--- आदेश ---
(पारित दि. 06-09-2007 )
द्वाराश्रीमतीप्रतिभाबा.पोटदुखे, अध्यक्षा –
तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,..................................
1. महसूल सर्कल गोठनंगांव हे गोंदिया जिल्हयातील अर्जुनी / मोर या तहसिल मध्ये समाविष्ट आहे. तक्रारकर्ता नं. 1 आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, मर्या. गोठनगांव, रजि.नं.1422, ही त्या परिसरातील म्हणजेच गोठनंगांव, जरुघाटा, सुरबन, गंधारी, कढोली, प्रतापगढ, बोंडगांव व करांडली गावांसाठी कार्यरत आहे. तक्रारकर्ता संस्था या परिसरातील सभासद /कास्तकारांना पत पुरवठा करणारी कायदेशीर संस्था असून ही संस्था वि.प.नं. 2 कडून कर्ज घेवून आपल्या सभासदांना हंगामी पिकासाठी कर्ज पुरवठा करीत असते व कर्जाच्या रक्कमेची वसुली करुन वि.प.नं. 2 कडे परत फेड करीत असते. तक्रारकर्ते नं. 2 ते 79 तक्रारकर्ता नं. 1 चे सभासद आहेत.
2. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या राष्ट्रीय कृषी पीक विमा योजने अंतर्गत वि.प.नं. 1 शेतकरी सभासदांच्या पिकाचे विमा उतरविण्याचे काम करीत असते. अर्जुनी / मोर तालुक्यातील गोठनगांव रेव्हेन्यू सर्कल राष्ट्रीय कृषी पीक विमा योजने अंतर्गत वि.प.नं.1 च्या कार्यक्षेत्रात येते.
3. वर्ष 2005-06 च्या रब्बी हंगामात त.क. नं. 2 ते 79 नी वि.प.नं. 2 च्या माध्यमातून धान पिकाच्या उत्पादनासाठी कर्ज घेतले. त्यांनी घेतलेले कर्ज व विम्याची रक्कम याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. गोठनगांव रजि. नं. 1422 चे सभासद / शेतक-यांनी घेतलेल्या कर्जाचा व कपात झालेल्या प्रिमियमचा क्रमश ः तपशील -
--------------------------------------------------------------------------------------
अ.क्र. सभासद / शेतक-यांचे नांव गांव कर्जाची प्रिमियम
रक्कम कपात
1 योगराज गोविंदा हलमारे, बोंडगांव 29,200/- 584/-
2 देवानंद नकटु कोडापे, बोंडगांव 52,600/- 1,052/-
3 बाबुराव मनिराम साखरे, करांडली 28,984/- 580/-
4 बाबुराव धोंडु कुळमेते,. करांडली 21,435/- 428/-
5 देवाजी हिरामन मडावी, करांडली 25,650/- 513/-
6 पंढरी पांडुरंग तिरगम, जरुघाटा 35,140/- 703/-
7 शामराव नारायण मडावी, करांडल 24,405/- 488/-
8 वामन वकटु पाटनकर, बोंडगांव 49,600/- 992/-
9 धनराज ऋषी हर्षे, बोंडगांव 20,140/- 363/-
10 बळीराम रामा तितरे, सुरबन 23,175/- 333/-
11 वासुदेव कोंडु इसवार, गोठनगांव 13,149/- 238/-
12 काशिराम शिवराम मेश्राम, सुरबन 10,350/- 187/-
13 विजय मुरारी शहारे, गंधारी 9,600/- 173/-
14 धर्मा रामजी मानकर, बोंडगांव 15,900/- 287/-
15 सुभद्रा रामजी उईके, बोंडगांव 12,320/- 222/-
16 जगदिश दोडकु राऊत, गोठनगांव 20,940/- 378/-
17 कांताबाई भिवा महाला गोठनगांव 12,849/- 232/-
18 बळीराम गोंविदा औरासे, गोठनगांव 11,790/- 213/-
19 राजकुमार दिवारु शाहारे, गोठनगांव 4,500/- 81/-
20 प्रविण राधेशाम पालीवाल बोंडगांव 16,330/- 294/-
21 रतिराम कारु राणे, गोठनगांव 20,800/- 375/-
22 पंढरी जयराम सोनवाने, बोंडगांव 12,040/- 217/-
23 भागवत आत्माराम मडावी, करांडली 10,550/- 190/-
24 मारोती तुकडु नैताम, बोंडगांव 9,269/- 167/-
25 बाबुराव शंकर पोरेटी, कढोली 9,420/- 170/-
26 बंगुबाई दिना मळगाम, बोंडगांव 14,900/- 269/-
27 शामराव शंकर पोरेटी, कढोली 14,800/- 267/-
28 सिमनाबाई मयाराम धानगुन गोठनगांव 20,345/- 367/-
29 विश्वनाथ मारोती दरवडे, प्रतापगढ 8,730/- 158/-
30 उमेश राधेशाम पालीवाल बोंडगांव 15,250/- 275/-
31 बेनुबाई यशवंत नारनवरे, गोठनगांव 12,400/- 224/-
32 भागरथा तुकडु नैताम, बोंडगांव 7,800/- 141/-
33 अजिज पिरमोहम्मद शेख, प्रतापगढ 7,800/- 141/-
34 गंगाबाई मारोती उईके, करांडली 7,400/- 132/-
35 दत्तु नारायण घासले गोठनगांव 16,855/- 304/-
36 देवानंद बकाराम डोंगरवार गोठनगांव 10,200/- 184/-
37 बळीराम लक्ष्मण चांदेवार, गोठनगांव 4,870/- 94/-
38 रपी रियाज शेख, गोठनगांव 11,810/- 213/-
39 मानिक मोहरु मडावी गोठनगांव 3,330/- 60/-
40 पुर्णाबाई अपरु हटवार बोंडगांव 3,580/- 65/-
41 वासुदेव शामराव कन्हाके करांडली 2,710/- 49/-
42 जहीर अहमद कुरैशी प्रतापगढ 11,479/- 207/-
43 नजमुत्तीशाह जहीर कुरैशी प्रतापगढ 24,400/- 440/-
44 कुसुमबाई दामोदर परतेकी, गोठनगांव 5,320/- 96/-
45 अजिज पिरमहमद शेख, प्रतापगढ 2,644/- 48/-
46 मारोती हरिभाऊ देशमातुरे सुरबन 4,450/- 81/-
47 दाजी कुकसु पुराम, करांडली 10,920/- 197/-
48 भिवा दिना मळगाम बोंडगांव 4,720/- 85/-
49 मनोहर मळू बरडे बोंडगांव 7,180/- 130/-
50 देवराम तुकाराम पुराम, सुरबन 9,175/- 166/-
51 निताराम गोंविदा मुनेश्वर बोंडगांव 7,170/- 130/-
52 नेताई बिळन सयाम बोंडगांव 4,970/- 90/-
53 विश्वनाथ लक्ष्मण ताराम बोंडगांव 9,610/- 173/-
54 राजेश नारायण टेंभुर्ने, गोठनगांव 10,995/- 198/-
55 पुर्णाबाई पंढरी जांभुळकर करांडली 9,530/- 172/-
56 विश्वनाथ शिवराम उईके करांडली 4,549/- 82/-
57 मुखराबाई नामदेव पुराम सुरबन 6,850/- 124/-
58 पारबता वासुदेव बावणे, जरुघाटा 5,200/- 94/-
59 शंकर सदाशिव सयाम, बोंडगांव 10,474/- 189/-
60 पारबता महादेव कळाम गोठनगांव 2,400/- 44/-
61 गंधरु हिडकु वलथरे, बोंडगांव 5,085/- 92/-
62 तुकाराम सोमा शहारे करांडली 5,630/- 102/-
63 वातु मारोती शहारे बोंडगांव 2,880/- 52/-
64 जयवंताबाई काशिनाथ नैताम प्रतापगढ 9,250/- 167/-
65 विठाबाई कवडू मडावी करांडली 4,520/- 82/-
66 इंद्रराज शिवा बळगे सुरबन 3,000/- 54/-
67 पुष्पाबाई प्यारेलाल साखरे सुरबन 9,330/- 168/-
68 बिसन रावजी गायराणे गोठनगांव 4,130/- 75/-
69 लहानु कवडु मरसकोल्हे गोठनगांव 7,125/- 129/-
70 मुक्ताबाई रमेश नाईक गोठनगांव 8,200/- 149/-
71 श्रावण भुरा नगरधने बोंडगांव 9,470/- 171/-
72 आनंदराव शंकर पोरेटी कढोली 9,350/- 169/-
73 कृष्णराव केवळराम राणे गोठणगांव 5,800/- 105/-
74 पंढरी बळीराम पुस्तोडे जरुघाटा 4,400/- 80/-
75 गौतम गणपत डोंगरवार गोठणगांव 3,880/- 70/-
76 गोविंदा भदु कुळमेते करांडली 1,465/- 27/-
77 मिराबाई गोपाळ बडोले करांडली 9,650/- 174/-
78 माधोराव सदाशिव शेंडे करांडली 3,140/- 57/-
---------------------------------------------------------------------------------------
3 त.क. क्रं. 1 ने त.क.नं. 2 ते 79 नी घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेतून विम्यापोटी येणारी प्रिमियम रक्कम वजा करुन वि.प.नं. 2 च्या माध्यमातून वि.प.नं. 1 कडे डिक्लेरेशन फार्म सहीत दिलेल्या मुदतीत जमा केली. अशाप्रकारे वि.प.नं. 1 ने त.क.च्यां शेतातील धान (भात) पिकाचा विमा उतरवून घेवून योजनेत नमूद केल्याप्रमाणे वादळ, गारपीठ, अतिवृष्टी, पूर, भुस्सखलन, नैसर्गिक वनवा, किड व रोग ईत्यादी नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेली नुकसान भस्त देण्याची हमी घेतली होती.
4 त.क. 2 ते 79 नी त्यांच्या जमिनीची योग्य ती मशागत करुन धानाचे (भात) पीक लावले होते. धानाला लागणारी खते, औषधे व पाण्याचा योग्य वापर केल्यामुळे त्यांना शंभर टक्के पीक येईल अशी शाश्वती होती. शेतातील धानाचे पीक परिपक्व होण्याच्या काळात म्हणजे दि. 18-04-2006 रोजी गोठंनगांव, प्रतापगढ, कढोली, बोंडगांव, सुरबन, गंधारी, जांभळी, संजयनगर व रामनगर परिसरात जोरदार वादळ व गारपीठ झाल्यामुळे शेतातील पीक अंदाजे 90% ते 95% पर्यंत नष्ट झाले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने वि.प.क्रं. 3 यांनी त्यांच्या संबंधित अधिका-या मार्फत झालेल्या नुकसानीबाबत सर्वेक्षण केले असता, वर नमूद केलेल्या गावातील शेतक-यांच्या शेतातील पिकाचे 50% पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे जाहीर केले आहे.
5 तालुका सहायक निबंधक तालुका – अर्जुनी/मोर यांनी सविस्तर चौकशी करुन 50% पेक्षा जास्त नुकसान झाल्याने विम्याची रक्कम मिळावी याबाबतचा अहवाल वि.प.क्रं. 3 कडे सोपविला.
6 वि.प. 1 ने विमा उतरविते वेळी त.क.नं. 2 ते 79 या शेतक-यांना वरील नमूद वादळ, गारपीठ, अतिवृष्टी, पूर, भुस्सखलन, नैसर्गिक वनवा, किड व रोग ईत्यादी नैसर्गिक कारणास्तव 50% पेक्षा कमी उत्पन्न झाल्यास गैरअर्जदार नं. 1 त.क.नी पिकासाठी घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेच्या 59.87% एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देईल असी हमी देवून प्रिमियमची रक्कम स्विकारली होती.
7 वि.प.क्रं. 1 व 2 नी टाळाटाळीचे उत्तर देवून नुकसान भरपाई देण्यास स्पष्ट नकार दिला. म्हणून त.क. नां ही तक्रार दाखल करणे भाग पडले आहे.
8 त.क.नं. 2 ते 79 यांना वर्ष 2005-06 च्या रब्बी हंगामात दि. 18.04.2006 रोजी गारपीठ झाल्यामुळे शेतातील पिकांचे जरी 90% ते 95% नुकसान झाले असले तरी त्यामुळे त.क.नं. 2 ते 79 हे खालील नुकसानीचे दरानुसार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत.
उबंरठा उत्पन्न – या वर्षीचे सरासरी उत्पन्न
नुकसानीचा दर = -------------------------------------------- X विम्याची रक्कम
उबंरठा उत्पन्न
10 त.क.यांनी मागणी केली आहे की, त्यांना वि.प.यांनी घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेच्या
59.87% एवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळावी. द.सा.द.शे.18% या दराने दि. 01 जानेवारी 2006 पासून रक्कमेची फेड करेपर्यंत अधिक नुकसान भरपाई द्यावी, मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासापोटी रुपये 3,000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- मिळावेत.
11 वि.प.क्रं. 1 यांनी त्याचे लेखी बयाण निशाणी क्रं. 11 वर दाखल केलेले आहे.
वि.प.म्हणतात की, त.क.यांना ग्राहक तक्रार दाखल करण्याचा हक्क नाही. कारण ते ग्राहक या व्याख्येत बसत नाही. वि.प.हे विमा कंपनी नसल्यामुळे ते सेवा देऊन राहिलेले नाहीत. गोंदिया जिल्हयातील अर्जुनी/मोरगांव जिल्हयातील रब्बी 20054-06 या मोसमातील उन्हाळा धान पिकाचे सरासरी उत्पन्न हे 1648.9 असे होते तर आरंभीचे उत्पन्न हे 1585 असे होते. उन्हाळी धान पीक उत्पन्नामध्ये कोणतीही तुट नव्हती, त्यामुळे त्या विभागातील शेतकरी हे योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र नाहीत. त.क. यांचा वि.प.क्रं. 1 यांच्या बरोबर कोणताही करार झालेला नाही. त.क. यांनी दाखल केलेली ग्राहक तक्रार ही खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे.
12 वि.प.क्रं. 2 यांनी त्याचे लेखी बयाण निशाणी क्रं. 13 वर दाखल केले आहे. वि.प.म्हणतात की, त्यांनी तक्रारकर्त्यांकडून विमा प्रिमियमच्या हप्त्याची रक्कम वि.प.क्रं. 1 यांच्याकडे डिक्लरेशन फॉर्मसह दिलेल्या मुदतीत जमा केले व त्यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारचा कामचुकारपणा नाही. वि.प.क्रं. 1 हे प्रिन्सीपल असून वि.प.क्रं. 2 ने फक्त त्यांचे एजंट म्हणून काम केले आहे, त्यामुळे सर्व प्रकारची जबाबदारी ही फक्त वि.प.क्रं. 1 यांची आहे. वि.प.क्रं. 2 म्हणतात की, त.क.यांनी मागितलेली रक्कम फक्त वि.प.क्रं. 1 व 3 यांच्याकडून वसूल होण्याबाबत उचित आदेश व्हावे व त्यांच्या विरुध्दची प्रार्थना ही खारीज करावी.
13 वि.प.क्रं. 3 यांना दि. 19.06.2007 रोजी नोटीस मिळून ही ते विद्यमान न्याय मंचात हजर झाले नाही व त्यांनी ग्राहक तक्रारीचे उत्तर सुध्दा दिले नाही. म्हणून वि.प.क्रं. 3 यांच्या विरोधात प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि. 06.08.2007 रोजी पारित करण्यात आला.
कारणेवनिष्कर्ष
14 शेतक-यांना नैसर्गिक आपत्ती व रोंगामुळे नापिकी झाली तर विमा संरक्षण व आर्थिक
पाठबळ देणे (उद्देश क्रं. 1 ) व अरिष्ट आलेल्या वर्षात शेतीचे उत्पन्न स्थिर ठेवणे
(उद्देश क्रं. 3) हे राष्ट्रीय कृषी योजनेचे मुख्य उद्देश आहेत.
15 राष्ट्रीय विमा योजनेच्या कलम 4(4) प्रमाणे अनावृष्टी अवर्षण या न टाळता येणा-या
आपत्तीसाठी सर्वसमावेशक (Comprehensive risk Insurance ) विमा सरंक्षण देण्यात आले आहे.
16 सदर प्रकरणामध्ये वि.प.क्रं. 1 यांनी मुख्य आक्षेप घेतला आहे की, त.क. हे ग्राहक नाहीत. रेशमबाई व इतर विरुध्द देना बँक व इतर या IV (2006) सीपीजे 4 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय छत्तीसगढ राज्य आयोगाने राष्ट्रीय कृषी विमा योजनेचे लाभार्थी हे ग्राहक या संज्ञेत येतात असा निर्वाळा दिला आहे.
17 वि.प.म्हणतात की, राष्ट्रीय कृषी विमा योजनेत आनेवारीला महत्व नाही तर ती योजना ही विभागीय दृष्टीकोनावर (Area Approach) आधारित आहे व अर्जुनी मोर तालुका विभागात उत्पन्नामध्ये तुट नसल्याने त्या विभागातील शेतकरी हे योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र नाहीत.
18 गुजरात राज्य ग्राहक संरक्षण केंद्र व इतर विरुध्द भारतीय जीवन विमा महामंडळ व इतर या प्रकरणात (मुळ याचिका नं. 192, 194, 197, 198, 260, 261 व 273/1997 आदेश तारीख 24.12.2005) आदरणीय राष्ट्रीय आयोगाने सर्वकष पीक विमा योजना संबंधित प्रकरणांमध्ये आदेश करतांना असे मत व्यक्त केले आहे की, " विमा हप्ता हा प्रत्येक कर्ज घेतलेल्या शेतक-याने स्वतंत्रपणे भरलेला आहे. पिकांचे संपूर्ण नुकसान झाले तर कर्जदार शेतक-याला संपूर्ण विमाकृत रक्कम मिळावयास पाहिजे. कर्जावू शेतक-यांचे मत विचारात न घेता त्यांना विमाकृत रक्कमेपेक्षा कमी रक्कम देणे हे अन्यायकारक आहे."
दर आदेशात आदरणीय राष्ट्रीय आयोगाने परिच्छेद क्रं. 21 मध्ये म्हटले आहे की,
‘विमा हप्ता हा प्रत्येक शेतक-याने स्वतंत्रपणे भरलेला आहे. विमा हप्ता हा गांव पातळीवर अथवा विशिष्ट पत संस्थेचे कर्जदार म्हणून स्विकारला गेला नाही. योजनेयोजनेच्या कलम-10 अनुसार सुत्र आहे की,
उत्पन्नातील तुट
दावा -------------- X शेतक-याची विमाकृत रक्कम
आरंभीचे उत्पन्न
म्हणून अवर्षणामुळे संपूर्ण नापिकी आली तर संपूर्ण विमाकृत रक्कम कर्जदार शेतक-यांना देण्यात यायला पाहिजे.
19 तलाठी, कृषी सहाय्यक व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आलेलया पंचनाम्यात असे नमूद करण्यात आले आहे की, चिचोली, खोकरी, दिनकरनगर, करांडली, निमगांव (रिठी) जरुघाटा, पुष्पनगर, (अ) (ब) वडेगांव, कुटाई रिठी गावाला दि. 18.04.2006 रोजी चक्री वादळ पाऊस व गारपिठाने उन्हाळी धान पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत पडलेले आहे. तसेच दुस-या पंचानाम्यामध्ये प्रतापगढ, कढोली, घोंडगांव, सुरबन, गंधारी, जांभळी गांवात दि. 18.04.2006 रोजी चक्री वादळ पाऊस व गारपिठीने उन्हाळी धान पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक नुकसानीत आलेला आहे असे नमूद केले आहे. तसेच या दोन्ही पंचानाम्यामध्ये नुकसान हे 50% च्या वर असल्याचे लिहिलेले आहे.
20 तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, अर्जुनी/मोरगांव यांनी दि. 30.09.2006 रोजी जिल्हाधिकारी गोंदिया यांना लिहिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की,
"शासन निर्णय क्रं. सीआयएस/12/2000/सीआर/-18/11 ए/मंत्रालय मुंबई 32 दि. 27-05-2000 नुसार राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत कृषी विभागा तर्फे राज्यातील कृषी विषयक परिस्थितीचे सुक्ष्म नियंत्रण संनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरावर आपल्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीमध्ये सदर गारपीटग्रस्त शेतक-यांना लाभ मिळण्यासाठी असलेल्या अधिकारानुसार वरील शासन निर्णयानुसार, संस्थेच्या कागदपत्रावरुन तसेच तलाठी व कार्यकारी दंडाधिकारी अर्जुनी/मोर यांचे अहवालावरुन रब्बी धान पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होत असल्याने सदर संस्थेच्या शेतकरी सभासदांना विम्याचा लाभ घेण्यास पात्र असल्याचे दिसून येते."
21 सदर ग्राहक तक्रारी मध्ये तक्रारकर्ता शेतक-यांनी भात पीक लावले होते, त्याचा विमा काढलेला होता व विमा हप्त्याची कर्जाच्या रक्कमेतून कपात झाली होती या बाबी निर्विवाद आहे. विभागीय दृष्टिकोनाच्या तांत्रिक आधारावर तक्रारकर्ता शेतक-यांना राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा लाभ मिळू न देणे ही वि.प.क्रं. 1 यांच्या सेवेतील न्यूनता आहे.
22 वि.प.क्रं. 1 यांनी दाखल केलेले केस लॉ
(अ) तक्रार क्रमांक – 94/06, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, भंडारा
(ब) पी.ए.नं.327/1999 राज्य ग्राहक वाद निवारण आयोग, हैद्राबाद हे सदर ग्राहक तक्रारीस लागू होत नाहीत.
असे तथ्य व परिस्थिती असतांना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
1. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी तक्रारकर्ता शेतक-यांना परिच्छेद क्रं. 3 मध्ये नमूद केलेली कर्जाची रक्कम ही ती रक्कम सर्व तक्रारकर्त्यांना मिळेपर्यंत आदेशाच्या तारखेपासून द.सा.द.शे.9% व्याज दराने द्यावी.
2. विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी प्रत्येक तक्रारकर्ता यांना शारीरिक व मानसिक त्रासासाठी रुपये 2000/- तर ग्राहक तक्रारीचा खर्च म्हणून 1000/- रुपये द्यावे.
3 वरील आदेशाचे पालन विरुध्द पक्ष क्रं. 1 यांनी आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत करावे . अन्यथा विरुध्द पक्ष क्रं. 1 हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 27 प्रमाणे कारवाईस पात्र असतील.