::: नि का ल प ञ:::
मंचाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या) (पारीत दिनांक :28/08/2019
1 अर्जदाराने सदर तक्रारीसोबत तक्रार दाखल करण्यास झालेल्या विलंबाबद्दल माफी मिळण्याबाबत अर्ज दाखल केला होता, त्यावर गैरअर्जदार यांनी उत्तर दाखल केले व मंचाच्या आदेशा प्रमाणे सदर तक्रारीतील कारण हे सतत घडत असल्या कारणाने सदर प्रकरण गुणवत्तेवर निघाली काढण्याचा आदेश पारित करण्यात आला.
2. अर्जदाराच्या तक्रारीचा आशय असा आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदार विरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा 1 चे कलम 12 अन्वये ग्राहक तक्रार अर्ज गैरअर्जदार विरुद्ध दाखल केलेला आहे. तक्रारीचा थोडक्यात असा आहे की अर्जदाराने गैरअर्जदार यांनी निर्माण केलेले प्लॉट खरेदी केल्याने अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहे अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या माध्यमातून मौजा वडगाव पटवारी अभिलेख नुसार परावर्तित सर्वे नंबर 135 मधील लेआउट यातील प्लॉट क्रमांक 4 यांची एकूण आराजी १७९२चौरस फूट खाली जागा गैरअर्जदाराने अर्जदाराला 450 रुपये प्रति चौरस फूट या भावाने प्लॉटची होणारी एकंदर रक्कम 8,06,449/-रुपये मध्ये प्लॉट विक्री करण्याचा सौदा गैरअर्जदाराने केला असून या सौद्यापोटी गैरअर्जदारला ईसार दाखल एकूण रक्कम,4,50,000/- दिनांक 1.1.2013 रोजी अर्जदारांकडून नगदी रुपाने मिळाले आहे. गैरअर्जदाराने इसार पत्रामध्ये रक्कम 4,50,000/- रुपये अर्ज दाराकडून नगदी मिळाले व उर्वरित प्लॉटची किमतीमधील राहिलेली रक्कम प्लॉटची विक्रीचे वेळी अर्जदाराने गैरअर्जदार ला द्यायचे ठरले. अर्जदाराला गैरअर्जदार हे सदर प्लॉटची विक्री हे दिनांक 1. 5. 2013 रोजी करून देणार होते व विक्रीपूर्वी गैरअर्जदार सदर प्लॉट क्रमांक 4 ची मोजणी करून गोटे गाढून जागेचा हद्दी अर्जदाराला समजाऊन देणार होते व मोजणी मध्ये जेवढी जागा भरेल तेवढा जागेची ठरल्या भावाने होणारी रक्कम अर्जदाराने गैरअर्जदाराला द्यायची होती परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदाराला जागेची मोजणी करून गोटे गाढून च्या जागेची हद्द विक्रीचे तारीख दिनांक 1. 5. 2013 पूर्वी व नंतरही करून दिली नाही. अर्जदाराने सदर प्लॉट विक्री करून देण्यासाठी गैरअर्जदार यांना पुष्कळ वेळा सतत विचारणा केली परंतु अर्जदाराने शेवटी दिनांक 17.4.2013 रोजी प्लॉट ची विक्री करून मिळवण्यासाठी गैरअर्जदार यांना विनंती केली परंतु आजतागायत गैरअर्जदाराने विक्री अर्जदाराला करून दिली नाही. .अर्जदाराने सदर प्लॉट हा निवासी वापराकरता सोयीचा व्हावा म्हणून गैरअर्जदार कडून खरेदी केला होता. गैरअर्जदाराच्या उपरोक्त व्यवहारामुळे दिनांक 12.9.2014 रोजी त्यांच्या वकिलामार्फत गैरअर्जदार यांना नोटीस पाठवली नोटीस मध्ये प्लॉट ची विक्री करून द्यावी किंवा इसार पत्राच्या वेळी घेतलेली रक्कम व्याजासह परत करावी अशी सूचना गैरअर्जदारला दिली परंतु अर्जदाराचे नोटीस गैरअर्जदाराने स्वीकारली नाही गैरअर्जदाराच्या या वागणुकीमुळे अर्जदाराला मानसिक शारीरिक आर्थिक त्रास सहन करावा लागला सबब सदर तक्रार गैरअर्जदार विरुद्ध अर्जदाराने दाखल केलेली आहे
अर्जदारांची मागणी अशी आहे की अर्जदाराला प्लॉट क्रमांक 4 ची रक्कम 4, 50, 000/- रुपये इसार मधेय दिनांक 1 .1 .2013 रोजी दिलेली रक्कम गैरअर्जदार ने परत करावी, तसेच अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक आर्थिक त्रास पोटी १,००,०००/- व तक्रार खर्च रुपये १०,०००/-गैरअर्जदाराने अर्जदाराला देण्याचे आदेश देण्यात यावे.
.
३. गैरअर्जदाराने तक्रारीत त्यांचे उत्तर दाखल करून तक्रारीतील कथन अमान्य करीत नमूद केले कि, अर्जदार यांनी गैरअर्जदार कडून कोणतेच प्लॉट खरेदी केले नसल्यामुळे अर्जदार हे ग्राहक या या व्याखेत बसत नसल्यामुळे सदर तक्रार मोडत खारीज करण्यात यावी. अर्जदाराने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे उपरोक्त प्लॉटचा कोणताही सौदा गैरअर्जदाराने अर्जदारास सोबत केलेला नाही वास्तविक गैरअर्जदार उपरोक्त अशा कोणत्याही प्लॉटचा मालक नसल्याने व गैरअर्जदारा सोबत सदर सौदा किंवा विक्री करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराला इसार पत्र करून दिले नाही,किवा त्याच्याकडू गैरअर्जदाराला कोणतीही रक्कम भेटली नाही तसेच इसार पत्रावरील गैरअर्जदाराची सही सुद्धा खोटी आहे म्हणजेच अर्जदाराने खोटा व बनावटी इसार पत्र तयार केलेले आहे तसेच उपरोक्त तथाकथित प्लॉटची विक्री अर्जदार अर्जदाराला गैरअर्जदार 1. 5. 2013 रोजी करून देणार होते ही बाब अमान्य आहे कारण वास्तविक गैरअर्जदाराने अर्जदारास सोबत अशा कोणत्याही सौदा केला नसल्यामुळे विक्री करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अर्जदाराने गैरअर्जदार विरुद्ध तक्रार क्रमांक 13/
2015 प्लॉटच्या खरेदी संबंधित टाकलेली आहे म्हणजेच अर्जदार हा प्लॉटचा व्यवसाय करतो व म्हणून सुद्धा अर्जदाराची तक्रार विद्यमान यांच्यासमक्ष चालू शकत नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणताही प्लॉट विकलेला नाही किंवा सौदा केलेला नाही रक्कम सुद्धा घेतलेली नाही सबब असा कोणताही व्यवहार अर्जदार व गैरअर्जदार मध्ये झालेला नसल्यामुळे शारीरिक-मानसिक रक्कम देण्याचा खर्च होत नाही सबब हा व्यवहार दिवाणी स्वरूपाचा असल्यामुळे सदर तक्रार चालवण्याचा अधिकार मंचाला नाही सबब सदर तक्रार खर्चासह खारिज करण्यात यावी
4. तक्रारकर्तीची तक्रार दस्तावेज, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद व गैरअर्जदार . यांचे लेखी म्हणणे, पुरावा शपथपत्र लेखी युक्तीवाद तसेच तक्रारकर्ती व वि. प यांचे तोंडी युक्तिवादावरून प्रकरणातील विवादीत मुद्याबाबत मंचाची कारणमिमांसा व निष्कर्ष खालीलप्रमाणे.
कारण मिमांसा
५.. सदर प्रकरणात अर्जदार यांनी तक्रारीसोबत नि.क्र. 5 वर दस्त क्र.1 वर, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदाराला विवादीत प्लॉटचे विक्रीसंबंधाने करून दिलेले इसारपत्र दाखल केले आहे.. सदर इसारपत्राचे अवलोकन केले असता सदर दस्तावेजात, इतकेच नव्हे तर प्लॉटच्या संदर्भात विक्रीपत्रव्यतिरीक्त इतर कोणतीही सेवा पुरविण्याचे आश्वासनदेखील गैरअर्जदाराने अर्जदाराला दिलेले नाही. मा.सर्वोच्च न्यायालयाने गणेश वि. श्याम, सिव्हील अपील नं.331/2007 निकाल दिनांक 23/9/2013 अन्वये, भुखंड विक्री व्यतिरीक्त इतर सेवा जसे अकृषक करणे, विकसन करणे इत्यादि संलग्न सेवा इत्यादि पुरविण्याची जबाबदारी भुखंड विक्रेत्याने स्विकारली असल्यांस सदर सेवांचे संदर्भात भुखंड खरेदीकर्ता हा ग्राहक ठरतो मात्र केवळ भुखंडाचे विक्रीपत्र करण्याच्या करारनाम्याचे अनुपालनासंदर्भातील विवाद हा ग्राहक विवाद या संज्ञेत बसत नाही व सदर विवाद हा दिवाणी स्वरूपाचा विवाद असल्यामुळे सदर अधिकारक्षेत्र असलेल्या न्यायासनासमोर दाद मागणे आवश्यक आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले सदर न्यायतत्व प्रस्तूत प्रकरणी तंतोतंत लागू होत असल्यामुळे अर्जदाराला योग्य त्या न्यायासनासमोर प्रस्तूत विवाद दाखल करण्याची मुभा देवून प्रस्तूत तक्रारअर्ज निकाली काढणे न्यायोचीत होईल. सबब वरील विवेचनावरून मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतिम आदेश
1) अर्जदाराला प्रस्तुत विवाद योग्य अधिकारक्षेत्र असलेल्या न्यायासनासमोर दाखल करण्याची मुभा राहील व ती केस दाखल करताना मुदतीच्या कायद्याची कोणतीही बाधा अर्जदाराला राहणार नाही करिता प्रस्तुत तक्रार क्र. 214/2015 निकाली काढण्यात येते.
. 2) उभय पक्षांनी आप आपला तक्रारखर्च सोसावा.
3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात यावी .
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे)) (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ)) (श्री. अतुल डी. आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष