नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावती अन्वये गुंतवलेली रक्कम मागणी करुनही परत दिली नाही म्हणून त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष श्री.अग्रसेन सह.पतसंस्था मर्या., धुळे (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतविली होती त्याचा तपशील खालील प्रमाणे.
मुदत ठेव पावती क्रमांक | ठेव रक्कम | ठेव दिनांक | देय रक्कम | देय दिनांक |
२८५८ | ५०००/- | २१/११/०३ | १०,०००/- | २१/११/०९ |
तक्रार क्र.२२९/११
३. तक्रारदार यांनी गुंतवलेल्या रकमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता पतसंस्थेने रक्कम देण्यास नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडून मुदत ठेव पावतीतील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
४. विरुध्द पक्ष यांना नोटीसची बजावणी झाली आहे. परंतू ते हजर झाले नाहीत म्हणून त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारित करण्यात आले.
५. तक्रारदार यांची तक्रार व विरुध्द पक्ष यांचा खुलासा यांचा विचार होता तक्रारीच्या न्यायनर्णियासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
१. तक्रारदार हे ग्राहक आहेत काय? होय.
२. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
३. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे? अंतिम आदेशा प्रमाणे.
४. आदेश काय? खालील प्रमाणे.
विवेचन
६. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांनी नि.५/१ वर मुदत ठेव पावतीची झेरॉक्स प्रत सादर केलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांच्या मुदत ठेव पावतीची रक्कम नाकारलेली नाही. मुदत ठेव पावती तसेच त्यातील रक्कम यांचा विचार होता तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
७. मुद्दा क्र.२- प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत रकमा गुंतवल्या होत्या ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे मुदत ठेव पावतीत गुंतवलेली रक्कम परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. परंतू मागणी करुनही रक्कम न देणे ही विरुध्द पक्ष यांची तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र.२ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
तक्रार क्र.२२९/११
८. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी दाखल केलेली मुदत ठेव पावतीतील रक्कम रु.१०,०००/- व व्याजासह होणारी रक्कम तसेच मानसिक त्रासापोटी रु.५०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.३०००- मिळावी अशी मागणी केलेली आहे. तक्रारदार हे विरुध्द पक्ष श्री.अग्रसेन सह.पतसंस्थ मर्या., धुळे यांचेकडून मुदत ठेव पावतीमधील व्याजासह होणारी रक्कम मिळण्यास पात्र आहेत. तसेच रक्कम परत मिळावी म्हणून तक्रारदार यांना पतसंस्था यांच्या विरुध्द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. सबब तक्रारदार हे अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रू.५००/- व मानसिक त्रासापोटी रु.५००/- वसुल होऊन मिळण्यास पात्र आहेत असे आम्हांस वाटते.
१०. मुद्दा क्र.४ - सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
२. श्री.अग्रसेन सह.पतसंस्थ मर्या., धुळे यांनी तक्रारदर यांना मुदत ठेव पावतीमधील मुदतअंती देय रक्कम व त्यावर देय तारखेपासून संपुर्ण रक्कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्के प्रमाणे व्याज या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
३. श्री.अग्रसेन सह.पतसंस्थ मर्या., धुळे यांनी तक्रारदर यांना मानसिक त्रासापोटी रु.५००/- तसेच अर्जाचा खर्च रू.५००/- या आदेशाच्या प्राप्तीपासून ३० दिवसाचे आत अदा करावेत.
४. वर नमुद आदेश क्र.२ मधील रकमेपैकी काही रक्कम अगर व्याज दिले असल्यास त्यावर कर्ज दिले असल्यास सदरची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे