रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक – 136/08 तक्रार दाखल दि. 3/12/08 निकालपत्र दि. – 22/12/08. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कामगारांची सहकारी पतपेढी मर्यादित, पनवेल, जि. रायगड. पत्ता- ए-001, श्रीनाथजी रेसिडन्सी, मिडल क्लास हौसिंग सोसायटी, प्लॉट क्र. 60, पनवेल, जि. रायगड तर्फे, चेअरमन श्री. दिलीप महादेव मुद्देबिहाळकर ..... तक्रारदार
विरुध्द
1. अम कम्प्युटॉनिक्स, पत्ता- मु.गोरेगांव, पोस्ट ऑफिस जवळ, ता. पनवेल, जि. रायगड.
2. श्री. मिलींद चुटके, रा. सर्व्हे नं. 23, मधुसुदन बंगला, आनंदविहार कॉलनी, हिंगणे (खुर्द), सिंहगड रोड, पुणे. ..... विरुध्दपक्ष उपस्थिती – मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष मा.श्री.बी.एम.कानिटकर,सदस्य - नि का ल प त्र -
द्वारा मा.अध्यक्ष, श्री.आर.डी.म्हेत्रस. तक्रारदारांनी ही तक्रार विरुध्दपक्षाचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदींतर्गत दाखल केलेली आहे. तक्रार दाखल करुन घेण्यासाठी तक्रारीची छाननी झाल्यावर तक्रारदारांच्या तक्रारीचे स्वरुप हे ग्राहक संरक्षण कायदयामधील तरतूदीनुसार नसल्याने व यातील तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयामध्ये असलेल्या ग्राहकाच्या व्याख्येत बसत नसल्याने तसेच तक्रारदारांची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 24 (अ) अन्वये मुदतीत नसल्याने या दोन्ही बाबत युक्तीवाद करण्यासाठी मंचाने तारीख नेमलेली होती. मंचाने त्याबाबतची नोटीस तक्रारदारांना दि. 5/12/08 रोजी जारी केली होती व मंचातर्फे दि. 19/12/08 ही तारीख नेमली होती. परंतु नेमलेल्या तारखेला तक्रारदार हजर नव्हते तसेच आज दि. 22/12/08 रोजी सुध्दा तक्रारदार हजर नाहीत. त्यांना युक्तीवाद करण्यासाठी तक्रार दाखल करण्यापुर्वी योग्य ती संधी दिली होती. परंतु ते मंचापुढे हजर झाले नाहीत. तसेच त्यांनी मंचापुढे योग्य तो खुलासाही केलेला नाही. 2. मंचाचे मते, तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत. तक्रारदार हे मर्यादित पतपेढी आहेत. तिचा उद्देश व्यापारी हेतूचा आहे. तसेच तक्रारदारांनी त्यांची तक्रार मुदतीत कशी आहे ? याचा खुलासा तक्रारीचे कारण घडल्यापासून 2 वर्षांचे आत केलेला नाही व त्याबाबत योग्य तो खुलासाही केलेला नाही. कागदपत्रांचे अवलोकन केले असता मूळ करार हा सन 2004 चा आहे. तक्रार ही सन 2008 मध्ये दाखल केलेली आहे. दरम्यानचे काळात त्यांचा पत्रव्यवहार झाला असल्याचे दिसून येते. परंतु पत्रव्यवहारामुळे कायदयाची मुदत वाढत नाही. याबाबत मा.राष्ट्रीय आयोग यांनी 2008 (4) C.P.R. (N.C.) M.S. Subramanian V/s. I.C.WA. या निकालाचा आधार घेतला आहे व स्पष्ट केले आहे. 3. तक्रारदारांनी मुदतीबाबत नेमल्याप्रमाणे आवश्यक असलेला विलंब माफीचा अर्ज देखील दिलेला नाही. त्यांना योग्य ती संधी देऊनही आपले म्हणणे मांडले नाही. नेमल्याप्रमाणे त्यांना 21 दिवसांची संधी दिली होती. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाच्या तरतूदींमध्ये बसत नसल्याने ती निकाली काढण्यात येते. या आदेशाची प्रत तक्रारदारांना पाठविण्यात यावी. दिनांक :- 22/12/08. ठिकाण :- रायगड-अलिबाग. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |