्रारकर्तीचे वकील अॅड.एन.पी.देवगडे यांनी युक्तीवाद केला की विरुध्द पक्ष यांनी गुरुनानक वार्ड, शास्त्रीनगर, भंडारा मधील गट क्र.583/1 आणि 584/1 या भुखंडावर श्री साई अपार्टमेंट चे बांधकाम करुन तेथील सदनिका विकण्याचे प्रयोजन 2012 साली केले.
9. तक्रारकर्तीने त्यापैकी तिस-या मजल्यावरील क्रमांक 302 ही सदनिका विरुध्द पक्षाकडून घेण्याचा करार दिनांक 04/05/2012 रोजी केला. करारानुसार सदर सदनिकेची रक्कम रुपये 15,51,000/-(पंधरा लाख एक्कावन्न हजार) ठरली होती. त्याअनुषंगाने तक्रारकर्तीने दिनांक 4/5/2013 पर्यंत एकुण रक्कम रुपये 04 लक्ष विरुध्द पक्षास दिले. उर्वरित रक्कम रुपये 11,51,000/-(अकरा लाख एक्कावन्न हजार) विरुध्द पक्षास दिनांक 30/4/2013 पर्यंत सदनिकेचे सर्व बांधकाम पुर्ण करुन सदर सदनिकेचा ताबा घेतेवेळी दयावयाचे होते. परंतु विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्तीने मागणी करुनही कर्ज मंजुरीसाठी आवश्यक दस्तावेज न पुरविल्याने तक्रारकर्तीस बँकेकडून कर्ज मंजुर झाले नाही तसेच तक्रार करतेवेळीपर्यंत सदर सदनिकेचे काम पुर्ण केलेले नाही. तक्रारकर्तीचे वकील यांनी दिनांक 17/08/2015 रोजी नोटीस पाठवून सदर सदनिकेचे बांधकाम पुर्ण करण्याकरीता विनंती केली. परंतु त्यास विरुध्द पक्षाने कोणताही प्रतिसाद दिला नाही.
10. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला गृहकर्ज घेण्याकरीता संबंधीत दस्ताऐवज न देणे व सदर सदनिकेचे बांधकाम पुर्ण न करणे ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी आहे.
11. तक्रारकर्तीची तक्रार, दस्तऐवज, तक्रारकर्तीचे वकील यांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो.
A) तक्रारकर्तीची तक्रार मंजुर होण्यास पात्र आहे काय? – होय.
B) अंतीम आदेश काय? - कारणमिमांसेप्रमाणे
कारणमिमांसा
12. तक्रारकर्तीने गुरुनानक वार्ड,शास्त्रीनगर, भंडारा येथील गट क्रमांक 583/1 आणि 584/1 या भुखंडावरील श्री साई अपार्टमेंट क्र.1 मधील तिस-या मजल्यावरील क्रमांक 302 ही सदनिका एकुण किंमत 15,51,000/-(पंधरा लाख एक्कावन्न हजार) घेण्याचा करार दिनांक 4/5/2012 ला विरुध्द पक्षाशी केला व दिनांक 4/5/2012 रोजी पर्यंत रक्कम रुपये 4 लक्ष विरुध्द पक्षाकडे जमा केले. करारनाम्याची झेरॉक्स प्रत Ex4/2 वर दाखल केली आहे. त्यावरुन तक्रारकर्तीने सदर सदनिका क्रमांक 302 विकत घेण्याचा करार विरुध्द पक्षाशी केला होता आणि त्यापोटी रुपये 4,00,000/-(चार लाख) विरुध्द पक्षाला दिले होते हे स्पष्ट होते.
13. संबंधीत गट क्रमांक 583/1, 584 वर अपार्टमेंटचे बांधकाम परवाना मंजुरी मुख्य अधिकारी नगर परिषद, भंडारा यांचे पत्र क्रमांक नपअ/मुअ/बांध/963/2014 दिनांक 12/05/2014 ला मिळाला.
14. तक्रारकर्तीचे वकील यांनी सदर सदनिकेचा बांधकाम तपासणी अहवाल, अभियंता व्ही.बी.धांडेकर यांचे दिनांक 4/2/2016 रोजीचा तपासणीचा अहवाल Ex.4/6 वर दाखल केला आहे.
अभियंता श्री व्ही.बी.धांडेकर यांचे अहवाला प्रमाणे, Remaining work that is not completed 1. Door panel of flat not provided 2. Electric work of flat & apartments, transformer not completed 3. Sanitory water supply work of flat & apartment not completed 4. Lift for apartment not completed. Overall 70% to 75% of flat and apartment is completed. Construction of apartment and flat is in progress.
15. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीच्या सदनिकेचे काम पुर्ण न करणे आणि तक्रारकर्तीने नोटीसद्वारे दस्तावेजाची मागणी करुनही गृहकर्ज काढण्याकरीता संबंधीत दसावेज न देणे ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रृटी आहे. त्यामुळे तक्रारकर्ता यांनी दिलेले 4 लाख रुपये द.सा.द.शे. 12% व्याजासह मिळण्यास पात्र आहे. याशिवाय तक्रारकर्ती शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 20,000/- आणि तक्रारखर्च रुपये 5,000/- मिळण्यास पात्र आहे.
करीता आदेश पारीत.
अंतीम आदेश
- तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजुर.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याने दिलेली रक्कम रुपये 4,00,000/-(चार लाख)द.सा.द.शे. 12% व्याजासह दिनांक 4/5/2012 पासून ते संपुर्ण पैसे तक्रारकर्तीस मिळेपर्यंतचे व्याजासह दयावे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस मानसिक, शारीरिक त्रासासाठी नुकसान भरपाई म्हणून रुपये 20,000/- (वीस हजार) दयावे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 5,000/-(पाच हजार) दयावे.
- विरुध्द पक्षाने आदेश क्र. 4 व 5 ची अंमलबजावणी आदेशाची
-
- प्रबंधक, जिल्हा ग्राहक मंच, भंडारा यांनी सदर आदेशाची प्रत नियमानुसार तक्रारकर्त्यास विनामुल्य उपलब्ध करुन दयावी.
श्री हेमंतकुमार पटेरिया श्री मनोहर चिलबुले
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,
भंडारा