Maharashtra

Bhandara

CC/17/86

Seema Ramdayal Pardhi - Complainant(s)

Versus

Agriculture Insurance Company of India Ltd. - Opp.Party(s)

Adv.Vijay C Pardhi

27 Nov 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/17/86
( Date of Filing : 06 Oct 2017 )
 
1. Seema Ramdayal Pardhi
Vinoba Nagar.Tumsar. Tah . Tumsar.
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Agriculture Insurance Company of India Ltd.
20th Floor. B.S.E. Tower. Dalal Street. Fort. Mumbai. 400023.
Mumbai
MAHARASHTRA
2. The Bhandara District Central Co-Op. Bank Ltd
Sihora. Tah. Tumsar.
BHANDARA
MAHARASHTRA
3. THE SEVA SAHKARI SANSTHA
Dhanegaon. Tah. tumsar
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:Adv.Vijay C Pardhi, Advocate
For the Opp. Party:
Dated : 27 Nov 2019
Final Order / Judgement

                                                     (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                          (पारीत दिनांक 27 नोव्‍हेंबर, 2019)   

01.   तक्रारदारांनी उपरोक्‍त नमुद तिन्‍ही तक्रारी या ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्षां विरुध्‍द ग्राहक मंचा समोर जरी वेगवेगळया स्‍वतंत्ररित्‍या दाखल केलेल्‍या असल्‍या तरी उपरोक्‍त नमुद तक्रारीं मधील विरुध्‍दपक्ष हे एकच आहेत आणि नमुद तिन्‍ही तक्रारीं मधील तपशिलाचा थोडाफार भाग वगळता वस्‍तुस्थिती सुध्‍दा सारखीच आहे आणि ज्‍या कायदे विषयक तरतुदींचे आधारावर या तिन्‍ही तक्रारी निकाली निघणार आहेत, त्‍या कायदे विषयक तरतुदी सुध्‍दा सारख्‍याच आहेत म्‍हणून आम्‍ही या तिन्‍ही तक्रारीं मध्‍ये एकत्रितरित्‍या निकालपत्र पारीत करीत आहोत.

02.  उपरोक्‍त नमुद तक्रारीं मधील थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे- तक्रारदार हे उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून ते शेतीचा व्‍यवसाय करतात. तक्रारदारांचे मालकीची मौजा सिलेगाव, तहसिल तुमसर, जिल्‍हा भंडारा येथे शेती असून तया-त्‍या तक्रारकर्त्‍याचे शेतीचा भूमापन क्रमांक आणि क्षेत्रफळ, पेरणी केलेले पिक व पिकाचे क्षेत्रफळ  इत्‍यादीचा तपशिल खालील विवरणपत्रा मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे आहे-

02(अ) ग्राहक तक्रार क्रं- CC/17/84

तक्रार क्रमांक

तक्रारकर्त्‍याचे नाव

शेत भूमापन क्रमांक

शेतीचे क्षेत्रफळ हेक्‍टर आर मध्‍ये

जय श्री राम या वाणाचे धान पेरणी केलेल्‍या पिकाचे एकूण क्षेत्र

01

02

03

04

05

CC/17/84

श्री रामदयाल सेवकराम पारधी

738/1

1.95

 

 

 

735/2

0.40

 

 

 

740

1.56

 

 

 

706

0.25

 

 

 

755

1.10

 

 

 

एकूण क्षेत्रफळ

5.26 H.R.

5.08 HR

     ग्राहक तक्रार क्रमांक- CC/17/84 मधील तक्रारकर्ता श्री रामदयाल सेवकराम पारधी यांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी एकूण 5.08 हेकटर आर क्षेत्रात धान पिकाची पेरणी केली व त्‍यांना प्रतीएकर 20 क्विंटल (प्रतीहेक्‍टर 50 क्विंटल) अपेक्षीत उत्‍पादन येत असून त्‍याचे उत्‍पन्‍न प्रती एकर रुपये-40,000/- (प्रतीहेक्‍टर रुपये-1,00,000/-) येते. त्‍यांनी पुढे असे नमुद केले की, माहे एप्रिल-मे-2016 मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 3 दि सेवा सहकारी संस्‍था धनेगाव, शाखा-धनेगाव, तहसिल-तुमसर, जिल्‍हा-भंडारा यांचे मार्फतीने, विरुध्‍दपक्ष क्रं-2 दि भंडारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि. शाखा-सिहोरा, तहसिल-तुमसर,जिल्‍हा–भंडारा या बँके मधून एकूण रुपये-1,00,000/- एवढया रकमेचे पिक कर्ज  त्‍यांनी घेतले होते, त्‍यावेळी विरुध्‍दपक्ष क्रं-1 अॅग्रीकल्‍चर इन्‍शुरन्‍स कंपनी ऑफ इंडीया लिमिटेड विभागीय कार्यालय, मुंबई यांचे कडून पिकाचा विमा उतरविला होता आणि त्‍या बाबत विमा हप्‍त्‍याची रक्‍कम सुध्‍दा तक्रारकर्ता यांचे कडून कपात करण्‍यात आली होती. सदर विम्‍याव्‍दारे किड, पुर, अग्‍नी, नैसर्गिक आपत्‍ती किंवा अन्‍य कोणतीही विपदा यापासून पिकास विमा संरक्षण देऊन झालेल्‍या नुकसानीची भरपाई करुन देण्‍याची जोखीम विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने स्विकारलेली होती. माहे जून-2016 मध्‍ये त्‍यांनी शेतीमध्‍ये धानाची पेरणी केली, यासाठी त्‍यांना प्रतीएकर रुपये-20,000/- एवढा खर्च लागला परंतु किड आणि अन्‍य कारणामुळे तक्रारकर्ता यांचे अपेक्षीत पिकाचे एकूण-5.08 हेकटर आर क्षेत्रा करीता 60 टक्‍के एवढे नुकसान झाले असून झालेल्‍या नुकसानीची एकूण किंमत रुपये-5,00,000/- एवढी आहे. झालेल्‍या नुकसानी संबधात तक्रारकर्ता यांनी कृषी अधिकारी यांचे कार्यालयात तक्रार केली असता त्‍यांनी दिनांक-24.10.2016 रोजी मौक्‍यावर येऊन निरिक्षण करुन पिकाचे 60 टक्‍के एवढे नुकसान झाल्‍या बाबत अहवाल दिला. त्‍यानंतर तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्षांकडे कृषी अधिकारी यांचे अहवालासह लेखी अर्ज देऊन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून झालेली एकूण नुकसानी रुपये-5,00,000/- भरपाई म्‍हणून मिळावी अशी मागणी केली परंतु विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्ता यांची मागणी फेटाळून लावली. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारकर्ता यांना दोषपूर्ण सेवा दिली त्‍यामुळे त्‍यांना आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे म्‍हणून तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्षांना त्‍यांचे वकील श्री विजय पारधी यांचे मार्फतीने दिनांक-15.04.2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेनी त्‍यांचे वकीलांचे मार्फतीने नोटीसला खोटे उत्‍तर पाठवून विमा दाव्‍याची रक्‍कम अमान्‍य केली.                         

     म्‍हणून शेवटी तक्रारकर्ता श्री रामदयाल सेवकराम पारधी यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्‍यांचे पिकास झालेल्‍या नुकसानी बाबत भरपाई म्‍हणून रुपये-5,00,000/- विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे. तसेच दिनांक-19.11.2016 पासून प्रतीदिवस रुपये-1000/- प्रमाणे नुकसानी बाबत मिळावेत. तक्रारकर्ता यांना झालेल्‍या मानसिक त्रासा बाबत रुपये-25,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्षां कडून देण्‍यात यावा अशी मागणी केली.

*******

02(ब) ग्राहक तक्रार क्रं- CC/17/85-

तक्रार क्रमांक

तक्रारकर्त्‍याचे नाव

शेत भूमापन क्रमांक

शेतीचे क्षेत्रफळ हेक्‍टर आर मध्‍ये

जय श्री राम या वाणाचे धान पेरणी केलेल्‍या पिकाचे एकूण क्षेत्र

01

02

03

04

05

CC/17/85

श्री विजय रामदयाल पारधी

735/1

1.62

1.60

 

 

737

0.36

0.35

 

 

704

0.28

0.27

 

 

739/1

1.06

1.00

 

 

क्षेत्रफळ

3.32 H.R.

3.22 HR

 

 

741

1.56 H.R.

1.50 H.R.

       ग्राहक तक्रार क्रमांक- CC/17/85 मधील तक्रारकर्ता श्री विजय रामदयाल पारधी यांचे  असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी एकूण 4.72 हेक्‍टर आर क्षेत्रात धान पिकाची पेरणी केली व त्‍यांना प्रतीएकर 20 क्विंटल (प्रतीहेक्‍टर 50 क्विंटल) अपेक्षीत उत्‍पादन येत असून त्‍याचे उत्‍पन्‍न प्रती एकर रुपये-40,000/- (प्रतीहेक्‍टर रुपये-1,00,000/-) येते.

     ग्राहक तक्रार क्रमांक- CC/17/85 मधील तक्रारकर्ता श्री विजय रामदयाल पारधी यांनी पुढे असे नमुद केले की,  माहे एप्रिल-मे-2016 मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 3 दि सेवा सहकारी संस्‍था धनेगाव, शाखा-धनेगाव, तहसिल-तुमसर, जिल्‍हा-भंडारा यांचे मार्फतीने, विरुध्‍दपक्ष क्रं-2 दि भंडारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि. शाखा-सिहोरा, तहसिल-तुमसर, जिल्‍हा–भंडारा या बँके मधून एकूण रुपये-1,00,000/- एवढया रकमेचे पिक कर्ज त्‍यांनी घेतले होते, त्‍यावेळी विरुध्‍दपक्ष क्रं-1 अॅग्रीकल्‍चर इन्‍शुरन्‍स कंपनी ऑफ इंडीया लिमिटेड विभागीय कार्यालय, मुंबई यांचे कडून पिकाचा विमा उतरविला होता आणि त्‍या बाबत विमा हप्‍त्‍याची रक्‍कम सुध्‍दा तक्रारकर्ता यांचे कडून कपात करण्‍यात आली होती. सदर विम्‍याव्‍दारे किड, पुर, अग्‍नी, नैसर्गिक आपत्‍ती किंवा अन्‍य कोणतीही विपदा यापासून पिकास विमा संरक्षण देऊन झालेल्‍या नुकसानीची भरपाई करुन देण्‍याची  जोखीम विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने स्विकारलेली होती. माहे जून-2016 मध्‍ये त्‍यांनी शेतीमध्‍ये धानाची पेरणी केली, यासाठी त्‍यांना प्रतीएकर रुपये-20,000/- एवढा खर्च लागला परंतु किड आणि अन्‍य कारणामुळे तक्रारकर्ता यांचे अपेक्षीत पिकाचे 2.83 हेकटर आर क्षेत्रा करीता 60 टक्‍के रुपये-1,69,800/- आणि 1.89 हेकटर आर करीता 50 टक्‍के रुपये-94,500 असे मिळून एकूण रुपये-2,64,300/- एवढे नुकसान झाले असून झालेल्‍या नुकसानीची एकूण किंमत रुपये-2,64,300/- एवढी आहे. झालेल्‍या नुकसानी संबधात तक्रारकर्ता यांनी कृषी अधिकारी यांचे कार्यालयात तक्रार केली असता त्‍यांनी  दिनांक-24.10.2016 रोजी मौक्‍यावर येऊन निरिक्षण करुन उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे नुकसान झाल्‍या बाबत अहवाल दिला. त्‍यानंतर तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्षांकडे कृषी अधिकारी यांचे अहवालासह लेखी अर्ज देऊन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून झालेली एकूण नुकसानी रुपये-2,64,300/- भरपाई म्‍हणून मिळावी अशी मागणी केली परंतु विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्ता यांची मागणी फेटाळून लावली. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारकर्ता यांना दोषपूर्ण सेवा दिली त्‍यामुळे त्‍यांना आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे म्‍हणून तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्षांना त्‍यांचे वकील श्री विजय पारधी यांचे मार्फतीने दिनांक-15.04.2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेनी त्‍यांचे वकीलांचे मार्फतीने नोटीसला खोटे उत्‍तर पाठवून विमा दाव्‍याची रक्‍कम अमान्‍य केली.                         

     म्‍हणून शेवटी तक्रारकर्ता श्री विजय रामदयाल पारधी यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्‍यांचे पिकास झालेल्‍या नुकसानी बाबत भरपाई म्‍हणून रुपये-2,64,300/- विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे. तसेच दिनांक-19.11.2016 पासून प्रतीदिवस रुपये-1000/- प्रमाणे नुकसानी बाबत मिळावेत. तक्रारकर्ता यांना झालेल्‍या मानसिक त्रासा बाबत रुपये-25,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्षां कडून देण्‍यात यावा अशी मागणी केली.

*******

02(क) ग्राहक तक्रार क्रं- CC/17/86

तक्रार क्रमांक

तक्रारकर्तीचे नाव

शेत भूमापन क्रमांक

शेतीचे क्षेत्रफळ हेक्‍टर आर मध्‍ये

जय श्री राम या वाणाचे धान पेरणी केलेल्‍या पिकाचे एकूण क्षेत्र

01

02

03

04

05

CC/17/86

श्रीमती सिमा रामदयाल पारधी

705

0.74

 

 

 

738/2

0.26

 

 

 

754

0.99

 

 

 

739/2

1.34

 

 

 

733

0.82

 

 

 

एकूण क्षेत्रफळ

4.15 H.R.

4.02 HR

        ग्राहक तक्रार क्रमांक- CC/17/86 मधील तक्रारकर्ती श्रीमती सिमा रामदयाल पारधी यांचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी एकूण 4.02 हेक्‍टर आर क्षेत्रात धान पिकाची पेरणी केली व त्‍यांना प्रतीएकर 20 क्विंटल (प्रतीहेक्‍टर 50 क्विंटल) अपेक्षीत उत्‍पादन येत असून त्‍याचे उत्‍पन्‍न  प्रती एकर रुपये-40,000/- (प्रतीहेक्‍टर रुपये-1,00,000/-) येते.

      तक्रारकर्ती श्रीमती सिमा रामदयाल पारधी यांनी पुढे असे नमुद केले की, माहे एप्रिल मे-2016 मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं 3 दि सेवा सहकारी संस्‍था धनेगाव,शाखा-धनेगाव,तहसिल-तुमसर,जिल्‍हा-भंडारा यांचे मार्फतीने, विरुध्‍दपक्ष क्रं-2 दि भंडारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि. शाखा-सिहोरा, तहसिल-तुमसर, जिल्‍हा–भंडारा या बँके मधून एकूण रुपये-1,00,000/- एवढया रकमेचे पिक कर्ज  त्‍यांनी घेतले होते, त्‍यावेळी विरुध्‍दपक्ष क्रं-1 अॅग्रीकल्‍चर इन्‍शुरन्‍स कंपनी ऑफ इंडीया लिमिटेड विभागीय कार्यालय, मुंबई यांचे कडून पिकाचा विमा उतरविला होता आणि त्‍या बाबत विमा हप्‍त्‍याची रक्‍कम सुध्‍दा तक्रारकर्ती यांचे कडून कपात करण्‍यात आली होती. सदर विम्‍याव्‍दारे किड, पुर, अग्‍नी, नैसर्गिक आपत्‍ती किंवा अन्‍य कोणतीही विपदा यापासून पिकास विमा संरक्षण देऊन झालेल्‍या नुकसानीची भरपाई करुन देण्‍याची  जोखीम विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने स्विकारलेली होती.

     तक्रारकर्ती श्रीमती सिमा रामदयाल पारधी यांनी पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी माहे जून-2016 मध्‍ये त्‍यांनी शेतीमध्‍ये धानाची पेरणी केली, यासाठी त्‍यांना प्रतीएकर रुपये-20,000/- एवढा खर्च लागला परंतु किड आणि अन्‍य कारणामुळे तक्रारकर्ती यांचे अपेक्षीत पिकाचे एकूण-4.02 हेकटर आर क्षेत्रा करीता 60 टक्‍के एवढे नुकसान झाले असून झालेल्‍या नुकसानीची एकूण किंमत रुपये-4,02,000/- एवढी आहे. झालेल्‍या नुकसानी संबधात तक्रारकर्ता यांनी कृषी अधिकारी यांचे कार्यालयात तक्रार केली असता त्‍यांनी  दिनांक-24.10.2016 रोजी मौक्‍यावर येऊन निरिक्षण करुन पिकाचे 60 टक्‍के एवढे नुकसान झाल्‍या बाबत अहवाल दिला. त्‍यानंतर तक्रारकर्ती यांनी विरुध्‍दपक्षांकडे कृषी अधिकारी यांचे अहवालासह लेखी अर्ज देऊन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून झालेली एकूण नुकसानी रुपये-4,02,000/- भरपाई म्‍हणून मिळावी अशी मागणी केली परंतु विरुध्‍दपक्षांनी तक्रारकर्ती यांची मागणी फेटाळून लावली. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारकर्ती यांना दोषपूर्ण सेवा दिली त्‍यामुळे त्‍यांना आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे म्‍हणून तक्रारकर्ती यांनी विरुध्‍दपक्षांना त्‍यांचे वकील श्री विजय पारधी यांचे मार्फतीने दिनांक-15.04.2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेनी त्‍यांचे वकीलांचे मार्फतीने नोटीसला खोटे उत्‍तर पाठवून विमा दाव्‍याची रक्‍कम अमान्‍य केली.                          

     म्‍हणून शेवटी तक्रारकर्ती श्रीमती सिमा रामदयाल पारधी यांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन तयांचे पिकास झालेल्‍या नुकसानी बाबत भरपाई म्‍हणून रुपये- रुपये-4,02,000/- विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे. तसेच दिनांक-19.11.2016 पासून प्रतीदिवस रुपये-1000/- प्रमाणे नुकसानी बाबत मिळावेत. तक्रारकर्ती यांना झालेल्‍या मानसिक त्रासा बाबत रुपये-25,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च विरुध्‍दपक्षां कडून देण्‍यात यावा अशी मागणी केली.

*******

03.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 अॅग्रीकल्‍चर इन्‍शुरन्‍स कंपनी ऑफ इंडीया लिमिटेड विभागीय कार्यालय, मुंबई यांनी तक्रारनिहाय लेखी उत्‍तर पान क्रं 43 ते 52 वर दाखल केले. त्‍यांचे लेखी उत्‍तरा प्रमाणे केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक योजने प्रमाणे आणि प्रशासकीय मंजूरी नंतर राज्‍यात पूर्वी असलेली राष्‍ट्रीय कृषी विमा योजना रद्य करुन त्‍याऐवजी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2016 पासून राबविण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने शासन निर्णय क्रं-प्रपिवियो-2016/प्र.क्रं-97/11-ए, दिनांक-05 जुलै, 2016 रोजी घेतला. सदरची विमा योजना क्षेत्र हा घटक धरुन (AREA APPROACH) राबविण्‍यात येते. पिकनिहाय अधिसुचित विमा क्षेत्र घटक म्‍हणजेच मंडळ गट, तालुका निहाय निश्‍चीत करण्‍यात आलेले आहे. सदर विमा योजने मध्‍ये पिक पेरणी पासून ते काढे पर्यंतच्‍या कालावधीत नैसर्गिक आग, विज, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्‍खलन, दुष्‍काळ, अपुरा पाऊस, किड व रोग इत्‍यादी कारणामुळे  पिकातील घटीमुळे झालेले नुकसानीची जोखीम स्विकारण्‍यात येते. सदरची नुकसानी ही पिक कापणी प्रयोगावरुन सरासरी काढून निर्धारित करण्‍यात येते. निर्धारित क्षेत्रातील पिकाचे हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन उंबरठा उत्‍पन्‍ना पेक्षा कमी झाले तर सर्व विमाधारक शेतक-यांचे  नुकसान झाले असे गृहीत धरण्‍यात येईल. उंबरठा उत्‍पन्‍न किंवा हमी उत्‍पन्‍न हे मागील 7 वर्षाचे (नैसर्गिक आपत्‍ती/दुष्‍काळ इत्‍यादीसाठी 02 वर्ष वगळून किमान 05 वर्षाचे उत्‍पन्‍न) सरासरी उत्‍पन्‍न X जोखीमस्‍तर असेल. या योजने अंतर्गत सर्व पिकांसाठी 70 टक्‍के समान जोखीमस्‍तर निश्‍चीत करण्‍यात आला आहे. उंबरठा उत्‍पन्‍न निश्‍चीत करण्‍यासाठी मागील 7 वर्षातील नैसर्गिक आपत्‍ती/दुषकाळ इत्‍यादीची 2 वर्ष वगळून किमान पाच वर्षाचे पिकाचे सरासरी उत्‍पन्‍न विचारात घेण्‍यात येते. नुकसान भरपाई ठरविण्‍याचे सुत्र-

 

                 उंबरठा उत्‍पन्‍न (-)चालू वर्षाचे सरासरी उत्‍पन्‍न

नुकसान भरपाई = - X

विमा संरक्षीत रक्‍कम रु.प्रती हे.  

                          उंबरठा उत्‍पन्‍न

       जर एखाद्या पिक विमा क्षेत्रात काही कारणामुळे पिक कापणी प्रयोग होऊन उत्‍पन्‍न निर्धारित झाले नाही तर शेजारील विमा क्षेत्राचे उत्‍पन्‍न विचारात घेता येते. प्रतीकुल हवामान इत्‍यादीमुळे 75 टक्‍के पेक्षा जास्‍त क्षेत्रावर उगवण न झाल्‍यास किंवा पेरणी न केल्‍यास सदरची तरतुद लागू होईल. 75 टक्‍के पेक्षा जास्‍त क्षेत्र बाधीत झाल्‍यामुळे पिक पूर्ण नष्‍ट होणे किंवा लागवड करण्‍याची परिस्थिती नसणे त्‍यावेळी तरतुद लागू राहिल. पुर, अपूरा पाऊस इत्‍यादी मुळे 50 टक्‍के पेक्षा जास्‍त घट अपेक्षीत असेल तर नुकसान भरपाईच्‍या प्रमाणात विमाधारक शेतक-यांना 25 टक्‍के मर्यादे पर्यंत रक्‍कम आगाऊ देण्‍यात येते. सदर विमा जोखीम अंतर्गत नुकसान भरपाईचे निकष व नुकसान भरपाई ठरविण्‍याची सविस्‍तर पध्‍दती संदर्भांकिंत शासन निर्णयात स्‍पष्‍टपणे नमुद केलेली आहे. पिकाची कापणी केल्‍यावर दोन आठवडया पर्यंत  नुकसान झाल्‍यास वैयक्तिक स्‍तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्‍यात येते तसेच पुराचे पाण्‍यामुळे झालेले पिकाचे नुकसान, गारपीट, भूस्‍खलन इत्‍यादी नैसर्गिक आपत्‍तीमुळे झालेले पिकाचे नुकसान वैयक्तिक स्‍तरावर पंचनामे करुन देण्‍यात येते. अधिसुचित पिकाचे बाधित क्षेत्र हे विमा संरक्षित क्षेत्राच्‍या 25 टक्‍के पेक्षा जास्‍त असेल तर अधिसुचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी हे काढणी पश्‍चात नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र ठरतात. विमा कंपनी नमुना सर्व्‍हेक्षणाच्‍या आधारे नुकसान भरपाई निर्धारित करेल.

     विरुध्‍दपक्ष क्रं 1 अॅग्रीकल्‍चर इन्‍शुरन्‍स कंपनी ऑफ इंडीया लिमिटेड विभागीय कार्यालय, मुंबई तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, तक्रारदारांनी सन-2016-2017 या वर्षाचे 7/12 उता-याच्‍या प्रती जोडलेल्‍या नाहीत तसेच तक्रारदारांचे तक्रारी मध्‍ये नमुद केलेल्‍या शेतजमीनीचे क्षेत्रफळामध्‍ये भात पिकाचे उत्‍पादन घेतल्‍याचा पुरावा सादर करण्‍यात यावा. तसेच तक्रारदारांनी घेतलेल्‍या पिकाचा विमा प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप-2016 या योजने मध्‍ये होता याबद्यल दस्‍तऐवज जोडलेले नाहीत. विरुध्‍दपक्ष क्रं 2 भंडारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेनी तक्रारदारांचे पिकांचा विमा उतरविण्‍यात आला होता या संबधी पुरावा दाखल करावा. तक्रारदारांचा प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत विमा होता किंवा कसे हे कळविण्‍या बाबत विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनीने, विरुदपक्ष क्रं 2 बँकेला पत्र क्रं-एम.आर.ओ/ लिगल/ 3394/ 2018, दिनांक-26 सप्‍टेंबर, 2018 रोजीचे पाठविले होते परंतु त्‍याचे उत्‍तर विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेनी अद्याप पर्यंत दिलेले नाही. ज्‍या पिकाचा विमा प्रस्‍ताव स्विकारलेला आहे त्‍याच पिकाची त्‍याच हंगामात पेरणी करणे आवश्‍यक असून तशा आशयाचा पुरावा दाखल करणे आवश्‍यक आहे. भंडारा जिल्‍हयात भात, ज्‍वारी, बाजरी, नाचणी मका, तुर, मुग, उडीद, सोयाबिन, भूईमुग, तिळ, सूर्यफुल, कारले, कापासून, कांदा इत्‍यादी अधिसुचित पिकासाठी योजना राबविली होती. शासन निर्णया नुसार भात पिकाची विमा संरक्षीत रक्‍कम ही रुपये-39,000/- प्रतीहेक्‍टर आहे व त्‍यावर शेतक-यांना भरावा लागणारा प्रिमियम प्रती हेक्‍टर रुपये-780/- एवढा आहे. तक्रारदारांनी किती क्षेत्राचा पिक विमा काढला तसेच किती रकमेचा विम्‍याचा हप्‍ता भरला या बाबत कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही.

     विरुध्‍दपक्ष क्रं 1 अॅग्रीकल्‍चर इन्‍शुरन्‍स कंपनी ऑफ इंडीया लिमिटेड विभागीय कार्यालय, मुंबई तर्फे पुढे असे नमुद केलेले आहे की, महाराष्‍ट्र शासनाचे उपरोक्‍त नमुद शासन निर्णयातील परिच्‍छेद क्रं 16 नुसार मा.आयुक्‍त कृषी महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांनी अधिसुचित क्षेत्रातील खरीप पिकांची पिक कापणी प्रयोगावर आधारीत सरासरी उत्‍पन्‍नाची आकडेवारी संबधित विमा कंपनीस दिनांक-31 जानेवारी, 2017 पर्यंत तुर, कापूस, कांदा या पिकांची सरासरी उत्‍पन्‍नाची आकडेवारी सादर करावी असे नमुद केले होते. तक्रारदारांची शेती सिलेगाव येथे असून ते सिहोरा महसूल मंडळात येते. विमा योजनेच्‍या तरतुदी नुसार मा.आयुक्‍त कृषी महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांनी अधिसूचीत क्षेत्रातील खरीप पिकांची सरासरी उत्‍पन्‍नाची आकडेवारी पिक कापणी प्रयोगा नुसार विमा कंपनीकडे सादर केलेली आहे, त्‍या आकडेवारी नुसार सिहोरा महसूल मंडळात घेण्‍यात आलेल्‍या अधिसूचित भात पिकाचे चालू हंगाम सरासरी उत्‍पन्‍न हे अंबरठा उत्‍पन्‍ना पेक्षा जास्‍त आढळून आल्‍यामुळे पिकाच्‍या उत्‍पन्‍ना मध्‍ये घट आढळून आली नाही म्‍हणून विमा योजनेच्‍या तरतुदी नुसार तक्रारदारांना भात पिकासाठी नुकसान भरपाई रक्‍कम देय नाही असे नमुद केले. मा.आयुक्‍त कृषी महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांचे सिहोरा मंडळातील भात पिकाचे खरीप 2016 चे सरासरी उत्‍पन्‍न आणि उंबरठा उत्‍पन्‍नाच्‍या प्रती ते उत्‍तरा सोबत नि.क्रं 6 व 7 प्रमाणे ग्राहक मंचाचे अवलोकनार्थ दाखल करीत असून त्‍यानुसार सरासरी उत्‍पन्‍न हे उंबरठा उत्‍पन्‍ना पेक्षा जास्‍त असल्‍याचे दिसून येत असल्‍याने नुकसान भरपाई देय होत नाही. महसूल मंडळ सिहोरा, तालुका तुमसर जिल्‍हा भंडारा यामध्‍ये भात या पिकाचे उंबरठा उत्‍पन्‍न प्रती हेक्‍टरी 1076 किलोग्रॅम आहे आणि चालू हंगाम सरासरी उत्‍पन्‍न प्रती हेक्‍टरी 1810.4 किलोग्रॅम आहे, त्‍यामुळे उत्‍पन्‍नातील घट हेक्‍टरी किलोग्रॅम काहीही नसल्‍याने नुकसान भरपाई देय होत नाही. अशाप्रकारे तक्रारदारांच्‍या सिहोरा, तालुका तुमसर, जिल्‍हा भंडारा या मंडळात भात पिकासाठी उत्‍पन्‍नात घट आढळून आली नसल्‍यामुळे विमा योजनेच्‍या तरतुदी प्रमाणे नुकसान भरपाई देय  होत नाही. तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे विमा केलेल्‍या भात पिकाचे किड व रोगराईपासून नुकसान झाल्‍याचे नमुद आहे, महाराष्‍ट्र शासनाचे शासन निर्णय मुद्या क्रं 10.5 मध्‍ये दिलेल्‍या जोखीम व्‍यतिरिक्‍त इतर कोणत्‍याही जोखीमीला वैयक्तिक स्‍तरावर पंचनामे करण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीची नाही. किड व रोगराई मुळे झालेल्‍या नुकसानीचे निर्धारण मा.आयुक्‍त कृषी महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांनी अधिसुचित केलेल्‍या क्षेत्रातील पिक कापणी प्रयोगावर सरासरी उत्‍पन्‍नाचे आकडेवारी नुसार होते, त्‍या आकडेवारी नुसार खरीप-2016 हंगामात सिहोरा महसूल मंडळातील भात पिकाचे चालू हंगामाचे सरासरी उत्‍पन्‍न हे उंबरठा उत्‍पन्‍ना पेक्षा जास्‍त असल्‍याने तेथे उत्‍पन्‍नात घट आढळून आलेली नाही म्‍हणून विमा योजने प्रमाणे झालेल्‍या पिकाचे नुकसानी बाबत  नुकसान भरपाई देय होत नाही, त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. शासन निर्णयातील विमा योजनेतील तरतुदी नुसार
कृषी आयुक्‍तालय मार्फत सादर करण्‍यात आलेल्‍या राज्‍य शासनाच्‍या पिक कापणी प्रयोगावर आधारीत सरासरी उत्‍पन्‍नाची आकडेवारी गृहीत धरण्‍यात यावी असे स्‍पष्‍टपणे नमुद आहे.

      विरुध्‍दपक्ष क्रं 1 अॅग्रीकल्‍चर इन्‍शुरन्‍स कंपनी ऑफ इंडीया लिमिटेड विभागीय कार्यालय, मुंबई तर्फे खालील नमुद मा.न्‍यायालयांचे निवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात आली-

       मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, दिल्‍ली यांचे समोरील रिव्‍हीजन पिटीशन क्रं.2393-2394/2008 अॅग्रीकल्‍चर इन्‍शुरन्‍स कंपनी –विरुध्‍द–नाईनसिंग व इतर आणि इतर पिटीशन मधील एकत्रित निवाडयामध्‍ये प्रकरणाची गुणवत्‍ता, त्‍याचे रसग्रहण करुन तसेच नेहमी पडणारे प्रश्‍न आणि त्‍यावर कृषी मंत्रालयाने दिलेले स्‍पष्‍टीकरण इत्‍यादी समजावून घेऊन तसेच प्रत्‍येक पक्षकारास योजनेच्‍या नियमावर आणि गुणवत्‍तेवर युक्‍तीवाद करण्‍यास पुरेशी संधी देऊन योग्‍य तो निर्णय घ्‍यावा असे नमुद केलेले आहे. विमा योजने अंतर्गत मा.कृषी आयुक्‍तालय, पुणे यांनी पिक कापणी प्रयोगावर आधारीत जाहिर केलेली आकडेवारी फक्‍त ग्राहय समजण्‍यात येते आणि त्‍या अहवाला नुसार नमुद तक्रारदारांना विमा योजने नुसार नुकसान भरपाई देय होत नाही.

  1. Writ Petition No.-2478/1992 Hon’ble  High Court of Bombay, Bench-Aurangabad.
  1. Writ Petition No.-973/2004  Hon’ble High Court of Bombay, Bench-Aurangabad.
  1.  First Appeal No.-FA/04/1904 Hon’ble State Commission Circuit Bench Nagpur.

     उपरोक्‍त मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडे हे जरी राष्‍ट्रीय कृषी विमा योजनेशी संबधित असेल तरी त्‍यामधील तरतुदी आणि प्रस्‍तुत तक्रारीं मधील पंतप्रधान पिक विमा योजने मधील तरतुदी या सारख्‍याच असल्‍याने सदर निवाडे या प्रकरणात लागू पडतात. या न्‍यायनिवाडयांचा थोडक्‍यात सारांश असा आहे की, संबधित विमा योजने अंतर्गत मा.कृषी आयुक्‍तालय, पुणे यांनी पिक कापणी प्रयोगावर आधारीत जाहिर केलेली आकडेवारी नुसारच नुकसान भरपाईचे निर्धारण होते व त्‍याप्रमाणे नुकसान भरपाई दिल्‍या जाते, पिक कापणी प्रयोगा व्‍यतिरिक्‍त इतर कोणत्‍याही आकडेवारीवर जसे आणेवारी इत्‍यादीवर विसंबून राहून विमा कंपनीला विमा रक्‍कम देण्‍याचा आदेश करणे योजनेतील तरतुदीचे विसंगत ठरेल व तसा आदेश न्‍यायालय देऊ शकत नाही.

     सबब वर नमुद केल्‍या प्रमाणे उपरोक्‍त नमुद तिन्‍ही तक्रारीं मधील तक्रारदारांनी तक्रारीतील केलेल्‍या मागण्‍या या मंजूर होण्‍यास पात्र नसून तक्रारी या खर्चासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे करण्‍यात आली.

04.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 दि भंडारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक शाखा सिहोरा, तहसिल तुमसर जिल्‍हा भंडारा (तक्रारदारांना पिक कर्ज देणारी बँक) आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 दि सेवा सहकारी संसथा धनेगाव, तहसिल तुमसर, जिल्‍हा भंडारा (विरुध्‍दपक्ष क्रं 3 सेवा सहकारी संस्‍थेचे मार्फतीने तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँके कडून कर्ज घेतले) यांना तक्रार निहाय रजिस्‍टर पोस्‍टाने ग्राहक मंचा तर्फे पाठविलेली रजि. नोटीस मिळाल्‍या बद्यल रजि. पोस्‍टाच्‍या पोच तक्रार निहाय दाखल आहेत परंतु ग्राहक मंचाची नोटीस मिळूनही विरुध्‍दपक्ष क्रं 2 आणि क्रं 3 हे ग्राहक मंचा समोर उपस्थित झाले नाही व त्‍यांनी लेखी उत्‍तर दाखल केले नाही म्‍हणून ग्राहक मंचाव्‍दारे तक्रार निहाय विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँक आणि विरुध्‍दपक्ष क्रं 3 सहकारी संस्‍था यांचे विरुध्‍द तक्रारी एकतर्फी चालविण्‍याचा आदेश नि.क्रं 1 वर  दिनांक-16.11.2018 रोजी पारीत करण्‍यात आला.

05.   उपरोक्‍त नमुद तिन्‍ही तक्रारीं मध्‍ये तक्रारदारांनी तक्रारनिहाय दिनांक-24.10.2016 रोजीचा प्रधानमंत्री पिक योजना पीक नुकसानी सुचना फार्मच्‍या प्रती ज्‍यावर ग्राम सेवक आणि इतर दोघांच्‍या सहया आहेत,  मौजा सिलेगाव, तलाठी साझा क्रं 15, तालुका तुमसर जिल्‍हा भंडारा नकाशा, गाव नमुना 8 (अ) च्‍या प्रती,  सन-2015-2016 या वर्षातील 7/12 उता-याच्‍या प्रती, मंडळ कृषी अधिकारी, सिहोरा, तालुका तुमसर, जिल्‍हा भंडारा यांनी तक्रारदारांचे शेत सर्व्‍हे नंबर, लागवडीचे क्षेत्र, नुकसानीचे क्षेत्र इत्‍यादी संबधात केलेला मौका तपासणी अहवाल, जो तालुका कृषी अधिकारी तुमसर जिल्‍हा भंडारा यांचेकडे सादर केला तो दिनांक-19/11/2016 रोजीचा अहवाल, दि भंडारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक मुख्‍यालय भंडारा यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 चे अमलबजावणी बाबत शाखा व्‍यवस्‍थापक सिहोरा यांना दिनांक-26.07.2016 रोजी दिलेले पत्र, तक्रारदांरानी विरुदपक्षांना रजि.पोस्‍टाने पाठविलेली नोटीसची प्रत व रजि.पोस्‍टाच्‍या पोच, विरुध्‍दपक्ष क्रं 1 अॅग्रीकल्‍चर इन्‍शुरन्‍स कंपनीने तक्रारदार यांचे वकीलांना दिनांक-02.05.2017 रोजी दिलेले नोटीसचे उत्‍तराची प्रत, विरुदपक्ष क्रं 2 बँकेचे वकीलांनी तक्रारकर्ता यांचे नोटीसला दिलेले दिनांक-31.05.2017 रोजीचे उत्‍तराची प्रत अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तक्रारदारां तर्फे तक्रार निहाय त्‍या-त्‍या तक्रारकर्ता यांची शपथपत्रे पान क्रं 127 ते 129 वर पुराव्‍या दाखल दाखल करण्‍यात आलीत.

06.    विरुध्‍दपक्ष क्रं 1 अॅग्रीकल्‍चर इन्‍शुरन्‍स विमा कंपनीने तक्रारनिहाय लेखी उत्‍तर पान क्रं 43 ते 52 वर दाखल केले. तसेच पान क्रं 53 वरील दस्‍तऐवज यादी प्रमाणे विमा योजनेस केंद्र शासनाने दिलेली प्रशासकीय मान्‍यता, कार्यरत मार्गदर्शक सुचना, मंडळ, मंडळगट तसेच तालुका किंवा तालुकागट यादी, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विरुदपक्ष क्रं 2 बँकेला दिनांक-26.08.2018 रोजी पाठविलेले पत्र, दिनांक-05 जुलै, 2016 रोजीच्‍या महाराष्‍ट्र शासनाच्‍या शासन परिपत्रक/निर्णयाची प्रत, सिहोरा महसूल मंडळाचे चालू हंगाम उत्‍पन्‍न, सिहोरा महसूल मंडळाचे उंबरठा उत्‍पन्‍न आणि तक्रारीचे उत्‍तरामध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांच्‍या न्‍यायनिवाडयांच्‍या प्रती दाखल केल्‍यात.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे पुराव्‍या दाखल शपथपत्रा संबधात त्‍यांनी प्रतिज्ञापत्रावर दाखल केलेल्‍या उत्‍तरालाच पुराव्‍याचे शपथपत्र समजण्‍यात यावे अशा आशयाची पुरसिस नमुद तक्रारीं मध्‍ये पान क्रं 132 वर दाखल केली.

07.    उपरोक्‍त नमुद तिन्‍ही तक्रारीं मध्‍ये  तक्रारदारां तर्फे वकील श्री विजय पारधी यांचा तर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री हितेश वर्मा यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

08.   तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या तिन्‍ही तक्रारी, तक्रारीं मधील विरुध्‍दपक्ष क्रं 1 अॅग्रीकल्‍चर इन्‍शुरन्‍स कंपनी, मुंबई यांनी दाखल केलेली उत्‍तरे, प्रकरणां मधील दाखल तक्रारदारांची शपथपत्रे तसेच तक्रारदार आणि विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे दाखल दस्‍तऐवजांचे मंचाव्‍दारे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले, त्‍यावरुन ग्राहक मंचा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्ये उपस्थित होतात-

अक्रं

मुद्या

उत्‍तर

01

तक्रारदार यांच्‍या पिक विमा योजने संबधातील तक्रारी पंतप्रधान पिक विमा योजनेतील अटी व शर्ती प्रमाणे  मंजूर होण्‍यास पात्र आहेत काय? 

-नाही-

02

विरुध्‍दपक्षांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-नाही-

03

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

                                                   कारण मिमांसा

मुद्या क्रं 1 ते 3 बाबत-

09.    उपरोक्‍त नमुद तक्रारदारांची शेती ही मौजा सिलेगाव येथे असून ते सिहोरा महसूल मंडळात येते या संदर्भात तक्रारदारांनी 7/12 उता-याच्‍या प्रती अभिलेखावर दाखल केलेल्‍या आहेत.  तसेच तक्रारदारांनी मंडळ कृषी अधिकारी, सिहोरा, तालुका तुमसर, जिल्‍हा भंडारा यांनी तक्रारदारांचे शेत सर्व्‍हे नंबर, लागवडीचे क्षेत्र, नुकसानीचे क्षेत्र इत्‍यादी संबधात केलेला दिनांक-19/11/2016 रोजीचा मौका तपासणी अहवाल जो तालुका कृषी अधिकारी तुमसर जिल्‍हा भंडारा यांचेकडे सादर केला तो अभिलेखावर दाखल केलेला आहे. त्‍याच बरोबर दि भंडारा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक मुख्‍यालय भंडारा यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 चे अमलबजावणी बाबत शाखा व्‍यवस्‍थापक सिहोरा यांना दिनांक-26.07.2016 रोजी दिलेल्‍या पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केलेली आहे, त्‍यानुसार तक्रारदारांची शेती, त्‍यांनी भातपिकाची केलेली लागवड, त्‍यांचे पिकाचे झालेले नुकसान या बाबी सिध्‍द होतात.

10.   नमुद तक्रारीं मधील  महत्‍वाची बाब अशी आहे की, तक्रारदारांचे भात पिकाचा विमा होता, त्‍यांनी माहे एप्रिल मे-2016 मध्‍ये प्रत्‍येकी रुपये-1.00 लक्ष रकमेचे पिक कर्ज घेतले होते व त्‍या संबधात विमा हप्‍त्‍याची रक्‍कम कपात केली होती ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेच्‍या वकीलांनी तक्रारदारांचे नोटीसला दिलेल्‍या दिनांक-31.05.2017 रोजी दिलेल्‍या लेखी उत्‍तरात मान्‍य केलेली असून सदर नोटीसचे उत्‍तर अभिलेखावर पान क्रं 33 व 34 वर दाखल आहे, त्‍यामुळे तक्रारदांराचे भात पिकाचा विमा होता ही बाब सिध्‍द होते. तसेच या उत्‍तरात परिच्‍छेद क्रं 7 मध्‍ये असेही नमुद केलेले आहे की, यामधील एक तक्रारदार श्री रामदयाल सेवकराम पारधी (ग्राहक तक्रार क्रं-सीसी/17/84) हे विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेत सध्‍या संचालक या पदावर आहेत, त्‍यापूर्वी ते बँकेत सचिव पदावर कार्यरत होते त्‍यामुळे त्‍यांना पिक विमा योजनेतील तरतुदींची पूर्ण कल्‍पना व जाणीव आहे. परंतु तक्रारदार श्रीरामदयाल पारधी यांनी ते विरुदपक्ष क्रं 2 बँकेत पदाधिकारी आहेत ही बाब तक्रारी मधून उघड केलेली नाही तसेच विरुदपक्ष क्रं 2 बँकेच्‍या नोटीस मधील उत्‍तरातील मजकूर नाकबुल केलेला नाही.

11.   ग्राहक मंचा तर्फे प्रकरणातील दाखल दस्‍तऐवजांचे तसेच शासन निर्णयाचे अवलोकन करण्‍यात आले, त्‍यानुसार  मा.आयुक्‍त कृषी महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांनी पिक कापणी प्रयोगा नुसार अधिसूचीत क्षेत्रातील खरीप पिकांची सरासरी उत्‍पन्‍नाची आकडेवारी विमा कंपनीकडे सादर केलेली आहे, त्‍या आकडेवारी नुसार तक्रारदारांची शेती असलेल्‍या  सिहोरा महसूल मंडळात घेण्‍यात आलेल्‍या भात पिकाचे चालू हंगामातील सरासरी उत्‍पन्‍न हे अंबरठा उत्‍पन्‍ना पेक्षा जास्‍त आढळून आल्‍यामुळे पिकाच्‍या उत्‍पन्‍ना मध्‍ये घट आढळून आलेली नाही म्‍हणून विमा योजनेच्‍या तरतुदी नुसार तक्रारदारांना भात पिकासाठी नुकसान भरपाई रक्‍कम देय नाही.

12.     विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मा.आयुक्‍त कृषी महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांनी सिहोरा मंडळातील भात पिकाचे खरीप 2016 चे सरासरी उत्‍पन्‍न आणि उंबरठा उत्‍पन्‍नाच्‍या प्रती उत्‍तरा सोबत ग्राहक मंचाचे अवलोकनार्थ दाखल केल्‍यात त्‍यानुसार तक्रारदारांची शेती असलेल्‍या भागात भात पिकाचे सरासरी उत्‍पन्‍न हे उंबरठा उत्‍पन्‍ना पेक्षा जास्‍त असल्‍याचे दिसून येत असल्‍याने नुकसान भरपाई देय होत नाही. ग्राहक मंचा समोरील अभिलेखावरील पान क्रं 96 वर दाखल महसूल मंडळ सिहोरा, तालुका तुमसर जिल्‍हा भंडारा या दस्‍तऐवजा मध्‍ये भात या पिकाचे उंबरठा उत्‍पन्‍न प्रती हेक्‍टरी 1076 किलोग्रॅम आहे आणि चालू हंगाम सरासरी उत्‍पन्‍न प्रती हेक्‍टरी 1810.4 किलोग्रॅम आहे, त्‍यामुळे उत्‍पन्‍नातील घट हेक्‍टरी किलोग्रॅम काहीही नसल्‍याने नुकसान भरपाई देय होत नाही.

13.  तक्रारदारांचे तक्रारी प्रमाणे विमा केलेल्‍या भात पिकाचे किड व रोगराईपासून नुकसान झाल्‍याचे नमुद आहे, महाराष्‍ट्र शासनाचे शासन निर्णय मुद्या क्रं 10.5 मध्‍ये दिलेल्‍या जोखीम व्‍यतिरिक्‍त किड व रोगराई मुळे झालेली नुकसानीचे निर्धारण मा.आयुक्‍त कृषी महाराष्‍ट्र राज्‍य पुणे यांनी अधिसुचित केलेल्‍या क्षेत्रातील पिक कापणी प्रयोगावर सरासरी उत्‍पन्‍नाची आकडेवारी नुसार होते, त्‍या आकडेवारी नुसार खरीप-2016 हंगामात सिहोरा महसूल मंडळातील भात पिकाचे चालू हंगामाचे सरासरी उत्‍पन्‍न हे उंबरठा उत्‍पन्‍ना पेक्षा जास्‍त असल्‍याने तेथे उत्‍पन्‍नात घट आढळून आलेली नाही म्‍हणून विमा योजने झालेल्‍या पिकाचे नुकसानी बाबत नुकसान भरपाई देय होत नाही, शासन निर्णयातील विमा योजनेतील तरतुदी नुसार कृषी आयुक्‍तालया मार्फत सादर करण्‍यात आलेल्‍या राज्‍य शासनाच्‍या पिक कापणी प्रयोगावर आधारीत सरासरी उत्‍पन्‍नाची आकडेवारी गृहीत धरण्‍यात यावी असे स्‍पष्‍टपणे नमुद आहे.

14.   ग्राहक मंचाचे मते या प्रकरणातील दुसरी बाब अशी आहे की, पंतप्रधान पिक विमा योजना ही केंद्र शासनाची असून ती राज्‍य शासनाच्‍या सहाय्याने त्‍या-त्‍या घटकक्षेत्रात राबविण्‍यात येते आणि त्‍यामुळे महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रक हे तक्रारदारांना लागू आहे, त्‍या शासन निर्णयाचे बाहेर जाऊन तक्रारदारांना कोणतीही नुकसान भरपाई लागू होत नाही. ग्राहक मंचाचे वतीने मा.उच्‍च न्‍यायालय, मुंबई खंडपिठ औरंगाबाद आणि मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर यांनी दिलेल्‍या न्‍यायनिर्णयाचे अवलोकन करण्‍यात आले, त्‍यानुसार  सदर मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांनी दिलेले न्‍यायनिवाडे हे हातामधील नमुद प्रकरणांना तंतोतंत लागू पडत असल्‍यामुळे तक्रारदारांच्‍या तक्रारी या खारीज होण्‍यास पात्र आहेत असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍याच बरोबर वर नमुद केल्‍या प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेने नोटीसचे दिलेल्‍या उत्‍तरात ग्राहक तक्रार क्रं-सीसी/17/84 मधील तक्रारदार श्री रामदयाल सेवकराम पारधी  हे विरुध्‍दपक्ष क्रं 2 बँकेत सध्‍या संचालक या पदावर आहेत, त्‍यापूर्वी ते बँकेत सचिव पदावर कार्यरत होते त्‍यामुळे त्‍यांना पिक विमा योजनेतील तरतुदींची पूर्ण कल्‍पना व जाणीव  असल्‍याचे नमुद केले. परंतु तक्रारदार श्रीरामदयाल पारधी यांनी ते विरुदपक्ष क्रं 2 बँकेत पदाधिकारी आहेत ही बाब ग्राहक मंचासमोर दाखल केलेल्‍या तक्रारीं मधून उघड केलेली नाही तसेच विरुदपक्ष क्रं 2 बँकेच्‍या नोटीस मधील उत्‍तरातील मजकूर सुध्‍दा नाकबुल केलेला नाही, त्‍यामुळे उपरोक्‍त नमुद तिन्‍ही तक्रारीं या खारीज होण्‍यास पात्र आहेत असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.   

15.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही उपरोक्‍त नमुद तक्रारींमध्‍ये  खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                                                   :: अंतिम आदेश ::

  1. उपरोक्‍त नमुद तक्रारदारांच्‍या विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे विरुध्‍दच्‍या तिन्‍ही तक्रारी या खारीज करण्‍यात येतात.
  2. निकालपत्राच्‍या प्रमाणित सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात. सदर निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार क्रं-सीसी/17/84 मध्‍ये लावण्‍यात यावी आणि प्रमाणीत प्रती ग्राहक तक्रार क्रं-सीसी/17/85 व सीसी/17/86  मध्‍ये लावण्‍यात याव्‍यात.
  3. तक्रारदारांना तक्रारीतील  “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.