तक्रार क्रमांक – 59/2009 तक्रार दाखल दिनांक – 31/01/2009 निकालपञ दिनांक – 17/04/2010 कालावधी- 01 वर्ष 02महिने 17 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री.राजीवकुमार विनोदकुमार सिंग रा. बिल्डींग नं.79, रुम नं.2826, टिळक नगर, चेंबुर, मुंबई 89. .. तक्रारदार विरूध्द अहमद हुसेन नाबीबक्ष अंसारी रा. 1485, पीराणीपाडा,शांतीनगर, भिवंडी, जिल्हा - ठाणे. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य सौ. भावना पिसाळ - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल जी परेरा वि.प तर्फे वकिल शमशेद मोमिन आदेश (पारित दिः 17/04/2010) मा. सदस्या सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्री. रविकुमार सिंग यांनी श्री. अहमद हुसेन नाबीबक्ष अन्सारी यांचे विरुध्द दाखल केली आहे. त्यांनी विरुध्द पक्षकार यांचे कडे खरेदी केलेल्या पत्राशेड गाळयाचे तत्सम केलेल्या करारनाम्यानुसार काम पुर्ण करुन गाळा नं. 4 चे 12 जोडी व गाळा नं. 5 चे 12 जोडी प्रमाणे ताबा मागणी केली आहे.
2. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांचेकडे भिवंडी येथे पॉवरलूम काढण्यासाठी सर्व्हे नं. 81/2/2 चाविंद्रा या गावी पत्राशेड गाळा रु.9,90,000/- किंमत ठरवुन दि.23/08/2007 रोजी बुकींग केले व चेकद्वारे रु.3,00,000/- व गाळा 5 चे रु.2,00,000/- दिले व नंतर तक्रारकर्ता यांनी एकंदर रक्कम रु.11,25,000/- दोन पत्राशेड गाळा नं. 4 व 5 बद्दल भरले आहेत व दि.23/08/2007 व दि.26/11/2007 रोजी तत्सम करारनामा करुन उभयपक्षकारांनी सांक्षाकित केला परंतु नोंदणीकृत करण्यासाठी विरुध्द पक्षकार यांनी टाळाटाळ केली शिवाय .. 2 .. ठरलेली रक्कम रु.1,95,000 तक्रारकर्ता विरुध्द पक्षकार यांना देण्यास तयार आहेत. परंतु तक्रारकर्ता यांच्या रिजॉईंडर मधुन आढळते कि, विरुध्द पक्षकार ह्रयांना तक्रारकर्ता यांनी एकुण रक्कम रु.2,75,000/- द्यायचे बाकी आहेत. असे विरुध्द पक्षकार यांचे म्हणणे आहे. जे तक्रारकर्ता नाकबुल करतात. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांना दिलेली सर्व रक्कम त्यांच्या पालकांची कष्टाने कमवलेली आहे व त्यांच्या सेव्हीग अकाऊंट नं.2891695 टिळकनगर पोस्ट ऑफीस मधुन व कॅनरा बँक S/A नं. 79/2826 तसेच रु.1,00,000/- लोन घेतले होते. विरुध्द पक्षकार यांनी ठरलेल्या दोन गाळयापैकी 1 गाळा - 6 जोडी त्यातील काम अपुर्ण असतांनाही दिले व उरलेला गाळा नंतर देण्याचे कबुल केले. विरुध्द पक्षकार यांनी दि.27/05/2009 रोजी नो डब्ल्यु एस ऑडर कॉस्ट भरुन सेट असाईड करुन घेतली व लेखी कैफीयत देण्याचे ठरले पांतु त्यांनी ती मंचासमोर दाखल न करता नंतर तक्रारकर्ता यांना लेखी कैफीयत पाठवली व त्यांची प्रत मंचामध्ये विरुध्द पक्षकार यांच्या सही शिवाय व शपथपत्राशिवाय देऊन ठेवलेली मिळाली परंतु अशा लेखी कैफीयतीवर मंच अवलंबुन राहू शकत नाही. कारण सही व शपथपत्रांशिवाय दाखल केलेली कागदपत्रे कायदेशीर ग्राह्य ठरु शकत नाहीत. परंतु तक्रारकर्ता यांचे शपथपत्रपुर्वक रिजॉईंडर दाखल असुन त्यांत विरुध्द पक्षकार यांच्या लेखी कैफीयतीचे प्रत्यत्तर दिलेले दिसते. त्यानुसार विरुध्द पक्षकार हे गाळा नं 4 व गाळा नं. 5 पूर्ण करुन देण्यास तयार आहेत परंतु करारनाम्यानुसार ठरलेल्या रु.14,00,000/- किंमतीपैकी तक्रारकर्ता यांचे कडुन फक्त रक्कम रु.11,25,000/- विरुध्द पक्षकार यांना मिळाल्याचे ते कबुल करतात म्हणुन त्यापैकी राहीलेली रक्कम यांनी रु.2,75,000/- देऊन गाळा नं. 4 व 5 यांचा ताबा देण्यास विरुध्द पक्षकार कबुल केले असल्याचे निदर्शनास येते. परंतु तक्रारकर्ता यांनी देण्याची राहिलेली रक्कम 1,95,000/- एवढीच असल्याचे म्हणले आहे.
3. उभयपक्षकारांची पुरावा कागदपत्रे, तक्रारकर्ता यांचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद, रिजॉईंडर मंचाने पडताळुन पाहीले व मंचापुढे पुढील एकमेव प्रश्न उपस्थित होतोः- प्र.1 विरुध्द पक्षकार यांच्या सेवेत त्रृटी आढळतात का? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन त्याबद्दल पुढील कारण मिमांसा देत आहे. .. 3 .. कारण मिमांसा विरुध्द पक्षकार व तक्रारकर्ता यांच्यामध्ये दि.23/08/2007 व दि.26/11/2007 रोजी गाळा नं. 4 व 5 यांबद्दल करारनामा झाला होता. त्यापैकी एक गाळा विरध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायांस ताब्यात दिला परंतु त्यातील काम अपुर्ण असुन त्यात राहिलेली 6 जोडी पुढील गाळयात समाविष्ट करुन तो गाळा 18जोडीप्रमाणे देण्यात येईल असे ठरले होते. विरुध्द पक्षकार यांनी दोन्ही गाळे देण्याबाबत त्यांच्यात वाद दिसत नाही. फक्त दोन्ही करारनामा नोंदणीकृत करणे व त्यांची करारनाम्यानुसार ठरलेल्या किंमतीपैकी रु.11,25,000/- एवढी रक्कम दिल्याचे व मिळाल्याचे दोन्ही पक्षकार कबुल करतात. परंतु तक्रारकर्ता यांची अद्याप देणे राहिलेली किंमत विरुध्द पक्षकार यांच्यामते रु.2,75,000/- एवढी आहे तर तक्रारकर्ता यांच्यामते ती रु.1,95,000/- एवढीच आहे. त्यामुळे दोन्ही करारनामे पडताळुन पाहुन एकंदर ठरलेली रक्कम जर रु.14,00,000/- असेल तर त्यानुसार राहीलेली रक्कम तक्रारकर्ता यांनी देऊन सदर गाळा नं. 4 व गाळा नं. 5 यांनी नोंदणीकृत करुन देणे योग्य व कायदेशीर होईल म्हणुन हे मंच पुढील अंतिम आदेश देत आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 59/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत असुन या तक्रारीचा खर्च रु. 5,000/- (रु. पाच हजार फक्त)विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांस द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना उभयपक्षात झालेला दि.23/08/2007 व दि. 26/11/2007 चा करारनामा कायदेशीररित्या नोंदणीकृत करुन द्यावा तसेच तदनुसार मिळालेली रक्कम रु.11,25,000/- (रु. अकरा लाख पंचवीस हजार फक्त) करारनाम्यातील ठरलेल्या किंमतीमधुन वजा करुन उरलेली रक्कम तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांना द्यावी व त्याच वेळेस सदर जागा गाळा नं. 4 व गाळा नं. 5 (18 जोडी) प्रमाणे तक्रारकर्ता यास ताबा द्यावा. या आदेशाचे पालन ह्या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 2 महिन्याच्या आत करावे. असा आदेश हे मंच करत आहे.
.. 4 .. 3.विरुध्द पक्षकार यांनी वेळेवर करारनामा नोंदणीकृत न करता जागा व गाळा तक्रारकर्ता यांच्या ताब्यात न दिल्यामुळे जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल व नुकसान भरपाई पोटी विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायास रु.25,000/-(रु. पंचवीस हजार फक्त) द्यावेत. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही.
दिनांक – 17/04/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|